२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार
बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.
मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.
सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.
चंपी अर्थात मला अनुभव
चंपी अर्थात मला अनुभव नाहिए..पण काल मला त्या चाईल्ड्बर्थ एज्युकेटर नी सांगितलं की बाळाचा प्रत्येक अवयव रेडि व्हायला १ वर्ष लागतं..हृदय, फुफ्फुसे सगळं..मग पचनसंस्थेला ५ महिन्यातच का सुरु करायचं..?..म्हणुन तू रिलॅक्स हो...थोडं थोडं देऊन पहा काय काय आवडतं त्याला...पोटात् काही त्रास होऊ नये याचीच काळजी घ्यायची बस्स...
चंपी तुझे (चालेल ना तुझे
चंपी तुझे (चालेल ना तुझे बोलले तर ) बाळ तसे लहानच आहे. एकदा डॉ. ना विचारलेस तर तेही छान समजावून सांगतील त्याचा आहाराबद्द्ल..
चार महिन्यांपर्यंत त्याला फक्त दूधच दिले असशील तर लगेचच सफरचंद मला तरी वाटते नको. म्हणजे माझ्या मुलाच्या वेळी डॉ. नी सांगितलेले आणि मी एका पुस्तकात वाचलेले पण की , मुलांना सुरुवातीला लिक्विड फुडच द्यावे जसे पेजेचे पाणी , मूग डाळिचे पातळ वरण (नुसते मीठ टाकलेले, फोडणीचे नाही ), फळांचे रस वगैरे....
सुरूवातीला थोडया प्रमाणात द्यावे , मग हळू हळू प्रमाण वाढवावे, त्याला जर काही त्रास म्हणजे पोट फुगणे , जुलाब होत नसेल तर ईतर लिक्विड पदार्थ द्यायला हरकत नसावी.
डॉ. नी सांगितलेले एका वेळी एकच पदार्थ द्यावा.
फळ दिल्यावर जस तू म्हणतेस तस सफरचंद दिल्यावर काही त्रास होत नसेल तर द्यावे , हिरव्या सालीचे केळे व्यवस्थित, किंवा जरा जास्त पिकलेले, पण खाण्याजोगे असेल तर तेही दिले तर चालेल.
एक दोन महिन्यांनी भाताची खिमटी, नाचणीचे सत्व पातळच दिले तरी चालेल.
चंपी, बाळाच्या डॉक्टरच्या
चंपी, बाळाच्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच खायला द्यायला सुरु कर. बाळाला सहा महिन्यापर्यंत पाणी देवू नका असे आम्हाला डॉ. ने सांगितले होते. आईच्या दुधातून पाण्याची गरज भागते.
तसही, बाळाला जर अन्न द्यायला सुरवात करणार असलिस तर सुरवात शक्यतो वरणाच्या (मुगाच्या) पाण्यापासून, भाताच्या पाण्यापासून करावी. भाज्या उकळलेले पाणी पण चालेल. (परंतू कोणत्या भाज्या वैगरे आपल्या डो. ला विचारलेले बरे). सफरचंद वैगरे थोडं नंतर सुरु कर.
जून्या मायबोलीवर लहान मुलांच्या आहाराबद्दल (एक वर्षाच्या आतल्या) एक छान बाफ होता. बहुतेक नविन मायबोलीवर पण असेल. थोड्यावेळाने शोधून लिंक देते.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/84801.html?1219738700
इथे आहे बघ लहान बाळाच्या आहाराबद्दल.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93902.html
चंपी वरील लिंक नक्कि वाच
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2260?page=1 >> इथे पण चर्चा झालीये पुर्वी लहान बाळांच्या खाण्याबाबत.
याच नावाचा एक बाफ जुन्या मायबोलीवर पण होता. तिथेही असेल थोडी चर्चा.::)
हेलो चंपी अगं, घरातले
हेलो चंपी
अगं, घरातले वडीलधारे सांगतात की ६ महिने पर्यंत दूधाव्यतिरिक्त चे सॉलिड फूड बाळांना देऊ नका. पण डॉक्टर लोक हल्ली ४थ्या-५व्या महिन्यापासून द्यायला चालू केले तरी चालेल असे म्हणतात.
