(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
निसर्गाच्या गप्पा (भाग ७)
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) अभिनंदन..
शशांक चला आता सांगा कोणीतरी
शशांक चला आता सांगा कोणीतरी लवकर नावं...
सारीका, छान प्रचि
मी फक्त इतकेचं म्हणजे की ती
मी फक्त इतकेचं म्हणजे की ती जांभळी ऑर्चिड आहे
वरची खारुताई ना? फारच गब्बू आहे
रान तंबाखूचा फोटो हा हा हा
दिनेशदा,पद्मजा अशी बहरलेली
दिनेशदा,पद्मजा
अशी बहरलेली उंदीर मारीची (गिरीपुष्प) अनेक झाडे पुण्यात औन्ध परिहार जवळ,सायप्रस कॉलेज जवळ पहायला मिळाली
वरचे शेकरु आहे.. खारीचीच मोठी
वरचे शेकरु आहे.. खारीचीच मोठी बहिण म्हणता येईल.
पहिला फोटो ज्या फुलाचा आहे
पहिला फोटो ज्या फुलाचा आहे त्याचीच कळी आहे दुसर्या फोटोत
ओहो.. मला दुसरा वेगळा वाटलेला...
Garden plants poisonous to
Garden plants poisonous to people
www.dpi.nsw.gov.au/__.../garden-plants-poisonous-to-people.pdf
अशा अनेक साईट्स, दुवे, लिंक्स गुगलवर मिळतील - कृपया ही माहिती मिळवून वेळीच सावध व्हा - आपल्या बागेतीलही अनेक फुलझाडे, झुडुपे यात पहायला मिळतील - या झाडांना हाताळताना, छाटणी करताना क्वचित वाळलेला पालापाचोळा जाळताना काळजी घ्या - कण्हेरीचे सर्व भाग - पाने - फुले-बिया अतिशय विषारी असतात - कण्हेरीच्या वाळलेल्या (ओल्याही) भागाचा धूरही अतिशय विषारी असतो.
जंगलात फिरताना अनोळखी वनस्पती हाताळण्याचे धाडस महागात पडू शकेल - या आधी शांकलीने 'रान तंबाखू' बाबत काळजी घेताना - ग्लोव्ह्ज् चा वापर वगैरे जे सांगितले आहे ते खूप महत्वाचे आहे.
कळलावी, धोत्रा, टणटणी, एरंड, डायफेनबेकिया (डंब केन) हेदेखील या विषारी वनस्पतीत येतात.
शांकलीने टाकलेले फोटो - प्र
शांकलीने टाकलेले फोटो -
प्र चि १ व २ - वॉकिंग आयरिस ( Neomarica, Iridaceae family)
प्र चि ३ निळे फूल - ( Evolvulus alsinoides , dwarf morning glory, विष्णुक्रांता / विष्णुक्रांती)
हे मी शनीवारी कुंभार्ली घाटात
हे मी शनीवारी कुंभार्ली घाटात काढलेले काही फोटो.
शशांक, कण्हेरीबाबत खुपजणांना
शशांक, कण्हेरीबाबत खुपजणांना माहित नसते (यात पिवळी कण्हेर, बिट्टी, बिटकी पण आली) पण बकर्यांना मात्र हे ज्ञान उपजतच असते. त्या कधीच त्याला तोंड लावत नाहीत.
सिताफळाच्या झाडाला पण तोंड लावत नाहीत. पण प्राण्यांना विषावरचे उतारे पण
माहीत असतात. एक प्रकारचे पॅराकिट्स काही विषारी बिया खातात, आणि त्या विषावरचा उतारा म्हणून, नदीकिनार्याची माती खातात.
आता ह्या पक्षाच नाव सांगा.
आता ह्या पक्षाच नाव सांगा.
काल मी एक मजेशीर संदर्भ
काल मी एक मजेशीर संदर्भ वाचला. कविराज भूषण ने एका काव्यात औरंगजेबाला
भुंग्याची तर शिवाजी महाराजांना, सोनचाफ्याची उपमा दिली आहे.
याचे कारण असे कि भुंगा बाकी कुठल्याही फुलावर बसतो पण सोनचाफ्यावर नाही.
माझ्या हे कधी लक्षात आले नव्हते. यापुढे लक्ष ठेवावे लागेल.
दिनेशदा, मस्त माहिती.
दिनेशदा, मस्त माहिती.
शशांक, शांकली ते पहिले फुल
शशांक, शांकली ते पहिले फुल कसले मस्त आहे. हे परदेशी फुल दिसतय (विकीनुसार) . आणि दुसर्या फुलाचे आम्हाला कळण्यासारखे नाव द्या ना - शंख्पुष्पी
शोभा, मला बंदी असेल ना
शोभा, मला बंदी असेल ना ??
माधव, हे शंखपुष्पी का ? मला खरेच माहीत नव्हतं. गोकर्णीला पण
हे एक नाव आहे.
छ्या, आधी माहीत असतं तर थोडी अक्कल तरी मिळवता आली असती, हे खाऊन !!
शोभा, हा हॉर्नबिल आहे ना!
शोभा, हा हॉर्नबिल आहे ना!
शोभा, हा हॉर्नबिल आहे
शोभा, हा हॉर्नबिल आहे ना!>>>>अरे मला नाव माहित नाही. पण फोटो काढताना मात्र त्याने मला फ़ार दमवले.
दिनेशदा, तुम्हाला बंदी नाही. कारण मलाच नाव माहित नाही. (काय माहित असत हा प्रश्नच आहे. :स्मित:)
धन्यवाद शशांक दुसर्या
धन्यवाद शशांक
दुसर्या फुलाचे आम्हाला कळण्यासारखे नाव द्या ना - शंख्पुष्पी>>>>> अरे सहीच...
