"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच धक्कादायक आणि विचार/कृती करायला लावणारा भाग होता. समाजात ही विकृती आहे माहिती होते पण इतके प्रमाण असेल असे वाटले नव्हते. आमिरखानने परत एकदा प्रभावीपणे या विषयाची गंभीरता लोकांसमोर मांडली आहे.
मी इथे पाहिला. भारताबाहेरील लोक 'डेली मोशन' च्या लिंक वापरुन पाहु शकतील.

@मंदार कात्रे:

हा विषय तुम्हाला महत्वाचा न वाटायची कारण कळतील का? लहान मुलांच लैंगिक शोषण याबाबत असलेली आपल्या देशातील लोकांची मानसिकता अ..ति...श...य दांभिक आहे. दोन तासात कार्यक्रम बघते आणि दुसर्‍या धाग्यावर पोस्टी टाकते. बघायलाच पाहिजे!

‘सत्यमेव जयते’ने वाढवला नगरच्या ‘स्नेहालय’चा हुरूप!
नगर - कुण्या अर्भकाला वृत्तपत्रात गुंडाळून प्लॅटफॉर्मवर ठेवलेलं, तर कुणाला उकिरड्यावर कुत्र्यांच्या पुढ्यात टाकलेलं. कुणाला ओढ्यात, तर कुणाला काटवनात फेकलेलं...‘मुलगी नको’ म्हणून जन्मत:च ज्यांची अशी विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष जन्मदात्यांनीच केला, त्यातील काही भाग्यवान बालिकांना स्नेहालयच्या ‘स्नेहांकुर’मुळे नवं आयुष्य मिळालं आहे. अशा अश्राप मुलांसाठी काम करणा-या कार्यकर्त्यांचा हुरूप आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ मालिकेमुळे आता आणखी वाढला आहे.

लालबत्ती वस्तीतील मायभगिनी आणि त्यांच्या मुलांसाठी 1989 पासून कार्यरत असलेल्या स्नेहालयने सुमारे सहा वर्षांपूर्वी स्नेहांकुरच्या माध्यमातून स्त्री भ्रूणहत्येच्या प्रश्नावर काम करण्यास सुरुवात केली. अनौरस, बेवारस नवजात बालके, कुमारी माता, बलात्कारित महिला यांच्या पुनर्वसनासाठी स्नेहांकुर काम करते. समुपदेशन आणि संवाद या माध्यमातून मागील 5 वर्षांत 158 स्त्री भ्रूणहत्या रोखण्यात संस्थेला यश आले आहे.

नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील डॉ. आडकर बालसंकुलात स्नेहांकुर कार्यरत आहे. पालकांनी टाकून दिलेल्या अनौरस बालकांना इथे मायेची पाखर घातली जाते. अनेकदा नवजात बाळांना कच-यात फेकलेलं असतं. काही वेळा तर कुत्र्याने त्याचे चावे घेतलेले असतात. अपु-या दिवसांत जन्मलेली, अतिशय कमी वजनाची, अनेक आजार जडलेली ही मुलं जगवणं हे संस्थेपुढचं मोठं आव्हान असतं. आईविना असलेल्या या मुलांना नुसत्या औषधोपचारांची, दुधाची गरज नसते; तर त्यांना हवी असते माया, आपुलकीचा स्पर्श. या बाळांना हवे असतात प्रेमाची पखरण करणारे नवे आई-बाबा आणि उबदार घरकुल. स्नेहांकुरमध्ये आलेल्या 139 बालकांचं पुनवर्सन चांगल्या कुटुंबांत झालं आहे. अडचणीत आलेल्या सुमारे 155 मातांनाही संस्थेने मदतीचा हात दिला आहे. या बाळांची काळजी घेण्यासाठी 27 महिला (दाई) आहेत. डॉ. जयदीप देशमुख रोज येऊन मुलांची तपासणी व उपचार करतात. स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याबरोबर डॉ. प्राजक्ता, अजय वाबळे, कुंदन पठारे, बाळासाहेब वारुळे ही मंडळी स्नेहांकुरची जबाबदारी सांभाळत आहेत.

