निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
आरे वा जागु ६ वा भाग सुरु आणि
आरे वा जागु ६ वा भाग सुरु आणि येवढ्या पोस्ट पण. अभीनंदन.
"कमळाबाई">
अभीनंदन साधना. मस्त आयडिया दिलीस कमळ लावायची.
थायलंडला बराचश्या घराबाहेर कमळ पाहिलेलीत.
शशांक असेच लिहत रहा. साधना
शशांक असेच लिहत रहा.
साधना तुझे कमळ पाहिल्यापासून मला कधी एकदा कमळ आणुन लावते अस झाल आहे.
लाव गं. तुझ्या घरासमोर
लाव गं. तुझ्या घरासमोर विहिरीच्या बाजुला एक लहानशी पुष्करणी करुन घे. जास्त खोलही नको अशी (उगीच मुलांना भीती) तिथे लाव.
पनामा च्या भाजी बाजारात
पनामा च्या भाजी बाजारात मिळालेल्या या हालापिन्यो मिर्च्या...स्स्स... तिख्खट असतात पण फ्लेवर आणी दिसायला अतिशय सुरेख..
मिरच्याप्रेमींच्या आवडत्या!!!!
अग माझ्याकडे दोन मोठी भाडी
अग माझ्याकडे दोन मोठी भाडी आहेत. त्यात लावायचा विचार करते.
हा आमच्याकडचा साप
साऊथ अमेरिकेतील अतिशय लाडकी
साऊथ अमेरिकेतील अतिशय लाडकी फळभाजी अवाकाडो. कोलेस्ट्रॉल फ्री हे गुणी फळ तिकडे विविध शेक्स,सॅलड्स् मधील अविभाज्य अंग आहे.
वर्षू मिरच्या मस्तच आहेत. ही
वर्षू मिरच्या मस्तच आहेत. ही भाजी मला आधीपेरूच वाटले लांबट.
जागुले..'आमच्या कडचा' म्हंजे
जागुले..'आमच्या कडचा' म्हंजे गं काय????? पाळलायेस कि काय??
आणी ते कबुतर(कि कोणता पक्षीये??) किती आरामात न भिता बसलंय ..
वर्षू अग हा आमच्या परीसरात
वर्षू अग हा आमच्या परीसरात वावरत असतो. महिन्यातुन एकदा तरी आम्हाला दर्शन देतो. हा बाहेर आल्याची सुचना साळूंख्या आणि कावळे देतात. साळूंख्यांना भिती असते की त्यांची अंडी, पिल्ले हा खाऊन टाकेल म्हणून त्या कर्कश्य ओरडतात. ५-६ साळूंख्यांच्या जोडीला एक दोन कावळेही कर्कश्य ओरडतात ओरडतच ह्याचा पाठलाग करतात. साळूंख्या तर ह्याच्या डोक्यावर टोची मारतात. ह्या साळूंख्यांना घाबरत साप कुठेतरी जाऊन लपुन बसतो. फोटोमध्ये कावळा आहे.
वर्षू, या मिरच्या खाता तूम्ही
वर्षू, या मिरच्या खाता तूम्ही ? मला तर बोट सुद्धा लावता येत नाही. नायजेरियात याच खातात. त्यांचे पेपे (पेपर) सूप करतात तिथे. अवाकाडोची झाडे तर आमच्याकडे कोपर्याकोपर्यावर आहेत.
शशांक, साधारण बिळात घुसणारे साप गोल तोंडाचे. (बिळात घुसणे सोपे) झाडावर राहणारे (गवत्या साप,) टोकेरी तोंडाचे त्यामूळे फांद्यातून मार्ग काढणे सोपे जाते. तर सुक्या पाल्यापाचोळ्यात लपून राहणारे त्रिकोणी तोंडाचे. त्यामूळे ते तिथे सहज लपून राहतात.
अजून दोनच पाने वाचून झाली, पण काही मजेशीर माहिती मिळाली. सापाचे पिल्लू अंड्यात असताना, त्याला समोरच्या बाजूस आणखी एक दात असतो. (चोचीसारखा) त्याच्या मदतने तो अंडे फोडतो. पुढच्या जीवनात त्या दाताचा काहीच वापर होत नसल्याने, तो दात लगेच गळून पडतो. पण तोंडाच्या समोरच्या बाजूने एक फट राहते. त्या फटीतूनच तो जिभ बाहेर काढून वातावरणाचा अंदाज घेतो.
दिनेश दा.. आम्हा सर्वांच्या
दिनेश दा.. आम्हा सर्वांच्या भारी लाडक्या आहेत या मिर्च्या... लेकीकडे एक भली मोठी बरणी भरून इन्डोनेशिअन' सांबल' (म्हणजे आपल्या खर्ड्यासारखा प्रकार) करून आलेय..
माझ्याकडे तर रेग्युलर आहेत या मिर्च्या...
सापाबद्दल रंजक माहिती कळली..
काही साप अंडी घालतात तर काही
काही साप अंडी घालतात तर काही थेट पिल्लांना जन्म देतात. हेही विस्कटुन सांगा कोणी (गुगल कोण बघेल????)
