निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, सोनचाफ्याच्या परागीवहनाबद्दल गूगलवर pollination in michelia असा सर्च केला. त्यात बर्‍याच लिंक्स आहेत. पण नक्की किंवा ठामपणे याच कारणाने पॉलिनेशन होतं असं काही कळालं नाही.
पण आमच्या सोसायटीत बर्‍याच जणांनी सोनचाफ्याची झाडं लावली आहेत. त्यांची बियांपासून रुजूनच रोपं तयार झालेली मी बघितली आहेत. आमच्याही अंगणात त्या बिया पडून त्यांपासून छोटी छोटी रोपं कुठेही (अगदी पिंपळासारखी) उगवलेली असतात. साळुंक्या,ब्राह्मणी मैना,बुलबुल आमच्याइथे खूप आहेत. कदाचित ते सुद्धा सोनचाफ्याच्या बिया खात असतील. पण मी हे नीट बघितले नाहीये.

कविराज भूषण ने एका काव्यात औरंगजेबाला भुंग्याची तर शिवाजी महाराजांना, सोनचाफ्याची उपमा दिली आहे.
याचे कारण असे कि भुंगा बाकी कुठल्याही फुलावर बसतो पण सोनचाफ्यावर नाही.

>>> शिवबावनी अनेकदा वाचून हा असा विचार नव्हता केला. दिनेशदा.. तुम्हाला अजून एकदा सलाम.. Happy

हे ते काव्य...
कूरम कमल कमधुज है कदम फूल । गौर है गुलाब, राना केतकी विराज है ।
पांडुरी पँवार जूही सोहत है चन्दावत । सरस बुन्देला सो चमेली साजबाज है ।
भूषन भनत मुचकुन्द बडगूजर है । बघेले बसंत सब कुसुम समाज है ।
लेइ रस एतेन को बैठिन सकत अहै । अलि नवरंगजेब चंपा सिवराज है ॥

अर्थ :-
येथे भुषणाने औरंगजेबाच्या मांडलिक राजांना एकेका फुलाची उपमा दिली आहे. जयपूरचे राजे कछवाह हे कमळाप्रमाणे , जोधपुरचे राजे कबंधज हे कदंबाप्रमाणे, गौड़ गुलाबाप्रमाणे तर उदयपूरचे राणे केतकी पुष्पाप्रमाणे आहेत. पवार पांढरीच्या फूलासारखे तर चंदावताचे राजे जुईच्या फूलाप्रमाणे, बुंदेले चमेलीसारखे, बडगुजर मुचकुंद फुलाप्रमाणे तर बघेले वसंतकाली फुलणार्‍या सर्व पुष्प समुहाप्रमाणे आहेत. औरंगजेब हा भूंगा आहे. भूंगा जसा फूलाफूलातून मध गोळा करतो तसा औरंगजेब या सगळया राजांकडून कर गोळा करतो. पण शिवराय चंपकपुष्पाप्रमाणे आहेत की ज्याच्या वाटेला भुंगा(औरंगजेब) कधीही जात नाही.
....साभार - ॐकार नेरलेकर.

अरे वा, हे पूर्ण काव्य पण मिळाले. छानच.
शांकली, आमच्याकडे सोनचाफ़्याची फुले तशीच असतात, पण फळे वेगळी
असतात. जमला तर उद्या फ़ोटो काढतो.

दिनेशदा, तुम्ही जो फोटो दिलाय ना, जांभूळ,जांब कुळातलाच आहे family - Myrtaceae .Brisbane Box Tree असं नाव आहे त्याचं. आणि तुमचा अंदाज बरोबर आहे; हे झाड विषारी नाहीये.

सर्व फोटो मस्त !
दिनेशदा आणि सेनापती, 'औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्याबद्द्ल ' ह्यांच्याबद्दल कवि भूषणने लिहिलेल्या काव्याच्या ओळी तुम्ही लिहिल्यामुळे छान माहिती मिळाली.

