काही वर्षांपूर्वी नॉनस्टीकचं प्रचंड फ़ॅड आलं होतं आणि ते खूप आवडीचंही झालं होतं. त्याच सुमारास ऑफ़िसच्या वुमन्स नेटवर्कने एक सेमिनार ठेवला होता ज्यात नॉनस्टीक वापराचे बरेच तोटे सोदाहरण स्पष्ट केले होते...त्यानंतर मी स्वतः घरात नॉनस्टीक वापरायला बंद केलं..
मला त्यातलं जेवढं आठवलं ते या धाग्यात लिहिते आहे..जाणकारांनी अधीक प्रकाश टाकावा ही विनंती..
त्यांचं म्हणणं होतं की टेफ़्लॉन कोटिंग करताना जे रासायनिक वापरलं जातं ते ही भांडी अधीक उच्च तपमानाला असली की वातावरणात जे वायु सोडतं त्याने कॅन्सरपासून अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं तसेच प्रत्यक्ष शिजत असलेल्या पदार्थावरही हे रसायन परीणाम करून अनेक घातक आजार लिव्हर डॅमेज वगैरे होऊ शकतं...आता अर्थात ते जे दुष्मपरीणाम होतात ते इतरही घटकांमधून आपल्या शरीरात जाऊन इजा करू शकतं पण जर तुम्ही रोजच्या रोज जर अन्न नॉन स्टीकमध्येच शिजवून खात असाल तर धोक्याची पातळी स्वतःच स्वतः वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे हा एक बेसिक बदल मी माझ्या किचनमध्ये केला की सगळी नॉन स्टीक भांडी काढून टाकली आणि स्टील (८/१०) घेतलं. जमेल तिथे कॉपरबेस वालं (म्हणजे हीट डिस्ट्रिब्युशन चांगलं होतं असं म्हणतात)
आणि तव्यांच्या जागी आपला भारतातला एक लोखंडी आणि अमेरीकेतले कास्ट आर्यन (म्हणजे मला वाटतं बीडाचे) सध्यातरी यात काम होतं पण तरी काही ठिकाणी नॉन स्टीकची आठवण होतेच....आणि हे घरातलं नॉन स्टीक बंद करायचं कारण म्हणजे आपण शेवटी बाहेर जाऊन खातोच तर तिथे नॉन स्टीक वापरलं असणार तेवढं एक्सपोजर गृहीत धरून हा अतिरेक बंद केला आहे...
ज्यांना या विषयावर अधीक माहिती असेल त्यांनी नक्की इथे लिहा. किंवा मायाजालावर अनेक इंग्रजी साईट्सवर हीच माहिती आणखी व्यवस्थीत, शास्त्रीय भाषेतही उपलब्ध आहे .....वाचा आणि फ़ायदा करून घ्या..
आणि हो जर तुम्हाला वापरायचीच असतील तर काही लोकं म्हणतात की ही भांडी प्रचंड गरम करू नयेत आणि नुस्तीच तापवू नयेत...म्हणजे सुरुवातीलाच थोडं तेल/तूप/बटत काही तरी घालुन गॅस सीमवर ठेवूनच यात काम करावं ...अर्थात याने तोटे होत नाहीत असं मी वाचलं नाहीये..पण कदाचीत थोडं फ़ार कमी नुकसान होऊ शकत असेल...कल्पना नाही..
हे मी सगळं माझ्या आईला सांगितलं तेव्हा ती म्हणाली (अॅज एक्सपेक्टेड) आमच्यावेळी आपले लोखंडी तवे, कढया होतं तेच सगळ्यात बेस्ट होतं..आजच्या पिढीसारखं आर्यनतरी कमी नसायचं आम्हाला...असो....
इति नॉनस्टीक काळे पुराण.....
चांगली माहिती
चांगली माहिती दिनेशदा...
झंपी, कदाचित कंजुषी नसेल ग.. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन
खरंय नानबा. प्रश्न
खरंय नानबा. प्रश्न कंजूषीपेक्षाही कोटींग गेलेली भांडी वापरणं हानीकारक आहे हे माहितच नसल्याने वापरतात.
अजूनही कितीतरी लोकांना (साधारण आपल्या आयांच्या जनरेशनच्या बायकांना) नॉनस्टिककरता स्टीलचे चमचे, डाव वगैरे चालत नाहीत हेच माहित नसतं.
माझा एक अतिशय बाळबोध प्रश्ण,
माझा एक अतिशय बाळबोध प्रश्ण, आपण भारतात जी जर्मन सिल्व्ह्अर्ची भान्डी वापरतो त्यान्चे काय? त्याच्या कढया वापर्लेल्या चान्गल्या का?
