योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.
जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..
आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...
पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs
ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE
रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3
पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm
पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4
पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg
अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949
www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059
मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
स्टींग ऑपरेशन करुनही काही फरक
स्टींग ऑपरेशन करुनही काही फरक पडला नाही, हे तर चिड आणणारे होते.>>>>> अगदी. वर या दोघा पत्रकारांना मात्र अजुनही कोर्टाच्या चकरा आहेतच. कधी कधी तर आमचंच अॅरेस्ट वॉरंट निघतं म्हणाले ते. खरच काय बोलावं यावर काही कळत नाही.
आपण स्वतः हे करणार नाही एवढ्यानेच पुरेसं होईल असं वाटत नाही. अशी मानसिकता असलेल्या लोकांशी किंवा असं केलेल्या लोकांशी तात्काळ संबंध तोडणे हे आपण सुशिक्षित समजणारे लोक करू शकतो का?>>>> नीधप अनुमोदन. असं काहीतरी करायला हवं.
म्हणजे मुलींची जास्त असोत वा कमी, त्यांना किंमत शून्य उलट त्यांनीच किंमत मोजायची - हुंड्याद्वारे किंवा मग बाजारात विकलं जाऊन. संताप येतो.>>>>> खरच संताप येतो.
दूरदर्शनवरच्या वर्ल्ड धिस
दूरदर्शनवरच्या वर्ल्ड धिस वीक, टर्निंग पॉईंट अशा कार्यक्रमाबद्दल असंच बोलूयात पुन्हा. ती डोळ्यात काजळ घालणारी पत्रकार कोण हे कुणी सांगू शकेल का ? तिने तिच्या अशा प्रकारच्या मालिकेत अनेक धाडसि वार्तांकनं केली होती. चंबळचे डाकू हा एक अभ्यासाचा विषय असू शकतो हे त्या कार्यक्रमात असंच कळून आलं होतं. आमीरची ही मालिका सेम तशीच आहे. अर्थात त्या वेळी अशा प्रबोधनपर कार्यक्रमांना मर्यादित प्रेक्षक होता हे ही वास्तव आहेच. असो.
स्टींग ऑपरेशन करुनही काही फरक
स्टींग ऑपरेशन करुनही काही फरक पडला नाही, हे तर चिड आणणारे होते.>>>>> अगदी. वर या दोघा पत्रकारांना मात्र अजुनही कोर्टाच्या चकरा आहेतच. कधी कधी तर आमचंच अॅरेस्ट वॉरंट निघतं म्हणाले ते. खरच काय बोलावं यावर काही कळत नाही.
या स्टींग ऑपरेशन केलेल्या केसेस पूर्ण राज्यात वेगवेगळ्या कोर्टात चालू आहेत..... त्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या तारखांना उपस्थित रहावं लागतं...... जर दोन सलग तारखांना अनुपस्थित राहिलं तर अरेस्ट वॉरंट निघतं..हा नेहमीचा शिरस्ता आहे...... अरेस्ट वॉरंट निघतं याचा अर्थ असा नव्हे की ती दोन पत्रकार दोषी आहेत.
त्या दोघा पत्रकारांनी जर
त्या दोघा पत्रकारांनी जर वैयक्तिक खटला भरला असेल, तर केवळ ते तारखेला हजर राहिले नाहीत, म्हणुन
खटला निकालात निघू शकतो. मूळात त्यांना हजर रहाणे अशक्य व्हावे, म्हणूनच ते खटले राज्यभरातल्या
कोर्टात दाखल झाले असावेत.
ज्या क्षेत्रात गुन्हा घडला, तिथेच खटले दाखल व्हावेत, असा नियम आहे.
यावर राजस्थान सरकारने काय निर्णय घेतला, ते लवकरच दिसेल.
मित, तुमच्या मित्राचं स्टेटस
मित, तुमच्या मित्राचं स्टेटस मेसेज टाकण्यामागची भावना समजू शकतो. पण एक गोष्ट अशी आहे की आमिर खान सारखा प्रसिद्ध व्यक्ती एक सामाजिक विषयावरचा कार्यक्रम सादर करतोय म्हटल्यावर आपोआप त्याचा प्रेक्षकवर्ग जास्त असणार. आणि दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केल्यावर परिणामही जास्त होणार (कुणावर ते सोडा).
