Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विनार्च, ती अॅड पूर्णपणे
विनार्च, ती अॅड पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. ती वेदांता या कंपनीच्या कोर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबोलीटीची अॅड आहे. आम्ही गरीबाना मदत करून किती चांगले काम करतो हा संदेश आहे त्यामधून. ओरिसामधे आणि एकंदरच त्या कंपनीचे निगेटिव्ह न्युज किती आले आहेत. त्यामुळे ही अॅड बनवली आहे.
एवढेच चांगले काम करत असतील तर या अॅडसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यापेक्षा अजून १०० अंगणवाड्याना मदत करता आली असती.
टॉयलेट क्लीनरच्या जाहिराती तर
टॉयलेट क्लीनरच्या जाहिराती तर कुकरी शोजच्या मध्येही असतात.
अभिषेक बच्चनच्या आयडियाच्या जाहिरातींचा कंटाळा आलाय. नाकाला सुरकुत्या पाडणं आणि सगळी ओव्हरअॅक्टिंग. याच्या पावभाग अभिनय सिनेमात करेल तर?
ओह नंदिनी, असं आहे का? मलाही
ओह नंदिनी, असं आहे का? मलाही ती अॅड छान वाटली होती.
Chevrolet ची त्या सरदारची अॅड मस्त आहे. तसा गाडीशी त्या अॅडचा फार संबंध नाहिये तरी छान वाटते. आईचं काम विद्या सिन्हाने केलंय.
करीश्मा कपुरची नविन जाहिरात
करीश्मा कपुरची नविन जाहिरात बघितली टॉयलेट क्लिनरची...बिचारी कित्ती वाईट दीवस आले तीचे
'बंटी टेस्ट' ची जाहिरात आवडली
'बंटी टेस्ट' ची जाहिरात आवडली एकदम- गोदरेज हेअर डायची आहे.
त्या बाईने शेवटी दिलेले एक्स्प्रेशन्स एक नंबर!
अभिषेक च्या आयडिया वाल्या मला
अभिषेक च्या आयडिया वाल्या मला आवडल्या. तो डबा खात बोटे चाटत बोलतो ती सर्वात.
वेदांत वाली जाहिरात बघायला खूप छान वाटते. नंदिनीने दिलेली ब्याकग्राउंड माहीत नव्हती.
सगळ्या माजी हीरॉइन्सच्या जाहिराती महा बोअर आहे 'मी गृहिणी' वाल्या
माधुरीला अमेरिकेत 'स्माईल' दिसले नाही? नक्की कोणत्या अमेरिकेत राहून आली ती?
अगदी अगदी नंदिनीने बरोबर
अगदी अगदी नंदिनीने बरोबर लिहीले आहे. त्या कंपनीचा ओरिसाच्या नैसर्गिक संपत्तीवर डोळा आहे. सर्व खाण काम करून बाहेर एक्स्पोर्ट करायचे/ विकायचे आहे. ओरिसात उतरलयापासून त्यांच्या जाहिराती मारत असतात. गरीब पब्लिकला एक्स्प्लॉइट करणारे लोक्स आहेत ते. हॉस्पिटल वगैरे पण बनवत आहेत.
युवराज आजारी असल्याची बातमी आली त्याच दिवशी हेल्थ खराब तो टीम से बाहर वाली त्याची इन्स्युअरन्स वाली अॅड आली होती. किती बॅड टेस्ट मध्ये. परत कंपनीचा मार्केटिन्ग व्हीपी म्हणे धिस इज गुड काँट्रोवर्सी आम्ही जाहिरात परत घेणार नाही म्हणे. कुफेहेपा.
अरे ती झलके खुशिया कशाची
अरे ती झलके खुशिया कशाची जाहिरात आहे??
नुसते केस हलवणार्या स्त्रिया/ मुली दिसल्या पण प्रॉडक्ट काय आणि कोणत्या कंपनीच??
बाकी कोकाकोलाची उम्मीदोवाली धुप मस्त आहे.