त्या भांड्यांची आणि आपल्या
त्या भांड्यांची आणि आपल्या जेवणातील आम्ल पदार्थांची, दूधाची रासायनिक क्रिया होत असते.
त्यातून काही आरोग्यास अपायकारक घटक तयार होतात.
जर्मन सिल्व्ह्अर्ची भान्डी
जर्मन सिल्व्ह्अर्ची भान्डी आणि अॅल्युमिनियम हे दोन वेगळे धातु आहेत का?
सायोने दिलेल्या लिंकमधे म्हट्लं आहे कि हार्ड अनोडाइज्ड भांडी अॅल्युमिनियमवर प्रोसेस करुन बनवलेली असतात. जर अॅल्यु. स्वयंपाकासाठी चांगलं नाही तर हार्ड अनोडाइज्ड भांडी पण टाळावीत का?
मग कुकिंगसाठी ऑप्शन मातीची भांडी किंवा काचेची भांडी. मातीची भांडी सहज उपलब्ध नाहीत, सफाई पण फार चांगली होत नाही ( असं वाटतं आहे). राहिली काचेची भांडी, बोरोसिल डायरेक्ट फ्लेमवर ठेवलं तर चालतं ना? गॅसवरच्या कुकिंगसाठी वापरलं तर टिकेल का? तेलही कमी लागेल असं वाटतं आहे. कोणी प्रयोग केला असेल तर सुचवा प्लीज.
माझी आज्जी पेज मातीच्या
माझी आज्जी पेज मातीच्या मडक्यात शिजवत असे,. आणी येथे दुबईत माशाचे कालवण मातीच्या
भांड्यात बनवतो,
मातीच्या भांड्याचा स्वाद काही औरच !!
दुबईत माशाचे कालवण
दुबईत माशाचे कालवण मातीच्या
भांड्यात बनवतो, >> तेल जास्त लागतं का मातीच्या भांड्यांसाठी, कारण आधी भांडं कोरडं असताना बरंच तेल त्यातच मुरत असेल. शिवाय त्यात जी सुक्ष्म होल्स असतात त्यात अन्न अडकुन सफाई नीट होणार नाही अशीही शंका आहे मला. एक प्रचि जमेल का टाकायला? मला उत्सुकता आहे असं भांडं पहायची. मला माठाच्या फिनिशचं काही असेल असं वाटतं आहे. का गुळगुळीत असतं?
काचेच्या भांड्यांना डायरेक्ट
काचेच्या भांड्यांना डायरेक्ट हीट चालेल? मला वाटलेलं तडकतील.
मनिमाऊ: सध्या उपलब्ध माहिती नुसारः
हार्ड अॅनॉडाईज्ड भांड्यांवर केलेल्या प्रक्रियेमुळे अॅल्युमिनिअम अन्नात उतरत नाही, म्हणून ते सेफ आहे.
काचेची जी भांडी ओव्हनमध्ये
काचेची जी भांडी ओव्हनमध्ये जातात (त्यांना काय म्हणतात ते आता मला आठवत नाहीत) ती गॅसवर चालतात (कॉइलच्या गॅसवर चालतात का माहीत नाही कुणाला माहीत असल्यास कृपया सांगा) फ़क्त त्यात फ़ोडण्या करायच्या नसतात..उकळ काढू शकता.....मी अमेरीकेत तरी घरगुती पार्ट्यांमध्ये तसं उकळवताना सर्रास पाहाते....
नानबा, थँक्स. एवढ्या भरोशावर
नानबा, थँक्स. एवढ्या भरोशावर निश्चिंत होवुन वापरते फ्युचुराचा सेट.
वेळकाढु ( इतकं काय काय छान लिहितेस, आयडीपण छान घे ना. असं कोणाला वेळकाढु संबोधायला चांगलं नाही वाटत ) - तर तुझ्या माहितीप्रमाणे फोड्णी नाही चालत का बोरोसिलमधे? मग नाही कुकिंगला उपयोग. का मन घट्ट करुन एक वापरुन बघु? माझ्याकडे बरीच आहेत काचेची ( मेक - बोरोसिल) भांडी. नेमके बॉक्स टाकले आहेत त्यामुळे किती तापमान चालेल हे पहाता येत नाहीए. गुगलते आता.
वेळकाढू.(नावाबद्दल मनीमाऊ
वेळकाढू.(नावाबद्दल मनीमाऊ +१००). खूपच माहितीपूर्ण धागा काढल्याबद्दल आभार..
