Submitted by सायो on 15 March, 2012 - 12:53
पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स, कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा. जर पावाभाजी करण्याची मुख्य पाककृती हवी असेल तर ती पावभाजी रेसिपी इथे आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदा वाण्याच्या दुकानात
एकदा वाण्याच्या दुकानात एव्हरेस्टचा पाभा मसाला मागितला तर त्याने शेजार पाजारच्या ४ -५ रेस्टॉरंट्स ची नावं घेऊन ते तर बादशाहचा मसाला वापरतात म्हणून सांगितलं. तेव्हापासून बादशाहचाच पाभा मसाला वापरायचे. हल्लीच पुण्यनगरीतून खबर आली की प्रवीणचा सुहाना पाभा मसाला जबरी आहे. सो या देशवारीत तो घेऊन आले. चांगला आहे तो पण.
शिवसागरमधे डोसा पावभाजी असते,
शिवसागरमधे डोसा पावभाजी असते, >> जुहु?
सांताक्रुज वेस्ट ला शबरीची पावभाजी आणि पुण्यात रिलॅक्स.. पण भाजी अगदीच कमी देतात ते..
रिलॅक्स का जवाब नही. मसाला
रिलॅक्स का जवाब नही. मसाला पाव आणी एक्स्प्रेसो कॉफी पण बेष्ट !
मस्त धागा... माझी पाभा. कधीही
मस्त धागा... माझी पाभा. कधीही छान होत नाही. आता स्वाती ची करुन पहाते.
स्वाती, प्रश्न, ग.म. दुसरा काही चालेल का?
ग्रिडलवर खुप पाव मस्त पटापटा भाजले जातात (मसाला न लावता).
ब्रेड बोलची आयडीया मस्तच!
ब्रेड बोलची आयडीया मस्तच! छान टीप्स मिळाल्या. सायो, धाग्यासाठी धन्यवाद.
रिलॅक्स का जवाब नही. मसाला
रिलॅक्स का जवाब नही. मसाला पाव आणी एक्स्प्रेसो कॉफी पण बेष्ट ! >>>>>> +१
रिलॅक्स का जवाब नही. मसाला
रिलॅक्स का जवाब नही. मसाला पाव आणी एक्स्प्रेसो कॉफी पण बेष्ट ! >>>>>> +२
रिलॅक्स सारंग सो. मधलं हं, बिबवेवाडी च नाही
लाजो, तुला 'मंगल' मसाला तिकडे
लाजो, तुला 'मंगल' मसाला तिकडे पण मिळतो का? मी गेले ६ महिने नॉनव्हेजसाठी, स्पेसिफिकली चिकन ग्रेवी & तंदुरसाठी 'मंगल'चे मसाले वापरते. फारच भन्नाट आहेत. आता पाभा आणि अजुन बरेच काही आहेत, तेपण आणुन टाकते.
रिलॅक्सची पाभा यमी असते, पण
रिलॅक्सची पाभा यमी असते, पण जरा जास्तच तिखट असते. आवडली तरीही मला.
पाभा चा रंग जमण्यासाठी त्यात
पाभा चा रंग जमण्यासाठी त्यात अर्धे बीट खिसुन घालावे. मस्त रंग येतो.