स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी स्नेहांकुर सध्या ‘मुलींना वाचवा, पाळण्यात सोडवा’ अभियान राबवत आहे. ज्या पालकांना होणा-या किंवा झालेल्या मुलीची जबाबदारी नको आहे, त्यांनी गर्भातच मुलीची हत्या न करता हे बाळ सुरक्षित हातात द्यावं हा यामागील हेतू आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पाळणे ठेवण्यात आले आहेत. नको असलेल्या नवजात मुलीला कुठेतरी फेकण्याऐवजी त्यांना या पाळण्यात ठेवा, जेणेकरून त्यांच्या प्रतिपाळाची पुढील व्यवस्था करणे शक्य होईल, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या अभियानासाठी संस्थेने 5 लाख प्रचारपत्रके जिल्ह्यात वाटली आहेत. मुलींचा जन्मदर सध्या आठशेपेक्षा खाली आला आहे. तो किमान 900 च्या पुढे नेण्याचा संस्थेचा मानस आहे. ‘सत्यमेव जयते’ मालिकेच्या पहिल्या भागात आमिर खानने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देशभरातील 5 लाख नागरिकांनी एसएमएस केले. पहिल्या पाच दिवसांतच 31 लाखांचा निधी गोळा झाला. या रकमेत रिलायन्सने तेवढीच रक्कम घालून मदतीचा हा धनादेश स्नेहालयला देऊ केला. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमुळे स्नेहालयच्या कामाची माहिती जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचली. ‘स्नेहांकुर’ला सध्याची जागा अपुरी पडते आहे. नवजात बालकांसाठी आवश्यक असणारे व्हेंटिलेटर्स व अन्य सुविधा असलेल्या दालनाची आवश्यकता आहे. ‘सत्यमेव’च्या मदतीतून हे उभे राहू शकेल...

आम्ही तर केवळ एंटरटेनर, खरे हीरो तुम्हीच आहात : आमिर खान - ‘आम्ही फक्त एंटरटेनर आहोत, रियल हीरो तुम्ही आहात...’ अशा शब्दांत आमिर खानने डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा गौरव केला. स्नेहालयच्या कामाचे कौतुक करून संस्थेला आपण नक्की भेट देऊ, असेही तो म्हणाला. ‘सत्यमेव जयते’मुळे स्त्री भ्रूणहत्येप्रश्नी जनजागृती झाली आहे. देशभरात त्याबाबत चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ही मदत देऊन तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, असा शब्द डॉ. गिरीश यांनी आमिरला दिला.

छान

Conscience, ethics, principles, sense of right and wrong हा काही आहे की नाही?? बर कायद्याला पण घाबरत नाहीत हे डॉक्टर्स??? कमाल आहे निगरगट्ट्पणाची!

http://content.ibnlive.in.com/article/19-May-2012india/woman-dies-during...

परळीच्या डॉ. मुंडेंची बातमी वाचली परत. अगदी संताप संताप झाला आपण ह्यात काहीच करु शकत नाही असे वाटून. ह्या डॉक्टर खूप हुषार आहेत पण त्यांनी आपली सगळी हुषारी चुकीच्या कामांमधेच वापरली.
एक उसतोड कामगार स्त्री पाचव्या वेळेला प्रेग्नंट राहीली अन पाचव्यांदाही मुलगीच आहे असे कळल्याने अ‍ॅबॉर्शन साठी अ‍ॅडमीट झाली. भूलतज्ञ नसताना ह्या डॉ. नी भूल देउन अ‍ॅबॉर्शन करताना बिचारी जीवाला मुकली Sad आता त्या चार मुलींचे काय?
ह्या डॉक्टर दांपत्याने परळी परीसरात जवळपास शेकडो एकर जमीन विकत घेऊन ठेवली आहे. ह्यांच्या फार्म हाउस वर ह्यांनी शिकारी कुत्रे पाळले आहेत जेणेकरुन पाडलेल्या गर्भाची विल्हेवाट लावणे सोपे जाते. गेल्या वर्षीच सात स्त्री गर्भ नाल्यात सापडले त्यावेळी ह्या डॉ. ना अटक झाली होती, सर्व मशिन्स सिल केले होते तरी परत तिच चूक करण्याची त्यांची किती हिंम्मत झाली !! हा प्रकार घडल्यानंतर परळीचे नागरिक दवाखान्यासमोर निदर्शन करत होते म्हणून डॉ. नी स्वतःला अटक करवून घेतली अन संध्याकाळपर्यंत ह्यांना जामिनही मिळाला. Sad

