२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

Submitted by निंबुडा on 6 August, 2010 - 00:49

२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्‍याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.

मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.

सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ruchira mazi pan mulgi saha mahinyanchi ahe. Me tila lactogen formula milk dete adhipasun karan bf nahi karat. Tila me ratale batata lal bhopla dudhi ukdun puree karun dyayla suru kelay. Sprouted nachni powder shijvun dete sakali. Ratri cerelac rice with veg dete. Fruits ajun suru nahi keli. Tandul mug dal bharad pej try keli pan tila avadli nahi. Ajun tari divsatun 2-3 velach anna dete baki vela dudh. Ajun kahi suggest karta yeil ka.

निंबुडा, दलियाची पटकन होणारी खीर म्हणजे दलिया शिजवून घेणे...प्रेशर कुकरला भात करतो तसा. मुलांसाठी जरा ओव्हरकुक केलंत तरी चालेल..आणि मग चांगलं गरम किंवा आवडत असल्यास आटवलेलं दूध आणि मनुका,सुकामेवा, साखर आणि मस्त वेलची पावडर घालुन चांगली ढवळून देणे...
काहीवेळा मी गूळ घालते...तेव्हा मी दूध घालत नाही...बाकीचं जे काही आहे ते वर लिहिल्याप्रमाणे....मला स्वतःसाठी तर या गूळ घातलेल्या खीरीत दालचिनीपावडर पण आवडते...ट्रेडीशनल रेसिपी कुणीतरी देईलच तोवर ही चालते का बघा...:)

माझी लेक राजवी ६ महिन्यांची आहे... तिला मी आता सॉलिड फूड द्यायला सुरुवात केली आहे.. मूग आणि तांदळाची पेज सकाळी आणि नाचणी सत्व अन गूळ २ दिवसाआड.. अजून काय देउ??? सध्या ती जरा चिकट स्टूल पास कर्ते आहे... दाताचा त्रास सुरु झाला आहे पण त्यावर होमिओपॅथी सुरु आहे..

अजून काय देउ??? >>>
कल्याणी, या बाफवरच्या आधीच्या सर्व पोस्ट्स वाचल्या आहेत का तुम्ही? लहान बाळाला सॉलिड फूड सुरू करताना त्यावयाची काळजी आणि पदार्थ यांवर बर्‍याच पोस्ट्स आहेत.

त्या मी सगळ्या वाचल्य्यत निंबुडा... तरी खुप गोंधळ उडतोय... कधी काय आनि कितीचा.... सॉरी मी खुप प्रश्न विचार्तेय....

....

.

माझी मुलगी १ वर्ष, १ महिन्यांची आहे..
१) ब्रेस्ट फीडिन्ग कधी बंद करु..?? डॉ. साधारण २ वर्षे सांगतात ..
पण बर्यापैकी सगळे १ वर्षानंतर बंद करतात .. कधी बंद करु? मी वर्किन्ग आहे .. दिवस्भर मुलीला आई सांभाळते...

२) दात तिला थोडे उशिरा आले कॅल्शिअम कमी आहे असे डॉ. म्हणाले ...
कॅल्शिअम जेवणातुन मिळेल असे खाद्य कोणते ??.. जे तिला आत्ता देता येइल??

वरचे दुध चालु कर , नाचणीची पेज दे तिला , डोन्ट वरी येतील दात
ब्रेस्ट फिडिंग १.६ नंतर कर, सध्या ओफिस ला जाण्या आधी आणि आल्या आल्या पाजत जा

....

namskar maje bal 6 mahinyacha hoil ata tyala varche feed kase kay ani kiti ani kitivela chalu karu yachi kunitari detail mahiti dya . Mala sasu nahi ani aai khup lamb rahate. . . .

अमेरिकेत जेंव्हा बाळाला सॉलिड्स द्यायला सांगतात तेंव्हा फॉर्म्युलामधे राइस सिरियल ( बाळांसाठी मिळणारे) मिसळून पातळ पेस्ट करुन द्या म्हणतात. सुरुवात राइस सिरियल ने करुन हळू हळू इतर धान्यांचे ( बाळासाठीचेच ) सिरियल द्या असे म्हणतात. पहिल्यांदा १ टेबलस्पून देऊन पहावे.

साधारण १-२ आठवड्यातून एकच नवा पदार्थ द्यावा. त्याकाळात तो पदार्थ बाळाला सुट होतोय का नाही ते कळेल.एकदम बरेच नवे प्रकार देऊ नयेत.

