निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<त्याच्या घरी झाड आहे बोराचे. त्याला बोरे लागतात आणि बोरांच्या आत चारोळया>>> बोराच्या आत चारोळ्या Happy साधना त्याने काहीतरी वेळ मारून नेली.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
शशांकनी टाकलेला फोटो कृष्ण-शिरीषाचा आहे. (Albizzia amara) याला मंद सुगंध होता.

स_सा, गेळाच्या फुलाचा फोटो सह्ही एकदम.
आणि उजू ती गुलाबी फुलं किती सुंदर आहेत!
दिनेशदा, चारोळीच्या वृक्षाचे वर्णन मी खूप ऐकले आहे पण अजून प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नाहीये. कुठे दिसला तर नक्की फोटो काढून इथे देणार.

मामी, स्ट्रॉबेरीचे फोटो मस्त! महाबळेश्वरला पण असेच प्लॅस्टिक अंथरलेले बघितले होते. पण तेव्हा नुकतीच लाववड केली होती, त्यामुळे फुलं नव्हती. ती प्रथमच बघितली ह्या फोटोंत. सुंदर आलेत फोटो.

साधना..बोराच्या आत चारोळी..:हाहा:

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy

ही महाबळेश्वरला पाहिलेली फुलं. याला तो रेस्टॉरंटवाला 'डान्सिंग डॉल्स' म्हणत होता. एकाच कुळातली पण वेगवेगळ्या रंगसंगतीची :

dd1.jpgdd2.jpgdd3.jpg

मामी - ह्या फुलांना आमच्याकडे Fuchsia म्हणतात - मागल्या उन्हाळ्यात मी आणि मंजिरी घेउन आलो आहे हे झाड - अजून जागे झाले नाहीये. फुले आल्यावर फोटो टाकेन (fingers crossed:)

शशांक, स्ट्रॉबेरी ची रोपे runners नी तयार होतात - ती लावतांनाच ते कापड खाली अंथरायचे - मग त्या कापडावर सुरी ने एक X फाडायचा - आणि त्या ठिकाणी ते कापड उकलून रोप लावायचे.

@शशांक.. नाही रे चिमण्या दिसत इकडे.. आताशी मुलांना झू मधे घेऊन जातात चिमण्या बघायला..
युवराजचा,भारद्वाज चा फोटो मस्त.. आणी माहिती ही.
दिनेश दा.. आम्ही खलबत्ता वापरायचो बी फोडायला..चारोळी क्वचित सबंध निघायची नाहीतर आम्ही तुकड्यांवर(कधीकधी चुर्‍यावर सुद्धा !!) समाधान मानायचो . अगदी पेशंटली तानतास चालायचा उद्योग्!! Proud
वा.. नवीन वर्षाच्या फुलंमयी सुंदर शुभेच्छा!!!

मामी, ती फुलझाडे टांगलेल्या कुंड्यात लावायची. मस्त दिसतात. यातली बहुतेक फुले, मधुमालतीसारखी खाली झुकलेली असतात पण सरळ वर बघणार्‍या फुलांची
झाडे पण मी बघितली आहेत.
---
वर्षू, या असल्या उद्योगात मे महिन्याची सुट्टी मजेत जायची. पुर्वी, श्रीखंड बासुंदीत जास्त करुन चारोळ्याच वापरत. बदाम पिस्ते मिळतच नसत.

सर्व निसर्गप्रेमींना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ishu 331.jpg

दिनेशदा, आमच्या ईथे बरीच चेंडूफळाची झाड आहेत मग. आणि ती जी मला फूल वाटली ती फळ आहेत का त्या झाडाची?
शांकली ते गूलाबी फूल महाबळेश्वरला बघितल होत मी.
मामी
हा माझा झब्बू तूझ्या फोटोंना.

21052011380_0.jpg21052011382_0.jpg

उजू, पांढरे असताना ते फुलच असते मन वरच्या पांढर्‍या पाकळ्या गळून आत पिवळसर चॉकलेटी रंगाचे फळ तयार होते. (कदंबासारखेच.)

