नॉनस्टिकची काळी बाजू

Submitted by वेका on 22 March, 2012 - 18:04

काही वर्षांपूर्वी नॉनस्टीकचं प्रचंड फ़ॅड आलं होतं आणि ते खूप आवडीचंही झालं होतं. त्याच सुमारास ऑफ़िसच्या वुमन्स नेटवर्कने एक सेमिनार ठेवला होता ज्यात नॉनस्टीक वापराचे बरेच तोटे सोदाहरण स्पष्ट केले होते...त्यानंतर मी स्वतः घरात नॉनस्टीक वापरायला बंद केलं..
मला त्यातलं जेवढं आठवलं ते या धाग्यात लिहिते आहे..जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा ही विनंती..

त्यांचं म्हणणं होतं की टेफ़्लॉन कोटिंग करताना जे रासायनिक वापरलं जातं ते ही भांडी अधीक उच्च तपमानाला असली की वातावरणात जे वायु सोडतं त्याने कॅन्सरपासून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसेच प्रत्यक्ष शिजत असलेल्या पदार्थावरही हे रसायन परीणाम करून अनेक घातक आजार लिव्हर डॅमेज वगैरे होऊ शकतं...आता अर्थात ते जे दुष्मपरीणाम होतात ते इतरही घटकांमधून आपल्या शरीरात जाऊन इजा करू शकतं पण जर तुम्ही रोजच्या रोज जर अन्न नॉन स्टीकमध्येच शिजवून खात असाल तर धोक्याची पातळी स्वतःच स्वतः वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे हा एक बेसिक बदल मी माझ्या किचनमध्ये केला की सगळी नॉन स्टीक भांडी काढून टाकली आणि स्टील (८/१०) घेतलं. जमेल तिथे कॉपरबेस वालं (म्हणजे हीट डिस्ट्रिब्युशन चांगलं होतं असं म्हणतात)
आणि तव्यांच्या जागी आपला भारतातला एक लोखंडी आणि अमेरीकेतले कास्ट आर्यन (म्हणजे मला वाटतं बीडाचे) सध्यातरी यात काम होतं पण तरी काही ठिकाणी नॉन स्टीकची आठवण होतेच....आणि हे घरातलं नॉन स्टीक बंद करायचं कारण म्हणजे आपण शेवटी बाहेर जाऊन खातोच तर तिथे नॉन स्टीक वापरलं असणार तेवढं एक्सपोजर गृहीत धरून हा अतिरेक बंद केला आहे...
ज्यांना या विषयावर अधीक माहिती असेल त्यांनी नक्की इथे लिहा. किंवा मायाजालावर अनेक इंग्रजी साईट्सवर हीच माहिती आणखी व्यवस्थीत, शास्त्रीय भाषेतही उपलब्ध आहे .....वाचा आणि फ़ायदा करून घ्या..
आणि हो जर तुम्हाला वापरायचीच असतील तर काही लोकं म्हणतात की ही भांडी प्रचंड गरम करू नयेत आणि नुस्तीच तापवू नयेत...म्हणजे सुरुवातीलाच थोडं तेल/तूप/बटत काही तरी घालुन गॅस सीमवर ठेवूनच यात काम करावं ...अर्थात याने तोटे होत नाहीत असं मी वाचलं नाहीये..पण कदाचीत थोडं फ़ार कमी नुकसान होऊ शकत असेल...कल्पना नाही..

हे मी सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली (अ‍ॅज एक्सपेक्टेड) आमच्यावेळी आपले लोखंडी तवे, कढया होतं तेच सगळ्यात बेस्ट होतं..आजच्या पिढीसारखं आर्यनतरी कमी नसायचं आम्हाला...असो....
इति नॉनस्टीक काळे पुराण.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा, स्टीलचा सेट डिशवॉशरला टाकायला काही हरकत नसावी पण कास्ट आयर्न किंवा हार्ड अनोडाईज्ड भांडी हातानेच घासावी लागतात.

