उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले आणि मालिकांवरच्या इतर बीबीवरचे प्रतिसाद वाचुन असे वाटतेय की काही काही लोक फक्त चुका शोढण्यासाठी आणि इथे येउन टीका करण्यासाठीच मालिका पाहतात Proud

काही भाग नियमित पाहिल्यावर पटकथा, संवाद, दिग्दर्शन फारच ढोबळ वाटू लागले आहेत Sad दिग्दर्शक विरेन असल्यावर दुसरी अपेक्षा ठेवणेही चुकीचे आहे.
सध्या यमीच्या माहेरची मंडळी तिच्या सासरी पाहुणचारासाठी, मानपानासाठी जायचे घाटत आहे. पहिले मूल ( की मुलगा ? ) झाल्याशिवाय लेकीच्या घरचे पाणीही घ्यायचे नाही अशी पद्धत होती ना पूर्वी ? मग हे जेवायला कसे जाणार ? आणि सासरी जाऊन मानपान करुन घेणार ? की मलाच काहीतरी चुकीचे वाटते आहे ? Uhoh

सानी,
पुर्ण अनुमोदन !
आतापर्यत एकही मालिका न पाहणारे प्रेक्षक ही खास मराठी मालिका पाहु लागले आहेत

आणि सासरी जाऊन मानपान करुन घेणार ? >>
ही पद्धत अजुन अजुन पर्यंत पाहिलेली. माझ्या आत्ये भावाची बायको बेळगावची. मुलीला भेटायला पुण्याला जायचेत. पण घरातल पाणी पण प्यायचे नाहीत. शक्य तितके उभ्या उभ्या भेटुन जायचेत.

हा मानपान लग्नात राहिलेला म्हणून करणार असतील. दिग्दर्शन आता काहीसे सैलावल्यासारखे वाटते. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक कडूगोड (खरंतर कडूच जास्त) प्रसंग येऊन गेले असणार पण प्रत्येक दिवस असा दाखवत बसले तर कार्य कधी बघायला मिळणार? लोकांचा इंटरेस्ट संपून जाईल अशाने आणि मुख्य कार्य दाखवण्याच्यावेळेस कोणी पहायला जाणार नाहीत.

साने, त्या दुस्वासी दिराने काल कळी खुडली का गं?
कालचा भाग नाही पाहिल, पण परवा 'पुढील भागात' मध्ये यमी रडातानाचा सीन पाहिला होता.

मला त्या माधवरावांची अ‍ॅक्टींग फार्फारच आवडतीये Happy !

हो गं हो बागे, पण मला ती शंका होतीच... तो दीर फारच वात्रट आहे. कळी तो खुडेल अशी मला अगदी खात्री होती. महान दिग्दर्शक वीरेन काय करणार हे आता हळूहळू समजायला लागलंय मला Lol उंमाझो ची सुरुवात तर फार छान झाली, आता मात्र तोचतोचपणा सुरु झालाय. वर बर्‍याच जणांनी जे आधी प्रेडिक्ट केलं होतं, तसंच आता व्हायला लागलंय.

बाकी कळीचे खुडणे आणि यमूची आई खरंच न येणे असे काही दाखवून अंधश्रद्धा वाढवण्याचे काम वीरेनसाहेब करणार आहेत का?

सशक्त कथाबीज आणि दिग्गज कलाकारांचे कौशल्य चांगल्या पटकथे आणि दिग्दर्शनाअभावी वाया गेले तर मला फार वाईट वाटेल.

ती यमीची आई दीड -दोन किलो मेकप थापुन आजारी पडली बहुतेक. तो मेकप उतरवला तरी बरं वाटायला लागेल असं कितीदा मनात आलं.बाईला बरं नसतांना घरातले सगळे (पुरूषांसकट) तिच्या पलंगाच्या आजुबाजुनी ऊभे राहुन चर्चा करत असत का त्या काळी? असो.
रमाबाईंच्या वयाबाबत या लोकांचा भयानक घोळ झालाय. तेराव्या वर्षी लग्न झालं नां त्यांचं? मग तेरा वर्षांची त्या काळातली मुलगी अंगणात बसुन पाय झाड्त रडते? तिच्या साबा तिला झोपेतून उठवुन नेतांना कडेवरुन नेतात? सगळ्या फ्लॅशबॅक मधे तिचे केस एकाच लांबीचे? तर ते एक असो.
आधी माधवानी नुसतं तिला माडीवर बोलावलं तरी गोंधळ घालतात आणि नंतरच्या भागात ती नवर्‍याच्या मांडीवर डोकं ठेवुन झोलेली असली तरी आरामात तिला उठवुन नेतात? हे आणखी एक असो.
लिपस्टिक, आय शॅडो लावलेल्या, (घरात सतत थयथयाट करणार्‍या) विधवा बायका बघतांना त्या काळी विधवा बायकांचं जीवन कष्टाचं, दु:खाचं आणि वाईट होतं हे आजच्या पिढीला खरं वाटेल्? ते ही असो.

