Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खेळ मांडियेला वाळवंटी 'घाई'
खेळ मांडियेला वाळवंटी 'घाई' असंच आहे-
काही काम करायची घाई अशा अर्थानं नसावं ते. पण एखाद्या उत्सवात वगैरे- एक प्रकारची लगबग असते प्रत्येकाच्या हालचालीत, तो अर्थ अपेक्षित असावा कदाचित.
देहाची तिजोरी- भक्तीचाच ठेवा आहे. (भक्ती हाच ठेवा मला तरी ऐकू आलं नाही.)
माझ्या मते: वाळवंटी ठाई आणि
माझ्या मते: वाळवंटी ठाई
आणि भक्ती हाच ठेवा..
"गर तुम ना आ सको तो, मुझे
"गर तुम ना आ सको तो, मुझे सब्रमे बुला लो".
>>> स्वप्ना, ते 'कब्र में बुला लो' तर नाही ना?
इंटरप्रिटेशन : अत्त्युच्च प्रेमाची ग्वाही. तु नाय आलास तर तु मेलास असं मी समजेन आणि मग तू मला डायरेक्ट कब्रमध्येच बोलाव आणि मग तर काय आपण नेहमीच एकत्र राहू.
आम्रपालीची कबर?
आम्रपालीची कबर?
मामी
मामी
मामी __/\__ >>भरत, ते स्वप्न
मामी __/\__
>>भरत, ते स्वप्न असे नीट ऐकू येत नाही
हो,दिनेशदा, मी खूप वेळा ऐकलं ते गाणं. पण कळतच नाहिये. नवा पोर्टेबल प्लेयर घेतलाय त्यात हिंदी गाणी भरून घेतेय. बर्याच गाण्यांच्या शब्दांबद्दल शंका आहे. टाकेन इथे हळूहळू. रच्याकने, मराठी भावगीतं, जुन्या चित्रपटातली गीतं वगैरे डाऊनलोड करायची काही साईट आहे का एखादी?
रागा डॉट कॉम वर आहेत मराठी
रागा डॉट कॉम वर आहेत मराठी गाणी. धिंगाणा वर पण आहेत. ती रेकॉर्ड करुन घ्यायला काही सॉफ्टवेअर आधी डाऊनलोड करावी लागतात. मग साईटवर तशी सोय नसली तरी ऐकता ऐकता रेकॉर्ड करता येतात.
आता हसून नका, मला तो शब्द चक्क प्रमे असा ऐकू येतो. जो तूम न आ सकोगे, मुझको प्रमे बुलालो !!
दिनेशदा, मीही ते गाणं ३-४
दिनेशदा,
मीही ते गाणं ३-४ वेळा ऐकलं.
माझ्या मते स्वप्न चा मराठी उच्चार आणि थोडा हिंदवट उच्चार यामुळे तो घोळ होत असावा.
चौथ्यावेळी मला ते स~ऽऽप्न मे बुलालो असं ऐकू आलं.
बाकी मामींच्या युक्तिवादाला म्हणजे अगदी कोपरापासून हात जोडले
चैतन्य, आता तसेच ऐकू
चैतन्य, आता तसेच ऐकू येणार.
या बीबी वर हा उल्लेख झालाय का ते बघावे लागेल, पण ऐन दुपारी, यमुना तीरी..
मधले " अंगाला हात लावायचे, काही कारण होते का " हे अनेकजणांना वेगवेगळे ऐकू आले असेल !!
स्वप्ना
स्वप्ना http://www.youtube.com/watch?v=oMZ08gU9hfY ह्यात बघ 'प' अगदी स्पष्ट ऐकयला येताय.
रूनी, वाळवंटी बाई, वैष्णव
रूनी,
वाळवंटी बाई, वैष्णव बाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे ।
इथे वाचा: http://vishesh.maayboli.com/node/180
ते वाळवंटी घाई आहे का, हे
ते वाळवंटी घाई आहे का, हे मात्र आजच कळले.
