स्वप्न, ती आणि स्वप्नातला मी!

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 30 April, 2012 - 07:14

स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती
हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो

तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस
घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं

स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस
दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???

आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत
नकळत येणाऱ्या अश्रूंना माझ्या, मी आता वाट करून देत आहे
बागेतल्या प्रेम फुलांना, तुझ्या आठ्वणींच पाणी देत आहे!!!

गुलमोहर: 

धन्यवाद प्रद्युम्न सर, नव्यानेच लिहायला सुरुवात करतोय. आपल्या मार्गदर्शनाची अपेक्षा!

वास्तव व स्वप्न यातील नाजुक धागा छानदार गुंफला व उलगडला आहे.>>>> येस्स, हेच म्हणायचं होतं...
सुरेख कविता.......

आवडली Happy
बहुदा अनुला असं म्हणायचय की आयडी पण छान आहे आणि युनिक आहे त्यामुळे कविता वाचायची इच्छा झाली.. है ना अनु?
माझं हे असं झालं अ‍ॅक्चुली