चुटकीभर नमक, मोहरी की सनक
हलकीशी हल्दी, दालचिनी दर्दी
लहानशी लवंग, खसखस खमंग
उमंग है दिलमें जिसके, उसका सपना होगा सच...
तुमच्या आमच्या जगण्याला जरा मस्साल्याचा टच...

'वळू', 'विहीर' आणि 'देऊळ'च्या तडाखेबंद यशानंतर उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी घेऊन येत आहेत नवाकोरा झणझणीत चित्रपट - 'मसाला'...
उमेश - गिरीश कुलकर्णी यांच्या 'अरभाट चित्र'ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संदेश कुलकर्णी आणि प्रायोजक आहेत प्रवीण मसालेवाले.
मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.
चित्रपटाचं नाव 'मसाला'... मग शीर्षकाला साजेशी स्पर्धा हवीच की नाही?
परजा आपापली शस्त्रं...विळ्या, सुर्या, किसण्या, कढया, झारे, डाव, चमचे आणि हो, कॅमेरा!
तयार करा एक फक्कडशी पाककृती, मस्तपैकी सजवा, झक्कास फोटो काढा आणि इथे दिमाखात सादर करा!!!
फक्त पुढील गोष्टी ध्यानात ठेवा -
१. पाककृतीत मसाल्याच्या एखाद्यातरी पदार्थाचा वापर असायला हवा. एखाद्या पदार्थाच्या मूळ कृतीत बदल करून नवीन 'जरा हटके' पाककृती चमचमीत शब्दांत लिहून सादर केलीत तर खूपच मजा येईल.
२. पाककृतीचा आकर्षक सजावटीसह फोटो देणे स्पर्धेसाठी बंधनकारक आहे.
३. इथल्या पाककलानिपुणांकडून नवीन पाककृती अपेक्षित आहे. या अगोदर मायबोलीवर लिहिलेली स्वलिखित पाककृती पुन्हा नको.
४. 'मसाला - स्पर्धा' या ग्रुपातच 'नवीन पाककृती' ही लिंक वापरून आपली पाककृती लिहा. या ग्रुपात लिहिलेल्या पाककृतीच स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. तसेच, या पाककृती सार्वजनिक करायला विसरू नका.
५. पाककृती लिहिण्याची अंतिम तारीख आहे १२ एप्रिल, २०१२.
६. एक आयडी कितीही पाककृती लिहू शकतो. प्रत्येक नव्या पाककृतीसाठी नवीन धागा उघडावा.
या स्पर्धेचे परीक्षक असणार आहेत श्री. भूषण इनामदार.

