निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचेच फोटो व माहिती सुंदर.
मामी, मला सर्वच फुले आवडतात. एकाचे नाव नाही सांगता येणार.

हो मामी, त्याच कूळातले. वर्षूने यातला गुलाबी प्रकार दाखवला होता.
घरी लावायला म्हणून काही झाडे आणली कि नाही ?

ओ..अच्छा..डेलिया होता तो.. धन्स विवेक,वेलची
दिनेश दा..फुलांच्या नावावरून मुलींची नावे ठेवण्याची कल्पना खूप गोड रितीने सांगितली.. मजा आली वाचताना..
मामी..तुला हे हिरवंपांढरं कुठे मिळालं???

दिनेशदा, घरी लावायला नाही आणली. पण ताज्या भाज्या भरपूर खरेदी केल्या होत्या.

वर्षुताई, महाबळेश्वरला 'मधुसागर'च्या दुकानात होतं.

शोभा१२३ - काही तरी क्ल्यू दिल्याशिवाय ओळखणे - अपने तो बस की बात ही नही...... दिनेशदा, शांकली, साधना, जागू, स_सा, जिप्सी व इतरही काही मंडळीच अशा नुसत्या फोटोवरुन ओळखू शकतात (विदाऊट एनी क्ल्यू).

शोभा१२३ - ते फुल कित्ती गोडुलं आहे Happy

शोभेचं (डेकोरेटिव या अर्थाने - शोभा१२३ चं या अर्थी नव्हे :प ) 'केल' (Kale) आहे ते मामी च्या फोटो मधे - त्याची खाण्याची जात खूप पौष्टिक असते - मी करते याची भाजी - आणि बेक करून चिप्स सुद्धा Happy

मामी आणि वर्षूतै फोटो फारच छान आलेत. मामी हे डान्सिंग बॉल्स मी पण आणले होते महाबळेश्वराहून पण माझी रोपं जगली नाहीत. Sad

दिनेशदा, काव्यातून इतकी झाडं डोकावतात या बद्दल कधी फारसा विचारच केला नव्हता. तुमच्यामुळे आता जाणीवपूर्वक गाण्यांच्या शब्दांकडे लक्ष दिले जाईल.

शोभा, ते सानुलं फूल गुलाबी बहाव्याचं आहे असं वाटतंय. पण जास्त सस्पेन्स नको ठेऊस बरं! आणि ती रांगोळी किती सुंदर काढलीये! अगं मोदी गणपतीच्याच देवळात प्रदक्षिणा घालतो ना तिथे मागल्या बाजूला दुरंगी बाभूळ आहे. परत गेलीस तर जरूर बघ.

दिनेशदा, मागे हेम यांनी काळ्या कुड्याबरोबरच शेंगांचा एक फोटो टाकला होता. तो कदाचित वाकेरीचा आहे का?. Moullava spicata या नावाने गूगलवर सर्च केला तर तशाच शेंगा आणि पानं वाटताहेत. त्यातल्या त्यात फ्लिकरवर असेच फोटो दिसताहेत. पण मला कन्फर्म होत नाहीये. प्लीज, जरा तुम्ही पण बघाल का?

हो हो, वाकेरीच्या असू शकतात. वाकेरीचे नाव घेतले कि तिचा तो लाल पिवळा डौलदार तूराच आठवतो.
त्याला भयंकर काटे असतात. हात सोलवटून निघतो.
शोभेचे, फूल त्या जावा कॅशियाचेच असणार !

आपल्याकडे चैत्र चाहूल लागलीय आणि इथे लंडन मधे 'spring' चाहूल लागलीय. Happy कोपर्‍या कोपर्‍यात डॅफोडिल्स उमलली आहेत. आपोआप. आणि इतरही वेगवेगळ्या रंगाची खूप फुलं वातावरण प्रसन्न करतायत.

dafodil_1.jpgdafodil_2.jpg

आणि ह्यातलं डावीकडचं फूल भुंग्यांनी कुरतडलय.
dafodil_3.jpgdafodil_5.jpg

निसर्गाच्या चित्रकाराची कला किती छोट्या छोट्या गोष्टींमधे पण दिसुन येतेय पहा..
dafodil_4.jpg

हे झाड फुलांनी कसं लगडलय..
jaad_1.jpgjhad_2.jpg

काय सुंदर गुलाबी छटा आहे ना..
jhad_3.jpg

ह्या झुडुपाला पानं फुटण्याआधी फुलांचा घोस लागलाय
gulabi_1.jpggulabi_2.jpg

इतर झाडं नविन ऋतुच्या स्वागतासाठी नविन पानं-फुलं लेवून तयार आहेत आणि हे बिचारं वाळक्या फुलांचा गुच्छं वागवतय अजूनही Happy

walaka_jhad_1.jpgwalaka_jhad_2.jpg

शकुन्..आहाहा..डॅफोडिल्स.. वर्ड्सवर्थ च्या कवितेची जोराने आठवण करून दिलीस..!!!!!!
इतरही फुलं सुरेख आहेत.
प्रज्ञा, मी कोकणातच गेले नाहीये कधी.. मी एम पी मधली.. Happy

रोमात आहे...........वाचतीये आणि फोटोही पाहातेय! सुंदर!
सध्या आमच्या कडूलिंबावर (श्री.)कोकीळ आणि (सौ.) कोकिळा यांचं आणि कावळ्यांचं....आता यांच्यातलं श्री.आणि सौ. नाही बॉ ओळखत.................काहीतरी चाललय.
बहुतेक कोकिळांची नेहेमीची कॉन्स्पिरसी चालली असावी.
कावळीला पळवून लावून तिच्या घरट्यात अंडं घालणे! खूप गोंधळ चालू असतो.

