आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
हा अनुभव इतरांचाही आहे का?>>>
हा अनुभव इतरांचाही आहे का?>>> हो... डेक्कनच्या मॅच मधे वानखेडेच्या नॉर्थ स्टॅण्ड मधे धुमाकूळ घालणारा प्रेक्षक वर्ग बघितलाय... तसाच अनुभव RCBच्या मॅच वेळी सचिन तेंडुलकर स्टॅण्ड मधे आला. विराट जेव्हा लॉंगऑन क्षेत्ररक्षणाला आला तेव्हा कॉलेज तरुणींनी तर कहरच केला होता. इतर मॅचेसच्या तुलनेत IPLच्या मॅचेस मधे वैयक्तीक शेरेबाजीला जास्त उधाण येते असा माझा तरी अनुभव आहे.
पण हे तर इतर ठिकाणीही थोड्याफार फरकाने होतच असते. DJच्या तालावर नाचणार्या तरुण प्रेक्षक वर्गा कडून यापेक्षा वेगळी अपेक्षा ती काय असणार.
बॉल अडवताना खाली बसतो ते नेहमीच विनोदी दिसते.>>> मुनाफने कुंबळे कडून दिक्षा घेतलेली दिसतेय. :p आज तर तो चक्क पॉईन्टला उभा होता.
>>> पण क्रिकेटपेक्षा
>>> पण क्रिकेटपेक्षा उनाड्क्या आणि टवाळक्या करायला आलेल्या काही झुंडींना बघून फार वाईट वाटले... सीमारेषेवर असलेल्या क्षेत्ररक्षकांना चिडवणे... चिअरगर्ल्सबद्दल अतिशय अर्वाच्य भाषा वापरणे... मुरलीसारख्या ग्रेट प्लेअरला वाट्टेल त्या हाका मारणे असे अनेक खेदजनक प्रकार बघायला मिळाले... आणि आजूबाजूला बसलेले सामान्य प्रेक्षकसुद्धा त्यांच्या काँमेंटसना हसून त्यांना एकप्रकारे प्रोत्साहनच देत होते
१९८४ मध्ये पुण्यातल्या नेहरू स्टेडियमवर इंग्लंड वि भारत हा एकदिवसीय सामना पॅव्हेलियनच्या बरोब्बर विरूद्ध दिशेला असलेल्या क्लब ऑफ महाराष्ट्रच्या पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून बघायचा दुर्मिळ योग आला होता. त्या सामन्यात वेंगसरकरने शतक व श्रीकांतने अर्धशतक केले होते. ४५ षटकांत २२५ धावांचा पाठलाग करताना सुरवातीला इंग्लंडचे ५-६ खेळाडू लवकर बाद झाले. नंतर गॅटिंगने कुठल्यातरी दुसर्या खेळाडूच्या साथीने हाणायला सुरूवात करून इंग्लंडला विजयाच्या जवळ नेलें. भारत सामना हरतो आहे हे पाहून निराश झालेल्या प्रेक्षकांनी एकदम बाटलीफेक सुरू केली. हिराबागेपाशी असलेल्या स्टँडमधून अचानक बीअरच्या तपकिरी बाटल्यांचा वर्षाव सुरू झाला. ३-४ मिनिटे खेळ थांबला. १-२ बाटल्या एका क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ जाऊन पडल्यामुळे पंचांनी दोन्ही संघांना आत नेले. त्यानंतर सुद्धा १५-२० मिनिटे क्षेपणास्त्रांसारख्या असंख्य बाटल्या स्टँडमधून मैदानात येत होत्या. काही वेळाने क्षेपणास्त्रे थांबली. हिराबागेच्या बाजूला मैदानात बाटल्यांचा खच पडला होता. नंतर कर्मचार्यांनी येऊन अनेक पोती भरून बाटल्या नेल्यावर खेळ पुढे सुरू झाला व काही वेळातच गॅटिंगने शतक करून इंग्लंडला सामना जिंकून दिला. २७-२८ वर्षानंतरसुद्धा हा सामना व बाटल्याफेक अजूनही लक्षात आहे.
मुम्बईने आज शहाणपणा करून
मुम्बईने आज शहाणपणा करून गिब्जला खेळविले. याआधी सलामीसाठी टी सुमन, लेव्ही, जेकब्ज, फ्रॅन्कलीन, ब्लिझार्ड असे अनेक प्रयोग झाले होते. पण आज शहाणपणा सुचला.
>>> बॉल अडवताना खाली बसतो ते नेहमीच विनोदी दिसते.
