"सत्यमेव जयते" - भाग १ (Female Foeticide)

Submitted by आनंदयात्री on 6 May, 2012 - 03:43

योगायोगाने आमीरच्या नव्या 'सत्यमेव जयते' चा पहिला भाग बघायला मिळाला. आमीर म्हटल्यावर 'काहीतरी वेगळं' असणार, या आशेला सुखद बळकटी मिळाली.

जनजागृती आणि उद्याचा भारत घडवण्यासाठी प्रत्येक भारतीयाला केले जाणारे कळकळीचे आवाहन हा या मालिकेचा गाभा असेल असे वाटते. उद्याचा भारत घडवण्यासाठी आपणही काय काय करू शकतो, इतके दिवस 'सिस्टीम बदलली पाहिजे' वगैरे वगैरे अंतर्गत चर्चेतच येणारे विषय आता सार्वजनिक व्यासपीठावरून आमीर मांडेल असेही वाटतंय..

आपणही या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकतो का? माबोकरांना काय वाटतं या मालिकेबद्दल? या आणि अशाच प्रकारच्या पण सत्यमेव जयते याच मालिकेशी संबंधित गप्पांसाठी हा धागा...

पहिला भाग -
http://www.satyamevjayate.in/videos/#LBFEe1hZOgk
किंवा
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NG3WygJmiVs

ओ री चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगना में फिर आ जा रे - http://www.youtube.com/watch?v=_bv0Q9HTegE

रूनी ने दिलेल्या या काही लिंक्स -
पार्ट १
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqd3

पार्ट २
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqdm

पार्ट ३
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqe4

पार्ट ४
http://jannatserial.com/servicesdemo.php?id=xqmqeg

अस्चिगने दिलेल्या लिंक्स -
५७८२७११ वर Y केलत का टाईप?
स्नेहालयः अकाऊंट SJ-SHL
912010021691949

www.satyamevjayate.in
PO Box 37401
JB Nagar Post Office
Andheri (E), Mumbai 400059

मला अमेरीकेत http://www.dailymotion.com/video/xqn95a_satya-6may-1_creation
येथे पहाता आला शो.

सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजस्थान सरकारने ते खटले शीघ्र न्यायालयात चालवायची तयारी चालवली आहे. आमिर, मुख्यमंत्र्यांना त्या
संदर्भात भेटला होता.
आताच वेबदुनिया वर बातमी वाचली.

हा कार्यक्रम पाहून पुण्यातील एक कामवाली जी मराठी आहे, तिचा प्रतिसाद,

त्ये काय दाखिविता त्ये ठिक पण ह्यानला काय कळणार पोरीला लग्नात काय द्येयला लागतं ते. हुंडा बंद कराय्ला पायजेल आधी.

(हि खरी प्रतिक्रिया आहे एकीच्या कामवालीने म्हटलेली तिच्याच भाषेत.. तिच्या मते मुलीला मारण्या मागे अशा कारणांचा बंदोबस्तही करणे जरूरी आहे हे ती सुचवत होती?)

थँक्स बित्तुबंगा !
मुली जन्माला घालतील लोक पण तिला मिळणारी दुय्यम ट्रिटमेन्ट , बंधनं हे अत्ताच्या भारतात जसे चालु आहे तसे बकवास असु नये म्हणजे झालं !

>>त्ये काय दाखिविता त्ये ठिक पण ह्यानला काय कळणार पोरीला लग्नात काय द्येयला लागतं ते. हुंडा बंद कराय्ला पायजेल आधी.

हे अगदी बरोबर वाटलं. समाजात आज जी परिस्थिती आहे त्यावरूनच प्रत्येकजण उद्याची काळजी करतो. आज इथे बर्‍याच लोकांना वाटतंय की मुलगा आणि मुलगी मधे फरक करण्याची काहीच गरज नाही. पण ह्या विचारापर्यंत कसे पोचले ते? मला जी कारणं दिसतात ती म्हणजे

१. त्यांनी स्वतःच्या घरी असा भेदभाव पाहिला नाही
२. त्यांच्या सामाजिक वर्तुळात बहुसंख्य लोक असा भेदभाव करण्याच्या विरोधात आहेत
३. ह्या पलिकडे जाऊन स्वत: विचार करुन स्त्री-पुरुष दोघांकडे माणूस म्हणून पहावं असं त्यांना वाटलं.
४. ??

