चुटकीभर नमक, मोहरी की सनक
हलकीशी हल्दी, दालचिनी दर्दी
लहानशी लवंग, खसखस खमंग
उमंग है दिलमें जिसके, उसका सपना होगा सच...
तुमच्या आमच्या जगण्याला जरा मस्साल्याचा टच...
'वळू', 'विहीर' आणि 'देऊळ'च्या तडाखेबंद यशानंतर उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी घेऊन येत आहेत नवाकोरा झणझणीत चित्रपट - 'मसाला'...
उमेश - गिरीश कुलकर्णी यांच्या 'अरभाट चित्र'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संदेश कुलकर्णी आणि प्रायोजक आहेत प्रवीण मसालेवाले.
मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.
चित्रपटाचं नाव 'मसाला'... मग शीर्षकाला साजेशी स्पर्धा हवीच की नाही?
परजा आपापली शस्त्रं...विळ्या, सुर्या, किसण्या, कढया, झारे, डाव, चमचे आणि हो, कॅमेरा!
तयार करा एक फक्कडशी पाककृती, मस्तपैकी सजवा, झक्कास फोटो काढा आणि इथे दिमाखात सादर करा!!!
फक्त पुढील गोष्टी ध्यानात ठेवा -
१. पाककृतीत मसाल्याच्या एखाद्यातरी पदार्थाचा वापर असायला हवा. एखाद्या पदार्थाच्या मूळ कृतीत बदल करून नवीन 'जरा हटके' पाककृती चमचमीत शब्दांत लिहून सादर केलीत तर खूपच मजा येईल.
२. पाककृतीचा आकर्षक सजावटीसह फोटो देणे स्पर्धेसाठी बंधनकारक आहे.
३. इथल्या पाककलानिपुणांकडून नवीन पाककृती अपेक्षित आहे. या अगोदर मायबोलीवर लिहिलेली स्वलिखित पाककृती पुन्हा नको.
४. 'मसाला - स्पर्धा' या ग्रुपातच 'नवीन पाककृती' ही लिंक वापरून आपली पाककृती लिहा. या ग्रुपात लिहिलेल्या पाककृतीच स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. तसेच, या पाककृती सार्वजनिक करायला विसरू नका.
५. पाककृती लिहिण्याची अंतिम तारीख आहे १२ एप्रिल, २०१२.
६. एक आयडी कितीही पाककृती लिहू शकतो. प्रत्येक नव्या पाककृतीसाठी नवीन धागा उघडावा.
या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत श्री. भूषण इनामदार.
श्री. भूषण इनामदार हे नावाजलेले शेफ आणि आघाडीचे फूड स्टायलिस्ट आहेत. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीत पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हॉटेल ओबेरॉयसारख्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलं. त्यानंतर काही काळ ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केटरिंग कॉलेजात लेक्चरर म्हणून कार्यरत होते. गेली काही वर्षं ते फूड स्टायलिस्ट म्हणून काम करतात. अनेक बड्या कंपन्यांसाठी त्यांनी फूड स्टायलिंग केलं आहे.
'मसाला' चित्रपटाच्या निमित्तानं होणार्या या पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील -
पहिलं बक्षीस - 'मसाला चित्रपटाच्या मुंबईला २० एप्रिल, २०१२ रोजी होणार्या प्रीमियरची दोन तिकिटं आणि चित्रपटातल्या गाण्यांची एक सीडी.
दुसरं बक्षीस - 'मसाला चित्रपटाच्या मुंबईला २० एप्रिल, २०१२ रोजी होणार्या प्रीमियरची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'मसाला' चित्रपटातल्या गाण्यांची एक सीडी.
मंडळी,
या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण अजून दोन दिवसांची मुदतवाढ देत आहोत.. आता पाककृती पाठवण्याची शेवटची तारीख आहे १२ एप्रिल, २०१२..
- प्रवेशिका क्र. १ - नान आणि पनीर बटर मसाला
- प्रवेशिका क्र. २ - मस्साला चिकन
- प्रवेशिका क्र. ३ - पनीर चिली शेजवान
- प्रवेशिका क्र. ४ - लज्जतदार-मसालेदार कैरीची कोशिंबीर
- प्रवेशिका क्र. ५ - शेकटाच्या शेंगांची भजी
- प्रवेशिका क्र. ६ - भरवाँ करेला (कैरीचा मस्साला मारके)
- प्रवेशिका क्र. ७ - गरम (भाजक्या) मसाल्याची आमटी
- प्रवेशिका क्र. ८ - बटाट्याचा मसालेदार रस्सा ( खानदेशी स्टाईल)
- प्रवेशिका क्र. ९ - भरलेले वांगे... सासुबाई श्टाईल!!