मुनाफचे क्षेत्ररक्षण व व्यक्तिमत्व अत्यंत गचाळ आहे.
मास्तुरे... ९६च्या
मास्तुरे... ९६च्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यात अशीच नामुष्की ओढवली होती. अशी बरीच उदाहरणे आहेत.
दिल्ली गंडलीय आजच्या
दिल्ली गंडलीय आजच्या मॅचमध्ये.... धोनीचा टॉस जिंकुन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय!
मास्तुरे, इंद्रधन्युष्य,
मास्तुरे, इंद्रधन्युष्य, तुम्ही म्हणताय ती उदाहरणे भारताचा पराभव पचवता न आल्यामुळे केलेल्या हुल्लडबाजीची आहेत.... अर्थात तेही समर्थनीय नक्कीच नाही... पण इथे प्रकार जरा वेगळा दिसला... उगाच आगाऊ (त्याहीपेक्षा हिडीस हाच शब्द जास्त योग्य आहे) कॉमेंटस करुन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचा हा प्रकार होता
कॉमेंटस करुन लोकांचे लक्ष
कॉमेंटस करुन लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचा हा प्रकार होता >>> अनुमोदन
काळ बदलला... खेळाचा प्रकार बदलला... मग प्रेक्षकही कसे मागे रहाणार. मी त्यांचे समर्थन करत नाहीय... असले प्रकार थांबविण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीला 'पॉवर'ची साथ पाहिजे.
आज चेन्नई जिंकले तर बंगळूर व
आज चेन्नई जिंकले तर बंगळूर व चेन्नई या दोघांचेही १५ गुण होऊन सरस धावगतीच्या आधारावर चेन्नई ४ थ्या व बंगळूर ५ व्या क्रमांकावर येईल. त्यामुळे १२ गुण असलेल्या राजस्थान व पंजाबची खूपच पंचाईत होणार आहे. ३ र्या क्रमांकावर असलेल्या मुम्बईला सुद्धा धोका आहे. मुम्बईला उर्वरीत ३ पैकी किमान १ सामना जिंकलाच पाहिजे. पण मुम्बईचे सामने राजस्थान, बंगळूर व कलकत्ता या बलाढ्य संघांशी आहेत. यावेळी उपांत्य फेरीसाठी खूपच चुरस आहे व प्रत्येक सामन्यागणिक चित्र बदलत आहे.
<< यावेळी उपांत्य फेरीसाठी
<< यावेळी उपांत्य फेरीसाठी खूपच चुरस आहे >>
भाऊ
भाऊ
मुनाफने कुंबळे कडून दिक्षा
मुनाफने कुंबळे कडून दिक्षा घेतलेली दिसतेय.>>> इंद्रा, हे एकदम बरोबर. मलाही तसा बसणारा कुंबळे व बाजूने निघून जाणारा बॉल आठवला
भाऊसाहेब,
भाऊसाहेब,
आजच्या सामन्यातले आकडे राहुल
आजच्या सामन्यातले आकडे
राहुल शर्मा : ३ षटकात ३१ धावा ० बळी
दादा : ४ चेंडूत २ धावा करून बाद
उत्तप्पा : ६ चेंडूत ६ धावा करून बाद
नाही म्हणायला नेहरूने अपवाद म्हणून खूपच चांगली गोलंदाजी करून ४ षटकात फक्त २३ धावा करून ३ बळी घेतले.
आज लाँगलेगला मारलेला एक फटका अडवताना दादाकडे पाहून त्याच्याविषयी अतीव करूणा मनात दाटून आली. रारॉने त्या फटक्यावर ३ धावा पळून काढल्या. दादाला तो फटका अडवताना वाकवत सुद्धा नव्हते.
जसा स्त्रीहट्ट, राजहट्ट, बालहट्ट असतो तसा हा दादाहट्ट! आपल्याला फलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व यातले काहीही जमत नसताना स्वतः खेळण्याच्या व इतर अपयशी खेळाडूंना वारंवार खेळवण्याच्या त्याच्या अट्टाहासाने पुण्याला जवळपास तळाला नेऊन ठेवले आहे. निदान शेवटच्या २ सामन्यात तरी इतरांना संधी न देता उत्तप्पा, स्वत:, राहुल शर्मा, नेहरू हे नेहमीचेच अयशस्वी खेळाडू त्याने खेळवून आपला दुराग्रह त्याने दाखवून दिला. परिणामी पुण्याची अवस्था ६ षटकांत ४ बाद ३३ अशी दारूण झाली आहे. तरी नशीब आज नेहराने चांगली गोलंदाजी केली आणि मनिष पांडे, पार्नेल हे इतर फ्लॉप्स आज बाहेर आहेत.
