बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसाय, +१ !!! मैत्रेयी आणि निराकारला धन्यवाद!

पोचला रिक्षावालाsssss ग बाई घरी पोचला रिक्षावाला! Proud

गाणी खुप ऐकली. नविन बालकलाकार आदित्य ( स्वाती चा मुलगा) खुप छान गातो. त्याला स्वरा ची चांगली जाण आहे.
आणखी एक बालकलाकार सानिका ( मै ची मुलगी) छान गोष्टी सांगते. दोघांचे खुप कौतुक.

गटग मस्त झालं कालचं. सांस्कृतिक कार्यक्रम एकदम सही झाले. मैत्रेयी आणि निराकार तुमचे विशेष आभार.

माझा असा दाट संशय आहे की लालू शुक्रवारी रात्री ऑस्ट्रेलिअन ओपन टेनिसची महिलांची फायनल बघत बसली असणार आहे, आणि सकाळी उठायला न जमल्यामुळे तिने दांडी मारली असणार आहे. शोनाहो Proud

मी प्रज्ञाचा मागच्या गटगचा वॄत्तांत नाव बदलून छापायचा विचार करतेय,नवीन मेंबरांच्या भावना मस्तच मांडल्या होत्या. बाकी सगळ्यांना भेटून आनंद वाटला. मै-निराकारचे आभार.

लालू, मेरेको पता था! टेनिस पायी ए वे ए ठि चुकवलेस! कुफेहेपा Happy
खूप , प्रचंड धमाल आली! पुढचा आठवडाभर काहीच खाल्ले नाही तरी चालेल इतके खा खा खाल्ले. गप्पा, रंपा, चहा, पान हे झालेच.
बिल्वा, अभिप्रा, दिव्ति या नविन मेंब्रांची प्रथमच भेट झाली. छान वाटले. अभिप्राची चित्रे अप्रतिम!! बाई अन त्यांच्या लेकाची गाणी, स्पिन द यार्न, उ उ वि, मायबोली गीत, चिक्की विथ झक्की, हाई हन हिनयचे हिट , लास्ट बट नॉट लीस्ट बुवा अन भाईंचा रिक्षा ड्यान्स. सगळेच सुप्पर हिट्ट!
बर आमचे आभार बस करा की आता, सारखे बाथरूम मधे जाउन ट्डोपा पुसावे लागत आहे Lol

बर आमचे आभार बस करा की आता, सारखे बाथरूम मधे जाउन ट्डोपा पुसावे लागत आहे>>> हे ट्डोपा काय आहे याचा लवकरात लवकर खुलासा झाला तर बरे होईल. वरच्या विधानावरुन काहीही अर्थ (अनर्थ) लावणे अवघड झाले आहे हो!

सगळाच मेनू जबरी होता. अजून खातोय. आता पॅक करुन आणलेली वालाची उसळ संपवली. आज दिवस भर कालचाच मेनू होता. जो जो हात लगा वो सब मै लूट के ले आया! Proud

कालचं गटग मस्त. रात्री ११.२० ला घरी पोहोचलो. आठवणींनी अजूनही पोट भरलं आहे (कोण म्हणतोय, की मी खा खा खाल्लं म्हणून असं झालं !)
एक अगदी जाणवणारी गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच कुणी मला कात्रीत पकडलं नाही, नवीन सुविधांची मागणी केली नाही (अगदी नाही म्हणायला मेधा ची मागणी होती ती देणं मलाच काय कुणालाच शक्य नाही. ती तिलाच खाजगीत विचारा Happy ) मला वाटतं मी बालीष्टर सारखा वागतो हा बुवांचा शेरा सगळ्यांनी भलताच गंभीरपणे घेतला असावा. आणि तो खरा असेल तर मीच गंभीरपणे घ्यायला हवा.

ही ९५३वी पोस्ट.
ननीने तिचं शब्दकोडं इथे टाकून सहस्रकपूर्तीची सोय करावी अशी मी तिला विनंती करत आहे. Proud

अजय, या वयात काहीही गंभीरपणे घ्यायचं नसतं. झक्कींकडून शिका काहीतरी! Proud

च्च! माझ्या मागण्या जगजाहीर आहेत. प्रत्येकवेळी अजय किंवा समीर भेटले की मी त्याची पुनरावृत्ती करत असते. सह्यांची कॅंपेन सुरु करावी का ?

पूर्ण कविता विभाग इग्नोअर करायची सुविधा
एका आयडीला ( आय पी अ‍ॅड्रेस ट्रेस करुन ) महिन्याला २ किंवा ३ कविता पोस्ट करण्याची लिमिट
कविता टाकायला पेड मेंबरशिप अनिवार्य

हो हो टाका ते कोडं. प्रत्येकाची किती अक्षर ते पण दिले असते तर बरं होईल. Happy

>>अजय, या वयात काहीही गंभीरपणे घ्यायचं नसतं

कैच्याकै ! इतके का मोठे दिसतात अजयजी ?
अजयजींचा फोटो शादीडॉटकॉम वर टाकला तर आजही मुली सांगून येतील.

नशीब परवा हे सौ. अजय यांच्यासमोर बोलला नाहीत ?
विकु, तुम्ही कुणाला काही न सांगता एकदम सुमडीत निघून गेलात.

सायो +१
विकु, एकदम कल्टी टाकलीत? काय को? जी एस तसे मवाळ वाटले मला, बेसमेंट मध्ये तुम्हाला धोबीपछाड द्यायचा प्लान वगैरे नव्हता त्यांचा. Proud

Pages