आज समाजात अशी किती माणसं आहेत जी वरीलपैकी कुठल्यातरी गटात बसतात? बरीच माणसं तर हुंडा/स्त्रियांना मिळणारी हीन वागणूक अश्याच गोष्टी बघत/अनुभवत आलेत. अशा माणसांना जर मुलगा हवा असं वाटलं तर त्याला तसंच कारण आहे असं नाही का? अर्थात, मी ह्या गोष्टीचं समर्थन नक्कीच करत नाही, पण जोपर्यंत वर्तमान बदलत नाही तोपर्यंत भविष्याच्या काळजीने मुलगा हवा असण्याची मानसिकता बदलणं अवघड आहे.

काही महाभाग घराण्याचं नाव पुढे चालावं वगैरे अशा कारणांसाठी मुलगा हवा म्हणतात - अश्या लोकांना काय आणि कोण समजावणार? आणि जे लोक थंड डोक्याने भ्रूणहत्या/नवजात बालिकेचा खून करू शकतात, अश्या लोकांपुढे सगळे वाद-प्रतिवाद/कायदे थिटे पडतात.

>> किरण..,
ह्यांच्या 7 May, 2012 - 20:59 पोस्टच्या १-६ मुद्द्यांना अनुमोदन.
---------------------------------
आता मुद्द्याकडे, मला एक प्रश्ण पडलाय की पुर्ण > ३०० (?) पोस्टस्मध्ये मध्ये अश्या पोस्ट वाचल्या की आपण काही तरी करु शकतो असे वाचले.

मग नक्की ते काय? 'आपण काहितरी करु शकतो' असे लिहिणार्‍यांनी आतापर्यंत काय केले? व कसे केले हे ही वाचायला बरे वाटेल. ते ह्या साठी की नुसत्या चर्चा'च' न झडता व दुसर्‍याला ह्यांव केले पाहिजे व त्यांव केले पाहिजे असे न करता अश्या प्रोग्रॅमचा खरोखर उपयोग होतोय कमीतकमी हे कळू शकते.

हा प्रोग्रॅम बघून पुढे कसे काय ह्या विषयावर आपल्या बाजूने काय करु शकता येते/केलेय आधी/ करायचा प्रयत्न केलाय ह्यावर पण येवु द्या आता पोस्ट.

किती लोकांनी समस(तरी) केलाय?

माझा छोटासा प्रयत्न, मी समस केला. कारण हा विषय जसा (पहिल्या भागात) हाताळला त्याला नक्कीच साथ द्यायल आवडेल.

>>राज मिचिगन सगळे समाजसुधारक हाच विचार करुन गप्प बसले असते तर आज आपल्या माता भगिनी एवढ्या शिकल्या आहेत, बाहेर पडल्या आहेत त्या पडल्या नसत्या हो!
@चाणक्य , +१००

अहो चाणक्य,
त्यांचे वय जेमतेम आठवडाभराचे! समाजसुधारणेचा इतिहास वाचायचे वय आहे का राज मिचिगन यांचॅ? हे तरी लक्षात घ्या.

<त्ये काय दाखिविता त्ये ठिक पण ह्यानला काय कळणार पोरीला लग्नात काय द्येयला लागतं ते. हुंडा बंद कराय्ला पायजेल आधी<>

हुंडा देणं चूक आहेच. पण ज्यांची हुंडा द्यायची ऐपत आहे असे लोकही मुलगी नको का म्हणतात? (त्या कार्यक्रमातली जुळ्या मुलींची डॉक्टर आई आठवली?)

मुलगा-मुलगी यांना आहार, शिक्षण, अर्थार्जन, आर्थिक स्वावलंबन यांच्या समान संधी या पुढच्या पायर्‍या. कोणताही निर्णय मुलीच्या सहभागानेच घेतला जाईल अशी सवय लग्नापूर्वीच लावायला हवी. आपल्या आजूबाजूच्या लोकांना या गोष्टी बोलून दाखवून, प्रसंगी वाईटपणा पत्करून, दुसर्‍यांच्या भानगडीत नाक खुपसणे हा सद्गुण मानून आपणही आपला वाटा उचलू शकतो.

भरत, या बाबतीत आपल्याकडे "पराया धन" हि कल्पना फार खोलवर रुजली आहे ( या नावाचा चित्रपट पण होता. हेमामालिरा, राकेश रोशनचा ) काय करायचं मुलीला शिकवून. शेवटी दुसर्‍याच्या घरीच द्यायची, असे
म्हणणारे लोक आजही सापडतात.

मायबोलीवर अशा अनेक सभासद आहेत ज्या आपल्या लेकीला, अत्यंत कौतुकाने आणि जबाबदारीने
वाढवत आहेत. त्या सर्व मैत्रिणींना, खरंच सलाम करावासा वाटतो.