पण लागोपाठ सर्व सामन्यात दारूण पराभव होत असताना इतरांना अजिबातच संधी न देण्याच्या त्याच्या हट्टाला माझा कोपरापासून हात जोडून नमस्कार!
राजस्थान वि. पुणे: खुपच
राजस्थान वि. पुणे:
खुपच अपेक्षित निकाल
रहाणेचा परतलेला फॉर्म.....वॉटसनने दिलेला मॉमेंटम.... चंडीलाचा मॅच-विंनिंग स्पेल आणि बोथा-रहाणेने घेतलेला अफलातून कॅच ही राजस्थानच्या डावाची वैशिष्ठे.
परत एकदा चुकीची संघनिवड... स्थानिक खेळाडूंना नाकारलेली संधी.... एकेका ओव्हरचे स्पेल आणि स्मिथसारख्या परफॉर्मर खेळाडूला सातत्याने इतक्या खालच्या क्रमांकावर पाठवण्यासारखे अनाकलनीय निर्णय... आणि एकुणच खूप कॅज्युअल अॅप्रोच ही पुण्याच्या डावाची वैशिष्ठे.
आणि बॉडी लँग्वेजच सांगत होती
आणि बॉडी लँग्वेजच सांगत होती की आम्ही आपले पाट्या टाकतोय. स्मिथ वगैरेंसारखे एक दोन खेळाडू वगळता.
आज बर्याच दिवसांनी वॉरियर्स पाहिले. प्रत्येक मॅच मधे आधीच्या पेक्षा बेकार अवस्था दिसते. दादा तर केवळ आळशीपणा/संथपणा मुळे आउट झाला.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सुद्धा
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सुद्धा चांगले होते.... द्रवीड आणि गांगुली परत असे मॅचमध्ये एकत्र दिसतील का?
चंडीलाची मुलाखत पण छान होती.... त्याच्यामुळे बरेच दिवसांनी हिरवाणीचे नाव ऐकले.... आयपीएलने खरच स्थानिक खेळाडूंना खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलाय
१९०...डेक्कनने परत एकदा
१९०...डेक्कनने परत एकदा आव्हानात्मक धावसंख्या उभी केलीय.... आता त्यांच्या बॉलर्सनी ती डिफेंड केली म्हणजे मिळवली!
बोथा-रहाणे कॅच अफलातूनच
बोथा-रहाणे कॅच अफलातूनच होता... टोटल प्रेझेंस ऑफ माइंड... बोथानी कसला परपेक्ट थ्रो केल रहाणे कडे...
डेक्कन परत एकदा प्रचंड दुर्दैवी... बॉलर्सनी पार घालवली मॅच...
डेक्कन चार्जर्सनी पैसे नक्की
डेक्कन चार्जर्सनी पैसे नक्की कुठे खर्च केलेत? डेल स्टेन सोडला तर त्यांच्याकडे एक धड गोलंदाज नाही. अमित मिश्रा फार तर अर्धा धड आहे.
शिखर धवन आणि व्हाइट यांच्या फलंदाजीतील चांगल्या कामगिरीचा त्यांना अजिबात उपयोग करून घेता येत नाही.
--
शेन वॉटसनच्या समावेशामुळे राजस्थान रॉयल्स आणखीनच धोकादायक झालेत. किमान तीन फलंदाज अफलातून फॉर्मात.
चेन्नई, बंगलोर, राजस्थान आणि
चेन्नई, बंगलोर, राजस्थान आणि पंजाब अजुनही मुंबई, कोलकाता आणि दिल्लीला डावलून पुढे जाऊ शकतात.
गो फॉर इट.
राजस्थान, बंगलोर यांचा डेक्कन
राजस्थान, बंगलोर यांचा डेक्कन चार्जर्सविरुद्ध प्रत्येकी एक सामना बाकी आहे त्यामुळे यांना फायदा आहे .
