मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ते कभी अलविदा ना केहना मधील, ''व्हेअर्स द पार्टी टूनाईट- ऑन दी डान्स फ्लोर'' हे गाणं '' लेट्स हॅव पार्टी टूनाईट-ऑन दी डान्स फ्लोर'' असं वाटायचं. Happy

आणि एक पंजाबी अल्बम होता, त्यात एक गाणं होतं त्याचे लिरीक्स सगळे नाही आठवत, पण काहीसं असे होते,

पीछे पीछे आजा मेरे चाल विच आए
निगाह मार दा आई वे मेरा लौंग वाचा

आणि मी लहान असताना ते असं म्हणायचे, ज्यावरून अजून मला सगळे चिडवतात.

पीछे पीछे आजा मेरे चाल विच आए
निगाह मार दा आई वे मेरा लाल वांगा

Biggrin Biggrin Biggrin

Proud

सुर की नदिया बहते सागर में मिले
बदलाँ दारुSSS लैके बरसन हौले हौले
हे असं ऐकु यायचं!
>>> Happy

आर्या, या दोन वाक्यांत आख्खं जलचक्र बसवलंय. सूरांच्या नद्या बनून सागराला मिळतात. मग, बदलां दा रूप = त्या नद्या किंवा त्यांच्या पाण्याचे (गाण्यात उल्लेख न केलेल्या सूर्यामुळे बाष्पीभवन होतं आणि मग) ढग होऊन हळू हळू पाऊस पडतो.

चिकनी चमेली ऐकलं तेव्हा 'पऊवा चढा के' ऐकून पायात चपला चढवून आली असं मला वाटलं. मग नाच बघितल्यावर ज्ञानदीप उजळला. Happy

पीछे पीछे औंदा मेरी चाल ना आई
निगाह मार दा आई वे मेरा लौंग गवाचा >> माझी नाकातली चमकि (लौंग)हरवली आहे अशा अर्थाचे हे गाणे आहे.

"अरे संसार संसार" या चित्रपटातील अतिशय गाजलेले अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचे एक युगलगीत

"राजा ललकारी अशी घे
हाक दिली मला साद दे..."

गाणे ऐकताना पहिले कडवे कायम असे ऐकू यायचे :

"तुमचा भाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया"

हे असे असणार नाही याची खात्री होतीच कारण कुलदीप पवाराचा भाचा हा रंजनाचा धनी कसा होऊ शकेल ? पण तसे होत मात्र राहिले, शेवटी एका मित्राने वैतागून कुठूनतरी गाण्याचे मूळ शब्दच आणले, तेव्हा कळाले तिथे

"कुंकवाचा माझा धनी, बळ वाघाचं आलंया" अशी रचना आहे.

भाच्याचा संबंध नव्हता.

खेळ मांडियेला वाळवंटी ठाई
नाचती वैष्णव भाई रे

दुर्दैवाने गीतमंजुषा आणि आठवणीतली गाणी या दोन्ही संकेतस्थळावर "घाई" असेच लिहिले आहे.
पुढे एका ओळीत क्रोध अभिमान गेला "पावटणी" असे दिले आहे, ते "पावतळी" असे बरोबर आहे.

माझे आजोबा बरेचदा "नाचत ना गगनात नाथा" ऐकत बसायचे. खूप आवडतं गाणं होतं त्यांचं ते. मी बराच लहान होतो. दिवसभर ऐकल्याने शब्द मुखी रुळू लागले नि संध्याकाळी असाच मी गुणगुणत बसलो होतो.

"टीव्हीवरची देवाघरची डौलत लोक पहाट न्हाता.."* असंच वाटायचं मला आणि असंच गुणगुणायचो.. सगळे बेक्कार फुटायचे! मी खंप्लीट क्लूलेस!

* "ती ही वरची देवाघरची दौलत लोक पहात नाथा"

'अरे अरे ज्ञाना' असा काहीसा अभंग आहे,जो मला कायमच 'अरे अरे ज्ञाना न्हाला टिपा म्होर' असं ऐकू येतो. लहानपणी मी माझ्या पुरता असा अर्थ लावून घेतला होता की कोण तरी ज्ञाना नावाचा मुलगा पिंपा समोरच आंघोळीला बसला Lol

"जुम्मा चुम्मा दे दे" या गाण्यात कविता कृष्णमूर्तीबाई पुढील ओळी गाऊन झाल्यानंतर नक्की काय गातात काहीच कळत नाही. >>>>>>>

निंबुडा, स्वप्ना_राज ते असे आहे,

जुम्मा चुम्मा ना दे
जुम्मा चुम्मा ना दे चुम्मा
चुम्मे के दिन किया जुम्मेका वादा
जुम्मे को तोड दिया चुम्मेका वादा
करता जा जुम्मे जमा....