अल्टन ब्राउन (फ़ुड नेटवर्कवाला) एका गुड इट्सच्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं कास्ट आर्यन कशा प्रकारे स्वच्छ (सिझन) करायचं ते पण आता ते फ़ु ने च्या साइटवर जाऊन शोधायला लागेल....मला आठवतं तो म्हणाला होता की ते सारखं सारखं साबण पाणी लावुन स्वच्छ करायचं नसतं....पण मी तरी कास्ट आर्यन डीश वॉशरला नाही लावत...स्टीलची भांडी पाणी घालुन मग त्याच्या आतलं लागलेलं ब्रशने काढुन टाकली की मस्त चकाचक होतात (डीश वॉशरमध्ये)

माझ्या कडे आहेत कास्ट आयर्न ची पॅन्स. ३ वेगवेगळ्या साईजची आहेत. रोज वापरते. गॅस आणि ओवन दोन्हीत वापरते. माइल्ड डिश सोप आणि कोमट पाण्याने स्वच्छ करते. कोरडे करुन आणि तेलाचा पुसट हात लावते. दोन-तीन महिन्यांनी एकदा ओवनमधे सिझन करते. पोळी साठी लोखंडी तवा वापरते. त्यावर डोसे वगैरे पण छान होतात. पण नवर्‍याला आणि मुलाला डोसे करायला हार्ड अ‍ॅनोडाइज तवा आवडतो. माझ्याकडे बाकी भांडी पण आहेत हार्ड अ‍ॅनोडाइज. मी सेट नाही घेतला. ओपन स्टॉक मधली भांडी लक्ष ठेवले तर सेलमधे वाजवी किंमतीत मिळतात.

वेका, मी घेतलेल्या पॅन्स बरोबर आलेल्या सुचना इथे टाकतेय.
सिझन करण्यासाठी-
कोमट पाणी आणि माईल्ड डिश सोप वापरुन पॅन घासायचे. घासायला स्टीफ ब्रश किंवा पॅड वापरायचे. घूवून झाले की डीश क्लॉथने पुसून कोरडे करायचे. आता पॅनला आतून आणि बाहेरून तेल लावायचे. छान कोट बसला पाहिजे. ओवनच्या खालच्या रॅकवर फॉईल लावायची. ओबन ३५० फॅ. ला प्रीहिट करायचा. वरच्या रॅकवर पॅन उपडे ठेवायचे आणि १ तास बेक करायचे. मग ओवन बंद करुन भांडे ओवनमधेच रूम टेंप ला येऊ द्यायचे.

कास्ट आयर्न पॅनला गंजाचे डाग आले तर स्टील वूलने घासून रस्ट काढायचा आणि वर दिले आहे तसेच सिझन करायचे. दरवेळी स्वच्छ केल्यावर लगेच पुसून कोरडे करुन तेलाचा पुसट हात लावला तर गंज नाही चढत.

बरं झालंस लिहिलंस ते..आता अल्टनची लिंक शोधायला नको.....तुला आज बर्‍याच जणांचे/जणींचे दुवे मिळणार आहेत..

स्टीलची भांडी आयकियामध्ये छान मिळतात.वाजवी दरात एकदम मस्त क्वालिटी...त्याचं बूड जाड आहे त्यामुळे भाजी वगैरे करपत नाही.आतमध्ये (मेजरिंग) कप्सचे मार्किंग आहे.त्यामुळे सूप वगैरे करताना बरे पडते.

मला वाटतं तुम्हाला असंच आयकियाच्या तळमजल्यावर जाऊन शोधायला लागेल..कदाचीत नसेल ऑन-लाईन...मी आयकिया मधुन स्टीलची भांडी घेतली नाहीत...काही मेसिज (त्यांचं डिस्काउंट कुपन आल्यावर) काही किचनचं एक दुकान आहे नाव विसरले आता पण आउटलेट मॉलमध्ये असतं ते नेहमी तिथुन काही आणि एक दोन चक्क माझ्या नवर्‍याकडे आधीपासून होती...:) पण त्याला ती वापरता येत नव्हती म्हणून त्याने नॉनस्टीक घेतली होती (जी मी एक एक करून काढली)
स्टील घेताना ८/१० पाहून घ्यावं असं म्हणतात पण तरी माझी एक पर्टिक्युलर कढईसदृष्य पातेली आहे ती थोडी फ़ार लागतेच.....