मी दोन माणसांच्या तीन वेळच्या
मी दोन माणसांच्या तीन वेळच्या खाण्यासाठी :
सहा सुक्या मिरच्या कोमट पाण्यात भिजत घालते. एक अख्खा लसणीचा गड्डा सोलून आणि साधारण दोन इंची आलं किसून घेते. सु.मि. पुरेश्या भिजल्यावर त्यात आलं-लसूण घालून मिक्सरमधे गुळगुळीत पेस्ट करते. ही आलं-लसूण-सु.मि. पेस्ट घेऊन त्यात थोडं पाणी घालते (यामुळे पेस्टीचा स्वाद खुलतो अशी शेफ निलेश लिमयांची टीप आहे) आणि ते गरम तेलात घालते. मग लगेचच त्यात दोन वाट्या बारीक चिरलेला कांदा परतून घेते. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात दोन वाट्या बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटोला पाणी सुटले की त्यानंतर दीड वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची परतून घेते. हे सगळं व्यवस्थित शिजलं की पाच मध्यम बटाटे आणि एका मध्यम आकाराच्या फ्लॉवरचे तुकडे उकडून घेऊन चांगले मॅश करून कां-टो-भो.मि. मधे घालते. मटार वेगळे उकळून घेऊन त्यात घालते. चांगले ढवळून घेऊन त्यात जरा जास्तच पाणी घालून चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट आणि एव्हरेस्ट/ बादशाहचा पावभाजी मसाला घालून मंद गॅसवर उकळायला ठेवते. उकळी आल्यावर अमूल बटर घालून पळीवाढी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद...
तोंडाला पाणी सुटले..... रविवारी करतेच आता.
YouTube वरची रेसिपी आत्ताच
YouTube वरची रेसिपी आत्ताच केली, एकदम झकास, धन्स
मला प्लिज कोणी सांगाल का केसर
मला प्लिज कोणी सांगाल का केसर कोणत्या कंपनीचा चांगला मिळतो.
मस्त धागा. वाचूनच तोंपासु.
मस्त धागा. वाचूनच तोंपासु.
बाहेर हाटिलात भाजीबरोबर जे पाव देतात, ते कसे मऊ, लुसलुशीत असतात. मी घरी पाव भाजले की ते कडक (ब्रेड टोस्टसारखे) होतात. तसे मऊ, लुसलुशीत पाव भाजले जाण्यासाठी काही टीप्स आहेत का?
प्राची, पाव मधे कापून मधल्या
प्राची, पाव मधे कापून मधल्या दोन्ही बाजू आणि खालची-वरची बाजू असं सगळीकडे बटर लावायचं आणि मग नॉन स्टीक तवा चांगला तापवून गॅस मध्यम करून पाव भाजायचे. आधी मधली कापलेली बाजू किंचीत तांबूस होईपर्यंत शेकवायची आणि वरची आणि खालची बाजू अगदी थोडाच वेळ तव्यावर ठेवून लगेच पाव डीशमधे घ्यायचा आणि मस्त भाजीबरोबर हाणायचा.
जुन्या माबोत कोणीतरी आधीच बटर
जुन्या माबोत कोणीतरी आधीच बटर लावून भाजलेले पाव आयत्यावेळेस कुकरमध्ये वाफवण्याची टीप दिली होती. लुसलुशीत होतात म्हणे.. आजतागायत मी करू शकले नाहीये तसे. कोणी केले आहे का ??
मीच लिहिले होते ते बस्के..
मीच लिहिले होते ते बस्के.. आणि खूप लोकांसाठी पावभाजी करायची असेल तर ती युक्ती मी नेहमीच करते
मजिठीयाचे ही मसाले चांगले
मजिठीयाचे ही मसाले चांगले वाटतात मला. बादशाह आणि एव्हरेस्ट यांसारखे मसाले कायम मोठ्या पाकिटांतच मिळतात. पण मजिठीया ची छोटी पाकिटेही मिळतात. पाणीपुरी, छोले, पाभा इ. साठी मी तरी हल्ली हेच मसाले वापरते. खूप दिवस ठेवून मसाले विरी जातात. त्यामुळे छोटी पाकिटे बरी पडतात.
वा! मस्त टिप्स आहेत, पावभाजी
वा! मस्त टिप्स आहेत, पावभाजी बनवण्याच्या!
मंजू, जरा सविस्तर लिही ना
मंजू, जरा सविस्तर लिही ना याबद्दल. म्हणजे किती वेळ ठेवायचे? कसे ठेवायचे? शिट्टी काढायची की नाही?
ए मी पण लिहीले होते,
ए मी पण लिहीले होते, अर्काईव्ह बघा!
