योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.
जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..
आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...
पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs
ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE
रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3
पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm
पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4
पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg
अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949
www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059
मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
कर्नाटक सरकारने बंदी
कर्नाटक सरकारने बंदी घालण्याऐवजी समस्या समोर आणल्याबद्दल आमीरचे आभार मानायला हवेत.
<ती डोळ्यात काजळ घालणारी
<ती डोळ्यात काजळ घालणारी पत्रकार कोण हे कुणी सांगू शकेल का>
अशोक यांनी आधी लिहिलेच आहे. नलिनी सिंग या अरुण शौरी यांच्या भगिनी. त्यांनी कॅमेर्यात कॅप्चर केलेले बिहारमधले बूथ कॅप्चरिंग अजून लक्षात आहे. त्यांचा कार्यक्रम आंखों देखी . डी डी न्युजवर याच नावाचा कार्यक्रम अजूनही आहे. तो नलिनी सिंग करतात का ते बघावे लागेल.
होय....बिहारमधील ते बूथ
होय....बिहारमधील ते बूथ कॅप्चरिंग आजही जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर येते. बेमुर्वतखोरपणे कॅमेर्यापुढे येऊन आपली शस्त्रे परजणारे ते माफिया गुंड, ते हतबल हादरलेले, जवळपास निशस्त्र रडके दोनचार पोलिस, हल्ल्यानंतर सैरावैरा पळणारे दुबळे स्वयंसेवक आणि सर्वात दयनीय चित्र होते ते त्या बूथ ऑफिसरचे. जमिनीवर गडाबडा लोळून कॅमेर्यापुढे याचना करणारा तो वृद्ध सरकारी अधिकारी.
त्यावेळी शिक्का पद्धत होती, शिवाय रीपोलिंगचीही पद्धत नव्हती त्यामुळे त्या गुंडांचे फावत असे.
ओ री चिरैया नन्हीसी
ओ री चिरैया
नन्हीसी चिडिया
अंगना में फिर आ जा रे
अंधियारा है भरा और लहू से सना
किरनोंके तिनके अंबरसे चुनके
अंगना में फिर आ जा रे
हमने तुझपे हजारो सितम है किये
हमने तुझपे जहांभरके जुल्म किये
हमने सोचा नही , तू जो उड जायेगी
यह जमीं तेरे बिन सूनी रह जायेगी
किसके दमपे सजेगा मेरा अंगना
तेरे पंखोमें सारे सितारे जडूं
तेरी चूनर थनक सतरंगी बुनूं
तेरे काजलमें मैं काली रैना भरूं
तेरी मेहंदीमें मैं कच्ची धूप मलूं
तेरे नैनो सजा दू नया सपना
ओ री चिरैया, मेरी चिरैया
अंगना में फिर आजा रे
ओ री चिरैया
नन्ही सी चिड़िया
अंगना में फिर आजा रे
ओ री चिरैया
कार्यक्रम छान आहेच प्रभाव
कार्यक्रम छान आहेच
प्रभाव पडायला हवा !
अवांतर पोस्ट :
अवांतर पोस्ट : इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधे नलिनी सिंग यांनी नक्कीच टीव्ही मेडीयात आपला ठसा उमटवला आहे. अशाच प्रकारे टॉक शो मधून आपला ठसा उमटवणारे विनोद दुआ हे देखील दूरदर्शनचीच देणगी आहेत. त्यांचा जनवाणी हा कार्यक्रम विशेष गाजला. त्या कार्यक्रमात मंत्र्यांना बोलावून त्यांच्या खात्यासंदर्भात थेट प्रश्न विचारले जात. प्रेक्षकांतूनही आयत्या वेळचे प्रश्न यायचे. राजीव गांधी प्रधानमंत्री होते. दूरदर्शनच्या पडद्यावर दुआंच्या तिखट प्रश्नांना सामोरे जाताना मंत्र्यांची भंबेरी उडायची. त्यातून त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. किमान प्रश्नसंच तरी आधी पाठवा अशी फर्माईश होऊ लागली. सुरूवातीला राजीव गांधी दुआंच्या पाठीशी उभे राहील्याने मंत्र्यांची डाळ शिजली नाही. पण लवकरच काही कारणाने हा कार्यक्रम बंद पडला.