श्री. भूषण इनामदार हे नावाजलेले शेफ आणि आघाडीचे फूड स्टायलिस्ट आहेत. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजीत पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हॉटेल ओबेरॉयसारख्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलांमध्ये शेफ म्हणून काम केलं. त्यानंतर काही काळ ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केटरिंग कॉलेजात लेक्चरर म्हणून कार्यरत होते. गेली काही वर्षं ते फूड स्टायलिस्ट म्हणून काम करतात. अनेक बड्या कंपन्यांसाठी त्यांनी फूड स्टायलिंग केलं आहे.
'मसाला' चित्रपटाच्या निमित्तानं होणार्या या पाककृती स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील -
पहिलं बक्षीस - 'मसाला चित्रपटाच्या मुंबईला २० एप्रिल, २०१२ रोजी होणार्या प्रीमियरची दोन तिकिटं आणि चित्रपटातल्या गाण्यांची एक सीडी.
दुसरं बक्षीस - 'मसाला चित्रपटाच्या मुंबईला २० एप्रिल, २०१२ रोजी होणार्या प्रीमियरची दोन तिकिटं.
तिसरं बक्षीस - 'मसाला' चित्रपटातल्या गाण्यांची एक सीडी.
मंडळी,
या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण अजून दोन दिवसांची मुदतवाढ देत आहोत.. आता पाककृती पाठवण्याची शेवटची तारीख आहे १२ एप्रिल, २०१२..
- प्रवेशिका क्र. १ - नान आणि पनीर बटर मसाला
- प्रवेशिका क्र. २ - मस्साला चिकन
- प्रवेशिका क्र. ३ - पनीर चिली शेजवान
- प्रवेशिका क्र. ४ - लज्जतदार-मसालेदार कैरीची कोशिंबीर
- प्रवेशिका क्र. ५ - शेकटाच्या शेंगांची भजी
- प्रवेशिका क्र. ६ - भरवाँ करेला (कैरीचा मस्साला मारके)
- प्रवेशिका क्र. ७ - गरम (भाजक्या) मसाल्याची आमटी
- प्रवेशिका क्र. ८ - बटाट्याचा मसालेदार रस्सा ( खानदेशी स्टाईल)
- प्रवेशिका क्र. ९ - भरलेले वांगे... सासुबाई श्टाईल!!
- प्रवेशिका क्र. १० - "मस्साला च्या मारी"....
- प्रवेशिका क्र. ११ - सांबार वडी...... नागपुरी
- प्रवेशिका क्र. १२ - केळेवेळे
- प्रवेशिका क्र. १३ - कोलीमाच्या मसाला वड्या
- प्रवेशिका क्र. १४ - मटारच्या करंज्या.
- प्रवेशिका क्र. १५ - हिरव्या-गोड्या मसाल्यातील पौष्टीक पराठे
- प्रवेशिका क्र. १६ - मसालेदार, मजेदार वरणफळं...
- प्रवेशिका क्र. १७ - भरली वांगी मसाला दाक्षिणात्य पद्धतीने
- प्रवेशिका क्र. १८ - चिंबोरीचं (खेकड्याचं) कालवण
- प्रवेशिका क्र. १९ - अॅपल क्रिस्प
- प्रवेशिका क्र. २० - मटण चॉप्स फ़्राय
- प्रवेशिका क्र. २१ - जिगळ्या
- प्रवेशिका क्र. २२ - "मस्सालामामा की पोटली..."
- प्रवेशिका क्र. २३ - व्हेजिटेबल्स इन एक्झोटिक ग्रेवी (Vegetables in exotic gravy)
- प्रवेशिका क्र. २४ - तिरंगा पनीर कोफ्ता आणि लच्छा पराठा..
- प्रवेशिका क्र. २५ - झणझणीत लसुण-मसाला चटणी
- प्रवेशिका क्र. २६ - मुर्ग शोले
- प्रवेशिका क्र. २७ - जेवणानंतर काही गोडधोड - चायना ग्रास मसाला टॉवर्स
- प्रवेशिका क्र. २८ - मसाला बांगडा
- प्रवेशिका क्र. २९ - मराठमोळं मस्साला वांगं!!
- प्रवेशिका क्र. ३० - "हज'म'स्साला"
- प्रवेशिका क्र. ३१ - बीट इट विथ 'बीट'
हटके पाककृतीच्या
हटके पाककृतीच्या प्रतिक्षेत
माझ्या डब्याची तेव्हढी आठवण ठेव, स्पर्धे करता काय तो प्लेट मधे ठेवून फोटो बिटो काढ नंतर सरळ माझ्या डब्यात भर 
या स्पर्धेत नक्की भाग घेणार >>> तोषा, है शाब्बास!
पाक-क्रुती सकट फोटो कसे
पाक-क्रुती सकट फोटो कसे टाकायचे कोणी सान्गाल का?
फोटो कसे अपलोड करता येतील
फोटो कसे अपलोड करता येतील पाकक्रईती सोबत कोनी सान्गाल का?
"आई", पाककृती लेखनात
"आई",
पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा यासाठी ही लिंक पहा - http://www.maayboli.com/node/27484
माध्यम_प्रायोजक , मी पोस्ट
माध्यम_प्रायोजक ,
मी पोस्ट केलेली रेसिपी वरील लिस्ट मध्ये दिसत नाही .
व्हेजिटेबल्स इन एक्झोटिक ग्रेवी (Vegetables in exotic gravy).
- आभारी आहे
सामी
धन्यवादंंमंजुडी !!!!!!!
धन्यवादंंमंजुडी !!!!!!!
मंडळी, या स्पर्धेला
मंडळी,
या स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आपण अजून दोन दिवसांची मुदतवाढ देत आहोत.. आता पाककृती पाठवण्याची शेवटची तारीख आहे १२ एप्रिल, २०१२..
अरे व्वा! मुदत वाढवली का??
अरे व्वा! मुदत वाढवली का?? छानच
आता आणखीन मस्त मस्त पाकृ येऊद्यात 
त्या लिस्ट मध्ये लाजोचं
त्या लिस्ट मध्ये लाजोचं "हज'म'स्साला" मिसींग आहे ना?

मा_प्रा, वरच्या लिस्ट मधे
मा_प्रा, वरच्या लिस्ट मधे "हज'म'स्साला" अजुन दिसत नाहीय
धन्स प्रिया
ओ माप्रा, मसाले कुटुन कुटुन
ओ माप्रा, मसाले कुटुन कुटुन हात दुखायला लागले. आता च्यापानी कधी देणार?
मसाला स्पर्धेचा निकाल लागला
मसाला स्पर्धेचा निकाल लागला कां मग मला कां दिसत नाहीये??
मनी,
मनी, http://www.maayboli.com/node/34296 इथे पहा..
Pages