- प्रवेशिका क्र. १० - "मस्साला च्या मारी"....
- प्रवेशिका क्र. ११ - सांबार वडी...... नागपुरी
- प्रवेशिका क्र. १२ - केळेवेळे
- प्रवेशिका क्र. १३ - कोलीमाच्या मसाला वड्या
- प्रवेशिका क्र. १४ - मटारच्या करंज्या.
- प्रवेशिका क्र. १५ - हिरव्या-गोड्या मसाल्यातील पौष्टीक पराठे
- प्रवेशिका क्र. १६ - मसालेदार, मजेदार वरणफळं...
- प्रवेशिका क्र. १७ - भरली वांगी मसाला दाक्षिणात्य पद्धतीने
- प्रवेशिका क्र. १८ - चिंबोरीचं (खेकड्याचं) कालवण
- प्रवेशिका क्र. १९ - अॅपल क्रिस्प
- प्रवेशिका क्र. २० - मटण चॉप्स फ़्राय
- प्रवेशिका क्र. २१ - जिगळ्या
- प्रवेशिका क्र. २२ - "मस्सालामामा की पोटली..."
- प्रवेशिका क्र. २३ - व्हेजिटेबल्स इन एक्झोटिक ग्रेवी (Vegetables in exotic gravy)
- प्रवेशिका क्र. २४ - तिरंगा पनीर कोफ्ता आणि लच्छा पराठा..
- प्रवेशिका क्र. २५ - झणझणीत लसुण-मसाला चटणी
- प्रवेशिका क्र. २६ - मुर्ग शोले
- प्रवेशिका क्र. २७ - जेवणानंतर काही गोडधोड - चायना ग्रास मसाला टॉवर्स
- प्रवेशिका क्र. २८ - मसाला बांगडा
- प्रवेशिका क्र. २९ - मराठमोळं मस्साला वांगं!!
- प्रवेशिका क्र. ३० - "हज'म'स्साला"
- प्रवेशिका क्र. ३१ - बीट इट विथ 'बीट'
अभिनंदन हा उपक्रम
अभिनंदन
हा उपक्रम सुंदरच
(अवांतर - इनामदार साहेबांना काही कारणाने वेळ झाला नाही तर मला सांगितले जावे अशी विनंती! मीही पाकस्वादनिपूण मानतोच स्वतःला. नांवही भूषण आहे. बघा, पटलं तर)
मस्तच!!
मस्तच!!
<< 'अरभाट चित्र'>> असो. मी
<< 'अरभाट चित्र'>>
असो. मी अशा स्पर्धेत कदाचित पुढच्या जन्मी भाग घेऊ शकेन
पण छान कल्पना आहे
भारी कल्पना भाग घेण्याचा
भारी कल्पना
भाग घेण्याचा नक्की प्रयत्न करणार
मस्त स्पर्धा आहे.
मस्त स्पर्धा आहे. पाककलाकृतींच्या प्रतिक्षेत आहे!
एवढ्यातच इथे शीर्षकांमधील
एवढ्यातच इथे शीर्षकांमधील अमराठी शब्दांबद्दलचा धागा वाचला असल्याने या शीर्षकातील 'टच' हा शब्द मराठी नाही हे एकदम जाणवले.
मवा, 'मस्साल्याचा टच' हे
मवा, 'मस्साल्याचा टच' हे बहुधा गाणे आहे चित्रपटातले. घोषणेच्या सुरूवातीला आहेत काही ओळी, त्यातले जसेच्या तसे घेतले असावे.
वा वा नक्की भाग घेणार.
वा वा नक्की भाग घेणार.
लाजो प्रयत्न नाही, तुझा सहभाग
लाजो प्रयत्न नाही, तुझा सहभाग हवाच हवा. स्पर्धे बद्दल वाचतानाच तू, दिनेशदा, पूनम, मंजुडी ह्यांच्या प्रवेशिका बघायला मिळणार नक्की हेच मनात आलं माझ्या
हम्म पूनम.
हम्म पूनम.
>>मसाल्याच्या एखाद्यातरी
>>मसाल्याच्या एखाद्यातरी पदार्थाचा वापर असायला ह>><<
भारतीय जेवणात मसाल्याचा पुरेपुर वापर असतोच, एका पदार्थापेक्षा ज्यास्तच.
मसाल्याचे पदार्थात(पदार्थाच्या नावाखाली) काय धरता/येते?
आता म्हणाल हा काय प्रश्ण आहे.