असे कार्यक्रम पाहून 'मुलगाच हवा' हे डोक्यात घालून घेतलेल्या लोकांवर परिणाम होईल की नाही परमेश्वर जाणे.
ते सगळे खटले एकत्रित करून
ते सगळे खटले एकत्रित करून फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्यात यावेत ही आमीरची संयमित शब्दांतली मागणी योग्यच आहे. अनेक प्रकरणात अशा ट्रायल्स झालेल्या आहेत. आमीरच्या या आवाहनाला आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. पिटिशनऑनलाईन हा पर्याय काल मी सुचवला आहे.
मंदार आमीरने काल नवा शहरचं
मंदार
आमीरने काल नवा शहरचं उदाहरन दिलं होतं. तिथल्या कलेक्टरने त्याच्या कार्यक्रमपत्रिकेवर भ्रूणहत्येला प्राथमिकता दिली. शहरातल्या सर्व डॉक्टर्सना अशा चाचण्या बंद करण्याचे आवाहन केले. अन्यथा कारवाई होईल ही जाणीवही दिली. तसंच सगळ्या हॉस्पितल्सकडून गर्भधारणा झालेल्या स्त्रियांची माहिती घेऊन त्यांच्या अशा चाचण्या झाल्या का, झाल्या असल्यास आता त्यांची स्थिती कशी आहे हा ,मागोवा घेतला. आणि जिथे संशय आला तिथे धडक कारवाई करून काही डॉक्टरांना जेलमधे टाकल्यावर नवा शहरमधे हे प्रकार महिन्याच्या आत बंद झाले. सुशिक्षित लोक कारवाईला घाबरतात आणि भ्रूणहत्येमध्ये त्यांचंच प्रमाण जास्त आहे हे पाहता जागृती आणि धाक या दोन्ही मार्गाने हे प्रकार बंद करणारं उदाहरण पथदर्शकच म्हणावं लागेल. हे उदाहरण दिल्याने आमीरच्या म्हणण्याला पुष्टी आली. नवा शहरमधे होऊ शकतं मग संपूर्ण भारतात का नाही ?
'रजनी' [वर नीधप म्हणतात
'रजनी' [वर नीधप म्हणतात त्याप्रमाणे] रोजच्या शहरी समस्येमुळे अनिष्ट रितीने सर्वसामान्यांची 'आर्थिक' लुबाडणूक कशी करतात यावर भेदक नसले तरी खुसखुशीत भाष्य करीत असल्याचे दाखविले गेले होते [बासू चटर्जी यांची ती मालिका असल्याने हाताळणी तशी नर्मविनोदी असणे स्वाभाविक होते]....टॅक्सीवाले, गॅस पुरवठादार, रस्त्यावर मांडलेले लग्नमंडप, आवाज प्रदूषण, नळ जोडणी, किरकोळ दुकानदार, पोलिस चौकी.....आदी नेहमी सामोरे येणारे प्रश्न रजनीने मांडले आणि ते दूरदर्शनवर पाहणे लाखो प्रेक्षकांना भावण्याचे कारणही ती 'सामाजिक कार्यकर्ती' आमचीच दुखणी जाहीररित्या मांडत होती त्याचे अप्रुप खूप.
'सत्यमेव जयते' मधील प्रश्नाचे स्वरूप फार फार गंभीर स्वरुपाचे आहेत {इथून पुढेही ज्या समस्या आमीरने पटलावर घेतल्या आहेत त्याचा विचार करता} आणि त्याचे 'इफेक्ट्स' समाजालाच नव्हे तर दिल्लीलाही गंभीरतेने विचार करायला लावणारे आहेत हे तुम्हाआम्हाला या पूर्वीही जाणवत असेलच, पण एकमेव दूरदर्शन ते चॅनेल्स-सुकाळ या दीर्घ प्रवासात प्रथमच इतक्या संयत आणि प्रभावीरित्या ते संभाव्य परिणाम उत्तुंग इमारती, प्रशस्त बंगले ते झोपडपट्टीतही उपलब्ध असलेल्या छोट्या पडद्यावर सादर करून आमीर खान जे प्रशंसनीय कार्य करीत आहे तसेच त्याबद्दल त्यांचे आज जे प्रचंड जाहीर कौतुक होत आहे त्याला तो आणि त्याची टीम नक्कीच पात्र आहे.
