२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार
बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.
मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.
सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.
धन्स अदिती मी नाचणिचे सत्व
धन्स अदिती
मी नाचणिचे सत्व पाण्यात शिजवुन त्यात जीरेपावडर, किंचित मीठ आणि तूप घालून देत होते.
>>> हे मी पण आता ट्राय करून पाहीन.
>>नेस्टम राईस दूधातून
हा काय प्रकार आहे? >>> अगं नेसले चं जसं सेरीलॅक असतं तसं एक नेस्टम म्हणून प्रकार आहे. त्यात पण सेरीलॅक सारखे वेगवगळे फ्लेवर्स असताता. रागी, दाल्+व्हेजीटेबल, Fruits etc. सेरीलॅक पाण्यातून देतात आणि नेस्टम दूधातून.
आणि फळे कधी देतेस? >>>
अगं, हे लिहायचं राहिलं.
संध्याकाळी ६-७ च्या मध्ये दूधातून मारी वै. लिहिलंय ना तिथे कधी कधी पपई/चिकू असली फळं. सीझन वाईज देते. उन्हाळा होता तेव्हा आंबा/कलिंगड देत होते. संत्र/मोसंबीचा ज्युस पण देत होते. पण आता पावसाळ्यात द्यायला नको वाटते आंबट फळे. सर्दी होते ना!
बादवे, हे वीटाबिक्स काय आहे??
वीटाबिक्स
वीटाबिक्स http://en.wikipedia.org/wiki/Weetabix
ठाण्याला स्टेशनच्या जवळ समर्थच्या समोर एक दुकान आहे तिकडे नक्किच मिळते. बँगलोरला मी स्टारबझार मधुन आणायचे. बहुतेक कल्याणला बिग बझारमध्ये मिळते.
मी पण माझ्या मुलीचा आहार
मी पण माझ्या मुलीचा आहार लिहीते. चुक किंवा अजुन काही करायचं असेल तर सांगा. सध्या तिचं वजन वाढत नाही :-(. सध्या ती सव्वा वर्षाची आहे
सकाळी उठल्या उठ्ल्या ७ वाजता चपाती तुप लावुन. मग थोड्यावेळाने आम्ही करतो तो नाश्ता १/२ वाटी. जसं पोहे, उपमा, डोसा, इड्ली, थालीपीठ.
१.३० तासाने दुध. दुपारी भात, आमटी, भाजी, पोळी.
३ वाजता एखादे फळ.
४ ४:३० ला ओट्स (गोड्/तिखट), नाचणी(गोड), दलिया(ति़खट)
५:३०/६ ला दुधी, पालक, टोमॅटो , बीट, गाजर सुप.
८ वाजता जेवण.
झोपताना दुध.
मध्य मध्ये एखादं बिस्किट( नाचणी, मारी), काकडी, गाजर.
तीची मस्ती इतकी वाढली आहे की वजन वाढ्त नाही :-((
निंबुडा, माझ्या डॉ ने
निंबुडा,
माझ्या डॉ ने सांगीतलय फळं नेहमी उपाशी पोटी द्यावी/खावी
तुम्ही मुलांना पाणी प्यायला
तुम्ही मुलांना पाणी प्यायला द्यायला कधी पासुन सुरवात केलीत ? इथे बहुतेक १ वर्षापर्यंत वेगळे पाणी द्यायची गरज नाही असे सांगतात. दुधातूनच मिळणारे पाणी पुरेसे आहे असे म्हणतात.
तुम्ही मुलांना पाणी प्यायला
तुम्ही मुलांना पाणी प्यायला द्यायला कधी पासुन सुरवात केलीत ? इथे बहुतेक १ वर्षापर्यंत वेगळे पाणी द्यायची गरज नाही असे सांगतात. दुधातूनच मिळणारे पाणी पुरेसे आहे असे म्हणतात.