हिरो मोटोकॉर्प्च्या जाहिरातीमधील रेहमान फॅक्टर मोठा आहे.
माझा संताप संताप होणारी अॅड
माझा संताप संताप होणारी अॅड -
तो मुलगा जिमनॅस्टीक करतोय, पडतोय आणि त्याची आई मख्खासारखी बसून पाहतेय, काय तर म्हणे 'अभी पूरी रात बाकी है'. बहुतेक बॉर्नव्हिटा.
त्या आईच्या कानाखाली दोन ठेवाव्या वाटतात
झक्या झलके खुशियाँ मस्त अॅड
झक्या झलके खुशियाँ मस्त अॅड आहे ना? प्रॉडक्ट जाऊदे (खड्ड्यात)
अरे ती झलके खुशिया कशाची
अरे ती झलके खुशिया कशाची जाहिरात आहे??
नुसते केस हलवणार्या स्त्रिया/ मुली दिसल्या पण प्रॉडक्ट काय आणि कोणत्या कंपनीच??
>> क्लिनिक प्लस ची आहे. माझ्या मुलीची आवडती जाहिरात असल्याने कालंच लक्शपूर्वक पाहिली होती.
कोका कोला ची उम्मिदों वाली
कोका कोला ची उम्मिदों वाली धूप , सनशाईन वाली आशा/ रोने की वजहे कम है, हसने के बहाने ज्यादा काय मस्त जाहिरात आहे... खूप आवडली.
सुपरबॉल-४६ च्या टॉप-१०
सुपरबॉल-४६ च्या टॉप-१० जाहिराती : http://www.superbowl-commercials.org/14261.html
माझी आवडती: #७ आणि #३ (अॅक्युरा एनएसएक्स सकट, एकदम चाबुक गाडी )
ती कुठल्या गाडीची अॅड आहे?
ती कुठल्या गाडीची अॅड आहे? बहुतेक महिन्द्राची आहे कुठलीतरी. त्या एका माणसाला ३-४ बाया जंगलात किडनॅप करतात आणि टबात बसवून शिजवून खाणार असतात वगैरे. कैच्या कैच आहे.
टाटा कॅपिटलची नवीन जाहिरात
टाटा कॅपिटलची नवीन जाहिरात आवडली छोटुकली एकदम सही आहे
http://www.youtube.com/watch?v=QWI3APw11ic
'फेस का जीम' वाली च्युइंग गमची जाहिरात अगदीच बकवास, भिकार, टुकार वाटली
वोडाफोन ची मस्त आहे नविन
वोडाफोन ची मस्त आहे नविन आलेली.....
वोडाफोनच्या सगळ्याच जहिराती
वोडाफोनच्या सगळ्याच जहिराती मस्त असतात. तो 'पग' असलेल्या आणि नंतर झुझुवाल्या पण.
कॅडबरी सिल्कच्या जहिराती मला अगदी किळसवाण्या वाटतात. तो टॉयलेटमधला घाण किडा असलेली कुठली अॅड होती ना तेवढी गलिच्छ वाटते.
आयपीएल ची नविन जाहीरात छान
आयपीएल ची नविन जाहीरात छान आहे, तो एक मासुन मुलांना फळकूट सरकवून आत घेतो ती.
मेन विल् बे मेन वाली ती
मेन विल् बे मेन वाली ती लिफ्ट्मधली जाहिरात मस्तच आहे...तो नाहि का एका कपल साठी लिफ्ट न थाबवता वर जातो अनि मग सुन्दर मुलगि दिसल्यावर तिच्याबरोबर पुन्हा खाली येतो ती..
ती बिट्टू टेस्ट ची जाहिरात
ती बिट्टू टेस्ट ची जाहिरात आमच्या धाकट्याची फार आवडती आहे. ऑरेंज आंटीच्या ऐवजी तो अॅपल आंटी म्हणतो. आणि त्या जाहिरातीचे नाव "अॅपल आंटी" ठेवलयं.