आज झाडून सार्या वर्तमानपत्रातून या खर्याखुर्या रिअॅलिटी शो बद्दल जी अनुकूल मते येत आहेत ते पाहिल्यावर लोकांची नक्कीच अशा कार्यक्रमाची भूक वाढेल आणि तो 'ईडियट बॉक्स' आता 'अलार्मिंग बॉक्स' म्हणूनही ओळखला जाऊ शकेल.
अशोक पाटील
जर दोन सलग तारखांना अनुपस्थित
जर दोन सलग तारखांना अनुपस्थित राहिलं तर अरेस्ट वॉरंट निघतं..हा नेहमीचा शिरस्ता आहे...... अरेस्ट वॉरंट निघतं याचा अर्थ असा नव्हे की ती दोन पत्रकार दोषी आहेत.>>>> बरोबरे डॉक. ते दोषी नाहीतच. मला फक्त त्यांनाच होणारा हा अतिरीक्त त्रास अधोरेखित करायचा होता.( कदाचित नीट मांडायला जमलं नाही.)
>>नवा शहरमधे होऊ शकतं मग
>>नवा शहरमधे होऊ शकतं मग संपूर्ण भारतात का नाही ?
नक्की होऊदे
या खटल्यांचे स्वरुप काय आहे
या खटल्यांचे स्वरुप काय आहे ते बघावे लागेल. लिंगचाचणी हा गुन्हा आहे पण त्या डॉक्टरांनी कागदपत्रे
मात्र पुर्ण सावधगिरी बाळगूनच केली असणार. अशा चित्रीकरणाचा पुरावा म्हणून कितपत उपयोग होऊ
शकेल ?
बाकी काही नाही तरी त्या डॉक्टरांना मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगन्न्सी कायद्याची माहिती नक्कीच असणार.
काल दाखवलेल्या नकाशात आंध्र आणि कर्नाटकात बरी परिस्थिती दिसली.
होय आंध्र, कर्नाटकमधे चांगली
होय आंध्र, कर्नाटकमधे चांगली परिस्थिती आहे. मला तसं वाटलं नव्हत कारण आंध्र मधे हुंडा प्रकरण फार जोरात असतं. अगदी मुलीच्या जन्मापासुनच तिच्या लग्नाची तयारी सुरु होते.
मालिकेचे फक्त १३ एपिसोडच आहेत
मालिकेचे फक्त १३ एपिसोडच आहेत आणी ते बनवायला २ वर्ष लागली असे कळाले..
आणि कर्नाटक सरकारने म्हणे या मालिकेवर बंदी घातलेय!
कर्नाटकात बंदी का ?
कर्नाटकात बंदी का ? देवदासींवर कार्यक्रम करणार होता का, आमिर ?
"काल दाखवलेल्या नकाशात आंध्र
"काल दाखवलेल्या नकाशात आंध्र आणि कर्नाटकात बरी परिस्थिती दिसली...."
~ होय, पण काल रात्रीच एका बातमीत वाचले की कर्नाटक सरकार या मालिकेच्या प्रसारणावर [राज्यात] बंदी घालण्याचा विचार करीत आहे.
कारण ? कारण 'बेळगांव' मधील मुली विकत घेऊन त्यांची अन्य राज्यात लग्ने लावण्याचा प्रकार. त्यातही त्या एकाच मुलीवर घरातील चार-चार पुरुषांसमवेत राहण्याची सक्ती. ही माहिती कार्यक्रमातील एक स्त्री अधिकारी व्यक्तीच देत होती. कदाचित हा उल्लेख कर्नाटकाला खटकला असेल.
[मनिष झा च्या 'मातृभूमी' मध्ये हाच प्रकार दाखविला आहे....त्यावेळी बिहारमधील ते चित्र कित्येकाना अतिरंजीत वाटले होते, पण ते किती प्रखर सत्य आहे हे आता उमजते.]
अगदि बरोबर अशोकजी हेच कारण
अगदि बरोबर अशोकजी हेच कारण आहे, तिथे ह्या मालिकेवर बंदि घालण्याचे.
मग, बेळगाव सीमा वादावर पण
मग, बेळगाव सीमा वादावर पण महाराष्ट्रातून कार्यक्रम झालाच पाहिजे.
