"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> जे कायद्यला धरून नाही त्यावर कारवाई व्हावी आणि कायद्याची अंलबजावणी हा राष्ट्रीय अजेंडा होऊ शकतो. चोरी भूखंडाची असो की हक्कांची.

भूखंड - हक्क याबद्दल स्पेसेफीक नाही, पण केवळ कोणी कायदा केला आहे म्हणुन तो पाळायला हवा असे नको. अनेक राज्यकर्ते कायद्यांद्वारे शोषण करतात.

चाणक्यशी सहमत. बरेचसे चाहतेच अशा लोकांना "मखरात" बसवतात आणि मग आपल्या अपेक्षेप्रमाणे ते वागले नाहीत की भ्रमनिरास होतो.

फारएण्ड....तुमचे तसेच चाणक्य यांचे मत जरूर पटते. पण दुसरीकडे आमीर इतका भोळा जरूर नाही की तो प्रवाहपतीत होईल. त्याचे पाय नक्कीच जमिनीवर राहतील, तितका तो समंजस (आजतरी) वाटतोय.

पुढचे काय होईल ते मि.काळच ठरवील. त्याला कधी 'मखरात' बसविलेले पाहण्याचे दुर्भाग्य आम्हाला लाभू नये इतकेच मी म्हणेन.

अशोक पाटील

लाच घेणार्ञा अधिकार्या विरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि त्या अधिकर्याला अटक झाली अशा बातम्या आपण बरेचदा वाचतो.
त्याच धर्तिवर ; आपल्य माहिती मधे असे एखादे clinic असेल जिथे लिंग निदान चालते तर
"या या doctor कडे लिंग निदान चालते " अशा तर्‍हेचिइ तक्रार आपण करु शकु का? तशी तक्रार कुठे करावी लागेल?

एखाद्या कुटुंबाने हा मार्ग पत्करला असेल तर त्यांना संबंध तोड्णे , लग्न इ कार्याला न बोलावणे असे काही करु शकतो . समाजाकडुन पण असे pressure यायला हवे ना.

( मला असे कोणी माहिती नाही , just loud thinking , आपण काय करु शकतो याबद्द्दल.)

@ चमन

सत्यमेव जयते हा कार्यक्रम तुम्ही पाहिला असेल तर स्त्री भ्रूण हत्या हा विषय समाजाच्या सर्व घटकांना स्पर्श करून जाणारा आहे असं मला तरी वाटतं. तेरा भागाच्या मालिकेमधे विषय निवडताना ते राष्ट्रीय अजेंड्यावर असतील असेच निवडले गेले पाहीजेत. देशातल्या सर्वच विषयांना तेरा भागात कसा काय हात घालता येईल ? ही तेरा उदाहरणं प्रत्येकाला आपली वाटतील अशी निवडली गेली तर मालिका प्रभावी होईल, आणि कुठल्याही समस्येकडे पाहताना कशा पद्धतीने दहा बाजूंनी विचार केला गेला पाहीजे इतकं तर ती नक्कीच शिकवून जाईल. पण राष्ट्रीय अजेंड्यावर जो विषय नाही तो गंभीर नाही असा यातून अर्थ कसा काय निघू शकतो ? असे वाट्टेल तसे अर्थ काढणा-यांशी ग्रूप डिस्कशन तर सोडाच कुठल्याही व्यासपीठावर चर्चा होऊ शकणार नाही.

तुमचा समजा उद्या आमीरने पायरसीच्या समस्येवर आमीरने एपिसोड केला तर पायरसी बंद होणार आहे का हा प्रश्न मला नकारात्मक तर वाटलाच पण काल्पनिक प्रश्न घेऊन जे त्याने सादर केलेलं काम आहे त्याला बगल मारून त्याचं महत्व उगाचच कमी करण्यासारखा वाटला. म्हणूनच हा प्रश्न तुम्हाला जर इतका महत्वाचा वाटतो तर तुम्ही कधी त्याबद्दल गंभीरतेने विचार केला का हा स्वाभाविक प्रश्न तुम्हाला विचारलाय. त्यात अ‍ॅडमिनला त्रास देण्यासारखं काही मला तरी दिसत नाही. बाकि तुमची इच्छा.

तुम्ही माझ्या पोस्टमधून तुम्हाला सोयीचे अर्थ काढू शकता, शब्दच्छल करू शकता.. मात्र त्यातून काही साध्य होणार नाही हे लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

मायबोलीवरील एक प्रथा
एक चांगला विचार्,प्रयत्न, एखाद्याची स्तुती अन मग नंतर त्यावर शब्दच्छल ,मग दोषारोपण अन मग लांडग्यासारखे तुटून पडणे किंवा निरर्थक चर्वितचर्वण करणे.
या विषयावर तरी असे व्हायला नको.

Lol तुमचेच प्रश्न आणि तुमचीच ऊत्तरे. चालू द्या.

तुम्हाला माझी आधीची पोस्ट कळली नाही (की वाचलीच नाही) हेच पुन्हा दुर्दैवाने म्हणावे लागतेय.

काही साध्य होणार नाही हे अगदीच कळाले.
तुमची नम्र विनंतीही सपशेल मान्य.

सोडून द्या तो विषय.

@ चमन खरंच सोडून द्या आता. तुमच्या पोष्टी समजण्याइतकी पात्रता इतरांच्यात नाही असं खुशाल समजा.

फक्त तेव्हढा येसेमेस पाठवायचं तरी बघा ब्वॉ ! आमीर खान भरून पावला असं म्हणेन.