आजच्या वर्तमानपत्रात ही बातमी वाचली आणि अक्षरशः काटा आला अंगावर. या माणसांना डॉ. का म्हणावं? निर्घृणतेचा कळस आहे. संताप झाला अगदी. Angry

"गंदा है पर धंदा हे ये"
डॉक्टर आणि त्या डॉक्टरीनबाईच्या धंद्याच हेच सुत्र असले पाहीजे कदाचीत.

आम्ही कालच विचार करत होतो हि बातमी बघताना की या स्त्री भ्रूण हत्या करणार्‍या जवळपास सगळ्या गायनॅक महिला असतात, त्यांना हे कृत्य करवतं तरी कसं?

आत्ता आयबीएन लोकमतवर हे दाखवत होते. बीडचे पोलिस अधिक्षक अतिशय गुळमुळीतपणे बोलत होते याचा अर्थ सगळी यंत्रणा विकलेली आहे या मुंड्याला

हिरकणी, यूट्यूब दुव्याबद्दल धन्यवाद!

खरोखरंच वर्षा देशपांड्यांचं काम आणि हिंमत वाखाणण्याजोगी आहे. मुलाखतीत शेवटी त्यांनी म्हंटलंय तो भाग सारखा डोक्यात घुटमळतो, 'डॉक्टरांना कायद्याचं भय नसणं'. जनाची नाही तर मनाची तरी लाज असावी वगैरे फार वरवरचं झालं. मुळात हाती पैसा आल्यावर कायदा विकत घेता येतो हे समजल्यावर पुढलं सगळं सोपं झालं या अशा हरामखोरांसाठी!

वरती बर्‍याच जणानी लिहलेल्या प्रतिसादावरुन आणि वर्तमानपत्रातील बातम्यातुन असे कळते की हा कोणी मुंडे नावाचा डॉक्टर आणि त्याची पत्नी हे कोणीतरी राक्षस, सैतान या कॅटेग्रीतील व्यक्ती असावेत, मग प्रश्न हा पडतो की हा डॉक्टर आपली सर्व वैद्यकीय अस्त्रे-शस्त्रे घेऊन बाहेर पडत असावा, आणि गरोदर स्त्रीया दिसल्या की त्यांना आपल्या दवाखान्यात पकडून आणून त्यांचा गर्भपात करत होता आणि तो गर्भ कुत्र्याला खाऊ घालत होता की काय?
वरिल वर्तमान पत्रातील बातमीत कळते की, जवळ-जवळ तीन चार जिल्हातून आलेल्या लोकांच्या याच्या दवाखान्यासमोर नको असलेला मुलीचा गर्भ पाडून घेण्यासाठी रांगच रांग लागलेली असायची.

मग त्यारांगेत उभी रहाणारी जनता त्या डॉक्टर इतकीच या गुन्हात दोषी नाही का? त्या नको असलेल्या मुलीचा गर्भपात करुन वर समाजात उजळ माथ्याने फिरणारी ही जनता या गुन्हाला तितकीच जबाबदार नाही का?

जोवर समाजात या विषयावर समाजागृती होत नाही, तो पर्यंत असे एक ना अनेक डॉ. मुंडे तयार होतील. कारण त्यांच्या दरवाज्यात रांगा लावणारा समाज जो पर्यंत आहे तो पर्यंत नवजात मुलींच्या गळ्यात पडलेला हा गर्भपाताचा विळखा सुटणे अशक्य...!!

विजय , डॉक्टर त्या जनतेपेक्षा मोठा गुन्हेगार आहे. कारण त्याच्याकडे येणार्‍या जनतेपेक्षा तो 'डॉक्टर' कीची पदवी घेतली असल्याने व डॉक्टर होताना जी काही 'शपथ' घेतलेली असते त्यामुळे सामन्य माणसापेक्षा थोडा जास्त आदराच्या, जबाबदारीच्या स्थानावर जाऊन बसतो. त्या स्थानाला पुर्ण काळीमा फासून तो 'डॉक्टर' आहे हे विसरून पैसे घेऊन खून करणार्‍या किलर च्या रांगेत जाऊन बसतो तेव्हा लोकांना त्याचाच जास्त राग येणे साहजिक आहे.