मागे एका व्हिडिओ
मागे एका व्हिडिओ डोक्युमेंट्री बद्दल वाचलं होतं. त्या डॉक्युमेंट्रीत स्त्री भ्रूणहत्येचा विषय होता. फिल्मची सुरूवात उत्तर भारतातल्या कुठल्याशा गावात होते. मूल जन्माची वेळ झालेली असते. पडदे लावलेले, सुईण घरीच बोलावलेली. स्त्री च्या चेह-यावरच्या वेदनांचा क्लोज अप आणि नंतर बाळाच्या जन्माची बातमी. लडकी उई है अशी कुजबूज ऐकू येते आणि त्या बाळाला उचललं जातं. शुभ्र कपड्यात लपेटलं जातं. मैदानात दूधाने भरलेलं एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्या दूधात त्या अर्भकाला अलगद सोडलं जातं......
गुजरात मधे मुलगी झाल्यावर तिला आख्खा लाडू चारला जातो. श्वास गुदमरून बाळ दगावतं. ही फिल्म दहा एक वर्षांपूर्वीची होती. त्या वेली हरियाणा स्त्री भ्रुण हत्येमधे पहिल्या क्रमांकावर होतं. पुढे या फिल्म मधे काल्पनिक कथा घेऊन मुलींचं प्रंमाण कमी झाल्यावर मुलगे कसे अविवाहीत राहतील, लग्नविषयक नव्या प्रथा कशा शुरू होतील हे दाखवलं गेलं होतं जे आज सत्यात उतरतंय.
या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दूरदर्शवर दाखवली गेली पण रात्री खूप उशिरा...
Kiran.... तुम्ही ज्या महिला
Kiran....
तुम्ही ज्या महिला पत्रकार [डोळ्यात काजळ] विषयी विचारले आहेत त्या 'नलिनी सिंग'.
"
वरील फोटोतील अरुण शौरी हे त्यांचे अधिकृत 'माहिती' पुरविण्यामागील प्रमुख सूत्रधार. नलिनी सिंग यांचे अगदी शुद्ध तुपातील हिंदी ऐकणे त्या कार्यक्रमाच्या दर्जाइतकेच प्रभावी असायचे.
धन्यवाद अशोकजी.. अरूण
धन्यवाद अशोकजी..
अरूण शौरीच्या त्या भगिनी आहेत हे आताच गुगळताना कळालं...
"मैदानात दूधाने भरलेलं एक
"मैदानात दूधाने भरलेलं एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्या दूधात त्या अर्भकाला अलगद सोडलं जातं......"
~ नेमका हाच प्रसंग 'मातृभूमी' चित्रपटाच्या सुरुवातीला दाखविला गेला आहे. एकाच घरातील पाच आडदांड वाढलेले ते नवरे आणि खुद्द सासरा....या सर्वांसाठी म्हणून १ लाख रुपये देऊन खरेदी केलेली ती अजाण मुलगी. क्षणोक्षणी अंगावर शहारे आणणारा हा चित्रपट..... एकट्यानेच बघण्याच्या पात्रतेचा.
अब्ब्ब्ब्ब्बबबब आमीरला एका
अब्ब्ब्ब्ब्बबबब आमीरला एका एपिसोडला तीन कोटी मिळणार आहेत.
मी जे वाचलं त्याप्रमाणे
मी जे वाचलं त्याप्रमाणे कर्नाटकात कानडीत डबिंग केलेल्या कार्यक्रमावर बंदी घातलीये कारण हिंदीमधून कानडीत डब करून कार्यक्रम दाखवण्याचा पायंडा पडेल आणि कानडी इंडस्ट्रीला धोका निर्माण होईल. याही कारणाला काहीही अर्थ नाहीये पण कन्टेन्टमुळे बंदी नाहीये असं वाटतं.
हो. हेच कारण आहे.. तिथे
हो. हेच कारण आहे.. तिथे कदाचित हिंदीत कार्यक्रम होउ शकेल
आमिरला हा कार्यक्रम सर्व
आमिरला हा कार्यक्रम सर्व दक्षिणी भाषात डब करुन प्रसारित करायचा होता. त्याला फक्त कर्नाटकात परवानगी मिळाली नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे दुरदर्शनवरही प्रसारण आहे.
