मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सध्या २ जाहिराती डोक्यात जातायत.
एक मूव्हची आणि एक मॅगी का कुठल्या तरी मसाल्यांची.
मूव्हच्या जाहिरातीत ती पाठदुखीने त्रस्त अशी बाई पिशव्या बिशव्या सांभाळत चालतीये. तिला बघून तिचा सुपुत्र पिशव्या हातात घेतो. जिन्यावर वडील भेटतात. तो मुलगा बापाला विचारतो 'सगळी कामं आईच का करते?' इथपर्यंत ठिक असतं.
मग अचानक सगळ्या बायांचे किंचित होपफुल चेहरे. आणि बाप आईला सगळी कामं बिनबोभाट करता यावी म्हणून मूव्ह आणून देतो. अरे काय... सगळी कामं करायची आईने तर तिला मूव्ह दिले पाहिजे. १० रूपयाची ट्यूब आणून दिली की जबाबदारी संपली.. वा वा...

दुसरी अ‍ॅड म्हणजे एक व्यवस्थित जॉब इत्यादी करणारी बाई. हपिसात काम करत असताना एकदा मुलगा, एकदा मुलगी आणि एकदा नवरा तिच्या डोक्याशी येऊन 'आज जेवायला काय करणार?' असा भुंगा लावून जातात. तिचं कामातलं लक्ष उडतं. ती वैतागून घरी येते तर घरात नवरा आणि मुलं टाइमपास करत बसलेली असतात (मग थोडासा स्वैपाक का करत नाहीत कुणास ठाउक!). मग जाहिरात सांगते अमुक मसाले वापरा म्हणजे रोज चवदार अन्न मिळेल. मग ती बाई कृतकृत्य होऊन स्वैपाक करू लागते. आणि सगळे़जण आनंदी होतात.

मूर्ख अ‍ॅडस आहेत.

वर्षा_म अगदी. ए स्टार गाडीच्याच जाहिराती! अगदी बकवास! तरूण मुलांना दुसरं काही दिसतच नाही का काही?

नीरजा, अनुमोदन. अशीच मूर्ख एक अ‍ॅड मॅगी मसाल्याचीही आहे. मुलगा घरी ट्रॉफी घऊन येतो ती- तो मसाला घालून भाज्या केल्या, की बुद्धी तल्लख होते म्हणे! Lol

कॅडबरीची बसस्टॉपवरची जुनीच अ‍ॅड परत येतेय.. फारच गोड! Happy

ज्यांना-ज्यांना ते दोघं बहिण-भाऊ नाही वाटले, त्यांनी हात वर करा!>>>>>>>>>>>>> मी शरीफ आहे..........मी नक्कीच मानतो

एक एल आय सी ची अ‍ॅड आहे जिथे लहान मुलगा आपल्या काका ला विचारतो की लग्ना साठी कशी मुलगी आहे........
त्यात त्या काका ने जे तारे तोडले आहे त्या वरुन असे वाटते की
१) हुंडा मिळायलाच हवा.....
२) मुलगी चांगलीच नोकरी करणारी हवी...
३) मुली कडच्यांनी पैसे मागीतल्यावर नवर्या मुलाला दिलेच पाहीजे.

सरकारी अ‍ॅड नी असे बोललेले चालते//////////////////???????????????????????

उदय, त्यातला लहान मुलगा नंतर काय म्हणतो ते ऐका.
तो म्हणतो ही हे हवं असेल तर अमुक पॉलिसी घ्या, पण लग्न अशाच मुलीशी करा जी तुमच्यावर प्रेम करते.
संपूर्ण अ‍ॅड बघ. Happy

हो.. त्या एल आय सी च्या जाहिरातीतल्या लग्नाळु मुलाला विचारावसं वाटतं की ठोंब्या तु काय करणार मग?
आणि एंडोमेंट पॉलीसी बद्द्ल त्या छोट्या मुलाला माहिती आहे! (???) आणि या माठ्याला नाही..
काय डोकं चालवतात हे ??

मला ती कुठल्यातरी मोबाईलची जाहीरात खुप आवडते.. तो मुलगा त्या मुलीला आपल्या भावना सांगु शकत नसतो. त्या मुलीची मैत्रीण येउन त्याच्या मोबाईलवर इशारो इशारो मे दील लेने वाले गाणे वाजवते आणी विचारते की यही कहना है ना वगैरे... एकदम फ्रेश चेहरे आणी मस्त अ‍ॅड.. Happy

सध्या ती करोडपतीची अ‍ॅड लागते ज्यात त्या म्हातार्‍या माणसाला मुलगा आणि सून हिडिस-फिडिस करत असतात ती अतिशय डोक्यात जाते.

त्या सगळ्या करोडपती अ‍ॅडांमधे 'पैसा ना होनेसे कोई आदमी छोटा नही होता' असे म्हणताना श्रीयुत बच्चन छोटाच्या आधी हुशार या अर्थाने कपाळाच्या साइडला बोट टॅप का करतात ते मला कळलं नाहीये. Happy

एका तांदळाची अ‍ॅड आहे.......त्यात मुलगा आपल्या मित्रांबरोबर नाटकाची तयारी करत कॉलेज मधे असतो..तितक्यात तो फेसबुक ऑन करतो आणि त्याला दिसते आपली आई सुध्दा फेसबुक वर आहे...कोणीतरी म्हणते की स्टेटस बघ आई ने काय लिहिले आहे तर ते असते की " बिर्याणी इस रेडी" ते वाचुन सगळे मित्र याच्या बरोबर बिर्याणी खायला घरी......फार सुंदर अ‍ॅड आहे....मुलगा घरी येण्यासाठी आधुनिक आई त्याच्याच स्टाईल मधे बोलवते..... Happy

सध्या एक रिलायन्स 3G ची जहिरात येते. ती मला त्या छोटी मुलीमुळे फार आवडते. एकतर दिसतेही क्युट आणि ती कविता पण इतकी आत्मविश्वासाने आणि हावभावांसकट म्हणाली आहे. खुपच गोड.