संसदेत त्याच दरम्यान फेअरफॅक्स प्रकरण, बोफोर्स प्रकरण असे विषय गाजत होते आणि प्रधानमंत्री कार्यालयावर जनवाणीत सुनावणी व्हायची होती..
कार्यक्रम चांगला आहे. उद्देश
कार्यक्रम चांगला आहे. उद्देश चांगला आहे. याबद्दल अजिबात दुमत नाही. वाईट इतकंच वाटतं की अशा प्रकारच्या (समाजसुधारक) उपक्रमांची सुरुवात चांगलीच होते, पण पुढे काहीच होत नाही. भ्रष्टाचार-लोकपाल यावर अण्णा हजारेंनी सुरुवात चांगली केली, पण आता काय चालू आहे ???
हाही कार्यक्रम चांगला आहे, त्या निमित्ताने थोडी जनजागृती होईल हेही मान्य. पण पुढे काय?? १३ एपिसोड प्रसारित करुन आमीर अजून प्रसिद्ध होईल. अजून गडगंज कमाई करेल. १३ एपिसोड संपल्यावर आपण १३ दिवस त्यावर चर्चा करु आणि नंतर आपापल्या कामात व्यस्त होऊ. आपल्या भारतात कायदे आहेत, पण त्यांची प्रामाणिक अंमलबजावणी होत नाही....फारच निराशावादी बोलतोय असं वाटेल, पण दुर्दैवाने असंच घडतंय.
मी वर उल्लेखलेल्या फेसबुक प्रतिक्रियेशी सहमत असण्याचं कारण हेच
करुन आमीर अजून प्रसिद्ध होईल.
करुन आमीर अजून प्रसिद्ध होईल. अजून गडगंज कमाई करेल..
त्यासाठी बनियन चड्ड्या आणि आयडियाच्या बिनडोक जाहीराती त्याला करता आल्याच असत्या. टॉक शो, रिअॅलिटी शो किंवा बिग बॉस मधे यापेक्षाही जास्त कमाई झाली असती असं नाही का वाटत ?
आमीर प्रसिद्ध नाहीये का ?
किरण नावाच्या व्यक्तीला आमीर
किरण नावाच्या व्यक्तीला आमीर बद्दल प्रेम वाटणारच की!
अरे लिंक देताय ना?
अरे लिंक देताय ना?
त्यासाठी बनियन चड्ड्या आणि
त्यासाठी बनियन चड्ड्या आणि आयडियाच्या बिनडोक जाहीराती त्याला करता आल्याच असत्या. टॉक शो, रिअॅलिटी शो किंवा बिग बॉस मधे यापेक्षाही जास्त कमाई झाली असती असं नाही का वाटत ?
आमीर प्रसिद्ध नाहीये का ? >>>> +१
तसही कुठतरी सुरूवात होते आहे हे नक्कीच सुखावह आहे. आपल्या कल्पनेपेक्षाही कितितरी भयानक प्रकार घडताहेत आणि हे जगासमोर येत आहे.
जामोप्या, प्लीज विषयांतर करू
जामोप्या, प्लीज विषयांतर करू नका.
मुलगी झाली तर त्याला बाई
मुलगी झाली तर त्याला बाई जबाबदार नसून पुरुष जबाबदार असतो. यावरून आठवलं माझ्या चुलत जावेला दुसरीही मुलगी झाली म्हणून माझ्या चुलत सासूबाईंनी खूप गोंधळ घातला होता . त्यावर वरील गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न केला तर चक्क मला आली खूप शहाणी म्हणून डोळे वटारून गप्प बसविल्याचं आज आठवलं . आज पुन्हा आमिरखानने तेच बोलून दाखवल्यावर मला इतका आनंद झाला म्हणून सांगू! माझ्या साबांना मुददामच कार्यक्रम पाहिलाका? आणि नसेल तर रीपीट टेलिकास्ट जरूर पहा म्ह्णून जोरात सांगितले..
इथे आहे बघा..
