निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपा म्हणजेच सोनचाफा का?

मी एक अत्तर घेतलं आहे.. त्यावर चित्र सोनचाफ्याचं आहे, सुगंधही सोनचाफ्याचा आहे, पण नाव मात्र चंपा आहे.. याशिवाय एका दक्षिण भारतीय काकांनीही सोनचाफ्याच्या झाडाला चंपा असं म्हटलं..

व्वा! मध्यंतरी मिस्लेलं सगळं आज वाचलं ...फोटो पाहिले. छानच!
निसर्गप्रेमी लोकहो.....प्लीज पहा आणि सल्ला द्या.

अंगणातल्या एका नारळीच्या हिरव्याच झावळ्या खाली पडताहेत. काही चुकतय का? खरं म्हणजे पूर्ण वाळल्यावरच खाली पडतात.
झाडाची मुळं फ़ार उघडी पडली आहेत का? आळं करून घ्यायची गरज आहे का? पाणी कमी पडत असेल का? कारण त्यासाठी आळं खोल करण्याची गरज असेल तर आजूबाजूच्या जमिनीतच भराव टाकून मगच आळं करता येणार आहे. म्हणून आळ्याचाही फ़ोटो टाकला आहे.
प्लीज सल्ला द्या.

DSCN1489.JPGDSCN1490.JPG
ही दोन झाडं एकदमच लावली. अलिकडच्याचा हा पहिलाच बहर. पलिकडच्याला बरेच वेळा नारळ येऊन गेलेत. पण आता पलिकडच्याच्याच हिरव्या झावळ्या बर्‍याच पडताहेत.

DSCN1491.JPGDSCN1492.JPG

मी विंटर गार्डन (ऑकलंड) मधल्या फुलांचे फोटो ४ भागात टाकले आहेत.
सोनचाफा म्हणजे कनकचंपा !

मानुषू, राहुरी ऋषि विद्यापिठात विचारणार का ? त्या परिसरात बरीच नारळाची
झाडे बघितली होती. त्यांच्याकडे नक्कीच उपाय असेल.

बापरे कधी वाचणार मी सगळ.

मला पुर्वी टिव्हीच खुप वेड होत पण आता खरच कमी म्हणण्यापेक्षा गेलच आहे.

मानुषी
मला यात काहीच प्रॉब्लेम दिसत नाहीये. नारळही चांगले लागलेत.
कित्त्येक नारळाच्या झाडांची याहून बरीच जास्त मुळं उघडी असतात.
पाणी कमी असू शकेल किंवा काही रोग नाहीयेना पहा.

खरं तर नगर भागात नारळाचे झाड वाढलेय हेच नवल आहे. हि लागवड गेल्या ५०/६० वर्षापासूनचीच असणार. नारळ म्हणजे समुद्रकिनारा, हेच समीकरण होते.

तूमच्याकडे नारळ उतरवायला माणसं मिळतात, मानुषी ? आता तर कोकणातही
मिळत नाहीत.
पुण्याला आपटे रोडवरचे जे जुने बंगले आहेत, त्यांच्या आवारात बहुतेक नारळाची /
फणसाची झाडे आहेत. माझा मित्र म्हणायचे, या घरांचे मूळ मालक, नक्कीच कोकणातून आलेले असणार.

मानुषी समुद्रापासून दूर वाढणार्‍या माडांना मुळापाशी मिठ घालावे लागते असे माझी आजी सांगयची. तुम्ही करून बघू शकता. अपाय नक्की नाही व्हायचा. झावळ्यांच्या बेचक्यात मुंग्यांनी वारुळ केल्याचे मी बघितले आहे आणि मग तो माड हळूहळू सुकत गेला. तसे काही झाले नाहीये ना?

पुण्यात सगळीकडेच भरपुर नारळाची झाडं आहेत.>>>>सहमत. आमच्या सोसायटीत, तसेच शेजारच्या सोसायटीतही माडाची झाडे आहेत. व बरेच नारळही मिळतात.
शशांक : मस्त माहित. उताराही आणि साईटही. . धन्यवाद.
जिप्स्या : उतार्‍याबद्दल धन्यवाद.
शकून : हिरवी झाडे, हिरवी पाने, हिरवी फुले, छानच. फळे पण हिरवीच आहेत का Happy
साधने : मस्त आलेत ग फोटो.

<<<<मग कदाचित लेडी अ‍ॅमहर्स्टीया सारखे तूमचे नाव त्या नव्या झाडाला देतील. आणि त्यावेळी, नि.ग. चा ८७७९१३५९७१६६४९८७१३३३७८९६ वा भाग सुरु असेल.>>>> दिनेशदा, मस्त कल्पना!

नारळाची झाडं आमच्या सोसायटीत पण आहेत.

नारळाच्या शेंङ्याला एक प्रकारचे किडे पोखरतात नी मग शेंडा कुसतो. मानुषी, शेतकी तज्ज्ञ गाठुन विचार गं बाई, इतक्या वर्षांचे झाड डोळ्यासमोर जाताना बघवत नाही.