>>>
याबाबतीत सगळीकडे वेगवेगळे प्रवाद आहेत. घरातले वडीलधारे ओवाशेपांचे पाणी ३-४थ्या महिन्यापासून द्यायलाच हवे असे ठामपणे म्हणतात. डॉ. तर दूधात वावडींगही नको आणि ओवाशेपांचे काय पण साधे पाणीही नको असे सांगतात. शिवाय सगळीकडचे डॉ. वेगवेगळे सल्ले देतात. कुणी गाईचे दूधच द्या म्हणतात. कुणी डायरेक्ट म्हशीचे दूध चालू केले तरी चालेल म्हणतात. कुणी पाणी घालूनच उकळा म्हणतात तर कुणी अजिब्बात घालायचे नाही पाणी असे म्हणतात.
मी तरी ट्रायल अँड एरर बेसिस वर माझ्या अंदाजाने आणि पिल्लू ला काय सूट होतंय आणि पचतंय ते बघून सगळे प्रकार केले.
अजूनही फूलफ्लेज पाणी असे देत नाही मी त्याला प्यायला. पण दुपारचे आणि रात्रीचे जेवण (भात, खिचडी etc) झाले की तोंडातली भाताची शिते गिळायला सोपे व्हावे म्हणून थोडे कोमट पाणी (४-५ चमचे) देते मी त्याला. (अर्थात उकळलेले आणि गाळून घेतलेले साधे पाणी. नो ओवाशेपा etc.).
ते मल्टीव्हायटॅमिन्स चे ड्रॉप्स (v-syneral z) कधी पर्यंत द्यावेत? आमच्या डॉ. नी मला हॉस्पिटल मधून डीस्चार्ज झाल्यापासून राजसला ते ड्रॉप्स प्रीस्क्राईब केले होते. वंशवेल पुस्तकात ६-७ महिन्यांपर्यंत द्यावेत असे लिहिलेय. आमच्या डॉ. नी अगदी ७-८ महिन्यांपर्यंत जेव्हा जेव्हा पिल्लूला तपासायल न्यायचो तेव्हा तेव्हा ड्रॉप्स बद्दल विचारल्यावर "देत रहा" असे सांगितले. whereas माझी एक ठाण्यातली मैत्रिण आहे जिची मुलगी राजसपेक्षा १च महिन्याने लहान आहे, तिच्या डॉ. नी असे काही वेगळे ड्रॉप्स द्यायची काही एक गरज नसते असे सांगितले होते.
मी विटॅमीन आणी कॅल्शीयम १
मी विटॅमीन आणी कॅल्शीयम १ वर्षापर्यंत दिल होतं.
कुणीतरी सांगा ना मी माझ्या लेकीला देते ते बरोबर आहे ना? काही सुधारणा करता येइल का?. तिचं वजन नाही वाढत
निकिता, तू करतेयस ते पुष्कळच
निकिता, तू करतेयस ते पुष्कळच आहे अर्थात सफिशियंट असं वाट्टंय, पण आहारशास्त्रात पारंगत लोक काय ते योग्य मार्गदर्शन करू शकतील. तुझी मुलगी हल्ली फार मस्ती करते म्हणतेय्स, तर दिवसातून इतक्या वेळा तिला भरवणे कसे जमते तुला? एका जागी नीट बसून खाते का ती?
नाही. चालत फिरत खात असते
नाही. चालत फिरत खात असते
चालत फिरत खात असते >>> सेम
चालत फिरत खात असते >>> सेम गं. अजून चालत नाहीये माझं पिल्लू. पण मांडीतल्या मांडीत पण सारखी उठक-बैठक चालू असते. हातात धरायला ५-६ वेगेवेगेळी खेळणी, वस्तु रेडी ठेवाव्या लागतात. त्यांच्यात रमला की एकीकडे भरवायला बरे पडते.

चालायला लागेल तेव्हा तर मागे मागे फिरायला लावेल बहुतेक.