भाषेचा आनंद आहे. शरद पोंक्षे, नीना कुलकर्णी सोडले तर कुणीच सहजपणे बोलतय असं वाटत नाही. सगळ्याच बायका त्यांच्या नवर्‍यांना कधी तुम्ही म्हणतात तर कधी आपण तर कधी इकडुन वगैरे. घरात या बायका सतत कोर्‍या साड्या, नथ असं २४ तास घालत असत का? आणि पदरांना सेफ्टी पिना? त्याही इतक्या सहज लक्षात येतील अशा? बिचार्‍या माईंच्या संवादांची गाडी 'अगबाई' चं ह्यांडल मारल्याशिवाय पुढेच जात नाही. बाबा भाऊजी मोठा झाल्यावर डेली सोप्स मधे त्याचं भवितव्य उज्वल आहे. अगदी सिरीयल्सच्या व्हिलन स्टाईलमधे मनातल्या मनात बोलणं, आक्रस्ताळेपणा आणि अति नाटकीपणा व्यवस्थित चाल्लय. असोच.

रच्याक : गाणं छान आहे.

काही असो त्या काळातले नवरे सुखी संसाराचं मर्म ओळखुन होते. कारण ते येता जाता आपापल्या बायकोला 'तुझ्यामुळेच सगळं व्यवस्थित चाल्लय. हा संसार सुखाचा होतोय' असं म्हणत असत.

आता पुस्तकच घ्यावं आणि वाचावं. उगाच जिवाला त्रास कशाला?

तेरा वर्षांची त्या काळातली मुलगी अंगणात बसुन पाय झाड्त रडते? तिच्या साबा तिला झोपेतून उठवुन नेतांना कडेवरुन नेतात? >>>>> हे मलाही पटले नाही.

आधी माधवानी नुसतं तिला माडीवर बोलावलं तरी गोंधळ घालतात आणि नंतरच्या भागात ती नवर्‍याच्या मांडीवर डोकं ठेवुन झोलेली असली तरी आरामात तिला उठवुन नेतात?>>>>> + १

तेरा वर्षांची त्या काळातली मुलगी अंगणात बसुन पाय झाड्त रडते? तिच्या साबा तिला झोपेतून उठवुन नेतांना कडेवरुन नेतात? >>>>> हे मलाही पटले नाही +१००

आताच्या काळानुसार तेरा/अकरा हे वय लहान असलं तरी त्या काळात मुलींना समज असायचीच, अगदी लहान असल्यापासुन तसेच संस्कार, शिस्त त्यांना लावली जायची. रमा माहेरी असेपर्यंत समंजस दाखवलेली पण सासरी आल्यावर जास्तच रडुबाई वगैरे मुद्दाम दाखवतायत. आईने नीट समजावुन सांगितेलेले असते रडण्या-हसण्याच्या बाबतीत तरी???

त्या काळातील पुरुष मुले ही काही इतकी द्वाडपणा करत असतील असं वाटत नाही, ते ही आपल्या मोठ्या भावाच्या बायकोबरोबर.

श्रुतीवन्सं, या, शांत व्हा. बसा.>>>>>
वास्तविक आम्हांसही असे काही लिहीणे प्रशस्त वाटत नव्हते परंतु अगदीच डोक्यावरून पाणी जाऊ लागले तेव्हा रहावलेच नाही. जरा गुळ पाण्यावरोबर थोडे पन्हे पाठवा इकडे म्हणजे शांत होतो. Happy

श्रुती, मी अगदी हेच लिहायला इकडे आले होते. सारखे कडेवर उचलून घेणे हा काय प्रकार आहे ? आम्हाला १९८०-९० च्या दशकांत सुद्धा चौथ्या वर्षानंतर कुणी उचलून घेतलेले आठवत नाही Wink

सारखे कडेवर उचलून घेणे हा काय प्रकार आहे ? आम्हाला १९८०-९० च्या दशकांत सुद्धा चौथ्या वर्षानंतर कुणी उचलून घेतलेले आठवत नाही >>> अगदी अगदी.