हि वरची फुले आता गेल्या २/३ वर्षातच फार दिसायला लागली आहेत. आणि मनमोहक आकार आणि रंग, यामूळे चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. अजून तरी त्यात लाल, गुलाबी, पांढरा आणि अधल्या मधल्या छटाच दिसताहेत. यात अनेक
रंगांचे प्रयोग नक्कीच होत असतील.

या फुलांची नावं कुणी सांगेल प्लीज??

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३-हे फळ आहे.

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७- कॅक्टस.. एक तेव्हढच नाव माहीतै ..

वर्षू, मी पण हाँग काँगला हिच फुले बघितली होती !!
पहिले दोन ऑर्किडस आहेत. ४ ग्लॅडिओला प्रकारातले तर ५ शेवंतीच्या प्रकरातले (४/५ चे कंद असतात ) ६ ला मराठीत कोंबडा म्हणतात. हे माठ (पालेभाजी) कूळातले. याच्या काळ्या बारीक बिया असतात. देठाशी नखाने खाजवले तर सहज मिळतात.

३ मात्र तूमची खासियत दिसतेय !!

बिल्डिंग मधल्या तेलगु मंडळीं ना आज सकाळी सकाळी युगादी शुभाकांक्षालु म्हटले अन युगादि पचडी नावाचा षड् रस युक्त पदार्थ चाखला, घटकपदार्थात केळी गूळ अन काळे मिरे तर मला ओळखू आले बाकी अजून काही असतील. अर्थात सोबत भरपूर मेदूवडे ही चापले.
आता तुम्हा सगळयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!! काय पुरणपोळ्या श्रीखंड वगैरे असेल ते येउद्या संस्कृती संस्कृती म्हणतात ती हीच हो दुसर काही नाही. आपले सणवार सगळे आपल्याला निसर्गाच्या जवळ नेतात. आपण आज कडूलिंबाची चटणी खातो तेलगु लोक युगादी पचडी एवढाच काय तो फरक.

Solanum mammosum हे इंग्लिश नाव आहे त्या ३ नंबर च्या प्रचितल्या फळांचं...

हां..ऑर्किड्स.. आत्ता आठवलं तुम्ही सांगितल्यावर..

कोंबडा नाव नवीन ऐकलं.. आम्ही लहानपणी याला मखमलीची फुलं म्हणत असू.. Happy

ग्लॅडिओला फॅमिली- ग्रेट
धन्स दिनेश दा

श्रीकांत, देशातले सगळे श्रीखंड पुरी खाऊन डुलक्या खाताहेत. आपण परदेशी लोकच आज जागे आहोत !!

आपण परदेशी लोकच आज जागे आहोत !!

आम्ही पण आहोत हो... आज सकाळी आधी आहारातुन आरोग्य हा बीबी वाचल्यावर श्रीखंड नी पुरणपोळीवर मोठ्ठी फुली मारुन आले हाफिसात.

निग मंडळींना येते वर्ष आनंदाचे सुखाचे नी भरपुर बहराचे जावो.. निग कुटूंब अजुन मोठे होवो, विस्तारो, फांद्या फुटो, मुळे मजबुत होवो इ.इ.इ.इ.