मीही माझ्या पिल्लूला ५व्या महिन्यापासून तू देतेयस तसंच फळांचा रस द्यायला चालू केलं होतं. त्या शिवाय पालकाच, गाजर, टोमॅटो यांचा ज्यूसही (एकदम पातळ असा) देऊ शकतेस. इन्स्टंट फूडही हळू हळू ५व्या महिन्यापासून देऊ शकतेस. रोज रोज सफरचंद नको. त्याने constipation होऊ शकते. बाळांना त्रास होऊ शकतो. तरी दूधाव्यतिरिक्त काही चालू करताना आधी एकदम पातळ ज्यूसेस, मग हळू हळू सेमी सॉलिड गोष्टी (e.g. fruits, boiled vegetables pulps etc) मग दात यायला लागले की सॉलिड फूड असा एकंदर ग्राफ ठेवायला हरकत नाही.
सुरवात शक्यतो वरणाच्या
सुरवात शक्यतो वरणाच्या (मुगाच्या) पाण्यापासून, भाताच्या पाण्यापासून करावी. भाज्या उकळलेले पाणी पण चालेल. >>>
मुलांना सुरुवातीला लिक्विड फुडच द्यावे जसे पेजेचे पाणी , मूग डाळिचे पातळ वरण (नुसते मीठ टाकलेले, फोडणीचे नाही ), फळांचे रस वगैरे....
>>>>
पातळ ज्यूसेस मघ्ये मलाही अगदी हेच म्हणायचे होते.
जो, जुई, अल्पना , यमन थॅक्स ग
जो, जुई, अल्पना , यमन थॅक्स ग . मि वाचतेय इथल्या लिंक्स. भरपूर माहिती आहे .
चंपी तुझे (चालेल ना तुझे बोलले तर ) बाळ तसे लहानच आहे. एकदा डॉ. ना विचारलेस तर तेही छान समजावून सांगतील त्याचा आहाराबद्द्ल.. >>> जुई चालेल काय पळेल ग
अल्पना, जुई मि डॉ. कडेच जाते आता. दाळीचे पाणी मि दिवसातून एकदाच देऊ का? आणि कोनत्या टाईमिंगला देऊ साधारनपणे? भरपुर वाचले तरी प्रश्ण पड्तातच ग
यमन म्हनजे निंबुडा तु का? मि
यमन म्हनजे निंबुडा तु का? मि निमिष ला कधि कधि निंबुडा म्हनत असते :)(खट्टा खट्टा निंबुडा
)
हे सातू म्हनजे काय ? ते परदेशात मिळते का?
चंपे.. कुठलाही नविन पदार्थ
चंपे.. कुठलाही नविन पदार्थ बाळाला सकाळी किंवा ४ च्या आसपास द्यायचा म्हणजे संध्याकाळच्या आत तो पचुन जातो आणी मग रात्री गॅसचा वगैरे त्रास होत नाही...सातू बहुधा परदेशात नाही मिळणार
चंपी मला डॉ ने ६
चंपी मला डॉ ने ६ महीन्यापर्यंत राइस सिरिल द्यायला सांगितले. उद्या पासुन सुरु करेन.तोपर्यंत दूध आणि रा.सि. च द्यावा असा विचार करतेय.
कि थोडस पेज्/डाळीचे पाणी द्यावे? काय वाटते
महत्त्वाचे म्हणजे जास्तीचे
महत्त्वाचे म्हणजे जास्तीचे मीठ, साखर याची सवय न लावल्यास पुढे मोठे पणी तब्येतीस त्रास होत नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे जास्तीचे
महत्त्वाचे म्हणजे जास्तीचे मीठ, साखर याची सवय न लावल्यास पुढे मोठे पणी तब्येतीस त्रास होत नाहीत. >>> हे खरंच खूप महत्वाचं आहे.