एखाद्या कुटुंबाने हा मार्ग पत्करला असेल तर त्यांना संबंध तोड्णे , लग्न इ कार्याला न बोलावणे असे काही करु शकतो . समाजाकडुन पण असे pressure यायला हवे ना. >>>

नक्किच यायला हवे त्यांच्या ओळखिच्या लोकांकडुन. त्याबरोबर अशा लोकांचे पत्ते (पोस्टल पत्ता किंवा इमेल आयडी ) मिळाला तर अजुन बरे. त्यांच्या पत्यावर गेट वेल सुन म्हणुन पत्र पाठवायचे वगैरे काहि तरी उपक्रम करु या. फक्त doctor विरुद्ध मोहिम नाहि तर अशा लोकांविरुद्धही मोहिम काढायची आवश्यकता आहे.

आमीरने आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली. या प्रसंगी श्री. गेहलोत यांनी त्या दोन पत्रकारांच्या स्टिंग ऑपरेशनशी संबंधित सर्व खटले एकत्रित करून एकाच फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्याची मागणी मान्य केली आहे. तसंच स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राजस्थान सरकार करणार असलेल्या उपायांची माहितीही आमीरला दिली. भारतात ही बातमी सर्वांनी पाहिली असेलच.

प्रसंगी श्री. गेहलोत यांनी त्या दोन पत्रकारांच्या स्टिंग ऑपरेशनशी संबंधित सर्व खटले एकत्रित करून एकाच फास्ट ट्रॅक न्यायालयात घेण्याची मागणी मान्य केली आहे >>>>

आमिरने त्याच्याकडुन जेवढे होइल तेवढे नक्किच केले आहे. पण मला exactly अण्णा हजारे आणी रामदेव समोर सरकारने आधी ज्या पायघड्या घातल्या त्याची आठवण होते आहे . पुढच्या बारा भागात काय असेल आणी त्यानंतर काय होइल ते माहित नाहि. पण आज ndtv वरच्या चर्चेत आणी twitter वर संजय झा (hamara congress.com वाला) याने आमीरवर तोंड्सुख घेतले. भारतीय जनता यावेळेस तरी या सगळ्याला पुरुन उरेल आणी आमीरला पाठिंबा देवो अशीच देवाकडे प्रार्थेना आहे.

अमीर हा एक अती वलयांकीत व अती प्रसिद्ध सिनेनट आहे. त्याने टी व्ही वरच्या कार्यक्रमात का काम करायचे, अशी जळजळ, मळमळ असलेला धागा अजून का नाही निघाला?

असे बरेच कर्यक्रम आले अनि गेले...जनतेने चार दिवस वाह वाह केलि, दोल्यात अश्रु आनले, विरोध करु याचि शपथ घेतलि...पन चार दिवसानन्तर कुत्र्याच शेपूत्..वाकदे ते वाकदेच!

स्टारप्लसने युट्यूबवर टाकलेला ऑफिशियल व्हिडीओ आता अमेरीकेत पण दिसतोय.
हा भाग बघितला. कार्यक्रम अपेक्षेप्रमाणे चांगला निघाला.

राज मिचिगन
त्यात आपण (तुमच्या सहित) सर्वच -----मंडळी सामिल आहेत ना? मग हेच तर बदलायचे आहे. थोडी सकारात्मकता दाखवूया Happy

नंदिनीला अनुमोदन

>>आमिर खानने हा कार्यक्रम करण्याआधी स्टारला ज्या काही अटी घातल्या होत्या त्यानुसार त्याला रविवारी सकाळचाच स्लॉट हवा होता शिवाय दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रसारण व्हायला हवे होते

>कार्यक्रमाचा एकंदर स्वरूप लक्षात घेता आमिर खान (म्हणजे खरंतर त्याची पूर्ण टीम) टीव्ही या माध्यमाविषयी किती अभ्यास आहे आणी त्याचे सर्व परिणाम ते जाणून घेऊन आहेत हे बघून खरंच कौतुक वाटलं.

अगदी. दूरदर्शनचे राष्ट्रीय स्वरूप बघता (म्हणजे जिथे केबल नाही तिथे सुद्धा दिसणे) आमीरचा हा आग्रह किती योग्य होता ते लक्षात येतं.

विविध भारतीवर भारतीय वेळेप्रमाणे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता, आमिर खान श्रोत्यांशी संवाद साधणार आहे.
नेट्वर तो ऐकता येईल.

राज मिचिगन सगळे समाजसुधारक हाच विचार करुन गप्प बसले असते तर आज आपल्या माता भगिनी एवढ्या शिकल्या आहेत, बाहेर पडल्या आहेत त्या पडल्या नसत्या हो!

मुलगा हवा म्हणून कोणत्याही थराला जाणारे हे लोक... जर अशा कुटुंबात जन्माला आलेले मुल अपंग/disabled असेल तर? त्या बाळाचे अन त्याच्या आईचे किती हाल करतिल? (वेगळा विषय आहे...पण मला हा प्रश्न नेहमी पडतो Sad )

उत्तम कार्यक्रम ,धन्यवाद आमीर , भारतात ढोंगी समज-सेवक पुष्कळ आहेत ,पण खरीखुरी तळमळ असणारे आमीर सारखे विरळाच ,....
आमीरच्या कार्यक्रमाने लोकजागृती होवून स्त्री-भ्रूण हत्या सारखे अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात अशी अपेक्षा
यापुढे आमिरने पाणी टंचाई आणि गैर-व्यवस्थापन / सरकारी शिक्षनाचा खेळ-खंडोबा / बाल-मजदूरी /अंधश्रद्धा इत्यादी विषयावर हि जरूर कार्यक्रम करावे
जय हिंद ,जय भारत , सत्यमेव जयते ...

पोस्टी वाचल्या. आमीरकडून जेवढं करता येण्यासारखं आहे तेवढं तो करत असल्याचं दिसतंय. आपण समस, पत्रे इ ने त्याला सपोर्ट करायला हवा असं वाटतं.

Pages