श्रीकांत ने निसर्ग आणि आहार याचा संबंध असा उल्लेख केल्यावर, सहज मला
हे सूचले.
नुसत्या आहारातच नाही, तर काव्यात आणि कवितेत पण आजूबाजूची झाडेच कशी
डोकावतात बघा.
निंब किंवा कडूनिंब भारतभर आहे (कोकणपट्टीत नाही) त्यामूळे मिला है किसीका झुमका, ठंडे ठंडे हरे हरे नीमतले, पासून निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला, पर्यंत तो
आहेच.
सावित्रीच्या पुण्याईने देशभर वड आहेच. पण कुसुंब नावाचे झाड मराठी कवितेत
फारच कमी. मीराबाईच्या भजनात ते येते. लाल गुलाबी रंगाची ती अनोखी छटा
असते. पण आपल्याकडे तो रंगही नाही. पैठणीत कोनफळी पासून बैंगनी पर्यंत रंग
येतील, पण तो नाही.
केवडा, अबोली तशी जास्त करुन कोकणात. त्यामूळे केतकी, अबोली हि नावे
घाटमाथ्यावर नाहीत. बकुळा सातारकर किंवा गुलाब वाईकर अशी नावे असतील पण
केतकी खुटेगावकर किंवा अबोली वाठारकर.. अशी नावे नसतील पुर्वी.
कमळ मात्र सर्व भारतभर त्यामूळे उत्तरेकडे कमला, कोकणात कमल आणि देशावर
कमळी, कमळजा असणार. केतकी, अबोली नसली तरी शेवंता, गुलाब असणार.
आंब्याचे झाड सर्व भारतभर, त्यामूळे कोयलीया बोले अंबवा डार प्रमाणेच, पाडाला
पिकलाय अंबा, नीट बघ पण असणार.
मेंदी आपल्याकडे पुर्वी फारशी वापरात नव्हती. आपल्याकडे लग्नात मेहंदी रसम
पण नव्हतीच. खुलविते मेंदी माझा रंग गोरा पान किंवा मेंदीच्या पानावर मन
अजून झुलते.. हे अपवादच. मेहंदी लगे मेरे हाथ, ही उत्तरेकडचीच खासियत.
मेंदी नसली तरी विडा होताच. तो अगदी देवपूजेपासून पोटपूजेपर्यंत होताच (आणखीही कुठे कुठे होता ) त्यामूळे पान खाये सैंया हमारो, पासून भलताच रंगला
काठ लाल ओठात पर्यंत तो आहे. लौंगा इलायची का ईडा बनाया पासून कळीदार
कपूरी पान, केशरी चुना.. अशी रेंज आहे.
नारळाची झाडे कोकणातच असल्याने, यांच्या उरात भरली शहाळी, अशी ओळ तिथेच
येणार. लावणीत नारळाचे झाड नाही दिसणार.
आपल्याकडच्या नद्या म्हणजे उत्तरेकडच्या नद्यांपुढे ओढेच म्हणायचे.
त्यामूळे नदीया गहरी, नांव पुरानी.. नदीया धीरे बहो.. अशी रुपके आपल्याकडे
नाहीत. कशी काळनागिणी हे पण आधुनिक काव्यच म्हणायला हवे.
विस्कळीतच लिहिलेय मी, पण मुद्दा लक्षात आलाच असेल.
तुकाराम महाराजांनी, वृक्षवल्ली अभंगात काही नामोल्लेख केले असते, तर त्या
काळातील झाडे कुठली, ते कळले असते !!

छान.
प्रचि ४ ग्लॅडिओला फॅमिली नाही. तो ऑर्किडच आहे.
प्रचि ५ डेलिया आहे. शेवंतीच्या कुळातले नाही.

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष सर्वाना, निसर्गात भरपूर फिरवणारे जावो. Happy
पण आम्ही एकदम तरबेज होतो ह्या कामात. त्यामुळे आम्ही भरपूर खाऊन डबे भरून, सुट्टित माझे भाऊ पुण्याहून कोकणात यायचे, त्यांच्यासाठी ठेवायचो. काय शोभा आठवतंय ना सगळे?>>>>>प्रज्ञा, दिनेशदानी चारोळी म्हटल्यावर तो सगळा चित्रपट ऊभा राहिला डोळ्यासमोर. Happy
गेले ते दिन गेले. Sad

आताच दिनेशदांचा 'अंतरंग' बाफ पाहिला आणि जाणवलं की एवढ्या सगळ्या सुंदर, दिमाखदार, रंगित फुलांत मला सगळ्यात आवडतात - पांढर्‍या डेझी. अगदी साधीसुधी आणि आनंदी फुलं दिसतात ती.

तुमचं आवडतं फुल कोणतं आणि का ते सांगा प्लीज, सगळ्यांनी. Happy

मामी, खरं आहे.
पण मला विचारशील तर फुलांचे फुल असणेच मला त्याच्या प्रेमात पाडते.
त्यांच्या दुनियेत, असुंदर असे काही नसतेच.
माझ्या संग्रहातील (मी काढलेल्या ) फोटोत ९० टक्क्यांच्यावर फोटो फुलांचेच आहेत.

Pages