Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला चुकीचं ऐकू आलेलं गाणं
मला चुकीचं ऐकू आलेलं गाणं म्हणजे:
'साबुन की शकल मे बेटा तू तो निकला केवल 'झाग' ' च्या ऐवजी: 'बेटा तू तो निकला केवल 'झाड'.... !!! मी खूप दिवस विचार करत होतो की, साबणाच्या चेहेर्यात झाड कसं असेल आणि ह्या गाण्यातला बाप मुलावर इतका भडकला आहे की मुलाला तो झाड म्हणतोय?!!

इथे येऊन ह्ह्पुवा झाली!! हे
इथे येऊन ह्ह्पुवा झाली!!
हे सगळं वाचून आठवलं... रंगीला पिक्चर आला होता तेव्हा त्यातलं "अय्ययो" गाणं माझा एक मित्र असं ऐकायचा ...
छोडो छोडो कैसी बहारें क्या नजारें
अरे आओ दुम हिलाएं
मूळ गाण्यात ते "दिल मिलाएं" असं आहे!!
दुम हिलाये >>
दुम हिलाये >>

दुम हिलाए च जास्त बरोबर
दुम हिलाए च जास्त बरोबर वाटतेय...
रहमानची गाणी (खास करून त्या
रहमानची गाणी (खास करून त्या काळातली) आणि त्यातले शब्द हा एक स्वतंत्र पी एचडीचा विषय होइल.
आमच्या ग्रूप्मधे हेच गाणं आय्ययो दिल बोल असं म्हटलं जायचं... ते "आय्ययो इल्ल बो" असं आहे.
परवा मुकुंदा मुकुंदा दशावतारं
परवा मुकुंदा मुकुंदा दशावतारं मधलं हिंदि गाणं ऐकत होते. त्यात मुकुंदा मुकुंदा कृष्णा मुकुंदा मुकंदा पुढे मला मुझे दान में दे दे मिरिंडा मिरिंडा असं ऐकु आलं . ते नक्की काय आहे?
सध्या रावन मधल्या छम्मक छल्लो
सध्या रावन मधल्या छम्मक छल्लो चे लिरिक्स कोणाला कळलेत का?
मिठाई मिठाई माझे कृष्णाई
मिठाई मिठाई माझे कृष्णाई कान्हाई येई वो ... शब्द माहित असले तरी हा अभंग मला असाच ऐकू येतो
परवा मुकुंदा मुकुंदा दशावतारं
परवा मुकुंदा मुकुंदा दशावतारं मधलं हिंदि गाणं ऐकत होते. त्यात मुकुंदा मुकुंदा कृष्णा मुकुंदा मुकंदा पुढे मला मुझे दान में दे दे मिरिंडा मिरिंडा असं ऐकु आलं . ते नक्की काय आहे? >> हे सगळेच काय आहे, काही झेपले नाही.
मिरिंडा
मिरिंडा
छम्मक छल्लो लिरिक्स -
छम्मक छल्लो लिरिक्स - http://www.bollymeaning.com/search/label/RaOne
हेय ... मलाही ते मिरिंडा
हेय ... मलाही ते मिरिंडा मिरिंडाच ऐकायला येतं.
माझ्या मावशीकडे दोन आसामी
माझ्या मावशीकडे दोन आसामी मुली पेइंगगेस्ट म्हणून रहात होत्या, मी सुट्टीला गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर गाण्यांच्या भेंड्या खेळताना एकीने मेरा कुछ सामान हे गाणे असे म्हटले-
मेरा कुस सामान तुम्हारे पास पोडा हैं
साबनके कुस भिगे भिगे दिन रोख्खे हैं
पुढचं गाणं बिचारी म्हणू शकली नाही, मी इतकी खो खो हसत होते, अजूनही आठवले की हसू येते..!
स्वप्ना तुषार: मुकुंदा मुकुंद
स्वप्ना तुषार:
मुकुंदा मुकुंद कृष्णा मुकुंदा मुकुंदा