शोभा, तु टाकलेले फुलझाड कोणते??
अवोकॅडो मला गोव्याला दिसलेले पण घ्यायचा धीर केला नाही
पुढच्या निसर्ग गटगला
पुढच्या निसर्ग गटगला प्रत्येकाने किमान १ फुल, झाड किंवा निसर्गाशी संबंधित एखाद गिफ्ट घेऊन यायचे म्हणजे जितकी माणसे असतील तितकी गिफ्ट्स असतील आणि मग ती चिठ्या पाडून प्रत्येकी १ अशी वाटून घ्यायची.. परत जाताना आठवण म्हणून छान वाटतील>> व्वा व्वा मस्त आयडीयाची कल्पना आहे.
८ दिवसांनी भिशी आहे माझ्या कडे तेव्हा हि आयडीया राबवते....
साधना, हे पुस्तक मुद्दाम
साधना, हे पुस्तक मुद्दाम गावातल्या लोकांना भेट देण्यासारखे आहे. (पण ते लोक हे पुस्तक, घरात ठेवतील का अशी शंका आहे. काळोख पडल्यावर तर आपल्याकडे सापाचे नाव देखील घेत नाहीत. जणु तो लगेच हजर होणार असतो. पण भिती काही अगदीच अनाठायी पण नाही. तिथे कधीही साप निघू शकतात.)
वर्शू, संबल मी माझ्या
वर्शू, संबल मी माझ्या श्रीलंकन मित्राकडे खाल्ले होते, पण माझ्यासाठि का ते माहित नाही, त्यात त्यांनी भरपूर नारळ घातला होता. (माझे तिखटाबाबतचे नखरे सगळ्यांना माहित आहेत.)
<<<जागुले..'आमच्या कडचा'
<<<जागुले..'आमच्या कडचा' म्हंजे गं काय????? पाळलायेस कि काय??>>> अगदि हेच विचार माझ्या मनात आले होते.
दिनेशदा, सापाबद्द्ल ही नवीनच माहिती मिळाली.
वर्षू, दोन्ही फोटो मस्त!
हे ओळखा बरं काय आहे ?
हे ओळखा बरं काय आहे ?
दिनेश दा.. साऊथ ईस्टर्न
दिनेश दा.. साऊथ ईस्टर्न देशांत 'सांबल' अगदी रोजच्या जेवणात वापरला जाणारा प्रकार आहे
इंडोनेशिया मात्र नारळ वापरत नाहीत 'सांबल' मधे.. हा श्रीलंकी प्रकार दिस्तोय..
प्रज्ञा.. धन्स.. हे अंड्यावर स्केच पेन ने काढलेय कि काय??
प्रज्ञा, हा फुगा आहे.
प्रज्ञा, हा फुगा आहे.
प्रज्ञा तो फुगा आहे ना ?
प्रज्ञा तो फुगा आहे ना ?
प्रज्ञाचे बोट आहे का, ते
प्रज्ञाचे बोट आहे का, ते ?
वर्षू, श्रीलंकेत अगदी नियमितपणे ब्रम्हीचा पाला जेवणात खातात. तोही खोबरेल तेलात परतून. त्यांच्याकडे सगळ्यातच फार नारळ वापरतात. मसाले पण भरपूर.
माझ्या मित्राच्या घरी, ऑकलंडला पण त्याने ब्रम्हीचा पाला लावलाय.
नाही तो फुगाच आहे अस मला वाटत
नाही तो फुगाच आहे अस मला वाटत आणि तो पडद्याला लावला आहे.
मला तर फुगा कार्पेट वर ठेवलाय
मला तर फुगा कार्पेट वर ठेवलाय असे वाटतंय..
द्राक्ष तर नाही वेगळ्या
द्राक्ष तर नाही वेगळ्या रंगाचं?
म्हणजे मेजॉरीटी फुग्याची. पण
म्हणजे मेजॉरीटी फुग्याची. पण कारपेट की पडदा?
(No subject)
फुगा (बदलली मी टीम ) आणी
फुगा (बदलली मी टीम ) आणी कार्पेट
सर्वप्रथम आशुतोषला मागे
सर्वप्रथम आशुतोषला मागे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे 'जाहीर माफी!!'...... कैर्यांचे फोटो? काय हे?कुफेहेपा?
दिनेशदा, कमळांचा फोटो खास.
जागू, हादगापण उष्णच असतो. सापाचा फोटो किती अंतरावरून घेतलास ते सांग आधी.
वर्षूतै.. मिर्च्या बघून तोंपासू आणि हाय हाय दोन्ही झालं...
प्रज्ञा, मलापण तो फुगाच वाटतोय. पण आता उगाच फुकाचे गुपित ठेऊ नकोस.
धन्स शांकली.
धन्स शांकली.
फुगाच आहे - ज्या बाजूला
फुगाच आहे - ज्या बाजूला रंगवलाय त्याच्या विरुद्ध बाजुला कशावर तरी घासल्यामुळे त्याच्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होऊन त्या सनमायका / फॉर्मायकावर चिकटून बसलाय.
Pages