Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28
आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.
तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे एक वेगळाच प्रसंग दाखवणारं
हे एक वेगळाच प्रसंग दाखवणारं वारली पेंटिंग :
एक से बढकर एक कलाकृती. मामी,
एक से बढकर एक कलाकृती.
मामी, तुझ्या लेकीच्या खुर्च्यांचा सेट तर फारच आवडला. जमलंच तर लेकासाठी अश्या प्रकारातल्या खुर्च्या बनवून घेईन मी सुताराकडून आणि स्वतः रंगवायचा प्रयत्न करेन. (प्रोव्हायडेड घरात त्या खुर्च्या ठेवायला जागा मिळेल. सध्याच्या घरात तर शक्य नाहीये. )
वॉव, अगदी वेगळं वारली पेंटींग आहे. (मला बहूदा या धाग्यावर पडिकच रहावं लागणार.
)
ठाण्यात गुढीपाडव्याच्या वेळी
ठाण्यात गुढीपाडव्याच्या वेळी गावदेवी आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मोठ्ठ्या मोठ्ठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढतात. त्यापैकी ही एक :
दिवाळीच्या सुमाराला हा फोटो मी विपूमध्ये लावला होता. हा फोटो मोबाईलमधून काढला आहे, आणि ही रांगोळी संपूर्ण रांगोळीच्या बहुतेक १/१६ वगैरे असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंजली, मंजू, ब्राह्मणी नथ
अंजली, मंजू, ब्राह्मणी नथ नाकात घातल्यावर नाकाला पॅरलल रहात नाही. ती नाकपुडीपासून सुरु होते ती तिरकी होऊन दोन्ही नाकपुड्यांच्या मध्यापर्यंत आडवी होत संपते (नाक व ओठांच्या मधे येते). या नथीची तार त्याप्रमाणेच वळवलेली असते.
त्या पोर्ट्रेटमध्ये ती सरळ वाटतेय आणि नऊवारीचा ओचाही दिसत नाहिये (कदाचित तो नीट सावरुन घेतलेल्या पदराखाली लपला असेल).
इथे त्या बाईंची आडवी नथ दिसते आहे.
http://www.google.co.in/imgres?imgurl=http://www.anuroopwiwaha.com/image...
इथे उभी नथ दिसते आहे.
http://www.google.co.in/imgres?imgurl=http://3.bp.blogspot.com/-53Ij2TgB...
किंवा
http://www.google.co.in/imgres?imgurl=http://religion.bhaskar.com/2010/0...
वाशीच्या इनऑरबिट मॉलमध्ये
वाशीच्या इनऑरबिट मॉलमध्ये वाळूने साकारलेली कलाकृती
![Sand art.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/Sand%20art.jpg)
तन्मयतेने कलाकृती साकारण्यात रमलेला कलाकार
![Sand art 2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/Sand%20art%202.jpg)
मस्तच. वाळूने कसं काय
मस्तच. वाळूने कसं काय बनवतात?
मामी सही सेट्..मला पण हवा
मामी सही सेट्..मला पण हवा लेकी साठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटी
हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटी मधल्या रंगवलेल्या ह्या भिंती खूप आवडल्या होत्या
![DSCN1867.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/DSCN1867.JPG)
![DSCN1895.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/DSCN1895.JPG)
![DSCN1898.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/DSCN1898.JPG)
मित्राच्या बहिणीच्या
मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी गेलो होतो सोलापुरला. पहिलीच वेळ सोलापुरला जाण्याची.
डिसेम्बरमध्ये लग्न होत. त्याच्या आधी ८-१५ दिवसामागेच दंगल होउन गेली होती.
त्याचे परिणाम ठिकठिकाणी बाजारपेठेत दिसत होते मोडक्या, अर्धजळक्या दुकाना-टपर्यातुन उदासी सांडली होती. नकळत का होइना त्याचा परिणाम आमच्या मनावर झाला होताच.