जुम्मा चुम्मा ना दे
जुम्मा चुम्मा ना दे चुम्मा
जुम्मे के दिन किया जुम्मेका वादा
जुम्मे को तोड दिया जुम्मेका वादा
परसो जा जम्मे जमा..........

हे असे आहे ...

जुम्मा चुम्मा ना दे,
जुम्मा चुम्मा ना दे चुम्मा
जुम्मे के दिन किया जुम्मेका वादा (इथे चुम्मे का वादा असावे का ?)
जुम्मे को तोद दिया जुम्मेका वादा (इथे चुम्मे का वादा असावे का ?)
परसों जो जम्मे जमा

"करता जा जुम्मे जमा...." बरोबर असावे असे वाटतेय. निदान अर्थ लागतोय. पण "परसों जो जम्मे जमा" ला काहीच अर्थ नाहीये. Uhoh हिंदी लिरिक्स च्या काही साईट्स वर पण "परसों जो जम्मे जमा" असंच लिहिलेलं सापडलं होतं. पण अर्थ न लागल्याने इथे विचारलं. तर इथेही त्याच साईट्स वर बघून लोक सांगताहेत Proud

हे गाणे मी चुकीचे ऐकले असे म्हणणार नाही, पण ओळी वाचून बघाच.
(आता फिल्मी गाण्यांच्या चालीवर गायलेली भजने, इथे एका विशिष्ठ भाषिक समाजात खुपच लोकप्रिय आहेत. मनात नसले तरी ऐकावीच लागतात. शिवाय मूळ चाली आणि शब्द माझ्या डोक्यात इतके फिट्ट आहेत, कि हे प्रकार ऐकवतच नाही. शिवाय शब्दही ओढून ताणून बसवलेले..)

तर असेच एक भजन, मुखडा असा

जिस भजनमें राम का नाम ना हो
उस भजन को गाना ना चाहिये ( बरं बाबा )

पुढच्या ओळी

चाहे पत्नी कितनीभी प्यारी ना हो
उसको कभी भेद ना बताना चाहिये
और माँ चाहे कितनी भी बैरी ही हो
उससे कभी राज ना छुपाना चाहिये.... ( हे राम)

आता कळलं, मी एका विशिष्ठ भाषिक गटाचा उल्लेख का केला ते ?

मी लहान असताना एक गाणं मला जाम कळायचं नाही. ते नेहमीच 'साsssबुदाssणा ढुंढती हूँ' अस काहीतरी ऐकू यायचं, मग कळलं की तो शब्द साबुदाणा नसून आबुदाना असा होता.
आम्ही (मी आणि माझा दादा) तेंव्हा म्हणायचो की, त्या नटीचा उपास असेल म्हणून ती साबुदाणा शोधत फिरते...

दिनेशदा, उस भजन को गाना ना चाहिये ( बरं बाबा ) >>>> Biggrin

चाहे पत्नी कितनीभी प्यारी ना हो (दिनेशदा, इथे 'कितनी भी प्यारी हो' किंवा 'कितनी भी प्यारी क्यु ना हो' असं हवं ना?)
उसको कभी भेद ना बताना चाहिये
और माँ चाहे कितनी भी बैरी ही हो
उससे कभी राज ना छुपाना चाहिये.... ( हे राम)

आता कळलं, मी एका विशिष्ठ भाषिक गटाचा उल्लेख का केला ते ?

>>>> हा हा हा ... मी ओळखीचं वाटून घ्यायला हवंय का? Wink Biggrin

कसलं हॉरीबल भजन आहे!!!! :रागः

इतके दिवस मला वाटत होतं की मलाच फक्त चुकीची गाणी ऐकऊ येतात लक्ष देउन न ऐकल्यामुळे. पण हे सगळं वाचून खूपच छान वाटलं. हाहाहा आपल्यासारखेच कोणीतरी आहे हे बघून!! :):) दिवा

मामे, पाठवू का भजन ते ?

चाल.
नीले पर्बतोंकी धारा, आयी ढूंढने किनारा,
बडी दूरसे.. सबको सहारा चाहिये, कोई हमारा चाहिये..

केवळ चाहिये, या शब्दावर एवढा डोलारा रचलाय !!

जब भी साई का नाम सुनते तो दिले मेरा
डोले डोले... डोले डोले.

(झिपर्‍या सैफ हे गाणं म्हणतोय असं इमॅजिन करा.)

हे आधी इथे विचारलंय की नाही आठवत नाहीये. Uhoh
ते "क्यु आजकल नींद कम ख्वाब ज्यादा है, लगता खुदा का कोई नेक इरादा है" या गाण्यात प्रत्येक कडव्यानंतर काही पोरी कोरस मध्ये "से गुनिया" असं काहीसं ओरडतात. ते नक्की काय शब्द आहेत? मी गमतीने "चिकनगुनिया" असं म्हणते Wink

Pages