Submitted by तुषार जोशी on 20 January, 2012 - 21:57
बंद झाल्या सर्व वाटा डंख काळाचे विषारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
टाक मागे व्यर्थ भीती टाक मागे जीर्ण नाती
वादळा ये म्हण निघालो आज मी काढून छाती
सोस तू आघात सारे ठेव कष्टांची तयारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
गाठ तू ध्येयास ऐसे साधका आदर्श व्हावे
व्हायचे ज्याला यशस्वी हेच त्याने आचरावे
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
२० जानेवारी २०१२, ०६:००
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान .... दणकेबाज ... वीर
छान .... दणकेबाज ... वीर रसातली कविता
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी
जिद्द आशा बांध गाठी झेप घे तू घे भरारी
मस्त काव्य, मस्त संदेश
वा तुषार.. खुप छान.. आयुष्य
वा तुषार.. खुप छान.. आयुष्य जगावयास प्रोत्साहन देणारी
खुप दिवसांनी मायबोलीवर..
सुंदर!! मला खूप आवडली. अजून
सुंदर!!
मला खूप आवडली.
अजून प्रभावी झाली असती.. पण वृत्त निभावायचं असल्यामुळे चालायचंच...
वीररस. सुंदर
वीररस. सुंदर
छान कविता, आवडली.
छान कविता, आवडली.
खूप जिद्द दाखवणारी सुरेख
खूप जिद्द दाखवणारी सुरेख कविता..... छानच.
मनापासून आवडली..
मनापासून आवडली..
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही
हो दिवा अंधार पी तू उजळुदे ही रात्र सारी>>>>>छान>>>>जबराट कविता.
जबरदस्त कविता.
जबरदस्त कविता.