महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34

नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत

दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल

युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना

कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती

ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व >>> सलमान चालेल की,
घट्त्कोच - द ग्रेट खली
रामपाल यादव ला पण काहीतरी काम द्याच Happy
क्रुष्ण कोण बर ?

Lol .. Draupadi :,vidya balan , itar Bollywood madhla public mahabharat madhe fit honarach nahi !

रणवीर, इम्रान == नकुल सहदेव
प्रियांका - सुभद्रा (आजच्या जमान्यातही खात्यापित्या घरची दिसते.)
करिना= द्रौपदी (जास्त पन्न्याची साडी लागेल)
कतरीना = उत्तरा (आयटम साँगची गरज आहे म्हणून)

द्रौपदी कृष्णा (सावळी) होती आणि केसही लांबसडक होते, त्यामुळे विद्याच.
आरक्षण पाहिल्यावर मनोज वाजपेयी युधिष्टिरापेक्षा दुर्योधन म्हणून शोभेल असे वाटतेय.

कृष्ण = अमिर खान

युधिष्ठर = अक्षय कुमार

कर्ण = शाहरुख खान

अर्जुन = ह्रितीक रोशन

भीम = सनी देओल

नकुल = इम्रान खान

सहदेव = रणबिर कपुर

भीष्म = संजय दत्त

द्रोणाचार्य = अनिल कपुर

धुतराष्ट्र = धर्मेंद्र

गांधारी = रत्ना पाठक शहा

कुंती = शबाना आझमी

पांचाली = कतरिना कैफ

दुर्योधन = अजय देवगण

दु:शासन = अतुल कुलकर्णी

एकलव्य = सैफ अली खान

अभिमन्यु = शाहिद कपुर

अश्वथामा = विवेक ऑबेरोय

शकुनी = अक्षय खन्ना

शुक्राचार्य = सुनिल शेट्टी

जशी अजुन आठवेल तशी टाकत जाईल Happy

माझा आपला मराठी बाणा -
संजय - मोहन जोशी;
भीष्माचार्य - दिलीप प्रभावळकर;
भीम - जयवंत वाडकर ;
कृष्ण - नितीश भारद्वाज [ दूसरा कोण ? ];
कर्ण - डॉ. कोल्हे;
शकूनी - वैभव मांगले;
सुचलं तर आणखीनही सुचवीन !

भीष्म = संजय दत्त

द्रोणाचार्य = अनिल कपुर

धुतराष्ट्र = धर्मेंद्र

<<<< या चॉइसेस ला आणि ऑलमोस्ट पूर्णच पोस्ट ला Rofl

बरोबर भरत,
अन ते कुन्तीचेही जरा बघा, शबानाआझमी काय? कैच्याकैच. तिला हव तर गान्धारी बनवा. Proud
कुन्तीवरही आधीच खुप आघात झालेत, अजुन हा आणखी नको!

>>>>>>>>>>भीष्म = संजय दत्त <<<< ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
नको. त्यापेक्षा सन्जयदत्त ला "अश्वत्थाम्याचा" रोल द्या!

त्यापेक्षा सन्जयदत्त ला "अश्वत्थाम्याचा" रोल द्या! >>>>>>>> अरे त्या अश्व त्थाम्याचे वय काय संजय दत्त चे वय काय ?

काय लिंबु भाउ कै च्या कै Happy

शाहरुख ला विरोध का ?

मी त्याचे स्वदेश , चक दे इंडिया, डर, क-खु-क-ग इत्यादी चांगल्या चित्रपटातले काम बघुन कर्ण दिला आहे... त्याला चांगल्या सशक्त भुमिका दिल्या तर तो त्याचे नक्कीच सोने करतो..

Happy

<< भाऊ, भीम म्हणून अजय पूरकर शोभेल >> 'वझलवार', 'बुधकर' व आतां डायरेक्ट 'भीम' ! नॉट बॅड, नव्हे, खरंच व्हेरी गुड !!! Wink

अरे तस नै रे उदयभौ, युगानुयुगेच्या चिरन्जीवपदामुळे झोप न झाल्याने कण्टाळलेला अन कपाळावरील जखमेमुळे भन्जाळलेला, सदानकदाच्या "वन्चित/उपेक्षित" भुमिकेतील तारवटलेल्या डोळ्यान्चा अश्वत्थामा साजरा करायला दुसरा कोण भेटणार? Proud

दूरदर्शनच्या महाभारतात बी आर चोप्रांना अर्जुन- द्रौपदी म्हणून विनोद खन्ना- डिंपल हवे होते म्हणे.
इथे अक्षय खन्नाला एकजण अर्जुन तर एक चक्क शकुनी म्हणून कास्ट करतोय. गालफडं बसलेला अर्जुन नको, पण तरीही अक्षय खन्ना शकुनी ?
धर्म -> अजय देवगन (खरं तर तो धर्म, भीम, अर्जुन काहीही छान करेल)
कर्ण हा इतर पांडवांपेक्षा देखणा,तेजस्वी असावा (सूर्यपुत्र ना?) म्हणून हृतिक. आता त्याच्यासमोर अर्जुन म्हणून टॉम क्रुझच हवा मग.

कर्ण हा इतर पांडवांपेक्षा देखणा,तेजस्वी असावा (सूर्यपुत्र ना?) म्हणून हृतिक. >>>>>>>>>>>>>>>>>> ह्म्म्म्म्म, ही बाजू ध्यानातच नाही आली.

<< कर्ण हा इतर पांडवांपेक्षा देखणा,तेजस्वी असावा (सूर्यपुत्र ना?) म्हणून हृतिक. >> पण जाहिराती/ सिनेमांमधे दाखवतात तसा त्याला उघडा नाही ना दाखवतां येणार ! कर्णाचीं 'कवच-कुंडलं' हा मोठा अडथळा होईल ना !!! Wink

कर्णाचीं 'कवच-कुंडलं >> त्याचे कातडेच आहे ना हे ? फक्त कवचा सारखे ओबडधोबड होते ते म्हणुन कवच कुंडल प्रसिध्द आहे ते.... बरोबर ना ?

आवाजाचे काय रितिक च्या. कर्ण म्हणुन शोभेल का तो आवाज >> अकबर म्हणुन आवाज चांगला वाटलेला की, कदाचित इथेही वाटेल.

शाहरुख ला विरोध का ?>> कर्णावर आधीच खूप अन्याय झालाय. आणखी नको. म्हणुन. Happy
कर्ण थोडा उंच देखणा आणि सोनेरी (गोरा) असावा.

कृष्ण - नितीश भारद्वाज [ दूसरा कोण >>>>>>>>>>स्वपनिल जोशी

<<< Rofl
स्वप्निल जोशी कोणीतरी (नंद्याने?) म्हंटल्या प्रमाणे 'झपाटलेला' मधला 'मंतरलेला तात्या विंचु बाहुला' शोभेल फक्त Biggrin

<< दूसरा कोण >>>>>>>>>>स्वपनिल जोशी >> चालेल ! 'लग्नाच्या गोष्टीं'तून उचलून त्याला बाशिंगासकट एकदम अर्जुनाच्या रथावर बसवणं जरा बरं नाही वाटलं ,इतकंच !! Wink

Pages