कालच कोटिंग निघालेली दोन जाडेजुडे पॅन्स फेकून दिले.. वापरातही नव्हती पण अजून पडून होती..
दक्षी..मी हार्ड आनोडाईज्ड ची कढई,तवा वापरते. पुढच्या ट्रिप मधे मनीमाऊ ने सांगितलेला फ्युचुरा ची उपकरणे घेऊन जाईन ..
सगळ्यांकडून उपयोगी माहिती मिळत आहे..
पायरोग्लास ची भांडी जी
पायरोग्लास ची भांडी जी टेम्पर्ड असतात ती डायरेक्ट चुली वर / ग्यासवर ठेऊ शकाल.
मीही फ्युचुराचा तवा वापरते
मीही फ्युचुराचा तवा वापरते आणी लोखंडी अधून मधून. पण थालिपीठ, धिरडी, डोसे ह्याला नॉन्स्टिक वापरण्या शिवाय काही पर्याय आहे का ?
@ दिनेशदा बीडाच्या तव्यावर चांगल होतात का हे पदार्थ ?
खर तर पूर्वी आजी, आई लोखंडी तव्यावरच तर करायचे हे सगळ. पण आपल्याला जमत नाहीत ते
मी नॉनस्टीक तवा फक्त ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी वापरते. बीडाच्या तव्यावर ट्राय करुन बघायला हव.
@ वेळकाढू बाकी धागा मस्त काढलायस, अगदी उपयोगी.
मी ११/२ वर्षापुर्वी हार्ड
मी ११/२ वर्षापुर्वी हार्ड आनोडाईज्ड भांड्याचा सेट घेतला आहे कॉस्टको मधुन वरील नानबाची पोस्ट ती भांडी वापरायचा धीर देते आहे..
वेळकाढु (खरचं आयडी बदला हो) चांगली माहिती दिली आहेत तुम्ही.
बीडाचा तवा रोजच्या वापरात
बीडाचा तवा रोजच्या वापरात असला तर त्यावर आंबोळ्या, दोसे छान उलटतात.
तुर्की मधे पण मासे शिजवायला मातीचीच भांडी वापरतात.
मा़झी बंगळूरची शेजारीन
मा़झी बंगळूरची शेजारीन बीडाच्याच तव्यावरच चपाती भाजायची, मासे फ्राय करायची आणि आम्लेट, डोसे पण त्याच तव्यावर करायची.
बीडाच्या कढईत तळण्या व्यतीरिक्त अजून कशासाठि वापरता येईल?? भाज्या, आमटी केली तर चालेल का??
त्या कढईत भाजी केली तर
त्या कढईत भाजी केली तर झाल्यावर दुसर्या भांड्यात काढून घ्यायची, नाहीतर कळकते.
लोखंडी कढईत केलेली पालेभाजी व पिठले चवदार लागते.
तिला गंज लागू नये, हि काळजी मात्र घ्यायची.
उदा. लोखंड, पोलादाचे प्रकार,
उदा. लोखंड, पोलादाचे प्रकार, स्टील, तांबे, पितळ, अल्युमिनिअम इ. पैकी कुठल्या धातूंची भांडी चांगली/ वाईट असतात?
दिनेश पोळ्या चिकटतात हो
दिनेश पोळ्या चिकटतात हो तव्याला. <<< दक्षिणा अग तव्यावर पोळी टाकायच्या अगोदर तेल शिंपडायचे (त्यामुळे पोळी चिटकत नाही ) आणि लगेच पलटुन घ्यायची. मी असेच करते .
बाळ, तांबे पितळ, आतून कल्हई
बाळ, तांबे पितळ, आतून कल्हई केल्या शिवाय वापरता येत नाहीत. नाहीतर आपल्या
अन्नाशी त्यांची प्रक्रिया होते.
अल्यूमिनियम बाबत पण तोच धोका आहे. ( वीजेच्या मदतीने बॉक्साईटपासून अल्यूमिनियम वेगळा करायची स्वस्त प्रक्रिया, ज्ञात होण्यापुर्वी तो पण दुर्मिळ होता.
नेपोलियन अल्यूमिनियमच्या थाळ्यात जेवायचा !) पण तो धातू उष्णतेचा चांगला वाहक आहे.
लोखंडाबाबत वर लिहिलेच आहे.
स्टील त्या मानाने चांगले पण आजकाल चांगल्या प्रतीचे स्टील मिळत नाही, आणि
थेट आचेवर ठेवल्यास ती भांडी जास्त तापतात.