शिल्पा शेट्टीची पँटीनची
शिल्पा शेट्टीची पँटीनची जाहिरात पाहिली का? ती शेव्टी ये म्हणते ते किती बेसुरे आहे. अगदी अंगावर पाल पडल्यावाणी वाट्ते. मी तर म्यूटच करते ती आली की. आता जरा चूप बसून बाळूती शीव असे म्हणावे वाट्ते. हि हि.
"क्योकी शोर ना मचाया तो मजा
"क्योकी शोर ना मचाया तो मजा नहि आया" मन्च ची ननिन अॅड मस्त आहे ... सगळे शोर करण्याचे प्रसन्ग छान आहेत विशेषता शाळेतला
बॉर्नव्हिटाची अॅड- 'अंकल
बॉर्नव्हिटाची अॅड- 'अंकल आपको हिंदी आती है, मुझेभी आती है' लय भारी
'तु मेरा बेस्ट फ्रेंड है
'तु मेरा बेस्ट फ्रेंड है ना'... किती छानेयत त्यातली बाळं... लाईफबॉय पावडरची...
वोडाफोनच्या सातवी- आठवीच्या मुलामुलींना घेऊन केलेली एकही अॅड नाही आवडली...
सॉल्टवाल्या टूथपेस्टच्या सगळ्याच अॅड बकवास म्हणण्या पलिकडच्या...
माधुरीबाईंच्या सगळ्याच अॅड्स बकवास... स्पेशली भांड्यांचा साबण का स्क्रबवाली अॅड...
राहुन राहुन माधुरी नि अमिताभने कॅमेरा सन्यास घ्यावा असे वाटते...
फँटाची 'मचल मचल जाये' वाली
फँटाची 'मचल मचल जाये' वाली अॅनिमेटेड जाहिरात मस्त आहे. तालावर त्या पात्रांच्या हालचाली मस्त दाखवल्या आहेत.
सॉफ्ट ड्रिंक्सच्या
सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहिरातींवर बंदी आली आहे का? पेप्सी, कोकाकोला इ. च्या पूर्वी दर १० मिनिटांनी जाहिराती असायच्या. गेल्या काही महिन्यांपासून एकही जाहिरात दिसली नाही.
सॉफ्ट ड्रिंक्सच्या
सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहिरातींवर बंदी आली आहे का?<< आता जाहिरातींची त्यांना तितकी गरज भासली नसावी, आता आयपीएल बरोबर त्याही चालू होतील
तालावर त्या पात्रांच्या
तालावर त्या पात्रांच्या हालचाली मस्त दाखवल्या आहेत.>> हो तीनही कुत्रे एकाच वेळी उडी मारतात. शिवाय कलर स्कीम पण आल्हाददायक आहे.
मास्तुरे, पेप्सीची चेंज द गेम
मास्तुरे, पेप्सीची चेंज द गेम अॅड पाहिली नाही का? क्रिकेट सोडून फूटबॉल खेळायचा सल्ला देत आहेत ते सध्या.
आयपीएलच्या अॅडला फुल्ल मार्क्स. कार्निव्हल, तमाशा, सर्कस अशा अनेक विसेषणानी आयपीएलची संभावना होतेच. आता तर त्यानी स्वतःहून आपण हेच सर्व काही आहोत हे या अॅडमधून दाखवलाय. आयडीया, एक्झीक्युशन आणि टोटल ट्रीटमेंट एकदम झक्कास. आधीच्या हाणामारी अॅडपेक्षा ही अॅड कैकपटीने चांगली आहे. त्याबद्दल अजून इथे वाचा.
आयडीयाच्या खूनासंदर्भातली अॅड पण चांगली आहे. आयडीयाने कायम एखादी समस्या घेऊन त्यावरून अॅड काढल्या आहेत, याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.
आयपीएल ची नवीन अॅड मस्तच
आयपीएल ची नवीन अॅड मस्तच आहे..
व्होडाफोनच्या लेटेस्ट अॅडस एकदम बकवास... लाडकीला पूर्ण अनुमोदन..
Pages