पाऊस
'पाऊस' त्याच्यासाठी कोसळतो,
तिच्यासाठी बागडतो
त्या दोघांच्याही विश्वात
तो वेगवेगळा बरसतो
'पाऊस' म्हणलं की तिला आठवतात
त्यांच्या चोरून झालेल्या गाठीभेटी
त्याच्या प्रत्येक अबोल प्रश्नांची
असलेली उत्तरं तिच्या ओठी
त्याला मात्र आठवतात
रंगलेल्या फूटबॉल matches
अन् भज्यांसोबत जीरवलेले
बंक केलेले college classes
तिला आठवतं याच पावसात
त्यांनी पहिल्यांदा propose केलेलं
त्याला आठवत याच पावसामुळे
तिन उत्तरं देण टाळलेलं
तिला आठवतो तो गारवा
पहिल्या भेटीत जाणवलेला
त्याला आठवत त्याच्याच नंतर
तिच्या अंगी ताप भरलेला
तिला आठवते bike drive
याच पावसात केलेली
त्याला मात्र तीच भाबडं रूप
जेंव्हा चुकून ती त्याला बिलगलेली
तिला आठवते बागेची सफर
अन अचानक आलेला पाऊस
त्यानं केलेलं आर्जव
"प्रिये नको ना गं जाऊस"
त्याला मात्र आठवतं
तीच नेहमीच उशिरा येणं
अन कोसळणाऱ्या पावसामुळे
लवकर घरी जाणं
तिला आठवतं त्याचं प्रेम
याच पावसानी अनुभवलेलं
त्याला मात्र तीच रूप
जे पावसानेही न्याहाळलेलं
तिला फार आवडतात
पावसाचे तुषार झेलायला
त्याला बिलकुल चालत नाही
तिला पाऊस ही स्पर्शलेला
त्याला पाऊस का नाही आवडत
हे आताशा कुठे तिला कळायला लागलाय
आधी पडणार हे कोड
आताशा कुठे सुटायला लागलाय
तिला पाऊस आवडतो
म्हणून त्याला आवडत नाही
तिला आणखी कोणी हे अस आवडणं
हेच त्याला पटत नाही
पाऊस येतो आणि जातो
कित्येकवेळा हे असचं होतं
पण प्रत्येक पावसात त्याचं प्रेम
आणखीनच गहिरं होतं
आताशा कुठे त्याला ही
पाऊस थोडा आवडायला लागलाय
कारण त्यांच्या प्रेमाला
नेहमी तोच साक्षी राहिलाय
पण आताशा कुठं तिलाही
पाऊस नाही आवडत
कारण त्याला आणखी कोणी हे अस आवडण
हे तिलाही आता नाही पटत
* टीप : कविता जुनीच आहे..माबोकरांसाठी नव्याने पुन्हा एकदा
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस
क्लासिक !!
क्लासिक !!
अगदी सौमित्र टच आहे तुझ्या
अगदी सौमित्र टच आहे तुझ्या कवितेत...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तरीही स्वतंत्र आणि सुरेख..
वॉव्...........सुरेख......
वॉव्...........सुरेख......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण त्याला आणखी कोणी हे अस आवडण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे तिलाही आता नाही पटत>>>>>>>>> हे तर मस्तच......
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभार ऑल्स
अभार ऑल्स
रीया मस्त
रीया मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठांकु
छानै...!
छानै...!
छान आहे सारीकाला अनुमोदन.
छान आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सारीकाला अनुमोदन.
खुपच गोड कविता आहे. कॉलेजचे
खुपच गोड कविता आहे. कॉलेजचे दिवस आठवुन दिलेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आशय पण फारच लांबल्याने
छान आशय पण फारच लांबल्याने आशयातील गंमत अनुभवता आली नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद ऑल्स..... कौतुक : कस
धन्यवाद ऑल्स.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कौतुक : कस आहे स्वतःचा अनुभव असल्याने कुठे थांबु कळतच नव्हत...तरी बरच काही ड्रॉप केल
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यु अंजु
धन्यु अंजु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी सौमित्र टच आहे तुझ्या
अगदी सौमित्र टच आहे तुझ्या कवितेत...
काय म्हणता ! असेल असेल. आपला आयक्यु कमीच आहे तसही. पण फेसबूकासारख्या सायटींवर असंख्य लाइक्स घ्यायच पोटेन्शिअल मात्र नक्की आहे ह्यात.
बन्ड्या : फेबु वर मिळतिल रे
बन्ड्या : फेबु वर मिळतिल रे लाईक्स...खरी दाद तेंव्हा जेंव्हा इथे लाईक्स मिळतिल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण इथे सगळे मुरलेले आहेत्..त्यांना कविता अवडली तर सार्थक
कारण इथे सगळे मुरलेले
कारण इथे सगळे मुरलेले आहेत्..त्यांना कविता अवडली तर सार्थक स्मित
निष्कारण भ्रमात राहु नका. विवेक जागृत ठेवुन आपली निर्मिती आधी आपल्याला स्वत:ला आवडली पाहिजे. तरच ती इतरांना आवडते. हे मत जनरल. वरील कवितेबद्दल नाही. आणि वैयक्तिकही घेउ नये.
" माझं गाणं मला आवडतं तेव्हांच ते इतरांना आवडतं." - स्व. कुमार गंधर्व.
खुप सुंदर रिया!!! भावली
खुप सुंदर रिया!!! भावली कविता!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निष्कारण भ्रमात राहु नका.
निष्कारण भ्रमात राहु नका. विवेक जागृत ठेवुन आपली निर्मिती आधी आपल्याला स्वत:ला आवडली पाहिजे. तरच ती इतरांना आवडते.
>>>>
मला तर आवडतेच्.....पण मी इतरांना पण आवडायला हवी अस म्हणतेय्..आणि त्यात ज्यांना कवितेतल कळत त्यांना आवडली तर दुधात साखर ...काय???
धन्यु आर्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी सौमित्र टच >>> अगदी
अगदी सौमित्र टच >>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी अगदी.
खूप गोड कविता. आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कविता सह्हीच आहे. सौमित्रचा
कविता सह्हीच आहे. सौमित्रचा प्रभाव जाणतोय खरा.
पण ही उन्हाळ्यात का पोस्टलीय? पावसाच्या दिवसात ही कविता वाचायला आणखी बहार आली असती.
छान सौमित्रासारखी गाऊनही
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सौमित्रासारखी गाऊनही बघितली गारवा ट्रॅकमधे
निंबुडा,अमित,शुभांगी : लाख्
निंबुडा,अमित,शुभांगी : लाख् लाख आभार'
पण ही उन्हाळ्यात का पोस्टलीय? पावसाच्या दिवसात ही कविता वाचायला आणखी बहार आली असती.>>>>>>>
उन्हाळा सुखद व्हावा ह्या इच्छेने :)..झाला का???
कौतुक +१
कौतुक +१
आवडली
आवडली
dhanyu kishya
dhanyu kishya![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)