सहा महिन्यानंतर उकडून मॅश केलेल्या भाज्या, फळे असे बेबी फूड ( जार मधले किंवा घरी केलेले ) देऊ शकता असे सांगितले जाते.

तुमच्या पेडि ने काय सांगितले आहे ?

Te kalal g medha pan sadharan kiti vela deu mhanje sakalpasun kitichya antrane karan brestfeeding pan rahil na . Mag kasa balance thevu?

दर दीड दोन तासाने चेक करा. बाळ भुकेले झाले कि रडेल. पोट भरले कि खेळेल. अर्धवट भरले तर
चिडचीड करेल. मग बाळाचा एक पॅटर्न सेट होईलच. एक दोन आठवड्यात. नुसत्या लिक्विड्ने पोट भरे नासे झाले कि बेबी सॉलिड्स खाल्ल्यावर हॅपी दिसेल. अर्थात फोर्स फीड करायचे नाही.

Ok al laxat . . Mhanje balachya requirement nusar gap thevaycha. . . . Thank you

बाळाला मिरची किंवा तिखट जेवणात साधारण कधीपासून सुरू करावे? मिरेपावडरने सुरूवात करावी का?>> मी आले लसूण पेस्ट आणि जिरे एवढंच वापरायचे. क्वचित जिरे-धणे-बडीशेप पावडर. हिंग आणि हळद न चुकता. साधारण दीड वर्षानंतर चिकन सूप वै. करताना एक लवंग, एक छोटा दालचिनी तुकडा आणि एक मिर्‍याचा दाणा टाकायला सुरूवात केली. आता अडीच वर्षांचा झालाय. किंचीत मिरची पावडर वापरते, पण नेहमी नाहीच. हिरवी मिरची अजीबात वापरत नाही. चार वर्षांनंतर आपोआप हळू हळू थोडं तिखट खायची सवय होते.

माझा मुलगा मागच्या आठवड्यात १ वर्षाचा झाला . तो काहीच खात नाहि. फक्त दुध व पाणी पितो दिवासाभर . जेवायला भरवायला गेल कि तोंड फ़िरव्तो. अजिबात तोंड उघडत नाहि. बळजबरी ने भरवायला गेलं तर खूप हमसुन रडतो . दुधाची वाट बघतो म्हणून काल रात्री दुध दिलं नाही तर तसाच झोपला . १४ तास काहीच खाल्लं नाहि. सकाळी पण फक्त दुध प्यायला व अगदी थोडं अंड खाल्ल पण जेवण केल नाहि. त्याचे वजन या वेळेस १०% च आहे असं डॉक्टर म्हणे. ९ महिन्याच्या विजिट ला ४० % होता. काही काळत नाही काय करु.

त्याचे वजन या वेळेस १०% च आहे असं डॉक्टर म्हणे. ९ महिन्याच्या विजिट ला ४० % होता. काही काळत नाही काय करु.>> म्हणजे काय?

तुम्ही त्याला सेरेलॅक देऊन पाहिले आहे का? बर्‍याचदा मुलांना सेरेलॅक आवडते. सुरुवातीला राईसचे द्या.

फळे सुद्दा नाही खात का?

दीपाकुल,
बदाम भिजवून द्यायला हरकत नाही. आधी कधी उगाळून वगैरे दिला नसेल तर अर्धा बदाम देवून बघा. नट अ‍ॅलर्जी टाईप काही त्रास होत नाहिये ना ते पहा. नविन घटक देताना एकावेळी एकच द्यायचा. बदामाचे रुटीन बसले की मग अक्रोड देवून बघा. माझ्या मुलाला नुसता बदाम आवडायचा नाही त्यामुळे सुरवातीला दुधात पावडर करुन आणि नंतर घरी केलेले आल्मंड बटर. मी कधी भिजवून अक्रोड दिला नाही. अक्रोड नुसता खायला किंवा भरपूर अक्रोड घालून बनाना नट ब्रेड/ मफिन्स .

माझा मुलगा आता सव्वा वर्षाचा आहे. त्याला अंड कधीपासून देता येइल.. कोणत्या वेळेत द्यावं. कधितरी एखादा घास आमच्यातलं ऑम्लेट भरवलं आहे. पण रोज अंड द्याव का?

Pages