चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(२)

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 March, 2012 - 10:41

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे दुसरं छायाचित्र...

चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!

Chickentandoori_MCharoli_2.jpg

स्पर्धेचं स्वरूप आणि नियम http://www.maayboli.com/node/33622 इथे दिले आहेत.
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
***
वरील छायाचित्र kspoddar यांच्या सौजन्यानं (Creative Commons Attribution-Share Alike 2.0 Generic license अंतर्गत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा! आलं का दुसरं..... Happy

दही लावलं, मसाला घातला
चढला रंग लालेलाल...
तंदुरातून भाजुन निघालं
झालं चिकन हलालं....... Proud

अर्ज किया है ...

ऐ गुल-ए, गुलजार, गुलगुलीत, मसालेदार, चिकनी चिकन
जब तुम तंदूर से निकलती हो और खरपूस भूना होता है तेरा बदन
कौए ओरडने लगते है और एक आग सी मेरे पेट में ऐसे लगती है जानेमन
इस दुनिया को भूलकर मै सरळ चला जाता हूं तुम्हारे शरन

टोके, हिंदी नको म्हणतेस? मग ही घे : Happy

पाहूनी या मसालेदार चिकनांच्या माळा
सुराअसुरांसही ठक पडे वेळोवेळा
तंदुरी मसाला, लिंबू, कांदा मेळूनी हा सोहळा
स्वजिव्हे, स्वजनांसमवेत अनुभवावा

अरे एकाच आयुष्यात सालं किती वेळा मरायचं
मान कापुन, कातडी सोलुन, धगधगत्या कोळश्यावर पडायचं
पोटात खुपसुन सळई मरण झुल्यावर झुलायचं
मसाल्यांचा शृंगार करुनी दातांखाली चिरडायचं

चारोळीसाठी तरी थोडावेळ फोटोकडे पहावं लागतंय, मग तोंडाला पाणी सुटतंय आणि अर्धवट सुचलेली चारोळी विसरायला होतीय Proud

कितीही शिजली कितीही भाजली
येणार नाही स्वाद नवा
दिसता तोंडा पाणी सुटण्या
मसाल्याचा टच हवा

यजुर्वेद काय घेवून बसलाय राव
होमहवन जा ना करून जरा पार
यायच्याही आधी ती तुपाची पळी
अग्निला होती प्रिय मांसाचीच सळी .

काय वर्णू तुझं रूप तंदुरी?
लाल वस्त्र ल्यालीस भारी
कांदा-कोबी-गाजरासोबत
लिंबू तुला चवदार करी! Happy

कोंबडी सोलली , मसाला केला
प्रत्येक तुकडा शिगेला लावला
भट्टीत घालून मस्त भाजला
लिंबू पिळून खाऊन टाकला! Proud

दह्यात घोळवा नि मसाल्यात लोळवा
रंग ल्याली कोंबडी, तंदुरीत ठेवा
चर्र भाजली की ताटात सजवा
जावईबापु हात मारतील आडवा

मंदार दादा :
Rofl
Lol

माझी पण एक

व्याक व्याक व्याक व्याक
किंवा
व्याक
व्याक
व्याक
व्याक

Happy

Pages