अशातच दिसली ही महानगरपालिकेची सुंदर इमारत. प्रसन्न, देखणी आणि सोलापुरातल्या त्यावेळच्या त्या वातावरणाच्या बरोब्बर विरुद्ध प्रसन्नतेचा शिडकाव देणारी. उदासी गेलीच पळुन.
ही इमारत इतकी सुंदर आहे की हिला पळवता आल तर किती बरं असा विचार मनात आलाच.
वाळूची शिल्पं, कार्टुनवाल्या
वाळूची शिल्पं, कार्टुनवाल्या भिंती, इमारत ... फारच सुरेख. तो वाळूचा पाणघोडा अगदी दगडी वाटतोय. सह्हीच आहे.
तो खुर्च्यांचा सेट दादरला पोर्तुगिज चर्चजवळ राहणार्या कोणा ख्रिश्चन बाईने बनवला आहे. पण आता माझ्याजवळ तिचा कॉन्टॅक्ट नंबर नाहीये आणि नंतर ती कुठल्या एक्झिबिशनमध्येही दिसली नाही. इतर कोणाला माहित आहे का?
झकासराव, ही महापालिकेची इमारत
झकासराव, ही महापालिकेची इमारत आहे? विश्वासच बसत नाही. फारच सुंदर आहे.
खरंच झक्या सुरेख आहे सोलापूर
खरंच झक्या सुरेख आहे सोलापूर मनपा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाहवा... विश्वास बसत नाही,
वाहवा... विश्वास बसत नाही, मनपाची इमारत एवढी सुंदर! काय प्रपोर्शनमधे आहे ही!
सोलापूर महानगरपालिकेची इमारत
सोलापूर महानगरपालिकेची इमारत फारच छान आहे. माझ्यासाठी अजून विशेष आहे कारण तिथलं फर्निचरचं काम माझ्या वडिलांनी केलं आहे :).
वॉव, अंजली. किती छान. इतक्या
वॉव, अंजली. किती छान. इतक्या सुंदर वास्तुशी अगदी घनिष्ठ संबंध आहे की तुमचा.
--
--
पाटील, मस्त आहेत चित्रं.
पाटील, मस्त आहेत चित्रं. तुमच्याकडून चित्रांचं विवेचन ऐकायला आवडेल. जमलं तर जरूर लिहा.
पाटिल, अप्रतिम पेंटिग्ज आणि
पाटिल, अप्रतिम पेंटिग्ज आणि स्केच.
ग्लेशियर नॅशनल पार्कमधील आमचं टेंपररी घर अतिशय सुरेख सजवलेलं होतं. त्यातली ही खिडकी. याला खिडकी का म्हणावं? एक निसर्गचित्रच होतं ते. इतका सुंदर परीसर आणि तो दाखवण्याकरता अशी मोठी खिडकी. किती कल्पकता!
त्याच घरातल्या भिंतीवर हे दोन सुरेखसे वॉलहँगिग होते. दोन्ही तिथल्या संस्कृतीची ओळख करून देणारे. कवट्या जरी खोट्या असल्या, तरी अशा कवट्या (त्याही गुलाबी रंगात!) करून ठेवण्यामागची आयडिया मला भारीच आवडली.
पाटील, फारच सुरेख पेंटिंग्ज
पाटील, फारच सुरेख पेंटिंग्ज बघायला मिळाली तुमच्यामुळे. तिनही ग्रेटच.
मामे, अगं खिडकी आहे का देखावा चिकटवला आहेस अशी शंका यावी इतका सुरेख परिसर आहे बाहेरचा. Amazingly beautiful !
मामी मस्त कल्पना आहे
मामी मस्त कल्पना आहे धाग्याची. ते केयॉन्सच पेंटिग खुप आवडल. मुलीचे अर्धवट वापरलेले क्रेयॉन्स वापरून काही करता येत का बघिन.
इग्लु , रिसायकलिंग डिस्प्ले , वाळूची शिप्ले अमेझिंग आहेत. पाटिल जबरी पेंटिग्ज. वारली पेंटिग पण आवडले.