मला आमीरने घेतलेल्या उपायाचं
मला आमीरने घेतलेल्या उपायाचं फार कौतुक वाटलं. कुठलीही एक बाजू उचलून न धरता (स्वतःला न्यायाधीश न समजता) त्याने भारतीय न्यायसंस्था केंद्रस्थानी राहिल असा तोडगा काढला (राजस्थान सरकारला पत्र लिहिणे - तेही त्या हत्या थांबवण्याबद्दल नव्हे, तर द्रुतगती न्यायालयामध्ये सगळ्या केसेस हलवणे यासाठी). आपल्याला जमेल ते आपण किती प्रभावीपणे करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण वाटलं मला.
बादवे, हा भाग सलग किम्वा पार्टमधे ज्या लिंकवर दिसतोय ती लिंक पुढील प्रतिसादात द्याल का कुणी? मी धाग्यावर अपडेट करेन.
स्टार प्रवाहवर पण दुपारी ४.३०
स्टार प्रवाहवर पण दुपारी ४.३० पासुन मराठी सबटायटल्ससह कार्यक्रमाचे पुन:प्रक्षेपण होते काल.
उत्तम कार्यक्रम. दोन वेळा
उत्तम कार्यक्रम. दोन वेळा पाहिला दिवसभरात आणि दोन्ही वेळा शहारायला झालं. शेवटच्या गाण्याला तर डोळे गळायचे थांबलेच नाहीत.
डॉ. महिलेची केस जास्त शॉकींग वाटली..कळस म्हणजे नवरा ऑर्थोपिडीक सर्जन आहे
त्या नंतर लगेच वस्त्रापुर मधल्या रस्त्यावरच्या खर्या अर्थाने शिक्षीत महिलेची मुलाखत..ग्रेट!....आपण का आपल्याला सुशिक्षीत म्हणतो हा प्रश्न पडला.
राजस्थान मधल्या त्या दोन पत्रकारांचे काम अगदी स्तुत्य. दाखवल्या गेल्या विडीयो क्लिप्स मध्ये हे काम करणारे डोक्टर्स ही महिलाच आहेत
मीत च्या मित्राच्या स्टेटस ची असहमत...गावोगावी..प्रत्येक लहानश्या घरातही हा कार्यक्रम पोहोचावा यासाठी एकत्र एवढ्या चॅनेल्स वर (दूरदर्शन) सह दाखवला जात आहे. त्या लोकांना फेसबूक तर सोडा..वृत्तपत्रांची 'लक्झरी' तरी परवडत असण्याची शक्यता कमीच.
प्रत्य्क शुक्रवारी रात्रौ ८
प्रत्य्क शुक्रवारी रात्रौ ८ वा. स्टार न्यूज वर या भागाचा परिणाम काय झाला याबद्दलचा आढावा खुद्द आमीर घेणार आहे. कार्यक्रमाचे नाव आहे असर..
"पण कन्टेन्टमुळे बंदी नाहीये
"पण कन्टेन्टमुळे बंदी नाहीये असं वाटतं."
~ सहमत. आत्ताच एन.डी.टी.व्ही. वर त्याबाबतचे वृत्त पाहिले. 'डबिंग' चा पायंडा तेथील मूळ इंडस्ट्रीजला धंद्याच्या दृष्टीने घातक शाबीत होईल असा पवित्रा तेथील व्यावसायिकांनी घेतल्याने सरकारने ते पाऊल उचलले.
अर्थात बेळगांव, सौंदत्ती, निपाणी आणि गदग ही चार नावे स्त्रीयांच्याबाबतीत 'त्या' संदर्भात वेळोवेळी चर्चेला येत असतात [त्यातही 'देवदासी' प्रकार] आणि तो प्रश्नही कर्नाटक सरकारच्या दृष्टीने हळवा बनल्याने त्याचा उल्लेख पहिल्या भागात घेतला गेल्याचे समजल्यावरून त्या सरकारने ती बॅन-अॅक्शन उचलली असावी असा मी कयास केला.
अर्थात 'दूरदर्शन' वरूनही 'सत्यमेव जयते' चे कर्नाटकात प्रसारण झाल्याची खात्री मी हुबळी येथील भाचीकडून करून घेतली आहे.
अशोक पाटील
Pages