महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34

नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत

दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल

युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना

कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती

ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेटॅन्शिअल आहे सुंदर दिसायचं तिच्यात , देव डी काय, बरेचदा 'माही' बर्‍यापैकी केअरलेस च असते दिसण्या बाबत.. इन फॅक्ट मेन स्ट्रिम अ‍ॅक्ट्रेसेस सारखी 'रिडिक्युलस्ली टोन्ड फिगर- टु मच ग्रुम्ड ' इ. नाही म्हणूनच जे 'कॅरेक्टर' करतेय तशीच वाटते , बाकीच्या बायका ( अगदी कोंकणा सेनाशर्मा सुध्दा) अ‍ॅक्ट्रेस च वाटतात , कॅरॅक्टर पेक्षा.

द्रोपदीच्या रोलसाठी मला चित्रांगदा मोस्ट सुटेबल वाटते. सावळी, सुंदर आणि (लांब नाही पण)छान केस.

चित्रांगदा ..हम्म
तॉ हॉट आहे. पारंपारिक सौंदर्याच्या व्याख्येत नाही बसत. (सुंदर नाही असं नाही ). द्रौपदी ही पारंपारिक भारतिय कल्पनेप्रमाणेच सुंदर दिसायला हवी. माद्री - अमृता राव चालेल. चित्रांगदा मेनका म्हणून सुट होईल..( अर्जुन स्वर्गात जातो तेव्हां भेटते ती उर्वशी कि मेनका ? जिच्या शापामुळे त्याला वर्षभर स्त्री बनून रहावं लागतं )

कैकयी आणि मंथराबद्दल

रामायणाच्या तुलनेत महाभारताला परिपूर्ण ग्रंथ म्हटलं गेलय, मग या संपूर्ण ग्रंथात वरीलपैकी एकही कॅरेक्टर नाही हे कसं शक्य आहे ? आठवा आठवा लोक्स ! शकुनीमामा आहे.. पण स्त्री देखील असणारच.

पारंपारिक सौंदर्याच्या व्याख्येत नाही बसत. >>> किरण अरे माहीपेक्षा चित्रांगदा नक्कीच सुंदर आहे. तु देव डी बघच. माहीचा वरचा फोटो बघुन तु इम्प्रेस झालास, पण त्यात मेकअपचं कौशल्य जास्त आहे. ती फारच स्मार्ट आहे, पण चित्रंगदाएवढी काही सुंदर नाही.

कैकयी आणि मंथराबद्दल >>> या भुमिका द्रोपदीनेच पार पाडल्या ना महाभारतात. कैकयीमुळे रामायण घडलं, तसं द्रोपदीमुळे महाभारत. मी फक्त'कारण' म्हणते आहे.

सावित्री, नल दमयंती ही पण महाभारातातील उपाख्यानेच आहेत... त्यासाठी पण कलाकार लागणार. मेन स्ट्रीम मधले पुरणार नाहीत. केकताबाईंना काँट्रॅक्ट द्यावे लागेल.

श्रीयुत वैभव आयरेंना अतिशय गंभीरपणे अनुमोदन>>>>>>>>>>>> अरे बरोबर आहे तुम्हाला मान्य करावंच लागेल. मी उगाच नाही बोलत, पुरावा आहे माझ्याकडे
हा बघा पुरावा (आणि हसुन मरा) Rofl
Chess.jpg

Pages