>>> आयपीएलने खरच स्थानिक
>>> आयपीएलने खरच स्थानिक खेळाडूंना खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलाय
दुर्दैवाने महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या नशीबात या प्लॅटफॉर्मवर जागा दिसत नाही. श्रीकांत वाघ, हर्षद खडीवाले व धीरज जाधवला पुण्याने कुजवले. केदार जाधव कोणत्या संघात आहे याचा पत्ताच नाही. नाही म्हणायला पंजाबकडे एक सिद्धार्थ चिटणीस नावाचा खेळाडू अधूनमधून खेळताना दिसतो. तसं पाहिलं तर सचिन, अजिंक्य राहणे, झहीर खान व रोहीत शर्मा हे मुम्बई + महाराष्ट्राचे खेळाडू खेळताना दिसतात. आगरकर व पोवार पण दिसतात. पण ते मुळातच सुपरस्टार प्रकारातले असल्याने त्यांना जमेत धरता येणार नाही. पण इतर महाराष्ट्रीय स्थानिक खेळाडू मात्र कुजलेले आहेत.
>>> डेक्कन परत एकदा प्रचंड दुर्दैवी... बॉलर्सनी पार घालवली मॅच...
डेक्कनची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण भंगार आहे. फलंदाज जीव तोडून धावा बनवतात, पण गोलंदाज व क्षेत्ररक्षक सामना घालवितात. या स्पर्धेत डेक्कनने प्रथम फलंदाजी करून १७३, १८७, १९०, १९६ अशी मोठी धावसंख्या करून सुद्धा अवसानघातकी गोलंदाजीमुळे ते जवळपास सर्व सामने हरले.
Presenting the ever so
Presenting the ever so innocent Munap Fatel
(ट्विटरवरून)
मुनाफ अत्यंत मूर्ख गोलंदाज
मुनाफ अत्यंत मूर्ख गोलंदाज आहे. याला कशाला घेतात कोणास ठावूक. स्वत:च्या ३ र्या षटकांत लागोपाठ ३ नोबॉल आणि एक वाईड चेंडू टाकून तब्बल २१ धावा देऊन एकदम गणित बिघडवून टाकले. स्वत:च्या ४ थ्या व डावाच्या २० व्या षटकात तर त्याने फुल्टॉस व हाफव्हॉलींची खैरात करून तब्बल २४ धावा दिल्या. आज त्याची कामगिरी आहे ४-०-५५-१. त्याने गेलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली पण उरलेले २३ चेंडू वाईट टाकले. क्षेत्ररक्षण करतानाही सीमारेषेवर अत्यंत गलथान क्षेत्ररक्षण करून १ धावेऐवजी चौकार दिला. स्वतःची गोलंदाजी चोपली जात असताना हा मूर्खासारखा हसत होता. अतिशय वाईट परिस्थितीत असताना याच्या गोलंदाजीमुळे बंगळूरने १७१ धावांची मजल मारली.
आज मुनाफने शेवटच्या षटकात २४
आज मुनाफने शेवटच्या षटकात २४ धांवा देऊन वरचा चेहरा खरंच आपला आहे हें दाखवून दिलं !!!
गेल व कोहली स्वस्तात गेले असूनही राजस्थान १७१ -६ ! अगरवालची अप्रतिम खेळी ! मुंबईसमोर खडतर आव्हान.
आणि मुंबई जिंकलेलं आहे परत
आणि मुंबई जिंकलेलं आहे परत एकदा.. बंगलोर उरलेले दोन्ही सामने जिंकले तरच प्ले ऑफ्स मधे जाणार..
मुंबईने हातातून गेलेली मॅच
मुंबईने हातातून गेलेली मॅच खेंचून आणली; रायुडू व पोलार्ड कमालीचे खेळले !
मजा आली. रायडू नेहमीप्रमाणे
मजा आली. रायडू नेहमीप्रमाणे मदतीला धावून आला. आज पोलार्ड चक्क १०.५ षटके टिकला आणि नाबाद राहिला. सचिनचं अपयश बघवत नाहिय्ये. शेवटचा चौकार मारून सामना जिंकल्यावर बंगळूरच्या कुठल्या तरी खेळाडूची आणि मैदानात आलेल्या मुम्बईच्या खेळाडूंची काहीतरी भांडणे झाली. तिथेच प्रक्षेपण थांबविल्यामुळे ते समजलं नाही.
<< सचिनचं अपयश बघवत
<< सचिनचं अपयश बघवत नाहिय्ये. >> पण दादाने तें नेमकं हेरलंय; 'माझ्या धांवा होत नाहीत हे खरंय पण फक्त माझ्याच नांवाची अशी बोंब कां होतेय. अर्थात, मला गेलीं १५ वर्षं याची संवय झाली आहे', ही मखलाशी केलीच आहे त्याने आजच्या मुलाखतीत !!!
नाही बघायला मिळाली मुंबईची
नाही बघायला मिळाली मुंबईची मॅच..... इकडे चेन्नई विजयाच्या मार्गावर!
Pages