इथे आहे बघा.. http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs
शेवटचे गाणे तर अगदी सुंदर आहे.. http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE
वाईट इतकंच वाटतं की अशा
वाईट इतकंच वाटतं की अशा प्रकारच्या (समाजसुधारक) उपक्रमांची सुरुवात चांगलीच होते, पण पुढे काहीच होत नाही.>>>>>> सुरुवात झाल्यावर ते पुढे नेणं याची सुरुवात आपणच आपल्यापासुन करायची. कोणा ना कोणात काहितरी चांगला बदल घडत असेलच की.. एखादा त्याप्रमाणे वागेल, बर्याच जणांच्या डोक्यात त्या दॄष्टीने विचार व्हायला सुरुवात होइल.. हेही नसे थोडके.
टॉक शो, रिअॅलिटी शो किंवा
टॉक शो, रिअॅलिटी शो किंवा बिग बॉस मधे यापेक्षाही जास्त कमाई झाली असती असं नाही का वाटत <<
बर मग त्याने एका एपिसोडसाठी तीन कोट रुपये का घ्यावे. लोकांनाच्या भावनांना हात घालून स्वतःच्या तुंबड्या भरणे याव्यतिरीक्त कसलाही उद्देश या मालिकेपाठी नाही, जनजागृतीतर मुळीच नाही.
मित ~ समाजातील अशा प्रत्येक
मित ~
समाजातील अशा प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक भूमिकेतून वा दृष्टीने पाहू नये असे मी वयाने ज्येष्ठत्वाच्या नात्याने तुम्हास सांगू इच्छितो. "भारताने अग्नीबाण सोडला..... भारताने अमेरिकेच्या तोडीसतोडी वैज्ञानिक प्रगती केली..... भारताने वर्ल्ड कप जिंकला...." आदी बातम्याही आपण वाचत असतोच तेव्हा त्या बातम्याकडे 'यापेक्षा गावागावातून बेकारी वाढत चालली आहे, रोगराई आहेच, अन्नधान्याची अक्षम्य नासाडी होत आहे..' याकडे लक्ष दिले असते तर ?? अशा स्वरूपाचीही मते व्यक्त होत असतात. प्रत्येक गोष्ट 'यामुळे काय होईल ? क्या फर्क पडता है ?" या विचाराने पाहात गेल्यास जगणेच मुश्किल होऊन बसेल. थोडक्यात भारतच नव्हे तर जगातील अगदी समृद्ध समजल्या देशातूनही त्या त्या मातीतील प्रश्न हे सातत्याने उभे ठाकत असतातच. सदासर्वकाळ सगळीकडे 'आलबेल' अशी स्थिती कधीच असू शकत नाही.
त्यामुळे ज्यावेळी आमीरखानसारखा एरव्हीही गडगंज संपत्तीच्या राशीत लोळणारा कलाकार 'आपण या समाजापुढे काहीतरी विचारार्थ ठेवू शकतो ज्यायोगे सरकारही त्या प्रश्नांवर गंभीरतेने पाहायला पुढे सरसावेल....' असा विचार करून आपल्या नावाच्या वलयाचा लाभ त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी देत असेल तर त्याचा तो निर्णय स्तुत्य तर मानावाच, पण त्याचे ते करणे 'पैशा'त मोजूही नये.
आपल्या असलेल्या नसलेल्या कर्तृत्वाची भलीमोठी बॅनर्स रस्त्यारस्त्यावर लावणार्या सो-कॉल्ड समाजसेवकांपेक्षा आमीरसारख्या समाजाप्रती काहीतरी देणे लागतो ही भूमिका मनी ठेवून त्या अनुषंगाने वर्तन करणार्याला आपण शद्बरुपानेतरी प्रोत्साहन द्यावे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
अशोक पाटील
मुलगी झाली तर त्याला बाई
मुलगी झाली तर त्याला बाई जबाबदार नसून पुरुष जबाबदार असतो.
चूक... मुलगी असो वा मुलगा.... जबाबदार दोघेही असतात.
चिमुरी, अनुमोदन. अण्णा
चिमुरी, अनुमोदन.
अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आपल्याला दिसण्याजोगा परीणाम जरी झाला नसला तरी किमान एका तरी सरकारी अधिकार्याने त्याची धास्ती घेऊन लाच घेणं बंद केलं असलं तरी यशाची पहिली पायरी गवसलीच ना.