सिरियसली, आठ (मोठ्या) माणसांपेक्षा जास्त असतील पावभाजी खायला, तर पाव वाफवून घ्यायचे. पटापट होतात, शिवाय गरमही राहतात.
वरून कांदा-कोथिंबीर-लिंबूबरोबर टमॅटोही छान लागतो वरून.
सुहानाचा मसाला वापरून पाहीन आता.
प्राची, इकडे बघ - पान नं. ३४
प्राची, इकडे बघ - पान नं. ३४ आणि ३५
हायला. जुन्या मायबोलीतले
हायला. जुन्या मायबोलीतले अर्काईव्ह शोधलेच पाहिजेत आता! मूडीची पोस्ट होती एवढं नक्की आठवत आहे.
मंजू धन्स. पूनम, तुलाही
मंजू धन्स.
पूनम, तुलाही धन्यवाद. (शोधून लिंक देशीलच तू. आधीच आभार मानते. :))
पूनमची टीप इकडे आहे. हा
पूनमची टीप इकडे आहे. हा जुन्या मायबोलीवरचा पावभाजीचा धागाही पूर्ण वाचा. खूप छान टीपा दिल्या आहेत बर्याच जणांनी.
मंजू, तू नव्या माबोतल्या
मंजू, तू नव्या माबोतल्या धाग्यात '७-८ मिनिटं वाफ येऊ द्यायची मग बंद करायचा' असे लिहीले आहेस आणि जुन्या माबोत 'फक्त वाफ येऊ द्यावी ( जेमतेम २ मिनिटं)' असं लिहीलं आहेस. नक्की काय?
आता कुणीतरी पावभाजी वाढा बरं!
आता कुणीतरी पावभाजी वाढा बरं! फारच भुक लागली आहे! इथल्या पोस्टी वाचुन खवळली आहे!
अरे! मीही शोधली. तिथेही मी
अरे! मीही शोधली. तिथेही मी आणि मंजू बरोबरच आहोत
प्राची, चांगली वाफ येऊ
प्राची, चांगली वाफ येऊ द्यावी. पावांच्या संख्येनुसार तसेच कूकरच्या आकारानुसार ही वेळ बदलणार. पाव कमी म्हणून छोटा कूकर घेतला तर वाफ धरायला वेळ लागत नाही, खरंच दोन मिनीटे पुरतात. पण मोठा कूकर असेल तर वाफ धरायलाच वेळ लागतो.
वा वा वा...कसला झक्कास
वा वा वा...कसला झक्कास धागा...
अत्यंत आवडीचा विषय.
माझ्या पण काही टिपा :
१. पावभाजी करताना कांदा नाही घालायचा...फक्त वरुनच घ्यायचा बारीक चिरलेला कांदा...कारण कांदा कधिकधी शिजवला की जरा गोड्सर तरी लागतो...किंवा फूड प्रोसेसर मधुन वगैरे शिरुन घेतला असेल तर भाजी कडवट होते.अजुन एक म्हणजे मसाला बादशहाचाच वापरायचा...
२.ढबु मिरची उकडायची नाही..बारीक चिरुन परतुन घ्यायची.
३.भाजी तयार झाली की...एका छोट्या कढल्यात(फोडणीची पळी) पण चालेल...थोडं बटर किंवा तूप तापवायचं...त्यात १ चमचा तिखट आणि १ चमचा पाभा मसाला घालायचा...आणि वरुन फोडणी देतो तसं भाजीवर वरुन हे तेलं ओतायचं...मस्त रंग येतो...
(आमच्या कर्हाड मद्धे घाटावर मिळणारी पावभाजी अप्रतिम असते...मला तशी पाभा पुण्यात कुठेच मिळाली नाही...एकदा त्या पाभा वाल्याला तसं म्हटल्यावर त्याने मला त्याच्या टिप्स दिल्या आणी म्हणाला की आता अशी घरी करुन पाहा..तशी करुन पाहिल्यावर झक्कास जमली...)
Pages