Submitted by मनीषा- on 13 February, 2012 - 09:34
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे.
तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ?
माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत
दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो.
कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल
युधिष्टिर - मनोज वाजपेयी
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व
अर्जुन - अक्षय खन्ना
कुंती - शबाना आझमी
ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती
ता. का. हे निव्वळ कल्पनारंजन असल्यामुळे कल्पनाविलासाच्या बाबतीत कंजूसी करू नये ही विनंती
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व
भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व >>> सलमान चालेल की,
घट्त्कोच - द ग्रेट खली
रामपाल यादव ला पण काहीतरी काम द्याच
क्रुष्ण कोण बर ?
Lol .. Draupadi :,vidya balan
Lol .. Draupadi :,vidya balan , itar Bollywood madhla public mahabharat madhe fit honarach nahi !
भिष्मः बिग बि
भिष्मः बिग बि
रणवीर, इम्रान == नकुल
रणवीर, इम्रान == नकुल सहदेव
प्रियांका - सुभद्रा (आजच्या जमान्यातही खात्यापित्या घरची दिसते.)
करिना= द्रौपदी (जास्त पन्न्याची साडी लागेल)
कतरीना = उत्तरा (आयटम साँगची गरज आहे म्हणून)
द्रौपदी कृष्णा (सावळी) होती
द्रौपदी कृष्णा (सावळी) होती आणि केसही लांबसडक होते, त्यामुळे विद्याच.
आरक्षण पाहिल्यावर मनोज वाजपेयी युधिष्टिरापेक्षा दुर्योधन म्हणून शोभेल असे वाटतेय.
ऋतिक रोशन भीमापेक्षा अर्जुन
ऋतिक रोशन भीमापेक्षा अर्जुन म्हणून जास्त शोभेल अस मला वाटतं.
द्रोपदीसाठी विद्या परफेक्ट!!
कृष्ण = अमिर खान युधिष्ठर =
कृष्ण = अमिर खान
युधिष्ठर = अक्षय कुमार
कर्ण = शाहरुख खान
अर्जुन = ह्रितीक रोशन
भीम = सनी देओल
नकुल = इम्रान खान
सहदेव = रणबिर कपुर
भीष्म = संजय दत्त
द्रोणाचार्य = अनिल कपुर
धुतराष्ट्र = धर्मेंद्र
गांधारी = रत्ना पाठक शहा
कुंती = शबाना आझमी
पांचाली = कतरिना कैफ
दुर्योधन = अजय देवगण
दु:शासन = अतुल कुलकर्णी
एकलव्य = सैफ अली खान
अभिमन्यु = शाहिद कपुर
अश्वथामा = विवेक ऑबेरोय
शकुनी = अक्षय खन्ना
शुक्राचार्य = सुनिल शेट्टी
जशी अजुन आठवेल तशी टाकत जाईल
माझा आपला मराठी बाणा - संजय -
माझा आपला मराठी बाणा -
संजय - मोहन जोशी;
भीष्माचार्य - दिलीप प्रभावळकर;
भीम - जयवंत वाडकर ;
कृष्ण - नितीश भारद्वाज [ दूसरा कोण ? ];
कर्ण - डॉ. कोल्हे;
शकूनी - वैभव मांगले;
सुचलं तर आणखीनही सुचवीन !
कर्ण शाहरुख ? कर्णावर आधीच
कर्ण शाहरुख ? कर्णावर आधीच खूप अन्याय झालाय. आणखी नको.
कर्ण म्हणून हृतिक फिट आहे.
अर्जुन म्हणुन रितीक जास्त फिट
अर्जुन म्हणुन रितीक जास्त फिट बसेल... आर्या लोकांसारखा जास्त दिसतो... ग्रीक देवता
भीष्म = संजय दत्त द्रोणाचार्य
भीष्म = संजय दत्त
द्रोणाचार्य = अनिल कपुर
धुतराष्ट्र = धर्मेंद्र
<<<< या चॉइसेस ला आणि ऑलमोस्ट पूर्णच पोस्ट ला
बरोबर भरत, अन ते कुन्तीचेही
बरोबर भरत,
अन ते कुन्तीचेही जरा बघा, शबानाआझमी काय? कैच्याकैच. तिला हव तर गान्धारी बनवा.
कुन्तीवरही आधीच खुप आघात झालेत, अजुन हा आणखी नको!
>>>>>>>>>>भीष्म = संजय दत्त
>>>>>>>>>>भीष्म = संजय दत्त <<<< ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई
नको. त्यापेक्षा सन्जयदत्त ला "अश्वत्थाम्याचा" रोल द्या!
त्यापेक्षा सन्जयदत्त ला
त्यापेक्षा सन्जयदत्त ला "अश्वत्थाम्याचा" रोल द्या! >>>>>>>> अरे त्या अश्व त्थाम्याचे वय काय संजय दत्त चे वय काय ?
काय लिंबु भाउ कै च्या कै
भाऊ, भीम म्हणून अजय पूरकर
भाऊ, भीम म्हणून अजय पूरकर शोभेल
उदय छान, पण कर्ण साठी शारुख
उदय छान, पण कर्ण साठी शारुख नको.
