मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशाताईंचे एक जबरद्स्त प्रसिद्ध गाणे "रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी..". येथील सर्वानाच माहीत असणार. या गाण्याच्या दुसर्‍या कडव्यात ज्या ओळी आहेत त्या अशा ऐकू यायच्या :

"जात होते वाटेनं मी, तोर्‍यात मी तोर्‍यात
अवचित आला माझ्या हो होड्यात, जी होड्यात..."

पुढे स्थानिक संगीत स्पर्धेच्यावेळी एका गायिकेने नेमका तसाच उच्चार केल्यावर परिक्षकाने दुरुस्ती केली की, "होड्यात नसून ते होर्‍यात" असे आहे. एरव्ही होरा म्हणजे अंदाज असे आपण मानतो, पण इथे त्याचा अर्थ 'नखरा' असा होतो काय ?

"...एखाद्याच्या नखर्‍यात कुणी कसे येईल?"
~ खरंच बिनतोड मुद्दा आहे. 'नजरेचा टप्पा' च असावा. फक्त 'होरा' त्या अर्थाने कधी वाचनात आला नाही म्हणून थोडेसे कुतहूल जागृत झाले.

नुकत्याच येवू घातलेल्या "दिल्ली बेली" या चित्रपटातील

"भाग भाग डी. के. बोस डी. के. बोस डी. के. बोस भाग भाग डी. के बोस डी. के. भाग..."

या गाण्यातील "बोस डी. के." हे शब्द मला "भोसडीके" असे ऐकू येतात. आपण एकदा ऐकून पहा आणि माझ्या कानांवर विश्वास ठेवा.

त्या तरुतळी विसरले गीत हे मी आतापर्यंत चुकीचे ऐकत होतो, असं मला आत्ताच कळलं, मूळ कविता वाचताना.
त्या तरुतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेउन फिरतो इथे तिथे टेकीत!
असं आहे
आणि मी ऐकत होतो
हृदय रिकामे घेउन फिरतो इथे तिथे ते गीत!
य ओळीचा अर्थही लागत नाही खरं तर.

अमित तुम्हाला काही चुकीचं ऐकू आलं नाहीये. ते तसंच ऐकू यावं हाच उद्देश्य आहे ते शब्द गाण्यात टाकायचा.

अमित, तुम्ही ऐकलं तसंच आहे ते गाणं.
परवाच रेडिओ मिर्चीवर सांगत होते कि आमीर आणि इम्रानने बीग बॉसचा एकच एपिसोड पाहिला, जो त्या भयानक बाईचा - डॉली बिन्द्राच्या फेमस भांडणाचा होता. त्या भांडणात तिने हा शब्द इतक्या वेळा वापरला कि मामा भाचे inspire झाले. झालं त्यांची प्रतिभा जागृत झाल्यावर घुसले शब्द पहिल्या वहिल्या गाण्यात. पण गाण्यावर गदा येवु नये म्हणुन ते जरा बदलुन पण फायनल इफेक्ट तोच येइल असे वापरले.

भरत, मीही असंच ऐकतेय ते गाणं कित्येक वर्षं

अमित, मी पण ते गाणं ऐकून दचकले होते आधी.

रच्याकने, गुमनाममधल्या गाण्यातल्या त्या ओळी पुन्हा कान देऊन ऐकल्या. 'पैदा हुआ वो फानी है' अश्याच आहेत.

अमि, आता आपण आपलं मन तयार करायला हवं अशी गाणी ऐकायला, कारण एकदा ट्रेंड आला कि सगळी अशीच गाणी येतात त्या लाटेमधे. या नंतर एक कुठले तरी 'चुडैल' असं काही गाणं पण आलं आहे ना. आधी सौम्यपणे कंबख्त म्हणुन झालं, कमिना झालं, चुडैल पचवता पचवता, डी के बोस. करा सवय.

बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये
तूम जियो हजारो साल, ये मेरी है आरजू
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू सुनीता...

या गाण्यात सुनीताच्या जागी मला, आज विनय का बरे ऐकायला येतेय ?

दिनेश.. हे गाणं पण चुकीचं ऐकलं .. कमाल आहे.. मला तर सुनिता, अनिता, सविता असं काहीतरी ऐकू येईल असं वाटलं Lol

छडी लागे छम छम या गाण्यात शेवटी 'म्हणा सारे एकदम, ओनामासीदम' असे काहीतरी आहे. नक्की शब्द काय आहे?

ओनामासीदम चा प्रश्न मी पण आधी याच बाफवर विचारला होता तेव्हाही कुणीतरी 'ओम नमः सिध्दम' च सांगितले होते. पण ते ओनामासीदम असेच ऐकू येते हो Uhoh

पण ते ओनामासीदम असेच ऐकू येते हो <<< हो कारण मीटरात बसवण्यासाठी ते तसेच लिहिले, म्हटले गेले आहे..
'श्री गणेशाय नम:' च्या ऐवजी 'श्रीगणेशा' केला असे म्हणतो तसे.. Happy

ना कजरे की धार, ना मोतियों के हार मधे एक ओळ आहे,
थी पत्थर, तूने छूकर सोना कर दिया खरा,
मला ते अगदी काही दिवसांपुर्वी समजलं, आधी वाटायच "सोना कर दिया खराब" Happy

हे मी कदाचित आधी लिहिलं असेल पण परवा 'गुप्त'चं टायटल सॉन्ग ऐकताना पुन्हा आठवण झाली. ह्यात कोरसमध्ये जे गातात ते मला 'गुप्ताजी' असं ऐकू यायचं. मग कळलं की ते 'वो क्या है' असं आहे. Happy

माझी मैत्रिण..
अरे अरे ज्ञाना झाला पितामह... Uhoh
मी कान उपटुन सांगितलं, पितामह नाही अरे अरे ज्ञाना झालासी पावन.... Proud

Pages