Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
फ्लिपकार्टच्या लहान मुलांच्या
फ्लिपकार्टच्या लहान मुलांच्या तोंडी मोठ्यांचे संवाद मोठ्यांच्याच आवाजात घातलेल्या अॅड्स मस्त वाटतात. ह्या मुलांनी एक्सप्रेशन्सही छान दिली आहेत.
एअरटेलची नवीन अॅड छान आहे.
एअरटेलची नवीन अॅड छान आहे. पार्कींगमधे गाडीची काच फुटलेली असते, मित्राला पोलीसांना फोन करायला सांगितल्यावर तो म्हणतो ,"मिस कॉल दिया है, वापस फोन करेंगे"
त्या मुलाचे expression छान आहेत. मला आवडली ही जाहिरात.
`वेस्ट साईड' ची अॅड आवड्ली.
`वेस्ट साईड' ची अॅड आवड्ली. म्युझिक छान आहे बॅक्ग्राउंड्ला.
कदाचित मी लिहिलं असेल
कदाचित मी लिहिलं असेल ह्याआधी. Pediasure ची अॅड डोक्यात जाते अगदी. आई समोर चांगला रव्याचा तिखट उपमा ठेवते तर तो लहान मुलगा नाक मुरडतो. मग आई हात हलवते आणि त्यातली निरनिराळी vitamins वगैरे टेबलाच्या वर दिसतात. ती पुन्हा हात हलवते आणि ती सगळी Pediasure मध्ये जातात. मग टेचात ती ते दुधात घालून मुलाला देते. मुलं जेवत नाहीत म्हणून तुम्ही सकाळ-संध्याकाळ नुस्तं Pediasure देणार का त्यांना? किती चुकीचा संदेश जातो ह्यातून. मध्यंतरी लोकसत्ताच्या एका लेखात कॉम्प्लानने उंची वाढते म्हणून दिवसातून अनेक वेळा मुलाला ते भरवून त्याच्या भुकेची, पचनशक्तीची आणि दाताची वाट लावणार्या आईबद्दल एका डॉक्टरनेच लिहिलं होतं.
"हर एक फ्रेंन्ड जरुरी होता
"हर एक फ्रेंन्ड जरुरी होता है"ही अॅड छान आहे.:)
काजोलची नवी पॅम्पर्सची
काजोलची नवी पॅम्पर्सची जाहिरात मस्त आहे. बाळ खूपच गोड आहे ते.
सीनियर मि & मिसेस बच्चन यांची
सीनियर मि & मिसेस बच्चन यांची ती कसलीशी जाहिरात थांबली ते बरीक बरे झाले.
बाकी बच्चन कुटुंबाची परिस्थिती इतकी हलाखीची आहे की सूनबाई काही महिने नव्या जाहिराती करू शकत नसल्याने सासूबाईंना लगेच पदर खोचून कामास उभे रहावे लागले. त्यात आता घरात खाणारे एक तोंड वाढणार.
भरत.
भरत.:हाहा:
पण त्या अभिषेकपेक्षा सिनिअर्स
पण त्या अभिषेकपेक्षा सिनिअर्स कितीतरी उत्तम...
भरत
भरत

कॅटबरी ची नवी अॅड "आय लव यु
कॅटबरी ची नवी अॅड "आय लव यु कब कहा था" मस्तच
... कॅटबरीच्या जवळ जवळ सगळ्याच अॅड मस्त असतात:)
आणखी एक छान अॅडः बासमती तान्दूळाची... फेसबुक पर "मॉम का स्टेट्स "बिर्यानी बना रही है"... मग सगळे मीत्र सुद्धा त्यान्चा प्लॅन कॅन्स ल करुन त्याच्या कडे बिर्यानी खायला जातात
फेस-बुक ची आजीला आजोबा गालावर पप्पी घेऊन नातवा सह पळतात ती अॅड पण सहिच आहे
"हर एक फ्रेंन्ड जरुरी होता है"ही अॅड छान आहे>>> हो
अमुलची अॅड 'म्हारो गाव
अमुलची अॅड 'म्हारो गाव काठापारे' लहानपणापासून आवडते.
म्हारो गाव काठापारे>>>>
म्हारो गाव काठापारे>>>> काठापारे कि काठावाडी???!!!! ... आधी स्मीता पाटिल होत्या ह्यात आता दुसर कोणी तरी आहे पण शेवटी स्मीता पाटीलला दाखवतात... छान आहे हि पण अॅड
अरे मॅगी ची नवी अॅड पण छान आहे... "हर कोई इसे मेरी मॅगी..." डिस्क्रीपटीव्ह अॅड छान जमलीय
मला तर ती 'जलेएएबीइइइइ' वली
मला तर ती 'जलेएएबीइइइइ' वली अॅड फार आवडते (आवडायची)
म्हारो गाव काठापारे>>>>
म्हारो गाव काठापारे>>>> काठापारे कि काठावाडी???!!!! ... आधी स्मीता पाटिल होत्या ह्यात आता दुसर कोणी तरी आहे पण शेवटी स्मीता पाटीलला दाखवतात... छान आहे हि पण अॅड
अरे मॅगी ची नवी अॅड पण छान आहे... "हर कोई इसे मेरी मॅगी..." डिस्क्रीपटीव्ह अॅड छान जमलीय
अमुलचीच 'जरासी हसी दुलार
अमुलचीच 'जरासी हसी दुलार जरासा..' अशी अॅड होती ना?