आयाम बिनासाखरेचं नाही, पण तरीही कमी साखरेचं दुध पितो. त्याच्या जेवणात मीठ तर बर्यापैकी कमी असतं. आणि सगळ्या भाज्या खातो (कारल्यासकट, चक्क कच्चं कारलं पण खाल्लंय त्याने दोन वेळा, कडूलिंबाची पानं पण हौशीने खातो).
सहा महिने ते वर्षाचा होईपर्यंत त्याला देत असलेल्या वेगवेगळ्या खिमट, खिचडी, दलिया वैगरे पदार्थामंध्ये डॉ. च्या सल्ल्याने सगळ्या भाज्या देत होते. टॉमेटो, दुधी,गाजर अशा भाज्यांनी सुरवात केली. नंतर हळू हळू पालक आणि इतर पालेभाज्या (बहूतेक ७-८ महिन्यानंतर), कोबी, बिन्स अश्या सगळ्याच भाज्या देत गेले.
वर्षाचा असताना फुलका आणि भाजी घातलेले वरण किंवा पातळ भाजी कुस्करून खायला घालायचे. दिड वर्षाच्या सुमारास न कुस्करता खायला लागला. आणि दोनचा झाल्यावर पुर्णपणे हाताने जेवायला लागला.
म्रुनिश ,मि सकाळि देत जाईल मग
म्रुनिश ,मि सकाळि देत जाईल मग त्याला. आज दिले होते मुगाच्या डाळीचे पाणी , मस्त पित होता ..माझा हातच पकडायचा
मि थोडेशेच देनार होते पन , नाहि दिले तर तो रडायचा त्यामुळे मि सगळे दिले म्हनजे, २-३ स्पून ठिक आहे का? थोडे म्हनजे नक्कि किति स्पून देऊ?
पिहू , राईस सिरीयल आणि डाळीचे पाणी पन दे ना थोडे थोडे. बघ तु .जरा टेन्शनच येते नाहि ,काय द्यावे आणि काय देऊ नये ते. तु कान टोचनार आहेस कि नाहि इकडे कि, भारतात गेल्यावर?
मि काय करु मला सांगा ना? ..मि इथे कान टोचूण घेऊ का त्याचे कि भारतात गेल्यावर? खूप त्रास देतात का कान टोचल्यावर?
अमा, म्हनजे साखर आणि मिठ एकदम थोडेशेच टाकायचे ना.
ओके थॅक्स अल्पना, अमा
ओके थॅक्स अल्पना, अमा
अग चंपे ..खरच मुलांनाही
अग चंपे ..खरच मुलांनाही आवडतो जरा चवीत बदल..
२-३ स्पून ठीक आहे.. आणी जरा थोडे थोडे प्रमाण वाढवत न्यायचे..फक्त एक लक्क्षात ठेव.. काहि वेळा नविन पदार्थ जरा पचायला वेळ लागतो..त्यामुळे नेहमी जर त्याला २ तासानी भूक लागत असेल तर वरचे पदार्थ खाल्यावर ३ तासानी लागु शकते.. तसेच काही मुले असे वरचे खाल्यावर छान २-३ तास गुरगुटुन झोपुन जातात त्याना असे पोट भरल्याची गुंगी आल्यासारखे होते.. असे काही झाले तर घाबरु नकोस म्हणुन सांगितले.. 
चंपूतै अग थोडी मोठी झाल्यावर
चंपूतै अग थोडी मोठी झाल्यावर याच मुलांना कोक/ पेप्सी/ पिझा बर्गर/ प्रिझर्वेटिव घातलेले चीटोज चिप्स वगैरे जंक फूड चा सामना करायचा आहे. त्याला नाही म्हणायचे आहे. ह्या पदार्थात नको तेव्ह्डे सोडिअम, साखर व इतर केमिकल्स असतात त्याने शरीरावर वाइट परिणाम होतात. वजन उगीचच वाढून बसते ते व्हायला नको म्हणून सुरुवातीपासूनच त्यांना आरोग्यपूर्ण सवयी लावायच्या.