गोष्ट आहे १९९७-९८
गोष्ट आहे १९९७-९८ ची...
सध्याच्या नव्या पिढीतील उदयोन्मुख गायिका सौ. जान्हवी प्रभू-अरोरा, तिच्या लहान पणात कुडाळ (जि. सिंधुदूर्ग्)ला नातेवाईकांकडे आलेली... तिच्या पालकांशी खूप जूना परिचय असल्यामुळे, जान्हवि च्या गायनाचा एक जाहीर कार्यक्रम आम्ही कुडाळात आयोजीत केलेला... त्या कार्यक्रमात बरीच नवी-जूनी हिंदी-मराठी गाणी जान्हविने गायलेली... कार्यक्रमाची सांगता पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगितबद्ध केलेल्या 'हे हिन्दु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा...' या गाण्याने केलेली... गावात उपलब्ध असलेल्या साधन्-सामुग्री मधे आपले सर्व कौशल्य पणाला लावून मी ध्वनी-संयोजन केलेले... कार्यक्रम पूर्णपणे पार पडल्यावर माझा एक मित्र - छोटू पडते, माझ्याजवळ आला आणी म्हणाला, 'तुका ह्यां शेवटाचां गाणां चुकीचा नाय वाटला?'... मी अर्थातच नकार दिला, आणी त्याच्या मागणी वरुन त्याला गाण्याची फक्त महत्वाची ओळ म्हणुन दाखवली... 'म्हणजे असां आसा ह्यां गाणां? माका कायतरी वेगळांच आयकाक येय व्हतां...' इती छोटू पडते
छोटू पडते गाण्याची महत्वाची ओळ अशी ऐकत होता...
हे हिन्दू मुस्लिमा प्रभो शिवाजीराजा...
आधी कुणी लिहिले असेल नसेल
आधी कुणी लिहिले असेल नसेल माहिती नाही.... !
शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले... या गाण्यातल्या
'आठवते पुनवेच्या रात्री... याच्या पुढची ओळ...
लक्षदीप विरघळले गात्री- च्या ऐवजी 'लक्षद्वीप विरघळले गात्री' असं ऐकू यायचं आधी
दिनेशदा धन्यवाद! अदिति, ऐकून
दिनेशदा धन्यवाद! अदिति, ऐकून पाहते तिथे तरी नीट ऐकायला येतं का ते.
>>हे हिन्दू मुस्लिमा प्रभो शिवाजीराजा
__/\__
काल "अभिमान"मधलं "नदिया
काल "अभिमान"मधलं "नदिया किनारे" ऐकत होते. त्यातही "नदिया किनारे........आयी कंगना" एव्हढंच ऐकू येतं. मधले शब्द काय आहेत हे मला अजूनही माहित नाहिये. मधल्या एका कडव्यातले पण काही शब्द गूढ आहेत. आत्ता आठवत नाहीत. आज संध्याकाळी परत ऐकून उद्या पोस्टेन.
हे हिन्दू मुस्लिमा प्रभो
हे हिन्दू मुस्लिमा प्रभो शिवाजीराजा...
@ स्वप्ना.. ' नदिया किनारे
@ स्वप्ना.. ' नदिया किनारे हेराली आई कंगना..'
हिन्दी त 'हेराना' म्हणजे हरवणे.. गाण्यात लाडिक रुपात वापरलाय शब्द म्हणून 'हेराली'
नदिया किनारे हेराये आयी
नदिया किनारे हेराये आयी कंगना
(नदीकिनारी काकणं हरवून आले)
वर्षू नील, भरत धन्स! हा शब्द
वर्षू नील, भरत धन्स!
हा शब्द माहित नव्हता
हे हिन्दू मुस्लिमा ...
हे हिन्दू मुस्लिमा ...
