सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी मराठी वरील "असंभव" ही पण चांगली मालिका होती. चांगले कलाकार आणि वेगळच कथानक.

अजय देवगण चा "काल" ज्यात त्याने भुताची भुमिका केली आहे, तो पण मस्त आहे. जेंव्हा इशा देओल ला समजत की पाण्यात त्याची सावली पडत नाही आणि हा अमानवी आहे, तो प्रसंग झकास होता.

पंकज कपुर आणि के.के.रैना चा "एक रुका हुवा फैसला" खुप वेगळा आणि खीळवुन ठेवणारा.

शुश्मीता सेन चा "वास्तुशास्त्र" खुपच घाबरवणारा होता.

मराठीत एक खुन पट होता " झाकोळ" त्यात डॉ.लागु आणि सरला येवलेकर होते. तसाच नुतन आणि डॉ. लागुंचा (किशोर मिस्कीन ने काढलेला एक सीनेमा होता. ) त्यात सचीन आणि सारिका पण होते. तो फारच मस्त सस्पेन्स होता. नाव आठवत नाहिये.

"सावरखेड एक गाव" हा पण मस्त सस्पेन्स राखलेला सीनेमा.

नाटकांमध्ये "अंधार माझा सोबती" ( फैय्याज, काशीनाथ घाणेकर ), "कुणी तरी आहे तिथं" ( कुमार सोहोनी दिग्दर्शीत. त्या वर त्यांनी "एक रात्र मंतरलेली" हा सीनेमा काढला.), एक डॉ. लागुंच एक नाटक होतं त्यात त्यांनी कुबड्या, कुरुप माणसाची भुमीका केली होती. नाव सांगा कुणी तरी!!! रिमा लागुचं " सविता दामोदर परांजपे" छानच नाटक होत. पुर्नजन्मावर आधारीत "गोष्ट जन्मांतरी ची" हे चंद्रलेखाच नाटक होतं.

एक रात्र मंतरलेली... हेच विचारायला आलो होतो , हे कुणी तरी वर आधारीत आहे का, त्यात सतिश पुळेकर होता ना? ... http://www.youtube.com/watch?v=FzG0JgwJ-Y8&feature=related

नूतन लागूंचा सिनेमा पारध.

तसाच नुतन आणि डॉ. लागुंचा (किशोर मिस्कीन ने काढलेला एक सीनेमा होता. ) त्यात सचीन आणि सारिका पण होते. तो फारच मस्त सस्पेन्स होता. नाव आठवत नाहिये. >>>> मोकिमी, तो चित्रपट 'पारध' (जुना) होता.
श्रीराम लागुने संपत्तीसाठी नुतनच्या मुलाचा (सचीनचा) खुन केलेला असतो आणि नुतन शेवटी त्याचा सुड घेते. असा. मस्त गुढ कथा होती ती Happy

एक रात्र मंतरलेली... हेच विचारायला आलो होतो , हे कुणी तरी वर आधारीत आहे का, त्यात सतिश पुळेकर होता ना?>>>

हो नाटकात सतिश पुळेकर होता. नायिका आठवत नाही. दोन्हीचा दिग्दर्शक कुमार सोहोनीच होता.

नूतन लागूंचा सिनेमा पारध.>>>>> धन्स जामोप्या.... त्यात एक गाण होत "सावध हरणी सावध ग!! करिल कोणी तरी पारध ग!!!"

लागुंच्या त्या नाटकाचं, वर उल्लेखलेल्याचं नाव आठवलं "गुड बाय डॉक्टर". त्यात त्यांनी कुबड्या कुरुप माणसाची भुमिका केली आहे. मी लहान असताना हे पाहिलं होतं खुप भिती वाटली होती तेंव्हा.

मराठीत एक खुन पट होता>> झाकोळ हा खुन पट नाही म्हणता येणार.
नायकाची बायको मेल्यानंतर त्याला अस वाटत राहत की इन्डायरेक्टली तिच्या मृत्युला तोच जबाबदार आहे.

आबासाहेब तुम्ही the ring बद्दल बोलताय का? >>>>>>> मी गुगलून पाहील the ring जापानीज आहे. मी पाहीलेला तो हा चित्रपट नाही.