ओट्स या धान्यप्रकारा बद्दल
ओट्स या धान्यप्रकारा बद्दल माहीती लिहा ना कुणाला माहीत असेल तर. मी तरी Diet concious लोकांना ओट्स च्या खाद्य प्रकारांवर अधिकारवाणीने बोलताना ऐकलंय. लहान मुलांसाठी पौष्टीक वै. आहे का ते? माझ्या आईकडे ओट्स चे काहीतरी पोह्यासारखे दिसणारे आहे. त्या पासून काय काय करता येईल नक्की?
डेलिया मी मुलीला ती काही
डेलिया मी मुलीला ती काही महिन्याची असल्यापासुनच पाणी देते. एक वर्ष झाल्यावर तर तिच्या साठी एक सिपी कप भरुनच समोरच ठेवायचे मी. आणि दहा महिन्यापासुन सगळच जेवण कुस्करुन द्यायला लागले. आम्हि तिखट, मसाले इ. जास्त खात नाही आणि तिच्यासाठि अजुनच कमी झालय ते ती आता साडे तीन वर्षाची झाली तरी तसच चालु आहे. (हे सगळ आयुर्वेदिक डॉ ने सांगितलेल होत.)
अजुन इथे वर मी जाळी बद्दल वाचल. मला त्याच आयुर्वेदिक डॉ ने सांगितल आहे की एक वर्षाची झाल्यावर, दात आल्यावर प्लॅस्टीक/ रबर अस काही तोंडात देउ नकोस. खुप चावल्याने त्याचा अंश पोटात जाउ शकतो.
सफरचंद आणि गाजर फोड देताना लक्ष ठेवा. कधी कधी बाळं टवका काढतात तो अडकु शकतो.
ह्या जाळ्या फूड ग्रेड असतात.
ह्या जाळ्या फूड ग्रेड असतात.
मी पण कालच आणलीये ती न्यूबीची
मी पण कालच आणलीये ती न्यूबीची जाळी. बघू आता वापरून.
ओट्स बद्दल कुणीच लिहिलं नाहिये अजून.
निंबुडा, ओटस लहान मुलांना
निंबुडा, ओटस लहान मुलांना चांगले, पण त्याची पोषणमूल्ये वगैरे माहीत नाहीत. पण इथे माबोवर त्याच्या बर्याच पाकृ आहेत :
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/127167.html?1211964588
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/139063.html?1213919394
इथे ओट्स सीरीयल मिळतात त्या
इथे ओट्स सीरीयल मिळतात त्या ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्मुला बरोबर बाळाला देता येतात. मी फॉर्मुलामधे मिक्स करुन देते ते ओट्स सीरीयल.
माझ्या आईकडे ओट्स चे काहीतरी
माझ्या आईकडे ओट्स चे काहीतरी पोह्यासारखे दिसणारे आहे. त्या पासून काय काय करता येईल नक्की?>>>
निंबुडा..
पसाभर ओट्स आणि चार पाच काळे खजूर एका वाटित थोडे पाणी घालून वरणभाताचा कुकर लावशिल तेव्हाच कुकरला लावायचे.
ही खीर थोडी चिकट असते पण मुलं आवडीने खातात. काळे खजूर तब्येतीला चांगले असतात.
शिजल्या नंतर मिक्सरमध्ये बारिक करुन कोमट दूध घालून खीरीसारखी हवी तशी कंसिस्टसी आली की भरवायचे बाळाला. स्वादासाठी जायफळ वेलचीची पूड अॅड करू शकतेस.
डॅफोडिल्स, धन्स. करून बघेन
डॅफोडिल्स,
धन्स. करून बघेन
डॅफोडिल्स, ओट्स शिजायला जास्त
डॅफोडिल्स, ओट्स शिजायला जास्त वेळ लागत नाही ना. कूकरला लावले तर ते ओव्हर कुक होतील का?
मृनिश, तू वर जी "पेजेसाठी
मृनिश,
तू वर जी "पेजेसाठी भरड" दिली आहेस त्यात हे जे म्हटलंयस ते समजलं नाही.