तसंच इथल्याच आधीच्या एका पोस्टीत कुणीतरी म्हटलंय....काल नवाशहरच्या एका अधि़कार्याने पण डोळ्यांत पाणी आणुन तेच म्हटलं की एका मुलीचा जीव वाचला तरी खुप मोठी गोष्ट आहे ती.
हा विडिओ फक्त भारतातच पाहू
हा विडिओ फक्त भारतातच पाहू शकता असा संदेश येतोय लिन्क वर क्लिक केल्यावर
दिखावा किती आणि खरंच किती
दिखावा किती आणि खरंच किती यापेक्षाही मला "हे पाहिल्यामुळे मला माझ्याकडून जमेल तेवढं 'चांगल्यासाठी' काहीतरी करावसं वाटतंय" असं वाटणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी या मालिकेला पैकीच्या पैकी गुण.
डॉ अगदी बरोबर मला ते नीट
डॉ अगदी बरोबर मला ते नीट शब्दात मांडता नाही आलं क्षमस्व पण मला वाटतं माझ्या भावना पोहचल्या सर्वांपर्यंत !!
हा विडिओ फक्त भारतातच पाहू
हा विडिओ फक्त भारतातच पाहू शकता असा संदेश येतोय लिन्क वर क्लिक केल्यावर
ओह्ह!
मग सगळीकडून दिसणारी एखादी लिंक देता का कुणी? ती टाकतो.
वर्षु ही लिंक ट्राय करून
वर्षु ही लिंक ट्राय करून पहा.
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
कार्यक्रम छान होता. नलिनी
कार्यक्रम छान होता. नलिनी सिंगचा हैलो जिंदगी कोणाला आठवत आहे का? जगजित सिंगचे शीर्षकगीत होते. सादरीकरणात तो कार्यक्रम उजवा होता.
डॉ : xx गुणसूत्र असेल तर
डॉ : xx गुणसूत्र असेल तर मुलगी xy असेल तर मुलगा . आईकडून नेहमी x गुणसूत्रच येतं तर वडिलांकडून येणारं गुणसूत्र x की y यावर बाळाचं लिंग ठरतं असं शाळेत शिकल्याचं आठवतंय. काही चुकीचं असेल तर सांगाल का?
भरत, बरोबर आहे तुमचं
भरत, बरोबर आहे तुमचं
चूक... मुलगी असो वा मुलगा....
चूक... मुलगी असो वा मुलगा.... जबाबदार दोघेही असतात.>>>> भरत तुमचं बरोबर आहे. पण मला असं वाटतय की डॉक्टरांना म्हणायचं आहे की मुल (मुलगी असो वा मुलगा) जन्माला घालायला आई आणि वडील दोघेही जबाबदार असतात. सायन्टिफिकली आणि नैतिकरित्या ती जबाबदारी दोघांचीही असतेच.
मित, तुम्ही आम्ही इथे बसून
मित,
तुम्ही आम्ही इथे बसून 'काय होणार!' असं म्हणत बसलो तर काहीच होणार नाही नक्की. आमिर खानने काही गोष्टी एकत्रित करून आपल्याला धक्का देण्याचे काम केले.. पुढे आपण काही करणार आहोत का? करणार नसू तर कार्यक्रमाने काय साधले हे म्हणायचा आपल्याला किती अधिकार आहे?
दुसरे म्हणजे अण्णा हजारे आणि आमिर खान यांची तुलना करण्यात अर्थ नाही. अण्णांचे सुरूवातीचे काम आणि आत्ताचे म्हणणे योग्य असले तरी प्रसिद्धीचा मोह त्यांनाही आवरलेला नाही. आमिर खान स्टार म्हणून प्रसिद्ध आहेच. त्या प्रसिद्धीचा अश्या समस्यांच्या संदर्भात जनजागृती होण्यासाठी उपयोग तो करत असेल तर वाईट काय?
दिखावा किती आणि खरंच किती
दिखावा किती आणि खरंच किती यापेक्षाही मला "हे पाहिल्यामुळे मला माझ्याकडून जमेल तेवढं 'चांगल्यासाठी' काहीतरी करावसं वाटतंय" असं वाटणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. त्यासाठी या मालिकेला पैकीच्या पैकी गुण.<<< +१०००००
Pages