कान टोचताना आपल्या इथे सोन्याच्या तारेने टोचतात. सोनाराला घरी बोलावितात. बाळे रड्तातच पण. बालपणी कानाची पाळी पातळ असते तेव्हा काम लगेच होते. तुमच्या तिथे मशीन वापरणार असतील. पण
मशीनची स्वच्छता तपासून घे. नाहीतर जंतूसंसर्ग होण्याची भीती आहे. विषयांतर झाले क्षमस्व
चंपूतै अग थोडी मोठी झाल्यावर
चंपूतै अग थोडी मोठी झाल्यावर याच मुलांना कोक/ पेप्सी/ पिझा बर्गर/ प्रिझर्वेटिव घातलेले चीटोज चिप्स वगैरे जंक फूड चा सामना करायचा आहे. त्याला नाही म्हणायचे आहे. ह्या पदार्थात नको तेव्ह्डे सोडिअम, साखर व इतर केमिकल्स असतात त्याने शरीरावर वाइट परिणाम होतात. वजन उगीचच वाढून बसते ते व्हायला नको म्हणून सुरुवातीपासूनच त्यांना आरोग्यपूर्ण सवयी लावायच्या.
कान टोचताना आपल्या इथे सोन्याच्या तारेने टोचतात. सोनाराला घरी बोलावितात. बाळे रड्तातच पण. बालपणी कानाची पाळी पातळ असते तेव्हा काम लगेच होते. तुमच्या तिथे मशीन वापरणार असतील. पण
मशीनची स्वच्छता तपासून घे. नाहीतर जंतूसंसर्ग होण्याची भीती आहे. विषयांतर झाले क्षमस्व
आणि हो चंपी. कोणताही नविन
आणि हो चंपी. कोणताही नविन पदार्थ देताना, एका वेळी एकच द्यावा. २-३ दिवस सलग बघितले कि लक्षात येतं, बाळाला पचतंय की नाही. मग त्या पदार्थाची सवय झाली की नंतर दुसरा देवून बघायचं.
जसं तू जर आता वरणाचं पाणी दिलं असशिल, तर अजून २ दिवस दुसरं काही नविन नको देवू. याचा त्रास नाही झाला तरच, पुढचा पदार्थ ट्राय कर.
(हे सगळं त्या जुन्या लिंक्समध्ये आहेच. )
इथे अमेरिकेत ४-५
इथे अमेरिकेत ४-५ महिन्यांपासून सॉलिड्स द्या म्हणतात. आईच्या दुधात किंवा फॉर्म्युला मधे राइस सिरियल कालवून द्यायचं असतं. अगदी पातळ पेज वस्त्रगाळ घोटलेली असेल तर कशी दिसेल तसं दिसते ते. त्यामुळे मुलांना गिळायला सोपं पडतं, सुरुवातीचे दोन आठवडे हा एकच प्रकार द्यायचा. दिवसातून एक एक किंवा २ वेळा
मग हळू हळू दर आठवड्याला एक या प्रमाणे व्हीट सिरियल, ओट सिरियल, रताळे, लाल भोपळा, फरसबी, वाटाणे, मक्याचे दाणे, अशा भाजा उकडून मॅश करून गाळून दिवसातून एकदा अशा सुरु करायच्या. एका आठवड्यात एकापेक्षा जास्त नवा पदार्थ द्यायचा नाही.
आधी भाज्या अन मग सफरचंद, केळे, पेअर अशी फळे सुरु करायची असा प्रघात आहे.
ज्यांना चालतं ते साधारण ६-८ महिन्यांवर बीफ / चिकन घातलेल्या भाज्या पण देतात.
राइस सीरीअल म्हणजे आपल्याकडे
राइस सीरीअल म्हणजे आपल्याकडे सिरीलॅक नेस्लेचे मिळते तेच ना?
हो मामी. पण अगदी तेच दिले
हो मामी. पण अगदी तेच दिले पाहिजे असे काही नाही. मी लेकाला साडे-पाच महिन्याचा झाल्यावर सॉलिड्स सुरु केले होते. डाळीच्या पाण्याने सुरुवात करुन मग हळु हळु घरी दळलेल्या डाळ-तांदळाची पेज वगैरे.