शाहरुख ला विरोध का ? मी
शाहरुख ला विरोध का ?
मी त्याचे स्वदेश , चक दे इंडिया, डर, क-खु-क-ग इत्यादी चांगल्या चित्रपटातले काम बघुन कर्ण दिला आहे... त्याला चांगल्या सशक्त भुमिका दिल्या तर तो त्याचे नक्कीच सोने करतो..
<< भाऊ, भीम म्हणून अजय पूरकर
<< भाऊ, भीम म्हणून अजय पूरकर शोभेल >> 'वझलवार', 'बुधकर' व आतां डायरेक्ट 'भीम' ! नॉट बॅड, नव्हे, खरंच व्हेरी गुड !!!
अरे तस नै रे उदयभौ,
अरे तस नै रे उदयभौ, युगानुयुगेच्या चिरन्जीवपदामुळे झोप न झाल्याने कण्टाळलेला अन कपाळावरील जखमेमुळे भन्जाळलेला, सदानकदाच्या "वन्चित/उपेक्षित" भुमिकेतील तारवटलेल्या डोळ्यान्चा अश्वत्थामा साजरा करायला दुसरा कोण भेटणार?
अनिल कपुर चा मुलगा संजय दत्त
अनिल कपुर चा मुलगा संजय दत्त कसा वाटेल भाउ
दूरदर्शनच्या महाभारतात बी आर
दूरदर्शनच्या महाभारतात बी आर चोप्रांना अर्जुन- द्रौपदी म्हणून विनोद खन्ना- डिंपल हवे होते म्हणे.
इथे अक्षय खन्नाला एकजण अर्जुन तर एक चक्क शकुनी म्हणून कास्ट करतोय. गालफडं बसलेला अर्जुन नको, पण तरीही अक्षय खन्ना शकुनी ?
धर्म -> अजय देवगन (खरं तर तो धर्म, भीम, अर्जुन काहीही छान करेल)
कर्ण हा इतर पांडवांपेक्षा देखणा,तेजस्वी असावा (सूर्यपुत्र ना?) म्हणून हृतिक. आता त्याच्यासमोर अर्जुन म्हणून टॉम क्रुझच हवा मग.
कर्ण हा इतर पांडवांपेक्षा
कर्ण हा इतर पांडवांपेक्षा देखणा,तेजस्वी असावा (सूर्यपुत्र ना?) म्हणून हृतिक. >>>>>>>>>>>>>>>>>> ह्म्म्म्म्म, ही बाजू ध्यानातच नाही आली.
आवाजाचे काय रितिक च्या. कर्ण
आवाजाचे काय रितिक च्या. कर्ण म्हणुन शोभेल का तो आवाज ?
त्यात काय डबिंग करू. कोणता
त्यात काय डबिंग करू. कोणता आरजे हवा सांगा?
<< कर्ण हा इतर पांडवांपेक्षा
<< कर्ण हा इतर पांडवांपेक्षा देखणा,तेजस्वी असावा (सूर्यपुत्र ना?) म्हणून हृतिक. >> पण जाहिराती/ सिनेमांमधे दाखवतात तसा त्याला उघडा नाही ना दाखवतां येणार ! कर्णाचीं 'कवच-कुंडलं' हा मोठा अडथळा होईल ना !!!
कर्णाचीं 'कवच-कुंडलं >>
कर्णाचीं 'कवच-कुंडलं >> त्याचे कातडेच आहे ना हे ? फक्त कवचा सारखे ओबडधोबड होते ते म्हणुन कवच कुंडल प्रसिध्द आहे ते.... बरोबर ना ?
आवाजाचे काय रितिक च्या. कर्ण
आवाजाचे काय रितिक च्या. कर्ण म्हणुन शोभेल का तो आवाज >> अकबर म्हणुन आवाज चांगला वाटलेला की, कदाचित इथेही वाटेल.
शाहरुख ला विरोध का ?>> कर्णावर आधीच खूप अन्याय झालाय. आणखी नको. म्हणुन.
कर्ण थोडा उंच देखणा आणि सोनेरी (गोरा) असावा.
कृष्ण - नितीश भारद्वाज [
कृष्ण - नितीश भारद्वाज [ दूसरा कोण >>>>>>>>>>स्वपनिल जोशी
कृष्ण - नितीश भारद्वाज [
कृष्ण - नितीश भारद्वाज [ दूसरा कोण >>>>>>>>>>स्वपनिल जोशी
<<<

स्वप्निल जोशी कोणीतरी (नंद्याने?) म्हंटल्या प्रमाणे 'झपाटलेला' मधला 'मंतरलेला तात्या विंचु बाहुला' शोभेल फक्त
<< दूसरा कोण
<< दूसरा कोण >>>>>>>>>>स्वपनिल जोशी >> चालेल ! 'लग्नाच्या गोष्टीं'तून उचलून त्याला बाशिंगासकट एकदम अर्जुनाच्या रथावर बसवणं जरा बरं नाही वाटलं ,इतकंच !!
Pages