@ स्निग्धा, अमुलचीच 'जरासी
@ स्निग्धा, अमुलचीच 'जरासी हसी दुलार जरासा..' अशी अॅड होती ना? >>> हो, छान होती हि अॅड पण!!!
त्यातली ती बटर रॅप केलेला
त्यातली ती बटर रॅप केलेला कागद चाटणारी मुलगी खुप आवडायची.
मॅगीच्या नविन जाहिरातीत दोन
मॅगीच्या नविन जाहिरातीत दोन भावंडांमध्ये चक्क "तुम्हे तो हम dustbin से उठाके लाये थे" असा संवाद दाखवीला आहे..
आज सकाळी रेडिओवर ऐकलेली
आज सकाळी रेडिओवर ऐकलेली अॅड

बाई - या भावजी चहा करते
भाऊजी - चहाच राहुदे बाजुला वहिनी. तुमच घर इतक कशाने चमकतय ते सांगा?
बाई - अहो भाऊजी कालच समृद्धी स्टीलची भांडी खरेदी केलीत
मला पण मॅगीची नविन अॅड खूप
मला पण मॅगीची नविन अॅड खूप आवडली. माझ्या घरात सतत भांडणारे दोघे असल्या मुळे अगदी घरातलीच वाटली. आई माझ्यावर जास्त प्रेम करते हे सिद्ध करायचा एकही चांस दोघे सोडत नाहित.
अमूलची नविन अॅड पण सुपर्ब आहे. त्यात खुश रहे तेरे बेटा बेटी वाली ओळ तर लाईच भारी. खूप खूप आवडली अॅड आणि शेवटी स्मिता पाटिल पण!
<<मला पहिल्यांदा चूकून "वो
<<मला पहिल्यांदा चूकून "वो बाबूजी" असं ऐकायला आलं >>
मारुति सुझुकी ची- "पर ये देता
मारुति सुझुकी ची- "पर ये देता कितनी है" अॅड खूपंच छान...
अमूलची नविन अॅड मस्तच आहे.
अमूलची नविन अॅड मस्तच आहे. जिंगलची ट्युन तीच ठेवून नविन रीफ्रेशिंग व्हिज्युअल्स. त्यातही पीसीवर बसलेली बाई, मोबाईलने फोटो काढत असलेली मुलगी. हे जास्त परिणामकारक व्हिज्युअल्स. शेवटी स्मिता पाटीलचा एकच शॉट दाखवून जबरदस्त नॉस्टॅल्जिक परिणाम साधलाय. म्हारे घर कंगन लक्ष्मी के बाजे.
टाटा टी ची नविन "देश उबल रहा
टाटा टी ची नविन "देश उबल रहा है, अब रंग भी बदलेगा" जाहिरात अप्रतीम. प्रत्येक वेळेस ती जाहिरात पाहिल्यावर तोंडातून "तथास्तु" निघून जातं.
जागो रे....
अक्षरी, अनुमोदन.
अक्षरी, अनुमोदन.
टाटा टी ची नविन "देश उबल रहा
टाटा टी ची नविन "देश उबल रहा है, अब रंग भी बदलेगा" जाहिरात अप्रतीम. प्रत्येक वेळेस ती जाहिरात पाहिल्यावर तोंडातून "तथास्तु" निघून जातं.<<<
अगदी अगदी...
कसले भाबडे असतो ना आपण!!
फॉर्च्युन कुकींग ऑईलची
फॉर्च्युन कुकींग ऑईलची जाहिरात आवडली - मुलाला सुट्टी मिळत नाही म्हणून त्याच्या बोटीवर जेवण घेऊन जाणार्या आईची. सामोसे वगैरे ठीक आहे पण पनीरची डिश तो मुलगा गरम न करता कशी खाणार ते कळलं नाही. कारण आई कारने रात्री प्रवास करून सकाळी पोचताना दाखवली आहे. असो.
तसंच पेअर्स सोपची ती मुलगी ओंजळीत उन्हाचा कवडसा पकडते ती आणि काजोलची त्या छोट्या बाळासोबतची डायपरची दोन्ही अॅड्स फार आवडल्या.
अनुष्का शर्मा आणि शाहरुखची ती कुठली अॅड आहे ती मात्र डोक्यात जाते.
न्युट्रेला न्यू कुकिंग ऑईलची
न्युट्रेला न्यू कुकिंग ऑईलची जाहिरातही मस्त आहे.
स्केल बदलनेसे कुछ नही होगा, आप तेल बदलिये.... तो सेल्समन मस्त नाचतो.
ती सावित्रीबाई.कॉम का काय आहे
ती सावित्रीबाई.कॉम का काय आहे ती संताप आणणारी जाहिरात आहे. दीपा लागूंना तरी समजायला हवं होतं की मोलकरीण म्हणजे मराठीच का दाखवायला हवी?
तशीच ती माधुरीची एक भांडी घासण्याची पावडर का लिक्विड त्याची जाहीरात. माधुरीलाही कळू नये.
Pages