http://www.ikea.com/us/en/catalog/categories/series/14888/
माझ्याकडे ह्यातले 3Qt आणि 5Qt आहेत(किं $१३ आणि $१५ बहुतेक).अजून एक वॉलमार्टच्या Manistead चे 3Qt चे आहे(कं $२०).ह्या ३मध्ये रोजचा स्वयंपाक होतो. पण आयकियाची भांडी जास्त चांगली वाटली.एकूण भांड्यांचे वजन तसे कमी आणि त्यातही बूड जड आणि जाड आहे.झाकणे जरा पातळ वाटतात.पण त्यामुळे फार फरक नाही पडत.

तो दहा डॉलरवाला सॉस पॅन मस्त वाटतोय...बघायला हवा.....

आणि with all due respect मी स्वतः वॉलमार्टच्या भांड्यापासून दूरच राहते.......मला वाटतं मला त्या दुकानाचाच प्रॉब्लेम आहे काहीतरी पण ती चर्चा इथे नको...
आयकिया दुकान असंही जायला मस्त आहे......

असतीलही कदाचित. सध्या वापरायची ती भांडी, त्याबद्दल एखादा बीबी उघडेपर्यंत. Proud

अरे लोक्स, भारतात राहणार्‍यांनी ते प्रेस्टीजचे तवे ८०० बिठशे ला घेऊ नका अजिबात. दर दोन महीन्याला त्यांचे डीस्काऊंट्स येत राहतात, मिनीमम २५-३०% तरी मिळतातच. लोकल दुकानदार असेल नेहमीचा तर अजून मिळू शकतो, शक्यतो १-२-३ गोष्टी एकत्र घेतल्या तर. प्रेस्टीजच्या साईटवर वगिरे कळणार नाही ते. पण दुकानदाराशी बोलून बघा. मी बंगळुरात असताना वर्षातून ३-४ दा तरी डीस्काऊंट चालू असायचा.
आणि हो, स्वैपाक्यांच्या हातात द्यायचा असेल तर लोखंडी तवाच बेस्ट !.. चांगला सगळ्यात जाड बघून आणायचा अन पिदडू द्यायचा. चुकूनही प्रेस्टीज वगैरे चे तवे स्वैपाक्यांना वापरायला किंवा कामवालीला घासायला देऊ नका. एकाच दिवसात होत्याचं नव्हतं करुन दाखवतात.. कोटींग. Proud

भाज्या (विशेषतः प्ररतून करण्याच्या) करण्यासाठी encapsulated steel ची भांडी हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात बुडाला २ स्टीलच्या थरांमध्ये १ अ‍ॅल्युमिनिअमचा थर sandwich केलेला असतो. बाकी भांडं स्टीलचं असतं. त्यामुळे अ‍ॅल्युमिनिअमशी थेट संपर्क येत नाही पदार्थाचा आणि भांडं सगळीकडून नीट तापतं. सपाट बूड असतं. फोडणी व्यवस्थित होते. त्याला वर झाकण असतं. मी 'विनोद' कंपनीची अशी २ भांडी गेले वर्षभर वापरत आहे. काहीही problem नाही. त्यामुळे अ‍ॅल्युमिनिअमच्या कढया बाद केल्या आहेत.

www.starcj.com ही वेबसाईट आहे शिवाय त्यांचं एक चॅनल सुद्धा आहे. तुमच्यापैकी कितीजणींकडे ते दिसतं ठावूक नाही. पण तिथे बर्‍याच गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. भरपूर डिस्काऊंट असतं शिवाय फ्री गिफ्टस पण. डिलिव्हरी फ्रि. मुंबईत ५ दिवस आणि इतर ठिकाणी ७ वर्किंग डेज... माझी काकू तिथून नेहमी काहीना काही घेत असते. परवा कैझरॉफ ची भांडी घेतल्याचं सांगत होती. चांगली आहेत म्हणे.