छान फोटो, माहिती, उपक्रम...
बाहेर एकदम ढगाळ, उदास वातावरण असताना जर स्वत:ला छान वाटावं असं वाटत असेल त्यासाठी उत्तम धागा..
बापरे किती वाचायचं राहिलंय नं..त्या सगळ्या लिंका आता एक एक करुन वाचेन....

वेका -- माझही असच मत आहे. हा धागा ही मुलेमुली एकदम भन्नाट आहेत. फार सुरेख माहिती मिळते. निर्व्याज आनंद मिळतो.

दिनेशदा - आपल्यकडे जेंव्हा कुत्रे-मांजरी पित्तामुळे आजारी पडतात तेंव्हा ते गवत खाऊन ओकारी करतात. मी हे कित्येकदा पाहिले आहे. कारण एक खास प्रकारचे गवत घाऊन पित्त बाहेर आणणे हे प्राण्यांना ठावूक असते. माणसांपेक्षा प्राण्यांचे intuition जास्त चांगले असते असे स्वामी विवेकानंद म्हणत.

सेनापती -- काय ओळी आहेत! प्रत्येक फुल आणि राजा ह्याबद्दल लावलेला अन्वय का लावला हेही वाचायला आवडेल.

दिनेशदा, एकदम नविन माहिती भुंगा- सोनचाफ्याची..! त्याबद्दल नमस्कार.
वरच्या प्रचितील धनेश/ ग्रेट इंडियन हॉर्नबील. याच्या विणीच्या हंगामातली माहितीही निरीक्षण करण्यासारखी आहे. अंडी घालण्याआधी मादी एखाद्या मोठ्या वृक्षाच्या ढोलीत स्वतःला बंद करुन घेते. म्हणजे नराच्या मदतीने शेण, माती वगैरे लिंपून.. त्यानंतर ढोलीत बंद असलेल्या मादीच्या अन्नाची सर्व काळजी नर घेतो. अंडी घातल्यानंतर पिल्ले बाहेर आल्यावर हे लिंपण फोडले जाते व धनेशीण बाहेर येते. पुण्याचे पक्षीमित्र सतिश पांडे यांनी काढलेले एक अप्रतिम छायाचित्र आहे. त्यांत त्या लिंपलेल्या ढोलीचे छोटेसे भोक व भोकातून बाहेर बघणार्‍या मादीचा डोळा असे ते छायाचित्र होते.
मला माझ्या सासुरवाडीला गणपतीपुळ्याजवळ नेवर्‍याला अशी एक लिंपलेली ढोली दिसली होती. नर भरवतांना थोडं निरीक्षणही केलं होतं. तळकोकणांत.. देवगरुड कोकलाक लागले..आता पाऊस येतलो ! असंही ऐकलंय. त्यांत कितपत तथ्य आहे, माहित नाही. (गांवी कोकणांत धनेशाला देवगरुड असंच म्हणतांना मी सर्रास ऐकलंय..!)

सेनापती -- काय ओळी आहेत! प्रत्येक फुल आणि राजा ह्याबद्दल लावलेला अन्वय का लावला हेही वाचायला आवडेल.

>>> खात्रीलायक माहिती नाही माझ्याकडे पण असे असू शकेल की दिलेल्या फुलांच्या यादीतून ज्या कमी-जास्त प्रमाणात मध निघतो त्या प्रमाणात औरंगजेब त्या त्या राजांकडून कर वसूल करत असेल.. Happy आता हा माझा उगाच काय पण अंदाज.. Lol असेही आशु शकते की फुलांची नावे त्या छंदात बसावी म्हणूनही तशी घेतली गेली असावीत.. Happy

दिनेशदा, एकदम नविन माहिती भुंगा- सोनचाफ्याची..! त्याबद्दल नमस्कार.>>>>अगदी अगदी +१

सेनापती तुलाही धन्स रे Happy

छान

एक चार दिवस इकडे आले नव्हते - तो पर्यंत - नवीन धागा सुरू होवून त्याची पाच पाने वाहिली सुद्धा !
क्या बात है ! - सगळ्या निसर्ग प्रेमी लोकांचं खूप कौतुक आणि अभिनंदन !
जिप्सी, 'कुसुम' चा फोटो एक नंबर !
धनेश चा फोटो पण खूप छान !