म्हणून अल्यूमिनियमचा कूकर आणि आत स्टेनलेस स्टीलचे डबे, हा चांगला पर्याय आहे.
मातीची भांडी शिजवण्यासाठी कशी तयार करायची, ते वर लिहिलेच आहे. तो एक
चांगला पर्याय आहे.
खास शिजवण्यासाठी तयार केलेली काचेची भांडी पण चांगली. त्यांची अन्नाशी प्रक्रिया
होत नाही. पण ती महाग असतात आणि हाताळणे जरा कठीण जाते. बोरोसील सारख्या काही कंपन्या, पूर्वापार अशी भांडी बनवत आहेत.
कालच कोटिंग निघालेली दोन
कालच कोटिंग निघालेली दोन जाडेजुडे पॅन्स फेकून दिले.. वापरातही नव्हती पण अजून पडून होती>>>>>>>>>>>आता जुने देउन नवि भांडी मिलतात ना.....२५%,३०% disc.
पुर्वी विमानाच्या पत्र्याचा
पुर्वी विमानाच्या पत्र्याचा तवा आणि कढया मिळायच्या ना? कलकत्त्याहून कुणीतरी नातेवाईकांनी आणून दिल्या होत्या.
साध्या तव्यावर तापमानाचं गणित एकदा जमल की पोळ्या वगैरे चिकटत नाहीत. घावन घालतानाही पहिला फाटतो, पुढचे छान होतात. पहिला फाटल्यावर खरपूस भाजून आपण एकीकडे ताटलीत घेऊन खाऊन टाकायचा
आमच्या ऑफिसमधला मातीचा तवा.
आमच्या ऑफिसमधला मातीचा तवा. या तव्यावरच्याच चपात्या आम्ही रोज खातो. तेल तूप न लावलेल्या अशा खमंग असतात त्या. हा तवा इथल्या सुपरमार्केट्मधे १०० शिलींगना म्हणजे ६० रुपयांना मिळतो. बाजारात आणखी स्वस्त असेल. नीट भाजलेला असल्याने ६/७ महिने तरी टिकतोच.
हे चित्र किंवा वर्णन यावरून भारतातले कुंभार असा तवा नक्कीच करुन देतील.
मातीच्या भांड्यात स्वयंपाकाचं
मातीच्या भांड्यात स्वयंपाकाचं राजीव दिक्षितांच्या व्याख्यानांतून ऐकलेलं आहे.
दिनेशदा, माझीही उत्सुकता बळावलीये. आता काही दिवसांनी सौ. माहेरी गेल्यावर किचन पूर्ण माझ्या ताब्यात..:) तेव्हा ही भांडी घेऊन प्रयोग करुन बघेन. त्यावेळी तुमची मदत होईलच!
वेळकाढू हार्ड आनोडाईज्ड फोडणी
वेळकाढू
हार्ड आनोडाईज्ड फोडणी पात्र कुठेही मिळेल, भांड्याच्या दुकानात वगैरे. तु पुण्यात असशील तर तुळशीबागेत गायत्री मार्केट, तुलसी मध्ये पहा. तिथे तर हार्ड आनोडाईज्ड चहाची भांडी पण मिळतात.
केव्हापासून मलाही नॉनस्टीक
केव्हापासून मलाही नॉनस्टीक तवा घ्यायचा होता, पोळ्यांसाठी. पण नंतर हा बीबी वाचून परवा कास्ट आयर्नचा तवा घेतला.
फोडणी घालायचं पात्र हार्ड
फोडणी घालायचं पात्र हार्ड अनोडाइज्डपेक्षा लोखंडी मिळतं ते किंवा लोखंडी पळी घ्यावी असे मी सुचवेन.
हेम, नक्कीच. फोडणीची लोखंडी
हेम, नक्कीच.
फोडणीची लोखंडी पळी तापवून, त्यात फोडणी करुन, ती पळीच आमटीमधे बुडवून काढायची. हि योग्य पद्धत. रोजच्या वापरात असली तर गंज वगैरे चढत नाही.
येस्स अगदी अगदी. पळीपेक्षा
येस्स अगदी अगदी. पळीपेक्षा थोडं मोठं आणि कढईपेक्षा बरंच लहान असं कढलं पण लोखंडीच असावं. द पोह्यांची फोडणी यात मस्त खमंग होते. तसंच ४ मिरगुंड, २ सांडग्याच्या मिरच्या असं एवढंसंच तळून काढायचं असेल तरही मस्त पडतं हे.
sandwich toaster चे
sandwich toaster चे कोटिंग पण घातक आहे का ?????...
Pages