मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक बाई एका बाप्याच्या शरीराला लावलेल्या कुठल्यातरी अत्तराने प्रभावित होऊन त्याला मागून मिठी मारून त्याच्या सदर्‍यातून आत हात घालताना दाखविलेली आहे. ही जाहीरात सुद्धा अत्यंत घाणेरडी आहे.

मास्तुरे, त्या अत्तराचे नाव Axe Effect.
हे अत्तर लाऊन एकही मुलगी न 'पटल्याने' दक्षिण भारतात एकाने त्या कंपनीवर खटला दाखल केला होता Biggrin

करता येते. इथे करायची का?>> हो म्हणजे किमान इतकी लहान मुले या जाहिरातित नको म्हणुन तरी करावी.

हे अत्तर लाऊन एकही मुलगी न पटल्याने दक्षिण भारतात एका माणसाने त्या कंपनीवर खटला दाखल केला होता>> Lol हे अचाट आहे Lol

How to Complain
Procedure for Processing a Complaint against an Ad, for contravention of ASCI Code

1. Pre Consumer Complaints Council (CCC) Meeting Procedure

2. CCC Meeting Procedure

3. Post CCC Meeting Procedure

Please fill in this Form and send by e-mail to asci@vsnl.com or by post to the below mentioned address

Please click here to Download Form

Please click here for Online Complaint Form

Write to -

The Advertising Standards Council of India
Alan Collaco - Secretary General
219, Bombay Market,
78 Tardeo Road,
Mumbai 400 034
Tel: (022) 23521066/23516863
Toll Free Number : 1-800-22-2724
Fax: 23516863
E-mail: asci@vsnl.com, alan@ascionline.org

As a policy we do not disclose the identity of the Complainant to the Advertiser. In case you send your complaint by e-mail please follow-up with a hard copy of your complete complaint with enclosures, by post to our above address

व्होडफोनच्या जाहिरातींच्या पार्श्वभूमीवर 'हर एक फ्रेन्ड जरूरी होता है' च्या एअरटेलच्या जाहिराती खूपच उजव्या आहेत. एक तर सर्व तरूण मंडळींवर बेतलेल्या जाहिराती, त्यातून 'मैत्री' हा जिव्हाळ्याचा विषय! दाढी करायला बसलेल्या मित्राला हसवणारा मित्र, ऑनलाईन फुटबॉलही हरणारा जाडा मित्र, ऑनलाईन चित्रपट पाहताना आलेलं एका मैत्रिणीला रडू आणि त्यामुळे आजीबाईंनी करून घेतलेला गैरसमज- मस्त आहेत ह्या जाहिराती. ह्याच कॅम्पेनमधली सर्वात पहिली 'कंजूस मित्र' ही जाहिरातही एकदम मस्त होती.
(ह्या जाहिराती पाहून मुलं ऑनलाईन खेळ, सिनेमे वगैरे पहायला लागली आणि त्यापायी महिनाखेरीस दुप्पट पैसे मोजू लागती, तर जाहिरातदारांचे काम फत्ते! पैसे भरणार्‍या पालकांना शुभेच्छा! :फिदी:)

सर्व डिओच्या (खासकरून 'अ‍ॅक्स' कारण ह्यांच्यापासूनच ह्या हिडीस जाहिरातींना सुरूवात झाली) बॅन केल्या पाहिजेत. आयपीएलचे तर हे लोक प्रमुख प्रायोजक असतात. अर्ध/ पाऊण नग्न लोक पाहणे म्हणजे वैताग आहे. शिवाय, दर पाच मिनिटांनी आहेच सुरू! (प्रत्येक ओव्हरनंतर)

त्या ऐवजी आताच आलेली 'फॉग' ह्या डिओची 'गॅस नाही, फक्त सुवास' ही जाहिरात व्यवस्थित आहे. संदेश पोचतो. अर्धनग्न युवतींशिवायच.

सहमत. क्रिकेट लहान मुलेही पाहतात. त्यामुळे अ‍ॅक्स वगैरे नकोच तेथे.

एअरटेलच्या जाहिराती मस्त आहेत. एक (नकाशावर अवलंबून असलेल्या ठिकाणी गेल्यावर) नकाशावरच भेळ ओतून बसलेला मित्र असलेली ही जाहिरात मस्त आहे. ते बहुधा फक्त चित्र आहे.

Affluent class डोळ्यासमोर ठेवून या जाहिराती बनवल्या आहेत हे लगेच कळते. त्यामुले रॉक कॉन्सर्ट्स, कार्स व इतर "हाय फाय" गोष्टींची रेलचेल आहे त्यात. पण जाहिराती एकदम स्मार्ट आहेत.

दुसरे म्हणजे कोणतीही Inappropriate गोष्ट "कूल" आहे असे दाखवतायत असे जाणवले नाही.