मधे एका मैत्रिणीने पांढर्‍या इक्झोराचं रोप दिलं होतं. अजून छोटंसंच आहे, पण तरी त्याला पहिल्यांदाच हा सुंदर गुच्छ आलाय..शिवाय मंद सुगंध पण आहे....

1 276_0.jpg1 278_0.jpg

आणि हे व्हेरिगेटेड अ‍ॅडेनियम....

1 279.jpg

जिप्सी, कुसुंबाचा फोटो अप्रतिम आलाय.
मुंबईत अजून याची कुसुंबी पानं रंग टिकवून आहेत, इथे पुण्यात ही पालवी फेब्रूच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतच जेमतेम होती. मुंबईचं हवामान दमट आहे म्हणून हा फरक आहे की काय?
शोभा, फोटो मस्त!
सेनापती, त्या सगळ्या ओळी दिल्या ते छान झालं.

जिप्स्या, अशा मोहोराचा फोटो घेताना, तूझ्या झूम कौशल्याचा पुरेपूर वापर करत, फुलांचा क्लोजप
मिळतोय का ते बघत जा. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी नीट दिसत नाही, पण अप्रतिम रचनासौंदर्य
असते त्यात.

शांकली,
कूळ तेच पण फुलांनी किती वेगळा "विचार" केलाय ना ? मी सांगितलेल्या सगळ्या झाडांची फळे
वेगवेगळी असली तरी फूलांतून त्याचे कूळ कळतेच. या झाडाने मात्र बरेच आगळेवेगळे रुप घेतलेय.

बी,
पक्ष्यांचे प्राण्यांचे अन्न ज्ञान खरेच अनोखे, वरचाच हॉर्नबील ज्यावेळी पिल्लांसाठी खाणे आणतो
त्या काळात एवढे विविध अन्न तो आणतो, कि त्यातून पिल्लांची आणि मादीची देखील उत्तम वाढ
होते. त्या काळात मादी स्वतः आपली लांब पिसे तोडून झाडाखाली टाकून देते. त्या ढोलीत त्या पिसांची
तिला अडचण झाली असते.

अशा मोहोराचा फोटो घेताना, तूझ्या झूम कौशल्याचा पुरेपूर वापर करत, फुलांचा क्लोजप
मिळतोय का ते बघत जा. >>>>दिनेशदा, ते खुपच उंचावर आहे Sad अगदी शेंड्याचा फोटो घेतलाय. पण तरीही मोहराचा फोटो क्लियर नाही आला. माझ्या लेन्सच्या limitations आडव्या आल्यात इथे. Sad पुढच्या वेळेस परत प्रयत्न करेन. Happy

शांकली, प्रज्ञा१२३, जिप्सी छान फोटो.
जिप्सी आमच्या ईथे पण आहे एक कुसूमाचे झाड, प्रत्यक्षात बघताना फार मस्त वाटते ना!
इक्झोराच्या झाडाला जेव्हा एकावेळेस १२-१५ गुच्छ येतात तेव्हा ते झाड पण किती मोहक दिसते ना बघायला.

जिप्सी, मग त्यासाठी तूला झाडावर चढणे, किंवा मोहोराचा एखादा छोटा भाग तोडणे हे गुन्हे माफ बरं का ?
तू श्रीकांत इंगळहाळ्ळिकरांनी काढलेला अंजनाच्या मोहोराचा फोटो बघितलास का ? अप्रतिम फोटो
आहे तो.

वॉव.. दोन दिवस नाही पाहिले तो इतकी माहिती वाचायची आणी फोटो पाहायचे जमा झाले...
हां आता झालं सगळं मागचं बघून आणी वाचून
अब आगे शुरु करो.. Happy

ऊन्हाळ्याचा त्रास कमी करण्यात आपली मदत करणारा
पिवळा टॅबूबीया
flowers 145.jpgflowers 147.jpg

या रविवारी राणीबागेत जायचा प्लॅन आहे. कोणाला जमणार आहे??? अप्सरेला प्रत्यक्षात पाहायचा मौका हातचा गमावु नका हो लोक्स....<<<<<<< साधनातै मी येणार आहे.अनायासे लेकीची परीक्षा ऊद्या संपते आहे त्यामूळे ती पण येणार आहे माझ्यासोबत.
किती वाजता भेटायचे ते कळवणार का?
अजून कोण कोण येत आहे?