मवा, दक्षिणा उत्तम माहिती...आईकडे द्यायला हवी...
वावे, encapsulated steel माहीत नव्हतं...अमेरीकेत पण तसं काही आहे का पाहायला पाहिजे पण आता माझी बहुतेक एक एक करुन भांडी घेऊन झालीत..प्रश्न अंड्याच्या तव्यासाठीचा आहे....

मातीच्या भांड्याचां फोटो..... बरेच दिवस प्रयत्न करता करता आज प्रचीची साइझ कमी करता आली

भात, पेज बनवण्या साठीचे मातीचे भांडे :
P1000021.Rev 3.jpg

तिन्ही भांडीचा एकत्र प्रची:
P1000219 Rev 3.JPG

माश्यांसाठी भांडे:
P1000221 Rev 3.JPG

मला फक्त शेवटचा माशाच्या भांड्याचा फोटो दिसतोय्..पहिले दोन नाही...(कदाचित मासे आवडतात म्हणून जादू झाली की काय??)
मातीची भांडी तुम्ही gas वर वापरता? आणि फोडण्या पण त्यात की फक्त उकळीसाठी??

बरेच दिवसांपासून फोटॉ टाकायचा होता..स्वाती तू सांगितल्यानंतर हे ग्रीडल पुन्हा वापरात आणलंय...एकंदरित भरपूर वापरलं जातंय असं लक्षात आलंय माझ्या म्हणून आता कायम बर्नरच्या एका भागावर चढवून ठेवलंय..त्यादिवशी घाई होती म्हणून छोटे फुलके यावरच केले आणि मग तापल्या तव्यावर मासा पण चढवून दिला..(जागुच्या पोस्टमध्ये त्याचा फोटो पण आहे)
या ग्रीडलच्या मागच्या बाजुला मार्क्स येणारं डिझाइन आहे...(फोटॉ काढायला आळस केलाय) त्यावर Grilled Sandwiches मस्त होतात....आणि पनिनीस इ. ....फक्त वरच्या भागात तेल थोडं पसरतं पण ते मी पेस्ट्री ब्रशने पुन्हा आणते....;)

फ्रेंच टोस्ट, Pancakes, ghawan इ.इ. साठी पण मस्त कामाला येतं....:)

From Tawa

From Tawa

@गौरीम, वर स्वातीने दिलेला उपाय वापरून बघ...

>>सिझन करण्यासाठी-
कोमट पाणी आणि माईल्ड डिश सोप वापरुन पॅन घासायचे. घासायला स्टीफ ब्रश किंवा पॅड वापरायचे. घूवून झाले की डीश क्लॉथने पुसून कोरडे करायचे. आता पॅनला आतून आणि बाहेरून तेल लावायचे. छान कोट बसला पाहिजे. ओवनच्या खालच्या रॅकवर फॉईल लावायची. ओबन ३५० फॅ. ला प्रीहिट करायचा. वरच्या रॅकवर पॅन उपडे ठेवायचे आणि १ तास बेक करायचे. मग ओवन बंद करुन भांडे ओवनमधेच रूम टेंप ला येऊ द्यायचे.

फक्त तुझा तवा आहे तर फक्त वरूनच तेल लावलंस तरी चालायला हवं असं वाटतं...नाहीतर ज्यांच्याकडून घेतलास त्यांनापण विचारून पहा..

चायनीज वोकबद्दल मला काही माहीत नाही...

धन्स वेका, करुन पाहिनच. पण मी कुठेतरी अस वाचल्याच स्मरत की त्या तव्यावर थोड तेल सोडुन गरम करायचा आणि मग त्यवर चिरलेला कान्दा काळपट होउ ध्यायचा अस काहितरी ., त्याबद्दल कोणी सान्गु शकेल का?

गौरीम, बिडाच्या तव्यामध्ये ४ चमचे तेल आणि एक कांदा उभा चिरून १५ मिनिट भाजून, परत तवा थंड झाला कि तोच कांदा परत १५ मिनिट भाजायचा. अस ५-६ वेळा करायच. मग तवा स्वच्छ धुवून तेल लावून वापरायला घ्या.

Pages