अर्थात मॅचच्या मधे मधे इतकी दाखवतात कि अति झाल्यामुळे वैताग येउ नये म्हणजे झालं.

आयडीया थ्रीजीची लेटेस्ट अ‍ॅड डोक्यात गेली. आयडीया थ्रीजी असलेलं काहीतरी गॅजेट आहे. ते इतकं अ‍ॅडिक्टीव्ह आहे की नसबंदी करण्यापेक्षा लोकसंख्यावाढीवर उपाय म्हणून तेच घ्या. असं अप्रत्यक्षरित्या सुचवलं जातंय. काय तर म्हणे 'मैने अपना विवाहित जीवन देश के लिये त्याग दिया!'
अरे काय फालतूपणा आहे.

आयडीया थ्रीजीची लेटेस्ट अ‍ॅड डोक्यात गेली>>>अगदी अगदी !

काल 'मी सिंधुताई सपकाळ' च्या कमर्शियल ब्रेकमधे कितीवेळा ही जाहिरात दाखवत होते! Angry

नी ने लिहिलेल्या त्या २ अ‍ॅड्स च्या संतापाला माझेही अनुमोदन. मलाही त्या जा डोक्यात जातात.

सध्या मराठी वर ती इचगार्ड वा तत्सम प्रॉडक्टची ते ए "ही खाज आहे भाऊ..." असे गाणे असलेली अ‍ॅड अस्ते. कित्ती किळसवणी वाटते ती जाहीरात. Angry

आयडिया थ्री जी बद्दल अनुमोदन. माझा विश्वासच बसला नाही अशी अ‍ॅड असेल असा. आयडिया बद्दल जरा प्रेम होते मनात ते लगेच गेले. लैच वैट आहे.

आयडियाची, गावातला सरपंच सगळ्यांना नावाऐवजी मो.नं.ने ओळखायचे ही सोडली तर कोणतीही अ‍ॅड नाही आवडली.

आयडीयाच्या सगळ्याच आयडीया इतक्या बकवास का असतात त्यांच्या मॉडेल सारख्याच...

निंबुडा
माझ्या एका मित्राने काही वर्षांपुर्वी कॉलर ट्युन म्हणून ठेवलेली ती अ‍ॅड. विचार कर फोन करणा-याची काय अवस्था होत असेल

imperial blue अ‍ॅड भारी आहे... एकजण हिर्‍याची अंगठी बायको साठी घ्यायला जातो..तिथे सेल्समन त्याला विचारतो..काही प्रश्न ..त्याचे उत्तर ऐकुन हिर्‍याचे कॅरेट वाढवत जातो..म्हणजे काही न जास्त बोलता सेल्समन ग्राहकाची घरी काय अवस्था असेल त्यातुन वाचवण्याचा प्रयत्न आपप्ल्या परी करे करत असतो
सुरुवातीला कशासाठी आहे ते विचारतो..लग्नाच्या वाढदिवसा साठी आहे ऐकल्यावर कमी कॅरेट ची दाखवतो..नंतर विचारतो किती वर्षे झाली..१० वर्षे ऐकल्यावर पहीली अंगठी परत घेउन जरा जास्त कॅरेट ची दाखवतो..नंतर कधी आहे विचारल्यावर ...काल होती..ऐकल्यावर..अजुन जास्त कॅरेट ची दाखवतो...

दोघांचा अभिनय अप्रतीम आहे..सुमित राघवन तर बेस्ट..बायको ने वाढदिवस विसरल्यावर चांगलाच झापला आहे..हे नुसत्या चेहर्यावरुन दाखवला आहे... Happy

>>>>>आयडीया थ्रीजीची लेटेस्ट अ‍ॅड डोक्यात गेली. आयडीया थ्रीजी असलेलं काहीतरी गॅजेट आहे. ते इतकं अ‍ॅडिक्टीव्ह आहे की नसबंदी करण्यापेक्षा लोकसंख्यावाढीवर उपाय म्हणून तेच घ्या. असं अप्रत्यक्षरित्या सुचवलं जातंय. काय तर म्हणे 'मैने अपना विवाहित जीवन देश के लिये त्याग दिया!'<<<<< मी हेच लिहायला आले होते. चहाटळपणाचा कळस आहे हि अ‍ॅड. अभिषेक दिवसें दिवस जास्तच डोक्यात जातोय. कुळाच्या नावाला बट्टा लावला. Wink

>>हो ती आयडीया थ्रीजीची अ‍ॅड एकदमचं फालतु आहे

अनुमोदन. ती Wego म्हणून कसली अ‍ॅड लागते तीसुध्दा तद्दन फालतू आहे.

आयडीया थ्रीजी च्या एका अ‍ॅड मधे शेवटी एक व्यक्ति अभिषेकला विचारतो "और तुम्हार बेबी?" अभिषेक बिस्किट खाता खाता म्हणतो "वो बिफोर थ्रीजी". मला पहिल्यांदा चूकून "वो बाबूजी" असं ऐकायला आलं तेव्हा काय दचकायला झालं होतं.

Pages