उजू, एरवी हे पिवळा, केशरी, लाल रंग आपल्याला उष्ण वाटतात. पण हेच रंग झाडांनी घेतले कि उन्हाळा सुसह्य होतो.
राणीच्या बागेत जाताहात तर कमला नेहरु पार्कात पण जा, त्यासाठी बाबुलनाथापासून पायर्‍यांनी चढायला सुरवात करा. तिथेच गुंजांची बरीच झाडे आहेत. पायर्‍या चढताना पायमोज्याचे एक दुर्मिळ
झाड लागते. कमला नेहरू पार्काच्या बाहेर, मुंबईतील बहुतेक एकमेव असे ओक चे झाड आहे.
पार्कात चंदनाचे झाड आहे. तिथून १०६ नंबरची बस पकडून सगळा क्वीन्स नेकलेस बघत नरीमन
पाँइंटला या, तिथे कदंबाची झाडे बहरली असतील..

दिनेशदा,
<<<<उजू, एरवी हे पिवळा, केशरी, लाल रंग आपल्याला उष्ण वाटतात. पण हेच रंग झाडांनी घेतले कि उन्हाळा सुसह्य होतो.>>>अगदी, अगदी.
मला १ वाजेपर्यंतच थांबायला जमणार आहे, नंतर घरचे पिकअप करणार आहेत राणीच्या बागेतून.त्यामूळे कमला नेहरू पार्कात नाही जमणार मला.:(
पण मी नंतर जमवेल, ईशिकाला दर सुट्टीत नेते मी कमला नेहरू पार्कात एकदातरी.त्यावेळी पायमोज्याला व चंदनाला बघून घेईल.
आणि गुंजा म्हणाल तर लेक पण ओळ्खेल सहज कारण माझ्या आजोळी(चंदनापूरीला) शेतात बांधावर भरपूर आहेत गुंजा (लाल, काळ्या आणि सफेद पण).
कदंब तर अंबरनाथमध्येच भरपूर आहेत.

ओह, हेच ते पायमोज्यांचे झाड! स्टॉकिंग्ज ट्री.. प्लीज पटकन जाऊन झटकन फोटो काढा आणि इथे द्या बरं!!
किती मनात आहे हे नवल बघण्याचे... इथे पुण्यात नाईये हा Sad
पण जाऊंदे.. मुंबैत तरी आहे ना! :स्मित:........ बघायला तरी मिळेल!!
उजू, फोटो मस्तच!
(दिनेशदांचा सगळ्या झाडांचा हिशोब म्हणजे कोणतं झाड नक्की कुठे, कुठल्या झाडानंतर त्याचा नं आहे हे अगदी तोंडपाठ आहे :स्मित:)

बाबुलनाथापासून पायर्‍यांनी चढायला सुरवात करा. तिथेच गुंजांची बरीच झाडे आहेत. पायर्‍या चढताना पायमोज्याचे एक दुर्मिळ झाड लागते.>>>>>> दिनेशदा - हे पायमोज्याचे झाड कसे असते - फोटो टाका ना......

दिनेशदा - तुम्ही वर जे सर्व वर्णन केलेत ना ते वाचताना असे वाटत होते ......की तुम्ही शरीराने परदेशात असलात तरी मनाने मुंबईतील कुठल्यातरी बागेतच (किंवा भरपूर झाडे असलेल्या रस्त्यावर) असणार ........ तिथले कुठलेही झाड कुठल्या ऋतूत कसे दिसते हे तुमच्या अंतःचक्षूसमोर उभेच रहात असणार... अगदी पान-फूल-फळांसकट ....

Pages