समाज जागृती व्हायला अजुन १०० वर्षे लागतील तोपर्यंत तरी अशा डॉ वर कारवाई करणे हाच उपाय आहे.
जसे सतीच्या चालीविरूद्ध कायदा झाला नसता तर समाज जागृती होऊन ती चाल बंद व्हायला बराच काळ गेला असता.

बरोबर आहे डेलीया तुमचे, पण इथे पाडलेले गर्भशी त्या डॉक्टरचे कसलेही नाते नव्हते, उलट ज्यानी आपल्या रक्तामासाचा जीव त्या डॉक्टरकडुन पाडुन घेतला ते माता-पिता काय कमी दोषी आहेत. तेव्हां फक्त त्या डॉक्टरवर कारवाई करुन काहीच उपयोग होइल असे वाटत नाही. हा डॉक्टर नाही तर दुसरा कोणी, इथे खरे तर रोगावर उपचार करण्याची जरुरी आहे. ती मात्र होताना दिसत नाही.

इथे ह्या कथीत मुंडे नावाच्या डॉक्टरने, डॉक्टरकी हा पेशा नसुन त्याला स्वत:चा व्यवसाय(धंदा) बनविला आहे आणि जो पर्यंत त्याच्या दवाखान्याच्या बाहेर अश्या गिर्‍हाईकांची रांग लागत असेल, आणि या अशा बेकायदेशीर गर्भपात करुन घेण्यासाठी ३०-४० हजार रुपये देणारे माता-पिता असतील तो पर्यंत तरी हे थांबणे कठीण. कारण एक मुंडे गेला तर त्याची जागा घेणारा दुसरा कोणीतरी येणारच.

हा डॉक्टर नाही तर दुसरा कोणी, इथे खरे तर रोगावर उपचार करण्याची जरुरी आहे. ती मात्र होताना दिसत नाही. >>>> डॉक्टराने स्वतःची मानसिकता बदलणे हा देखील रोगावर उपचाराचाच भाग नाहि का ?

डॉक्टराने स्वतःची मानसिकता बदलणे हा देखील रोगावर उपचाराचाच भाग नाहि का ?<<

इथे लोक फार भावनीक होऊन त्यांचे विचार मांडताना दिसतात, मानसिकता डॉक्टरानेच का बदलावी, समाजाने का नको, जेंव्हा समाजाची मानसिकता बदलेल आणि डॉक्टरांच्या दवाखान्यासमोर गर्भपात करुन घेणारी पब्लिकच नसेल तेंव्हा हे असले प्रकार आपोआप थांबलेले दिसेल. जसे वर सती प्रथेविषयी डेलीया यांनी लिहले आहे.

डॉक्टरांच्या व्यावसायिक नीतिमत्तेत ते बसते का? व्यवसाय करताना प्रचलित कायदे पाळायला नकोत का? भावनिक नव्हे, व्यावहारिक प्रश्न आहे. ICMR काय करते?
गर्भलिंगचिकित्सा कायद्याने बंद आहे. गर्भपात केव्हा करता येतो याचे नियम आहेत.
उद्या एखाद्या श्रीमंत पेशंटच्या नातेवाइकांनी जास्त पैसे दिले म्हणून पैशासाठी त्या पेशंटच्या उपचारांत गडबड पाठवून एखाद्या डॉक्टरने त्याला मुक्ती दिली तर तो निर्दोष असेल का?

भरत मयेकर,

अहो, इथे विजय आंग्रे म्हणतात ती समाजजागृती हा दीर्घकालीन उपाय आहे. मुंड्यांसारख्या डॉक्टरांना शिक्षा करणे हा तात्कालिक उपाय आहे.

दोन्ही उपाय हवेत! Happy

आ.न.,
-गा.पै.

गापि , वरच्या पोस्ट्स सलग वाचल्यात जनजागृती नको असे कोणी म्हटल्याचे दिसत नाही.
सतीची प्रथा केवळ जनजागृतीने बंद पडली की सतीविरोधी कायद्याची भीतीने?

Pages