मी गुगलून पाहील the ring जापानीज आहे.>> ring, grudge हे दोन्ही कुठल्या तरी जापनीज किंवा कोरीयन चित्रपटांवर आधारीत होते. मूळ चित्रपट अधिक प्रभावी आहेत.

अजुन एक चित्रपट आठवला "द घोस्ट स्टोरी" जुना आहे, पण मस्त आहे. "वोल्फमॅन" ( अ‍ॅन्थनी हॉप्कीन्स चा ) पण भयानक होता. जुडी फॉस्टर आणि अ‍ॅन्थनी हॉप्किन्स चा "सायलेंस ऑफ द लॅम्ब्स" अप्रतिम होता. त्यातला अ‍ॅन्थनी हॉप्किन्स चा अभिनय त्याला ऑस्कर देउन गेला.

आबासाहेब तुम्ही the ring बद्दल बोलताय का?>>>>>>>>

हो माधव तो रिन्ग सिनेमा आहे, पहिल भाग खुपच छान होता, दुसरा भाग तेवढा जमला नाहि.

आबासाहेब तुम्ही the ring बद्दल बोलताय का?>>>>>>>>

हो माधव तो रिन्ग सिनेमा आहे, पहिल भाग खुपच छान होता, दुसरा भाग तेवढा जमला नाहि.

पुर्नजन्मावर आधारीत लीजंडरी चित्रपट "मधुमती" आपण कसा काय विसरु शकतो? त्यातला दिलिप कुमार, त्यातली वैजयंतीमाला, त्यातली गाणी आणि त्यातला भुताचा शेवटचा सीन ... काहीही विसरता येत नाही. तसाच ऋशी कपुर चा "कर्ज" पन छान होता. ( शाहरुख खान आणि फराह खान नावाच्या चोरांनी कर्ज+मधुमती+ स्वतःचं अगाध ज्ञान लावुन "ओम शांती ओम" नावचं एक भयानक प्रकरण काढलं होतं. खरच मातेर कशाला म्हणतात ते कळेल.)

मधुमतीतल्या त्या प्रसंगात नंतर ती दिलिप कुमारला "बाबुजी" अशी कुजबुजत हाक मारते आणि ज्या नजरेने त्याच्या कडे पहाते, तेंव्हा अंगावर सरसरुन काटा येतो.

डॉ. लागुंच्या सिनेमा नाटकात बहुदा तेच विलन असतात का? Happy त्यांचा एक हिंदी षिणेमा होता.. त्यात त्यांच्या मुलाला की मुलीला किडनॅप केलेले असते.. तो पैसे मागत असतो... आणि शेवटी कळतं की ते स्वतःच हे करत असतात... कुणाला आठवतो का तो सिनेमा?

@ मोहन कि मीरा :

"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स" आणि याच टीमचा पुढचा "हॅनिबॉल" दोन्हीही अशा कथानकावरीलचे उत्कृष्ट आणि प्रेक्षकाला जागेवर खिळवून ठेवणारे चित्रपट. दोन्हीतही प्रमुख भूमिकेत अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स हा जबरदस्त अभिनय क्षमतेचा कलाकार प्रमुख भूमिकेत {रिचर्ड अ‍ॅटेनबरोनी बेन किंग्जलेच्या अगोदर अ‍ॅन्थोनी हॉपकिन्सचा नावाचा 'गांधी' भूमिकेसाठी विचार केला होता}.

तुम्ही "सायलेन्स...." साठी हॉपकिन्सना ऑस्कर मिळाल्याचा उल्लेख केला आहे. पण त्याचवेळी त्याच चित्रपटातील भूमिकेसाठी जोडी फॉस्टर हिलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले होते.

जोडी फॉस्टरचाच "पॅनिक रूम" हाही एक या पंगतीतील थरारकपट होय.

इन्कार मध्ये डॉ लागूंनी नव्हतं किडनॅप केलेलं. अमजद खान चुकून डॉचा नोकराच्या (साधू मेहेर) मुलला किडनॅप करतो, तरीपण डॉ खंडणी देतात.

