निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सि मस्तच वाळवंटातील गुलाब.

पद्मजा सुंदर फुल.

माधव ही अप्सरा गुलमोहराची आहे का ?

माधव ही अप्सरा गुलमोहराची आहे का >> नाही.

दिनेशनी अनेक वेळा सांगितले आहे याबद्दल. आता ओळखा. जिप्सी, साधना यांना मनाई आहे ओळखायला Happy

जागुतै Happy

दिनेशदा... हो नक्कीच.. Happy

आता मला माहित नसलेली ही काही फुलं....

कोणती आहेत...?

मी अप्सरा उशीरा पाहिली.. Happy

या रविवारी राणीबागेत जायचा प्लॅन आहे. कोणाला जमणार आहे??? अप्सरेला प्रत्यक्षात पाहायचा मौका हातचा गमावु नका हो लोक्स....

पद्मजाचे फोटो आता टाकले.. काय हे.. अगदीच बेसिक फुले दाखवताहात हो मॅडम.. आमच्याकडे एक्स्पर्ट लोक्स बसलेत...

उंदीरमारी नका म्हणु हो. चांगले ग्लिरीसिडीया किंवा गिरीपुष्प असे नाव आहे.. उंदिरमारी म्हटले की कंबरेला पदर खोचकुन म एका हातात काठी नी दुस-या हातात टॉर्च घेऊन उंदरांना शोधणारी बाई डोळ्यासमोर येते.. त्यापेक्षा गिरीपुष्प म्हटले की कसा फुलांनी बहरलेला, आभाळाला भिडलेला वृक्ष डोळ्यासमोर येतो.

पहिल काटेसावर आणि दुसर उंदीरमारी>>>>> हे वाचायच्या आधी मला ती झाडं ओळखु आली... खुप बरं वाटलं Happy

ग्लिरीसिडीया किंवा गिरीपुष्प>>> ही नावं छान आहेत... Happy

हल्ली फार दिसायला लागली आहेत ही झाडं... Happy

खरी आहे का ही माहिती?>>>>>> माहित नाही.. खरी असो वा नसो काही दिवस तरी साबुदाणा खाववला जाणार नाही..

माधव, तिथे उर्वशीची एकंदर तीन झाडे आहेत. त्यापैकी एक मोठे तिथल्या अधिकार्‍याच्या घराच्या आवारात आहे. त्याच्या जवळ जाता येत नाही, पण लांबून
बघता येते, ते झाड. दोन नव्याने लावलेली छोटी झाडे, बार्किंग डीयरच्या पिंजर्‍यासमोर आहेत. पण त्या तिन्ही झाडांना एकाचवेळी मोहोर येत नाही.

माधव, साबुदाणा बनवण्याची ती काही ऑफिशियल रीत नाही. तो बनवायला
मासे आणि किडे लागत नाहीत. तो साका काही दिवस ठेवावा लागतो हे खरे आहे,
पण जर तिथे किमान स्वच्छता पाळत नसतील तर ती बाब आरोग्यखात्याच्या
निदर्शनास आणावी लागेल.
त्या साक्याच्या तव्यावर बुंदी पाडून साबुदाणा करतात.
साबुदाण्यापेक्षा कसावा मूळ खाणे चांगले. अनेक आफ्रिकन देशात ते मुख्य अन्न आहे.
आम्ही ते खातो. शिजवून, भाजून खाता येते. (माझ्या विठाई मालिकेत सर्व माहिती आहे.)
कसावाची लागवड खुपच सोपी आहे आणि त्याचे उत्पादनही भरपूर येते. अगदी
दुष्काळातही ते झाड तग धरू शकते.
कसावाशिवाय, सॅगो पाम पासूनदेखील साबुदाणा करता येतो, पण आपल्याकडे
तो करत नाहीत, कारण तो रंगाने शुभ्र नसतो.
तसेही साबुदाण्यात काहिही पोषणमूल्य नाही.

दिनेश, हो तसाही साबुदाणा कमीच खातो मी. पण आता तो खाताना पण जडच जाईल - खायचा धीर झाला तर. निदान उपास करणार्‍यांनी प्रोसेस्ड फूड जराही खाऊ नये असे माझे मत झाले आहे. आपल्या पाठीमागे त्या अन्नात काय पडते, कसल्या प्रक्रिया होतात हे काहीच कळत नाही. आणि भारतात तरी त्याबद्दल काहीच खात्री देता येत नाही.

हे जाम आमच्यापेक्षा जास्त खारूताई आणि पक्षीच खातात. >> तुम्ही नुसते फोटोच काढत बसता. त्यांच्याकडे कॅमेरा नसल्यामुळे त्यांना राग येतो मग सगळे जांब ते फस्त करून टाकत असतील. Happy

माधव,
आपली जी उपवासाची कल्पना आहे तिला अगदी योग्य असा आहार म्हणजे,
वरी, राजगिरा, खजूर आणि केळे, काळे मीठ, ताक.

जागू,
त्यांना पण खुप तहान लागत असेल, या दिवसात.

जाम......... वॉव..... मला ज्ज्ज्ज्जाम आवडतात... Happy

मधे ते गुलाबी रंगाच्या जामचे फोटोपण टाकले होते ना इकडे......

मला आमच्याकडची काही झाडे द्यायची आहेत... Happy कुठकुठली ती यादी देतो हवंतर. कोणाला हवी असल्यास मला कळवा.. Happy

वा: सातवा भाग ..... अभिनंदन!

या गप्पा म्हणजे किती सुंदर ठेवा आहे.

नि.ग.च्या सातव्या भागाबद्द्ल सर्वांचे अभिनंदन !

"कुटुंबवत्सल ईथे फणस हा !
कटिखांद्यावर घेऊन बाळे !!"
माझ्या आत्याच्या घरचा फणस ..............

FANAS.jpg

Pages