हे हिन्दू मुस्लिमा प्रभो
हे हिन्दू मुस्लिमा प्रभो शिवाजीराजा.....:हहगलो:
नदिया किनारे हेराये आयी
नदिया किनारे हेराये आयी कंगना
(नदीकिनारी काकणं हरवून आले)>>>>> हे मी 'फेर आयी' कंगना असं ऐकत होते..
आज गोकुळात ची दुसरी ओळ.. राधिके गं राजपुन जा तुझ्या घरी असं ऐकु यायचं .. नंतर कधीतरी ते जरा जपुन आहे याचा शोध लागला!:D
हे हिन्दू मुस्लिमा प्रभो शिवाजीराजा
२ प्रश्न आहेतः १.
२ प्रश्न आहेतः
१. 'गुमनाम'च्या टायटल सॉन्गमध्ये पुढील ओळी आहेत:
आए सदा विरानोंसे जो पैदा हुआ, पैदा हुआ वो 'पानी' है.
हा शब्द 'पानी' नाहीये ह्याबद्दल माझी खात्री आहे. बाकीच्या शब्दांवरून तरी जो शब्द मिसिंग आहे त्याचा अर्थ 'मर्त्य' असा असावा असं वाटतं. काय आहे तो शब्द?
२. 'जिंदगीका सफर है ये कैसा सफर' ह्या गाण्यात पुढील ओळी आहेतः
थक गयी है नजर थक गये चारागर.
कुठल्याश्या चॅनेलवर गाण्याबरोबर शब्दही दाखवत होते त्यामुळे हा शब्द कळला. ह्याचा अर्थ काय?
कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा.
स्वप्ना, हिंदी सिनेमामुळेच
स्वप्ना, हिंदी सिनेमामुळेच जोपासल्या गेलेल्या माझ्या हिंदी-उर्दु (अ)ज्ञानान्वये ते शब्द खालील आहेत असं मला वाटत. (फारसं मनावर घेऊ नयेस, चुकीचे असण्याची दाट शक्यता आहे).
१. फानी असेल. ते 'सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे' यात फना हे काहीही विनोदी नसून त्याचा अर्थ नष्ट होणे टाईप असेल असं वाटतं.
२. चारागर म्हणजे गात्र वगैरे असेल.
इतर खरेखुरे ज्ञानी यावर प्रकाश टाकतीलच.
@स्वप्ना_राज ते फानी आहे.
@स्वप्ना_राज
ते फानी आहे. तुम्ही म्हणताय तसंच मर्त्य,नश्वर.
चारागर म्हणजे चिकित्सक अर्थात वैद्यकातला.उपचार करणारा.
स्वप्ना मला फानी शब्द अजून
स्वप्ना मला फानी शब्द अजून एका गाण्यात वापरलेला आठवलाय.
हे कुठेतरी अंतर्यात आहेत. गाणं देवानंदवर चित्रित केलय. पण मुख्य गाणं काही आत्ता आठवत नाहीये.
दुनिया एक अजायबखाना लेकीन फिर भी फानी
इस दुनिया में अमर रहेगी अपनी प्रेमकहानी
धन्स प्रचारक२००२.
फना म्हणजे शहीद होणे, एखाद्या
फना म्हणजे शहीद होणे, एखाद्या गोष्टीसाठी प्राण पणाला लावणे.
चारागर नवीनच शब्द, अर्थ कळाला.
चारागर हा शब्द अजून एका
चारागर हा शब्द अजून एका गाण्यात ऐकल्याचं आठवतंय..
कव्वाली आहे ये इश्क इश्क है इश्क ...
त्यात एक वाक्य आहे, मुझे चारागर की तलाश है.. असं
जाप्रटा
मेरे नामुराद जुनून का है इलाज
मेरे नामुराद जुनून का है इलाज कोई तो मौत है
जो दवा के नाम पे जहर दे उसी चारागर की तलाश है
Pages