महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34

नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत

दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल

युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना

कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती

ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कैकेयी महाभारतात कुठे? >> कां ? चांगला रोल जर मिळत असेल तर कां येऊं नये तिने महाभारतात !! इथं उलट अगणित रथ आहेत तिच्यासाठी, चाक तुटलंच तर धरून ठेवायला !! Wink

मान्य , पण माबोवर कोणाला काय रोल देता येईल याचा विचार करताना एक्दम 'कैकेयी' च्या रोलला फिट्ट व्यक्ती आठवली...

खरे तर बिग बी भीष्माच्या रोलमध्ये लोकाना आठवण्याचे कारण म्हनजे डुप्लिकेट बिग बी मुकेश खन्ना त्या रोल मध्ये होता हेच असावे .. मुकेश खन्नाला पाहताना बिग बी सारखा आठवत रहायचा.

दुर्योधनाला मनोज वाजपेयी ला पर्याय नाही. 'राजनीती चा परिणाम असावा ... "आठवा 'करारा जवाब देंगे'

हे अजुन काही
कुंती : रेखा/हेमा मालिनी
भीष्म : बिग बी
धृतराष्ट्र : वन अ‍ॅन्ड ओल्नी ए.के हंगल ( इतना सन्नाट्टा क्युं है भाई Proud )
गांधारी: राखी (डोळे बांधलेत तरी लक्ष वेधून घ्यायला ड्रामेबाज जड जीभ वाली बाईच पाहिजे ).
द्रोणाचार्यः विनोद खन्ना
शकुनी : ऋषी कपुर
युधिष्ठिर : अर्जुन रामपाल (अ‍ॅक्चुअली तो' निर्मल पांडे' शोभला असता, गेला बिचारा..)
भीम : जॉन अब्राहम Proud
अर्जुन : राहुल खन्ना ( अतिशय देखणा + प्रचंड पौराणिक चेहरा आहे त्याचा Happy )
नकुल : कुणाल कपुर ( अजुन एक अति पौराणिक चेहरा.)
सहदेव : शर्मन जोशी
कर्ण : ह्रितिक रोशन
दुर्योधन : सैफ अली खान ( सैफ बेस्ट वाटतो मला तशा निगेटिव्ह शेड साठी.. धूर्त दिसतो एकदम.)
दु:शासन : शाहिद कपुर
अभिमन्यु : रणबीर कपुर
द्रौपदी: विद्या बालन
शिखंडी : अतुल कुलकर्णी ( नटरंग च्या 'नाच्या' रोल मुळे)
कृष्ण : सर्वात हुषार आणि मिष्किल दिसणारा एकच अ‍ॅक्टर 'आमिर खान' .

शाहरुख ला काहीही रोल नको.. द्यायचाच असेल तर 'ओम शांति ओम' मधे जो पहिला रोल आहे न त्याचा एक्स्ट्रॉ अ‍ॅक्टर ची कामं करत असतो, 'भाsssगो' नावाचं एकच वाक्यं मिळतं त्याला, तस कौरवांच्या सैन्यातला एखादा 'भगोडा' कार्टा म्हणून एक्स्ट्रॉ रोल द्या त्याला..

कौरवांच्या सैन्यातला एखादा 'भगोडा' कार्टा म्हणून एक्स्ट्रॉ रोल द्या त्याला..

तीव्र निषेध... Sad

शाहरुख खान म्हणजे महाभारतातला समय... मैं समय हूं.. Happy ( तुम्ही बसा भांडत.. मी बसतो बघत! )

जे. ए. ला दिलाय न लोला, भीमाचा Biggrin

हॉलिवुड मधे वेस्टर्न महाभारत काढलं तर .. ट्रॉय इफेक्ट मुळे कर्ण फक्त ब्रॅड पिट Proud
बाकी मंडळी भरपूर टाकता येतील.
द्रौपदी : अँजलीना
भीष्मः जॉर्ज क्लुनी Proud

>> भीष्मः जॉर्ज क्लुनी
Lol

क्लिंट ईस्टवुड. आणि मॉर्गन फ्रीमन विदुर. अल पचिनो शकुनी. Proud

रसेल क्रो भीमच. एकदम फिट्ट. मग गाय पिअर्स दुर्योधन म्हणून चालेल.
केविन स्पेसी म्हातारा झाला, नाहीतर तो मस्त मिश्किल आणि हुशार दिसला असता कृष्णासाठी.

Joaquin phoenix, Mel Gibson, sean connery, ben kingsley

बाया कमी पडतायत हां..

द्रौपदी चांगली शोधा! जेलो आणि अँजेलीना काय! फिदीफिदी >> द्रौपदी जरा नाजूक पहिजे, एवढी तगडी नको Proud
सावळी हवी असेल तर हॅली बेरी ठिक आहे.

भुंगा, तुम्ही म्हणालात ते मी मॉडिफाईड पद्धतीने मांडले होते व तो इथे पहिला प्रतिसाद होता पण तो उडवला गेला Sad

हॅली बेरी नको.. त्यापेक्षा मग फ्रिडा पिंटोच बरीये फिदीफिदी >> बर, मग तिच्या बरोबर पाहिजे म्हणून देव पटेल ला सहदेव वगैरे बनवून टाकू. हाकानाका.

बेरी, पिन्टो वगैरे फुसक्या आहेत. Penelope घ्या.
एमी अ‍ॅडॅम्स ला पण घ्या. Proud

बाई, ब्लँचेट्साठी रामायण काढावे लागेल. कैकेयी. Proud

पेनोलपी चांगलीये.. मला जुनही अँजलीनाच योग्य वाटते.. जिच्या साठी लढाया होउ शकतात असं सेक्स अपिल अँजलीना कडेच हाये.

Pages