आणि मामी तुझं ते कोबी वर्गातलं........कोनातलं हिरवं पांढरं आईसक्रीम वाटतंय!

येस वर्षू मी ही अगदी हेच लिहिणार होतो की शकुन,डॅफोडिल्स कवितेची आठवण करून दिलीस शाळेतले दिवस आठवले नाना देशपांडे सर आठवले फार छान शिकवत.
Daffodils
I wandered lonely as a cloud
That floats on high o'er vales and hills,
When all at once I saw a crowd,
A host, of golden daffodils;
Beside the lake, beneath the trees,
Fluttering and dancing in the breeze.

Continuous as the stars that shine
And twinkle on the milky way,
They stretched in never-ending line
Along the margin of a bay:
Ten thousand saw I at a glance,
Tossing their heads in sprightly dance.

The waves beside them danced; but they
Out-did the sparkling waves in glee:
A poet could not but be gay,
In such a jocund company:
I gazed--and gazed--but little thought
What wealth the show to me had brought:

For oft, when on my couch I lie
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
And then my heart with pleasure fills,
And dances with the daffodils.

William Wordsworth
अशाच आणखी कविता शोधाव्याशा वाटल्यातर http://www.poemhunter.com इथे पहा

सुंदर डॅफोडिल्स.... मला खुप आवडतात पण आजवर केवळ फोटोच पाहिलेत. Sad

श्रीकांत, कवितेसाठी आभार.

थंड प्रदेशात झुपक्यांनी येणा-या किंवा एकाच वेळी अख्खे झाड फुलणा-या जाती जास्त असाव्यात बहुतेक.

स्चच्छ करकरीत उबदार सुर्यप्रकाश, त्या पार्श्वभुमीवर निमुळती छते असलेली, पांढ-या निळ्या हिरव्या पिवळ्या रंगात रंगवलेली एकसारखी घरे, घरांच्या खिडक्यांना टांगलेल्या कुंड्या आणि त्या कुंड्यांमधुन फुलेच फुले. घराच्या भिंतींवर बांधलेले फ्लॉवरबेड आणि त्यातुन डोकावणारी फुलेच फुले.. हे सगळे परदेशांमधल्या फोटोत पाहिलेय. आपल्या इथे कधीच पाहिले नाही.

साधना, थंड प्रदेशात उन्हाळा थोडा असतो. किटक कमी, त्यामूळे अगदी थोड्या दिवसात पुढच्या पिढीची त्यारी करायची असते त्या झाडांना. हि सगळी प्रक्रिया आतल्या आत चालू असते, आणि जरा ऊबदार हवामान मिळाले, कि झाडे भरभरुन फुलतात.

----

मी वाचले होते कि पुण्यात (विद्यापिठाच्या आवारात किंवा एम्प्रेस गार्डन मधे ) एक मोठे वाढलेले
कुसुंबाचे (कोशिम) चे झाड अहे. असेल तर या दिवसात ते पुर्ण झाड गर्द गुलाबी पालवीने भरुन गेले असेल.
पुण्यातल्या मंडळींनी लक्ष ठेवा बरं.

पुण्यात सध्या बरेच वृक्ष फुललेले आहेत. कुसुंबाचे झाड दिसतेका पाहिले पाहिजे.

मी शेंगदाणे लावले होते शेंगा कश्या येतात ते पहायला. मस्त शेंगा येउ लागल्या आहेत. मातीच्या वरच्या थरातच होत्या जास्त. फुला खाली पारंबी प्रमाणे एक शीर वाढत जमिनीत जाते त्याच्या टोकाला शेंगा येतात.

कोशिंब/कुसुंबाने नवी पालवी लेऊन बरेच दिवस झाले! आता 'ती' पालवी हिरवी झाली!! ह्यावेळी (किंवा गेले काही वर्षे) हवामानात इतके बदल होताहेत ना की साधारणपणे वसंत सुरू झाला की फुलणारी किंवा नव्या पालवीने बहरणारी मंडळी थंडी संपता संपताच फुलताहेत! किंवा असं काही निश्चित कळत नाहीये वृक्षांचं! आणि त्यामुळे मार्चमधे बर्‍याच वृक्षांना आता शेंगा लागल्या आहेत! इथे पुण्यात ३/४ दिवसांपर्यंत सकाळी थंड आणि दुपारी उन्हामुळे काहिली असं काहीसं हवामान होतं; त्यामुळे ह्या वृक्षांच्या फुलण्या-फळण्यात वेळापत्रक सांगणे जरा अवघड झालंय.
पण झकारांदा,तबेबुया,गुलाबी बहावा,शिरीष,रेन ट्री ही मंडळी मात्र वेळापत्रक अगदी चोख पाळतात हं! (शेवटी 'परकीयच' ना! वेळेबाबत फारच काटेकोर असणार!) शिरीषाचा मात्र अपवाद बरंका!

शांकली, हि सुरवातच आहे ग्लोबल वॉर्मिंगची.
मार्च महिना म्हणजे केनयाचा पावसाचा महिना. एकदाच पडला या महिन्यात पाऊस.
उन्हामूळे इथे पण झकरांदा अवेळी फुललाय.

Pages