दिनेश तुम्ही मागे लिहिलेला टु ब्रदर्स काल टिवीवर लागला होता. माणसांच्या राज्यात पावलोपावली अजाण प्राण्यांचे जे हाल होतात ते पाहुन जीव हळहळत होता. पण शेवटी आईबरोबर बसलेले दोघे भाऊ बघितल्यावर जागुन चित्रपट पाहिल्याचे सार्थक झाले. अतिशय सुंदर चित्रपट. इथे हा चित्रपट बनला असता तर एका वाघाने हिरोचे हिरविनीबरोबर कसे जुळवायचे ह्याची खटपट करण्यात सगळा वेळ घालवला असता.

>>कापलेल्या झाडाच्या फांदिला जर एक खास कल्चर लावले तर मूळे हमखास फुटतात
>>>ते कसलेतरी हार्मोन्स असतात.

साधना, बरोबर आहे. झाडाच्या वाढीसाठी लागणार्‍या हॉर्मोन्सना 'फायटोहॉरमोन्स' म्हणतात. त्यापैकी 'ऑक्झिन्स' (Auxin) वापरून फांद्यांना किंवा टिश्यू कल्चरमधे तयार झालेल्या पेशींच्यां गोळ्यांना (callus) मुळं फोडता येतात. निव्वळ ऑक्झिन्स वापरून मुळं न धरणार्‍या फांद्यांसाठी (किंवा टिश्युकल्चरमधल्या कॅलससाठी) आणखी वेगळ्या ट्रीटमेंटची गरज असते. कुतुहल असणार्‍यांसाठी खालच्या लिंकवर एक रीसर्च पेपर आहे या विषयावर. अख्खा पेपर वाचायला मिळाला नाही तरी अगदी थोडी माहिती 'इंट्रोडक्शन' भागात मिळेल.
http://www.jstor.org/discover/10.2307/2475008?uid=3739600&uid=2129&uid=2...

मस्त गप्पा रंगल्या आहेत. ऑफीसमधे सध्या ऑडीट चालू असल्याने निगवर येणं जमत नाहीये. आज बर्‍याच दिवसांनी वाचायला जमलं. मस्त वाटलं एकदम.

फारच छानच धागा आहे.
आता पर्यंत वाचतच होते. आता एक प्रश्न,
आमच्या कडील नारळाच्या झाडाचा मधला तुरा जो असतो तो गेले ८ ते १५ दिवस झाले दिसत नाही. काय कारण असेल ? तो तुरा परत येतो की झाड मेले असे समजायचे ? आज १२ वर्षे झाली झाडाला आता फळ येइल असे वाटत होते तर असे झाले . काय कारण असेल ? असे होते का ? पुन्हा तुरा दिसेल का ? झाड जगेल का ? कृपया जाणकारांचे मत जाणुन घ्यायला आवडेल.

दिनेश तुम्ही मागे लिहिलेला टु ब्रदर्स काल टिवीवर लागला होता<<< त्याच बरोबर काल स्टार मुव्हिज वर गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २ आणी मागच्या अठवड्यात डुमा हे चित्रपट पाहिले .

दिनेश, वरच्या फोटोबद्दल चेपुवर लिहिले आहे.

रच्याकने मध्यंतरी ब्लॉग करायचे घाटत होते. काय झाले त्या कल्पनेचे पुढे?

दिनेश टु ब्रदर्स बद्दल माझ्याकडूनही धन्यवाद. खूप सुंदर चित्रपट सापडला तुमच्यामुळे. तुम्ही मागे संपूर्णपणे aerial view मध्ये शूट केलेल्या अप्रतिम चित्रपटाबद्दल लिहिले होते ना? कुठला तो चित्रपट? 'चिकवा'वर सापडत नाहीये. रच्याकने तुमच्या त्या सगळ्या चित्रपटांची यादी चेपुवर लाऊन ठेवा. चिकवा - भाग १ च्या आधी पण एक धागा होता ना? का तो जून्या माबोवर होता?

सुनिता, तो तुरा म्हणजे कोवळी झावळीच असते. जरा लहान असेल ती, आणखी काही
दिवसांनी दिसेल. किंवा कदाचित तिथून फुले असणारी पोय, तयार होत असेल.

माधव, त्या चित्रपटाचे नाव होम. याच नावाने यू ट्यूबवर आहे तो.
साधारण दिड तासाचा आहे तो.

ससा, फुलांबाबत गोंधळ आहे. ती गुलाबी जामची किंवा ऑस्ट्रेलियन निलगिरीची
असावीत (पाने निलगिरीसारखी दिसताहेत. जामची रुंद असतात.) जर ती निलगिरीची असतील, तर त्याचा प्रसार व्हायला नको. निव्वळ शोभेसाठी लोक ही
झाडे लावतात, आणि नुकसान होते. या निलगिरीत, गुलाबी, लाल, केशरी अशा
अनेक छटा आहेत.

त्याच बरोबर काल स्टार मुव्हिज वर गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २ आणी मागच्या अठवड्यात डुमा हे चित्रपट पाहिले .

च्च... भाग १ खुपच छान होता. माझा मिसला Sad

Pages