शोभा प्रचि छान आहेत.. पक्षी ओळखीचा वाटतोय, बर्याच प्रचिंमधे बगितला आहे पण नाव आठवत नाहिये..
दिनेशदा, छान माहिती...
कविराज भूषण ने एका काव्यात औरंगजेबाला भुंग्याची तर शिवाजी महाराजांना, सोनचाफ्याची उपमा दिली आहे.
याचे कारण असे कि भुंगा बाकी कुठल्याही फुलावर बसतो पण सोनचाफ्यावर नाही.>>> खुप छान माहिती
दिनेश, शंखपुष्पी ठाण्याच्या
दिनेश, शंखपुष्पी ठाण्याच्या प्रदर्शनात दरवर्षी असते त्यामुळे त्याचे विष्णूक्रांता हे नाव माहित होते. फुल मात्र पुरंदर्यांच्या कृपेने पहिल्यांदाच बघितले.
शोभा शिंगचोच्या धनेश आहे ना?
शोभा - दोन्ही फोटो छानच, तो
शोभा - दोन्ही फोटो छानच, तो हॉर्नबिल / धनेश काय छान टिपलाय......
दिनेशदा - मला वाटतं सोनचाफ्याच्या फुलावर बहुतेक कुठलीही मधमाशीही बसत नाही....
एक प्रकारचे पॅराकिट्स काही विषारी बिया खातात, आणि त्या विषावरचा उतारा म्हणून, नदीकिनार्याची माती खातात.>>> बहुतेक अॅमेझॉन खोर्यातले ना ?
धनेश आहे ना? >>> नक्कीच, राखी
धनेश आहे ना? >>> नक्कीच, राखी धनेश आहे तो. बरोबर ना?
<<भुंगा बाकी कुठल्याही फुलावर
<<भुंगा बाकी कुठल्याही फुलावर बसतो पण सोनचाफ्यावर नाही<<<
धन्स दिनेशदा, हे मी पण पहिल्यांदाच ऐकलं!!!
शोभा - दोन्ही फोटो छानच, तो
शोभा - दोन्ही फोटो छानच, तो हॉर्नबिल / धनेश काय छान टिपलाय.....>>>>>>>>>>>>>आनंदी आनंद गडे............ एक तरी पक्षी मी बरोबर ओळ्खला. फ़ोटो काढतानाच हा धनेश आहे अशी खात्री होती. कारण काही दिवसांपूर्वी, दिनेशदानी ह्याच वर्णन केल होतं आणि हाच पक्षी माझ्या डोळ्यासमोर ऊभा राहिला होता. पण इथे माझ्या अगाध ज्ञानाच प्रदर्शन नको. म्हणून नाव विचारल.
शशांकजी धन्यवाद.
शोभा... हा पक्षी तुला कुठे
शोभा... हा पक्षी तुला कुठे आढळला?
गिरीकंद - राखी धनेश आहे तो.
गिरीकंद - राखी धनेश आहे तो. बरोबर ना? स्मित >>>> राखी धनेश नाही रे मित्रा - राखी धनेश असा असतो -
शोभाने टिपलाय तो ग्रेट इंडियन हॉर्नबिल.....
शोभा... हा पक्षी तुला कुठे
शोभा... हा पक्षी तुला कुठे आढळला? >>>>>>>>.आर्य, कोकणात. अग सारखा ईकडून तिकडे उडत होता. माझ्या हातात कॅमेरा बघून त्याला बहुतेक, मी त्याची शिकार करणार असं वाटल असणार. एक क्षणभर पण एका जागी शिरावत नव्हता. मग मी पण हट्टाला पेटले. आणि तो जाईल तिथे जाऊन भरपूर फोटो काढले त्यातील ३-४ चांगले आले.
शशांकजी धन्यवाद. आता हा
शशांकजी धन्यवाद. आता हा पक्षीबघीतला तर कदाचित मी ओळखू शकेन.
ओह, शशांकजी, धन्यवाद.
ओह, शशांकजी, धन्यवाद.
शोभा, हा हॉर्नबील तसा खेळकर
शोभा, हा हॉर्नबील तसा खेळकर असतो. माणसांना बूजत नाही तो.
त्याला खायला वगैरे दिलं, तर रोज येईल.
शशांक, आता माझ्या डोक्याला भुंगा लागला. सोनचाफ़्याचा इतका
मोहक वास म्हणजे तो किटकांसाठीच असणार. मग कुठला किटक
याचे परागीकरण करत असेल ?
आणि फळांची रचना आणि त्यातल्या लालभड्क बिया म्हणजे त्या
असणार पक्ष्यांसाठी. एकतर तो रंग त्यांना लवकर दिसतो आणि
दुसरे म्हणजे फळ उकलले तरी, बी आतमधेच असते. म्हणजे कुठल्यातरी
अणकुचीदार चोचीच्या पक्ष्यालाच ती बाहेर काढता येणार. मग पक्षी कोण ?
बरं त्यात खाण्याजोगा गरही दिसत नाही.
मानवी हस्तक्षेपाने या झाडांची लागवड होत असल्याने, याचे नैसर्गिक
बीजवाहक एकतर नाहीसे तरी झाले असतील किंवा त्यांनी सवयी
बदलल्या असतील.
प्रा. घाणेकरांच्या पण अनेक लेखात, याची रोपे कशी तयार होत असतील,
ते माहीत नाही, असा शेवट असतो.
सरिका, शेकरूचा फोटो मस्त
सरिका, शेकरूचा फोटो मस्त आलाय. ती अगदी कुतुहलाने बघतिये असं वाटतंय.
शोभा,तुझेही सगळे फोटो छान.
जिप्सी, तुझ्यामुळे हिरानंदानीची बाग बघायला मिळाली.
Pages