श्रुती Lol
कामावेसकट अनुमोदन.

आम्ही ह ना आपट्यांचं 'पण लक्षात कोण घेतो' वाचून १९०० च्या पहिल्या दोन-तीन दशकातल्या बायकांच्या वाईट स्थितीबद्दल वाईट वाटून घेत होतो. इथे १८७० च्या दशकातली सून पण ऐश करताना दिसतेय.. आपट्यांना काही कळत नव्हतं बहुतेक. Sad

नथ असं २४ तास घालत असत का?>>
सगळ खर पण हे नथीच प्रकरण मी स्वतः पाहिलेल आहे. सावंतवाडीत असताना तिथल्या एका ब्राम्हण घरातल्या आज्जीबाइंना मी सतत नथ घालुन फिरताना पहायचे. वय ८५ +. तब्येतीने एकदम नाजुक त्यातुन कंबरेतुन वाकलेल्या. पण तेजस्वी कांती. काही मोजके सोडले तर कळे भोरे केस. छान अंबाडा त्यावर फुल. नउवारी साडी आणी ट्प्पोर्‍या मोत्यांची मोठ्ठी नथ. नाक अर्ध फाटलेल होत. वजनामुळे असेल.

दिग्दर्शकाचे चालले तर यमू/रमा कधी मोठी व्हायचीच नाही. तिच्या बाळलीलांमध्ये आणि गंगाजमुनांमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे सोपे आहे.

'भारत एक खोज' मध्ये सावित्रीबाई फुले घरात नवर्‍याला जेवण वाढताना नथ घातलेल्या बघून ती भूमिका करणार्‍या शुभांगी गोखलेंना हाच प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी "त्या काळात स्त्रिया सतत नथ घालून असत; 'भारत एक खोज'साठी भानू अथैय्यांनी संशोधन करूनच वेशभूषा ठरवली होती." असे उत्तर दिले. सावित्रीबाईंचा आणि रमाबाईंचा काळ एकच.

कुठलीही सीरीयल पाहण्यापेक्षा इथे धागा वाचत राहील्याने अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी पडत नाही. Happy

मला कोणतीही ऐतिहासिक मालिका बघायला नको वाटते.. एकवेळ सासुसुन मालिका परवडली.. निदान बहुसंख्य लोकांच्या मनात त्या ऐतिहासिक पात्रांच्या जीवनाविषयी चुकीचे समज तरी निर्माण होत नाहीत.
ते हिंदीतल्या झाशीच्या राणीपासुन, वीर शिवाजी ते या मालिकेतही तेच. सुरवातीला एक दिग्दर्शकाच्या वा पटकथाकाराच्या लेखव स्वातंत्र्याबद्दल एक निवेदन दिलं की बास्स. मुळ कथावस्तु २५% बाकी आजच्या काळातल्या टीआरपीला योग्य असा मसाला. ना त्या काळातल्या चालीरीतीचे भान, ना वेषभुषेचे ना भाषेचे.
वाईट हे की अजुनही समाजात मोठा वर्ग असा असतो ज्यांना मुळ पुस्तके/व्यक्तीरेखेबद्दल वरवर माहीती असते. मग अशा मालिकांमुळे सगळा फोकसच बदलुन जातो. इथे मालिकेचा फोकस जो त्या काळात स्त्रियांची दुरवस्था, जाचक धर्मनियमांमुळे बांधुन टाकलेले विधवांचे जीवन, त्यावर उपाय म्हणुन एका काळापुढे पाहणार्‍या माणसाने आपल्या पत्नीला शिक्षण देण्याचा निर्णय, रमेची जबर इच्छाशक्ती,तिचे परिश्रम, बुद्धिमत्ता याकडे जाण्याऐवजी यमुला छळणार्‍या सासवा आणि तिची निरागसता, आईवरचे प्रेम 'एन्कॅश' करण्याचा प्रयत्न यावर जातोय. कशाला अशा गंभीर विषयांना हात घालायचा? सासु-सुनेचे दळण दळलेले बरे की त्यापेक्षा. Uhoh
म्हणुन मी तरी चुकुनही मालिका बघत नाही, फुकटचा मनस्ताप. Sad

Pages