हुंडा देणं चूक आहेच. पण ज्यांची हुंडा द्यायची ऐपत आहे असे लोकही मुलगी नको का म्हणतात? (त्या कार्यक्रमातली जुळ्या मुलींची डॉक्टर आई आठवली?)
------- नको या मानसिकतेला अनेक कारणे, गैरसमज, अनिष्ट प्रथा आहेत पैकी हुंडा केवळ एक आहे. मी जेथे वाढलो तेथे मुलाला 'ब्लँक चेक' आहे असे समजले जायचे... या प्रश्नाच्या मुळाशी निव्वळ आर्थिक कारण नाही आहे. माझे निरीक्षणः

समाजांत दुय्य्म स्थान मिळणे, बाहेर (समाजांत) अनोळखी लोकां कडुन होणारा जाच कधी अवहेलना, दरदिवशी रस्त्याने एकट्या स्त्रीला जातांना किमान ५ कॉमेंटस आणि ३ धक्के खावे लागतात, बस लोकलचा प्रवास असेल तर जास्तच.... :राग:. प्रत्येक धक्क्याला भांडायचे म्हटले तर काही तास किंवा तो दिवस खराब जातो... दुर्दैवाने एखादीला काही प्रसंगांना सामोरे जावे लागले तर समाजाकडुन संपुर्ण दोष हा त्या स्त्रि लाच मिळतो आणि घटनेत स्त्रीचीच चुकी आहे अशा पद्धतीने तिला समाजाकडुन वागणुक मिळते. सर्वात मुर्खपणा म्हणजे स्त्री म्हणजे 'घरकी इज्जत' असा समज. बाब्या सायंकाळी ८ पर्यंत परतला नाही तरी आई-वडिलांना तुलनेने 'तेव्हढी' काळजी नसते (असते पण घरकी इज्जत दावणीला बांधलेली नसते).

स्त्रीचा लढा हा पोटात असल्यापासुन सुरु होतो.... पुढे दर दिवशी तिला लढायचेच असते. माणुस हा अनुभवाने शहाणा होतो, वरिल काही (हे सर्व कारणे नाही आहेत, निव्वळ एका विभागाचा विचार करु नका) गोष्टींचा सामना केलेल्या स्त्रीची मानसिक स्थिती कशी बनत असेल?

आत्ता आकाशवाणीवर आमीर खानची बातचीत ऐकली.
१) एखाद्या स्त्रीला मुलीच होतात याकारणासाठी तिला कमी लेखणे अयोग्य आहे. पोटातला गर्भ मुलाचा की मुलीचा हे पित्याच्या वीर्यातून येणार्‍या जनुकावर ठरते, त्यामुळे कमी लेखायचेच तर त्या पित्याला लेखावे असे तो म्हणाला.
हे प्रतिक्रियात्मक असले तरी गैर वाटले. अर्थात संपूर्ण कार्यक्रमात मुलगा-मुलगी एकसमान या मुद्द्यावर भर होता. वृद्धमातापित्यांची जबाबदारी (विशेषतः सेवाशुश्रुषेची) उचलणार्‍या अपत्यांत मुलींचे प्रमाण जास्त असते असे (सत्यमेव जयते-ला)पाहणीत आढळले .
मुलगी जन्मभर आपली पण मुलगा त्याच्या लग्नापर्यंतच आपला, मग बायकोचा अशा अर्थाची एक म्हण एका श्रोत्याने सांगितली. (मातृसत्ताकाकडे परत?)
मुली आईवडिलांची देखभाल करतात, त्यांना बाकीचे हक्क असतात तसाच अंत्यसंस्काराचाही हक्क हवा, असे आपल्या वडिलांची अंतिम क्रिया केलेल्या एका श्रोता महिलेने सांगितले.

याच एका गोष्टीबद्दल तो परवाचा कार्यक्रम कमी पडला असे वाटले. या दाखवलेल्या वाईट गोष्टी करण्यामागचे त्या त्या लोकांचे हेतू (मोटिव्ह) कोणते कोणते आहेत याची फारशी चर्चा बघितली नाही (पहिला थोडा भाग हुकला होता माझा). हुंडा, स्त्रियांची सुरक्षितता किंवा इतर कोणती कारणे आहेत त्याची माहिती दिसली नाही.