हिंदीतले बराच चांगला सस्पेन्स असणारे पण कदाचित फारसे माहीत नसलेले चित्रपट
कब, क्यों और कहा : धर्मेन्द्र, बबिता, प्राण
शिकारः धर्मेन्द्र, आशा पारेख, संजीवकुमार
साजनः मनोज कुमार, आशा पारेख
महलः देव आनंद, आशा पारेख

"सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स" आणि याच टीमचा पुढचा "हॅनिबॉल" दोन्हीही अशा कथानकावरीलचे उत्कृष्ट आणि प्रेक्षकाला जागेवर खिळवून ठेवणारे चित्रपट >> 'हॅनिबाल' सिनेमा 'सायलेंस ऑफ द लँब्स' चा पुढचा थेट 'भाग असा नाही म्हणता येणार. तो फक्त 'लेक्टर' ह्या व्य्क्तीरेखेला ग्लोरिफाय करतो.
एड नॉर्टन आणि राल्फ फाईन्सच्या 'रेड ड्रॅगन' ला 'सायलेंस ऑफ द लॅंब्स' चा सिक्वल म्हणता येईल.

एड नॉर्टन आणि राल्फ फाईन्सच्या 'रेड ड्रॅगन' ला 'सायलेंस ऑफ द लॅंब्स' चा सिक्वल म्हणता येईल. >> त्यातही अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स आहे नि हा sequel नसून "सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स" चा prequel आहे रे. बहुधा ह्यातच तो कवटी उघडून मेंदू खातो हा सीन आहे.

हो , पुस्तकांच्या क्रमाप्रमाणे 'रेड ड्रॅगन' प्रीक्वल म्हणता येईल, यातच त्याला पहिल्यांदा जेरबंद करतात.
पण सिनिमे त्यांनी ऊलट्या क्रमाने बनवले.
मेंदू खाण्याचा सीन बहूधा ज्युलियाने मूरच्या 'हॅनिबाल' मधे(ही) आहे.
प्रचंड गोरी, ज्युलिआने नव्हे सीन्स Happy

पुनर्जन्मावर आधारित कथा असलेला 'डेड अगेन' नावाचा सिनेमा छान आहे.
केनेथ ब्रॅना, एमा थॉम्प्सन.

मराठीत पुनर्जन्म कथा फारशा नाहीत का? . वाट पहाते पुनवेची.. अलका कुबल पुढच्या जन्मात निशिगंधा वाड होते..

फॉस्टरबाईंचा "The Girl who lives Down the Lane" नावाचा Psycho Thriller आहे. १४- १५ वर्षाची मुलगी घरात एकटी रहात असते. पण कोणालाही ते कळू नये म्हणून घरात वर आपले वडिल काम करत असल्याचे भासवत असते. तिच्यावर वाईट नजर ठेऊन असलेल्या शेजार्‍याल (Martin Sheen) ते कळते..... नक्कीच बघण्यासारखा चित्रपट आहे. १४व्या वर्षीही काय काम केले आहे.

Godfather न्यू एम्पायरला लागला होता. शनिवारची तिकीटे मित्राने काढून आणली. मोठ्या आनंदात पहायला गेलो तर सिनेमा शुक्रवारी बदलला होता. मित्राला नीट विचारून तिकीटे न काढल्याबद्दल भरपुर शिव्या घातल्या. नशीबी आले ते बघू या म्हणून Assylum नावाचा Peter Cushingचा सिनेमा पाहिला. एका Assylum मध्ये मानसपोचारतज्ञाच्या Interviewसाठी आलेल्या डॉक्टरची Test अशी असते की, चार (की सहा) सायकोच्या केसेस अभ्यासून त्यातील एक जो डॉक्टर असतो तो कोण हे ओळखायचे. त्यावेळी तरी भयंकर वाटला. नंतर परत कधी बघायला मिळाला नाही. त्या प्रत्येकाची कथा एव्हढी थर्राट आहे....

Exorcist, The Ring किंवा Zombie Movies मला फारसे कघी आवडले नाहीत. ते हॉररपेक्षा किळसवाणे वाटले. The Omen (जुना)हा सर्वात चांगला भीतीदायक होता. सिनेमाच्या शेवटी एका छोट्या मुलाचे निरागस हास्यही भीती निर्माण करते. Polergeist चा पहिला अर्धा भाग जास्त घाबरवतो. त्यामुलीचे "Mommy..." असे हाक मारणे, ते खिडकी बाहेरचे झाडच टेरर निर्माण करते. मला त्याचा शेवट मात्र अजिबात आवडला नव्हता.

Pages