पण मसाला म्हणजे काही दुकानदार कोथींबीर +लिंबू + मिरची असा मसाला
का रोजच्या स्वंयपाकातील मसाल्याचे पदार्थ?
वा! मस्त कल्पना आहे
वा! मस्त कल्पना आहे
झंपी, कुठल्याही प्रकारचे ओले
झंपी,
कुठल्याही प्रकारचे ओले वा सुके मसाले चालतील.
मसाला पाकृ टाकली आणि बक्षिस
मसाला पाकृ टाकली आणि बक्षिस जरी मिळालं तरी सुद्धा मुंबईला प्रिमियरला जाणं अवघडच आहे त्यामुळे नुसत्याच पाकृ वाचाव्यात हे उत्तम
धन्यवाद. शाकाहारी, मांसाहारी,
धन्यवाद.
शाकाहारी, मांसाहारी, गोड वगैरे सर्व काही मोडेल ना स्पर्धेत?
भारतीय/ अभारतीय? असे सर्व ना?
मला वाटतं मसाल्या मध्ये वाटून
मला वाटतं मसाल्या मध्ये वाटून केलेली वाटणे (स्पेशल वाटणे) + रोजच्या स्वंयपाकातील मसाल्याचे पदार्थ (हिंग, हळद, मोहरी, जिरं, बडिशोप, लाल तिखट, गोडा/काळा मसाला) + लवंग, दालचिनी, मिरं, तमालपत्र इ. इ. सर्व अपेक्षित असावं.
मस्त मस्त रेसिपीज नविन
मस्त मस्त रेसिपीज नविन स्वरुपात मिळतील . आयोजकाना धन्यवाद !!
मस्त मस्त रेसिपीज नविन
मस्त मस्त रेसिपीज नविन स्वरुपात मिळतील . आयोजकाना धन्यवाद !!
मंजिरी सोमण, तुम्ही मुंबईत
मंजिरी सोमण,
तुम्ही मुंबईत नसलात तरी तुम्ही तिकिटं तुमच्या नातलगांना देऊ शकता.
शिवाय पुण्यातल्या खेळांची तिकिटं उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे मुंबईला शक्य नसेल तर पुण्यात बक्षिसाची तिकिटं वापरता येतील. तुम्ही अवश्य स्पर्धेत भाग घ्या.
मसाला पाकृ टाकली आणि बक्षिस
मसाला पाकृ टाकली आणि बक्षिस जरी मिळालं तरी सुद्धा मुंबईला प्रिमियरला जाणं अवघडच आहे >> चालेल तुम्ही बक्षीस जिंका आणि टिकीट मला द्या.
भन्नाट कल्पना!!!!
भन्नाट कल्पना!!!!
नॉनव्हेज रेसिपीज चालतील का ?
नॉनव्हेज रेसिपीज चालतील का ?
मा_प्रा, या ही चित्रपटासाठी
मा_प्रा, या ही चित्रपटासाठी खूssssssssssssssssssssssssssssssप शुभेच्छा!
मस्तच ! परफेक्ट वेळी घेताय .
मस्तच ! परफेक्ट वेळी घेताय . एक शंका :- पाककॄती भारतीयच हवी का ?
नॉनव्हेज रेसिपीज चालतील का
नॉनव्हेज रेसिपीज चालतील का ?>>>
जागू...तुझ्याकडुन तर यायलाच हवेत हं मासे
मस्त कल्पना
छान.. बक्षिसे ३ आहेत..
छान.. बक्षिसे ३ आहेत.. त्यापैकी एक दिनेशना, एक जागूना... म्हणजे स्पर्धा फक्त एकाच बक्षिसासाठी आहे..
शाकाहारी, मांसाहारी, भारतीय,
शाकाहारी, मांसाहारी, भारतीय, अभारतीय इत्यादी कुठल्याही प्रकारच्या पाककृती स्पर्धेसाठी चालतील.
छान.. बक्षिसे ३ आहेत..
छान.. बक्षिसे ३ आहेत.. त्यापैकी एक दिनेशना, एक जागूना... म्हणजे स्पर्धा फक्त एकाच बक्षिसासाठी आहे.>> त्यालाही बरेच दावेदार आहेत.
हटके पाककृतीच्या प्रतिक्षेत
हटके पाककृतीच्या प्रतिक्षेत
या स्पर्धेत नक्की भाग घेणार
अरे वा, प्रस्न विचारायला आले
अरे वा, प्रस्न विचारायला आले होते, पण उत्तर आधीच मिळालं.... भन्नाट कल्पना आहे राव! नवनवीन पाकृ शिकायला मिळणार.........मेजवानीच जणू!
:सहभाग घ्यायच्या प्रयत्नातली बाहुली :
Pages