परंपरांचा पगडा हे एकच कारण असू शकते (निपुत्रिका, मोक्षप्राप्त,इ.इ., आर्थिक , मुलगी म्हणजे घराण्याची अब्रू सांभाळण्याचा जाच ही कारणे आहेत ). पण कारणे समोर मांडून त्यांचीही चीरफाड झाली नाही हे खरे.
एका श्रोत्याने त्याला दुसर्‍यांदा कन्याप्राप्ती झाल्यावर एका उच्चशिक्षित उच्चपदस्थ व्यक्तीने 'होनी कोकौन टाल सकता है' असे सांत्वन केल्याचे सांगितले.

एका श्रोता महिलेने सांगितले की अ‍ॅबॉर्शनमध्ये नुसत्या लिंगपरीक्षणापेक्षा जास्त फायदा असल्याने काही डॉक्टर्स तर मुलाचा गर्भ असला तरी मुलीचा आहे असे सांगून गर्भपात करवून घेतात.

पोटातला गर्भ मुलाचा की मुलीचा हे पित्याच्या वीर्यातून येणार्‍या जनुकावर ठरते, त्यामुळे कमी लेखायचेच तर त्या पित्याला लेखावे असे तो म्हणाला. हे प्रतिक्रियात्मक असले तरी गैर वाटले. >>>>>>>>>

कमी लेखायचेच - यातील "चेच" यावर फार मोठा भर आहे असे वाटते. कमी लेखायचे काहिच कारण नाहि, पण हे ज्यांना सांगुन समजत नाहि त्यांनी एवढे तरी समजुन घ्यावे आणी मातेला दोष देउ नये असे त्याचे म्हणणे आहे.

 

दुसरा धागा काढा.

आजचा विषय तेवढाच महत्वाचा होता. salute आमिरखानला. त्याने शेवटी जे workshop घेतले ते खरोखर चांगले होते. कमी वेळेतहि ज्या पद्धतीने तो सर्व बसवतो आहे त्याबद्दल कौतुक आहे. आणी नंतरचे गाणे ... अप्रतिम!
-- child abuse चे बिल पडुन आहे गेले १ वर्ष राज्यसभेत आमीर त्याबद्दल पाठपुरावा करणार आहे

आंग्रे . जरा आधी रीना आणी इरा यांच्याशी बोलुन घ्या, अथवा तुम्हि जेथुन हे copy केले त्यांना बोलायला सांगा

http://daily.bhaskar.com/article/ENT-aamirs-special-gesture-for-beti-ira...

http://wonderwoman.intoday.in/story/When-ex-spouse-turns-best-buddy/3/83...

अशा कितीतरी बातम्या आहेत पण हा विषय नाहि तेव्हा हवेतर दुसरा धागा काढा याबद्दल. आपण बोलु.

आजचा एपिसोड पहिला .पण पहिल्या भागा इतका चांगला नाही वाटला , यापेक्षा महात्व्वाचे विषय असू शकतात >>> बापरे! Are you serious?

छान

आजचा एपिसोड पहिला .पण पहिल्या भागा इतका चांगला नाही वाटला , यापेक्षा महात्व्वाचे विषय असू शकतात >>> >>>>>

यापेक्षा महात्व्वाचे विषय ???? ५३% ! कात्रे साहेब तुम्हि इपिसोड पाहिला असेल तर हा आकडा तुम्हाला समजला नाहि का तुम्हि विसरलात ?

मी आज एपिसोड पाह्यला नाहीये. रात्री पाहीन. पण 'लहान मुलांचे लैंगिक शोषण' हा विषय कमी महत्वाचा वाटणार्‍यांच्या डोळ्यावर कसली झापडं लावली आहेत?
एक काम करा पिंकी विराणी यांचे 'बिटर चॉकलेट' नावाचे पुस्तक आहे ते जरा वाचा. मराठीत अनुवादही उपलब्ध आहे.

आजचा भाग पाहिला- अत्यंत व्यथित अंतःकरणाने पाहिला आणि हा भाग तसे पाहू गेल्यास वैश्विक समस्येबद्दल आहे. जपानी, जर्मन अन कोरीयन ( ही प्रातिनिधिक म्हणून देशांची नावे दिली आहेत्-इतरही आहेतच) नागरिक या प्रकारच्या विद्रूपतेने व विकाराने लिप्त आहेत व हा एक व्यवसायाचे स्वरूप होवून बसला आहे.
शॉकिंग आहे -याच्याशी सामाजिक ,आर्थिक स्तराशी काहीही संबंध नाहीये. ही विकृती व मानसिकता आहे-ही वृत्ती कशी निर्माण होते यावरही काही कोणी प्रकाश टाकू शकेल का? लैंगिक विकृती मधील हा सर्वात घृणास्पद प्रकाल आहे.
एपिसोड खूपच प्रभावी होता.

Pages