नविन घर घेतल तेव्हा बिल्डर एक्स्ट्रा मोल्डिंगचे तुकडे गराजमध्ये ठेवून गेलेला. ते कापून त्यापासून हा रिसायक्ल्ड सनबर्स्ट मिरर तयार केला.
मस्तच आयडिया केलीस सीमा. आरसा
मस्तच आयडिया केलीस सीमा. आरसा फारच झक्कास दिसतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सीमा, भारीच की. कसा केलास ते
सीमा, भारीच की. कसा केलास ते सांग की.
<<<<<<<हे एक वेगळाच प्रसंग
<<<<<<<हे एक वेगळाच प्रसंग दाखवणारं वारली पेंटिंग :.>>>>>>
मामी, सुंदर पेन्टींग....
ह्या चित्राबद्दल अधिक माहिती सांगू शकाल का?....
just कुतुहल म्हणून विचारतेय...
कालच टिव्हीवर 'हिमालया' वर एक documentary पाहिली. त्यात अशीच उंच कड्याला लटकलेली मधाची पोळी ,तेथील स्थानिक लोकं अश्याच पद्धतीने काढताना दाखवत होते...मात्र त्यांनी मधमाशांपासून संरक्षण म्हणून संपूर्ण अंग, अगदी डोक्यापासून झाकणारा पोषाख घातला होता....इथे मात्र तसे काही दिसत नाही, वारली लोकं हे काम कसे करत असतील?..
अशा पद्धतीने काढलेले हे मध मात्र अतिशय उत्कृष्ट आणि महागही असते.
छान धागा लंडन, २००७ सप्टेंबर
छान धागा
लंडन, २००७ सप्टेंबर
झेन गार्डन मधील एक रचना
झेन गार्डन मधील एक रचना (क्योतो, २००८ जुलै)
ते लंडनचं भारी आहे आश्चिग.
ते लंडनचं भारी आहे आश्चिग.
पाटील, खुप सुंदर पेंटिंग्ज
पाटील, खुप सुंदर पेंटिंग्ज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी देखावा एकदम पेंटिंग के माफिकच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सीमा, मिररची कल्पना भारीच
आमचं नविन घर बांधल तेव्हा मी काही मटेरिअल गोळा करुन ठेवलं होतं स्कल्प्चर बनवायला. नवरोबांनी एक दिवस गराज आवरताना सगळं उचलल आणि कचर्यात
लंडन पण मस्तच!
लंडन झक्कास. जमिनीत
लंडन झक्कास. जमिनीत ('पाण्यात' ला समांतर शब्द) पोहणारा माणूस ही कल्पनाच काय ग्रेट आहे. जमिनीवर तरंग उठलेलेही दाखवलेत. सलाम!!!
>>>>> मामी, सुंदर पेन्टींग....
ह्या चित्राबद्दल अधिक माहिती सांगू शकाल का?.... >>>>> काया, हे लवासामधल्या एका हॉटेलातलं चित्रं आहे. बघितल्याक्षणीच फार आवडलं आणि फोटो काढला. पण यात काय प्रसंग चितारला आहे याबद्दल काही कल्पना नाही. तु म्हणतेस तसं काही असू शकतं.
आश्चिगचे फोटो काही मला दिसत
आश्चिगचे फोटो काही मला दिसत नाहीत कधीच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहुतेक त्याच्या पोस्ट मला कळाल्यावरच दिसतील.
सर्वच उत्तम फोटो येत आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोलापुर महानगरपालिकेच कामकाज वरच्या इमारतीत न होता बाजुला एक इमारत आहे त्यात होत असेल म्हणुन ही बिल्डिन्ग अजुन चांगली मेन्टेन होत असेल. (अर्थात हे बहुद्धा. कारण मला पक्क माहीती नाहिये. कुण्या सोलापुरकराने ह्यावर प्रकाश पाडावा. :))
महशिवरात्री निमित्त केलेला
महशिवरात्री निमित्त केलेला बर्फाचा महादेव्..![mahashivaratr.. 013.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u30320/mahashivaratr..%20013.JPG)
Pages