बाकी मेधाच्या आणि इतर पोस्टना अनुमोदन. आधी भात, डाळीचं पाणी आणि मग भाज्या, फळं सुरु कर चंपी. तसेच एकदम कच्ची फळं/भाज्या सुरुवातीला देऊ नकोस. शिजवलेल्या दे. फळं देशील तेव्हा घरी बनवलेल्या अॅपल सॉस ने सुरु करु शकतेस.
सिंडरेला मी पण डाळी चे पाणी
सिंडरेला मी पण डाळी चे पाणी देउन सुरुवात करते उद्यापासुन.
चंपी मी कान इथेच टोचायचा विचार करतेय , भारतात १ महीन्यासाठी जात असल्याने तिचे १५ दिवस रडण्यात नको जायला.
>>तुमच्या तिथे मशीन वापरणार असतील. पण
मशीनची स्वच्छता तपासून घे. नाहीतर जंतूसंसर्ग होण्याची भीती आहे.>> अश्विनीमामी बरे झाले तुम्ही आधीच सावधान केले.
मी भारतातुन येताना नाचणी सत्व आणणार आहे.
थॅक्स सगळ्यांचे खूप उपयुक्त
थॅक्स सगळ्यांचे
खूप उपयुक्त माहिती दिलित.
काल डाळीचे पाणी दिले तर, आज लगेच शि वेगवेगळ्या प्रकारची होतेय. आज तर बाहेर गेलो त्यामुळे नाही दिले. आता उद्या देईल .
अ.मा. साखर आणि मिठाबाबत बरोबर
अ.मा. साखर आणि मिठाबाबत बरोबर आहे तुमचं. मी सुरुवातीला अजिबात साखर आणि मिठ न घालताच दिलं सगळं खाणं लेकीला. भाज्यांच्या वगरे मुळ चवी कळतात त्यामुळे असं वाटतं. मग काही महिन्यांनी किंचित मिठ घातलेलं द्यायला लागले. त्यानंतर एक वर्ष झाल्यावर आपण जेवतो ते जेवण पण मसाले तिखट अजिबात नाही. नुसतं हळ्द, जीरं, मोहोरी इ. आम्ही सुद्धा अगदी कमी खायला लागलो.
तसच सुरुवातीला मला आईने भरड द्यायला सांगितलेलं. ते असं करायचं
डाळ तांदुळ धुवुन वाळवायचे. मग तुपावर छान भाजायचे. त्यांची मिक्सर भरड काढायची. हे साधारण आठवडाभराचं करुन ठेवता येईल. मग आयत्या वेळी त्यातलं एक दोन चमचे घेउन व्यवस्थित पाण्यात शिजवुन पातळ पेस्ट करायची आणि ती द्यायची.
काही आठवड्यांनी यातच भाज्या उकडून अगदी पेस्ट करुन घालायच्या.
हे भरड म्हणजे आपले घरगुती
हे भरड म्हणजे आपले घरगुती राइस सीरीअलच. मुलांची वजने वाढू नयेत म्हणून आज जगभर एक प्रयत्न चालू आहे. तुम्ही उत्तम सुरुवात करून दिलीतर मुलांना चाळीशीत त्याचे फायदे मिळतील.
राइस सिरिअल आयर्न आणि इतर
राइस सिरिअल आयर्न आणि इतर बरेच काही मिनरल्स फोर्टिफाइड असते.
मागे जी जाळी सांगितलिये फळे
मागे जी जाळी सांगितलिये फळे देन्यासाठी ,त्यामध्ये जे प्लॅस्टीकचे आहे ते असन्याचे काय रीझन आहे? ते काढून त्यात फळे घालून देतात कि ते तसेच दोन्हिकडे ठेवून मध्ये फळे घालून देतात? म्हनजे बाळाला कसे सोपे पडेल खायला?
चंपी तु अजुन कहि नवीन सुरु
चंपी तु अजुन कहि नवीन सुरु केले काय बाळाला?
मी अजुन तरी दाळीचे पाणि सीरील मधे मिक्स करुन देतेय कारण ती नुसते पाणि पीत नाहिये
Pages