१ वाटी : दामोभाजुन
???
अग सुधारल ग ते..ते दाणे भाजुन
अग सुधारल ग ते..ते दाणे भाजुन असे हवे होते..
निंबुडा, माझी शेजारीण तर हे
निंबुडा, माझी शेजारीण तर हे पोह्यासारखे ओट्स मिक्सर मधून काढून, ते पीठ पाण्यात भिजवून त्यात चवीप्रमाणे जिरे, मीठ, तिखट, कोथिंबीर घालून त्याची धिरडी बनवते... चांगली लागतात म्हणे..
माझी शेजारीण तर हे
माझी शेजारीण तर हे पोह्यासारखे ओट्स मिक्सर मधून काढून, ते पीठ पाण्यात भिजवून त्यात चवीप्रमाणे जिरे, मीठ, तिखट, कोथिंबीर घालून त्याची धिरडी बनवते >>>
इथे माबोवर ओटस्च्या धिरड्यांची पाकृ टाकलीये ना कुणीतरी. लिंक असेल हँडी तर द्या प्लीज.
आणि तुझ्या शेजारणीला विचार ग मंजे की किती वेळ भिजवायचं ते ओट्स चं पीठ पाण्यात?
लहान मुलांना कितव्या वर्षी पासून तिखटाचे पदार्थ देऊन चालतील? म्हणजे मिरची किंवा तिखट घालून केलेले पदार्थ?
@ स्वाती... नाही होत .
@ स्वाती... नाही होत . नाहितरी लहान मुलांना मउच भरवतो ना आपण.. मग खिर करायला चालतात मउ शिजलेले ओट्स आणि खजुर.
@मंजिरी.. मस्त होतात ओट्स चि धिरडी.. ओट्स आणि अगदी थोडासा रवा दह्यात भिजवायचे आणि त्यात आलं लसूण कोथिंबिर हिरवी मिर्ची जिरं मिठ चवी प्रमाणे घालून मिक्सर मध्ये वाटून डोसे करायचे. इथे पण दिली होती कुणितरी रेसिपी.
लिंबुडा... एक वर्षाच्या मुलानाही देउ शकतो हे डोसे. मिर्ची कमी प्रमाणात किंवा नसली तरी चालेल.
लहान मुलांसाठी चविष्ट
लहान मुलांसाठी चविष्ट बटाट्याचे थालीपीठ - http://www.maayboli.com/node/19237
चटकदार, खमंग दुधी भोपळ्याचे
चटकदार, खमंग दुधी भोपळ्याचे धिरडे
http://www.esakal.com/esakal/20100829/4981927483866039342.htm
हे पण
हे पण वाचा:
http://72.78.249.107/esakal/20100819/4705998559880791159.htm
दुव्यांबद्दल दुवा!
दुव्यांबद्दल दुवा!
हाय ! माझ पिल्लु ४ महिने ६
हाय !
माझ पिल्लु ४ महिने ६ दिवसांचा झालाय . मि त्याला आता वरचे खाने सुरु करु शकते का?
येथे पाचव्या महिन्यांपासून सुरु केलेय सगळ्यांनी .मि मागचे सगळे वाचून काढलेय तरी, मनात खूप शंका येतायत...कारन ४-५ महिन्यांच्या मुलांसाठि आणि ६-७-८ महिन्यांच्या बाळांचे खाने यात कन्फुजन होतेय.
मि दोन दिवसांपासून अॅपल देतेय त्याला ४-५ या वेळेत(दिवसातून फक्त एकदाच..स्पून ने स्मॅश करुन ) त्याला आवडतेय ते, पन किति दिवस ते चालू ठेवू? नंतर काय सुरु करु?
मला सांगा प्लिज ?
पानी पन देतेय मि थोडे थोडे .
पानी पन देतेय मि थोडे थोडे . काय करु देऊ कि नको?
Pages