'हर एक फ्रेन्ड जरूरी होता है' च्या एअरटेलच्या जाहिराती खूपच उजव्या आहेत.>>
हो एकदम सही. Happy

पण निलेश फुबाईफु मधे त्या जाहीरातींच्या करता जे बोलतो ते लैच बोअर आहे. Sad

निलेश फुबाईफु मधे त्या जाहीरातींच्या करता जे बोलतो ते लैच बोअर आहे>> तो निलेश एकुणच बोअर आहे. मला अज्जिबात नाही आवडत.

दुसरे म्हणजे कोणतीही Inappropriate गोष्ट "कूल" आहे असे दाखवतायत असे जाणवले नाही.>>>. अनुमोदन Happy

Ambi Pur च्या अ‍ॅडमध्ये गाडीतली दुर्गंधी घालवायला तो मुलगा Ambi Pur वापरतो तेव्हा मला नेहमी ओरडावंसं वाटतं की अरे बाबा, तो वास कुठून येतोय ते बघ आधी. उगा एखादा उंदीर वगैरे मेलेला असायचा आणि हे बसलेत Ambi Pur लावून सुगंध हुंगत.

त्या एअरटेलच्या जाहीरातीत तंबुतल्या ठोंब्याची गर्लफेड का तत्सम कुणीतरी त्याचे कपडे, बूट आणि बाकी जे काय हातात लागेल ते घेऊन जाते (टॉवेल सोडून) आणि मोबाईल का नेत नाही म्हणे....
त्याला एवढा नागवल्यावर (आर्थिक आणि शारिरीक) किमान कुठेतरी मदत मिळावी या सद्हेतूने बहुदा....
आणि जाहीरात बनवणार्यांना हे कसे लक्षात आले नाही देव जाणे

आशुचँप - हो माझ्याही लक्षात आले नाही Happy "कुछ पिला यार" म्हणताना त्याचा चेहरा खुलतो ते मात्र मजेदार आहे.

आशु अनुमोदन... Happy मला पण हाच प्रश्न पडला होता. आणि मित्र बरा रिकामटेकडा दिसतोय ऑन माय वे टू गोवा म्हणे... Uhoh

गुड डे ची अ‍ॅड मस्त आहे. त्या ट्रकमधून बिस्किटाचे दोन पुडे मुलांसाठी पडतात ती. अर्थात ह्यापासून प्रेरणा घेऊन सगळ्या ट्रकवाल्यांनी असे पुडे वाटायला सुरुवात केली तर ब्रिटानियाचं दिवाळं निघेल Happy

नविन रसनाची जाहिरात एकदम बंडल आहे - रसना प्यायले की जेनेलिया घरी येते असे म्हणायचे आहे का त्यांना? का जेनेलियाला पण रसना आवडते असे काही?

ओरियो बिस्कीट्सची जाहिरात खरच गोड आहे खुप...ती मुलगी आपल्या आईचे सोंग घेऊन बाबांना, जेवायला वगैरे वाढते, कित्ती क्यूट Happy

>>मला सर्वात जास्त ते टॉयलेट क्लीनरच्या अ‍ॅडमधे किटाणू दाखवतात ना, त्यांचीच किळस येते.

मला आक्षेप ते नेमकं जेवताना दाखवतात त्याला आहे.

रिलायन्स मोबाईलच्या अनुष्का शर्माने केलेल्या जाहिराती अत्यंत कंटाळवाण्या आहेत. रिलायन्सची सर्व्हिस का घ्यावी हे कुठल्याच जाहिरातीतून समजत नाही.

सध्याच्या डोक्यात जाणार्या जाहिराती :

करिश्माची choccos - तो मुलगा अती आगाउ वाटतो . आणि आइची नक्कल करतो तर आई अति कौतुकाने बघते आणि हसते. ती जाहिरात englishमध्ये बघणे ही वेगळीच शिक्षा .

साक्षी तन्वरची केल्लोग्स : ती बाई इतक्या लाडीकपणे बोलते की डोकचं फिरत . ( विशेशता mummy special बादामसे... )

सिद्धार्थची फ्रूटी : महाआआआ...बोर

सध्या सगळ्यात मस्त IPL .
सगळॅ बसायला काहीना काही घेउन येतात ती ,
एक फक्त सन्गीत आहे ती - family outing म्हणून .
एक ती - beyond boundries .
IPL Tickets च्या सगळ्या ... मस्तच.

मला डीएसके वाल्यांची "भुर्कन चिऊ" बिलकुल आवडत नाही. गेंगाणा आवाज, विचित्र शब्द आणि अतिकृत्रिम अभिनय(?) Angry झी मराठीवर सततच सुरु असते ती अ‍ॅड.

"भुर्कन चिऊ" >>> Lol आणि त्या जाहिरातीत सुबोध भावे इमानदारीत अभिनय वगैरे करतो Lol

Pages