Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 March, 2012 - 10:41
पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे दुसरं छायाचित्र...
चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!
स्पर्धेचं स्वरूप आणि नियम http://www.maayboli.com/node/33622 इथे दिले आहेत.
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
***
वरील छायाचित्र kspoddar यांच्या सौजन्यानं (Creative Commons Attribution-Share Alike 2.0 Generic license अंतर्गत)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे व्वा! आलं का दुसरं.....
अरे व्वा! आलं का दुसरं.....
दही लावलं, मसाला घातला
चढला रंग लालेलाल...
तंदुरातून भाजुन निघालं
झालं चिकन हलालं.......
नुसतं बघूनच तोंडाला पाणी येतय
नुसतं बघूनच तोंडाला पाणी येतय च्यामारी! चारोळी काय करणार? कप्पाळ?
लावलं आलं लसून नी केलं दह्यात
लावलं आलं लसून
नी केलं दह्यात म्यारिनेट
तयार हाये चिकन तंदुरी
प्वाटात जाऊद्या थेट!
अर्ज किया है ... ऐ गुल-ए,
अर्ज किया है ...
ऐ गुल-ए, गुलजार, गुलगुलीत, मसालेदार, चिकनी चिकन
जब तुम तंदूर से निकलती हो और खरपूस भूना होता है तेरा बदन
कौए ओरडने लगते है और एक आग सी मेरे पेट में ऐसे लगती है जानेमन
इस दुनिया को भूलकर मै सरळ चला जाता हूं तुम्हारे शरन
हिंदी शेर चालतील?
हिंदी शेर चालतील?
मामे ओरडने लगते है मै सरळ
मामे
ओरडने लगते है
मै सरळ चला जाता हूं >>>
टोके, हिंदी नको म्हणतेस? मग
टोके, हिंदी नको म्हणतेस? मग ही घे :
पाहूनी या मसालेदार चिकनांच्या माळा
सुराअसुरांसही ठक पडे वेळोवेळा
तंदुरी मसाला, लिंबू, कांदा मेळूनी हा सोहळा
स्वजिव्हे, स्वजनांसमवेत अनुभवावा
अरे एकाच आयुष्यात सालं किती
अरे एकाच आयुष्यात सालं किती वेळा मरायचं
मान कापुन, कातडी सोलुन, धगधगत्या कोळश्यावर पडायचं
पोटात खुपसुन सळई मरण झुल्यावर झुलायचं
मसाल्यांचा शृंगार करुनी दातांखाली चिरडायचं
वैभ्या, ही 'त्या' पार्टीची
वैभ्या, ही 'त्या' पार्टीची चारोळी झाली, माप्रांना 'या' पार्टीची हवी आहे
चारोळीसाठी तरी थोडावेळ
चारोळीसाठी तरी थोडावेळ फोटोकडे पहावं लागतंय, मग तोंडाला पाणी सुटतंय आणि अर्धवट सुचलेली चारोळी विसरायला होतीय
लले .....
लले .....
पिसे काढता कोंबडी
पिसे काढता
कोंबडी लाजली
मस्साला लावता
लाल झाली
मामी, मस्त लिवलंय. मसाला मार
मामी, मस्त लिवलंय.
मसाला मार के हे हिंदीच आहे की
कितीही शिजली कितीही
कितीही शिजली कितीही भाजली
येणार नाही स्वाद नवा
दिसता तोंडा पाणी सुटण्या
मसाल्याचा टच हवा
यजुर्वेद काय घेवून बसलाय
यजुर्वेद काय घेवून बसलाय राव
होमहवन जा ना करून जरा पार
यायच्याही आधी ती तुपाची पळी
अग्निला होती प्रिय मांसाचीच सळी .
मामी, गुलगुलीत काय???
मामी, गुलगुलीत काय???
काय वर्णू तुझं रूप
काय वर्णू तुझं रूप तंदुरी?
लाल वस्त्र ल्यालीस भारी
कांदा-कोबी-गाजरासोबत
लिंबू तुला चवदार करी!
कोंबडी सोलली , मसाला
कोंबडी सोलली , मसाला केला
प्रत्येक तुकडा शिगेला लावला
भट्टीत घालून मस्त भाजला
लिंबू पिळून खाऊन टाकला!
मामी टोके
मामी
टोके
व्वा! पदार्थाइतक्याच तोंपासु
व्वा! पदार्थाइतक्याच तोंपासु चारोळ्या आहेत! येऊद्या अजून!
दह्यात घोळवा नि मसाल्यात
दह्यात घोळवा नि मसाल्यात लोळवा
रंग ल्याली कोंबडी, तंदुरीत ठेवा
चर्र भाजली की ताटात सजवा
जावईबापु हात मारतील आडवा
ईईईईई
ईईईईई
किंवा ई ई ई ई
किंवा
ई
ई
ई
ई
मंदार दादा : माझी पण
मंदार दादा :
माझी पण एक
व्याक व्याक व्याक व्याक
किंवा
व्याक
व्याक
व्याक
व्याक
तंदुरीत शेकवलेलं मांस
तंदुरीत शेकवलेलं
मांस लालभडक...
कोंबडी म्हणून खाल्ली
पण निघालं बदक.....
भुंग्या ... बरीच बदकं
भुंग्या ... बरीच बदकं पचवल्येत वाट्टं. चव कशी कळली बरोब्बर रे?
हायला, चारोळ्या नको पण
हायला, चारोळ्या नको पण प्रतिसाद आवरा!
मामी मी शुध्द शाकाहारी आहे...
मामी मी शुध्द शाकाहारी आहे... कोंबडी सोड तिचं अंड पण नाही खाल्लेलं कधी
घासफूस सम्राट आम्ही
भुंग्या मी तर तुला परवा
भुंग्या मी तर तुला परवा अश्याच लालभडक तंदुरीवर आडवा हात मारताना पाहिलं
(No subject)
Pages