स्वरम लो तरंगा (बृ)वृंदावनम लो वरन गा
वेन्न दोंगा वैना मन्नु तिंटीवा
कन्ले गुंडे प्रेम लयला मृदंगानीवा
असे मूळ तेलुगू गाणे आहे..
हवे असेल तर पुर्ण गाणे देईन इथे..
हिंदीतः
मुझे दान में दे व्रिंदा विरिंदा विरींदा
असे आहे..
काल ऐकलेले गाणे: क्या खुब
काल ऐकलेले गाणे:
क्या खुब लगती हो
बडी बंदर दिखती हो
सारिका मला गाणी नाही पण एक
सारिका
मला गाणी नाही पण एक जाहीरात जाम चुकिचि ऐकू यायची..
विविधभारतीवर विको च्या क्रिमची जाहीरात लागते..
त्याची शेवटची ओरिजिनल ओळ अशी आहे "विको टर्मरिक फोम बेस क्रिम"
मी कित्येक दिवस ती नीट ऐकूनही, मला ते फोम बेस च्या ऐवजी 'ओमफस्स क्रिम' कधी 'ओबेस क्रिम' असंच ऐकू यायचं.
सारीका
सारीका
माझा लेक 'बॉडीगार्ड'
माझा लेक 'बॉडीगार्ड' पिक्चरमधलं गाणं असं म्हणतो -
'तेरी मेरी तेरी मेरी प्रेम कहानी है मुश्कील, दो लब्जों में ये भयानक हो जायें' :-p
सारीका
सारीका
१०० डेज मधलं गाणं... ".
१०० डेज मधलं गाणं... ". सुन्दरिया.. सुन मारिया.... शू करिया... मेहेरबानी.... तू कहे तो नाम तेरे कर दू सारी जवानी... "
हे समुद्र किनार्यावर थोडंफार शूटिन्ग असलेलं गाणं...ऐकताना बर्याचदा असं वाटायचं..
"की हे सुन्दरी ... तुझं नाव मारिया आहे... तू माझं ऐक... इथेच समुद्रातच शू कर.. आणि माझ्यावर मेहेरबानी कर...(बहुधा त्या किनार्यावर आसपास लेडीज टॉयलेट नसेल म्हणून!!! ) आणि असं जर तू केलंस.. तर मी सगळी माझी जवानी तुझ्या नावावर करेन!!! "
आम्हाला कळायचं नाही.. की समुद्रात शू करून तू मला उपकारित कर... इथपर्यन्त ठीक आहे.. पण आख्ख्ही जवानी वगैरे नावावर करण्याइत्कं काय आहे त्यात!!!!
नन्तर त्या "शुक्रिया"चा, सुन दरिया, सुन माहिया चा अर्थ कळल्यावर आम्ही लोट्पोट हसून हसून मेलो!!!!
लहानपणी कुर्बानी ह्या
लहानपणी कुर्बानी ह्या चित्रपटातलं एक गाणं मला:
आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये तो बाप बन जाये
असं ऐकू यायचं.
चंद्रमाधवी - कैतरीच मला ते
चंद्रमाधवी - कैतरीच
मला ते रा-वन मधलं छम्मक छल्लो आहे ना ते काही नीट ऐकुच येत नाही.
त्यात करीनाच सारखं 'ऐसे कमाटीया' असं ऐकु येत.
आमच्या चाळीतली काही कार्टी
आमच्या चाळीतली काही कार्टी बॉडीगार्ड सिनेमाचं टायटल साँग असं म्हणतात..
आवजी भावजी
भेलपुरी खावजी
पैसा कौन देगा तेरा बाप.
अम्या
अम्या

_निल्या_, सारिका काल 'अल्लाह
_निल्या_, सारिका
काल 'अल्लाह के बंदे हस दे' खूप दिवसांनी ऐकलं. ह्यातलं 'जो भी हो कल फिर आयेगा' चा खरा अर्थ काल लागला. मला ह्या ओ़ळी ऐकल्या की आपण घरात नसताना कोणीतरी आलं होतं असं कामवालीने सांगावं, तिला त्या व्यक्तीचं नेम़कं नाव आठवू नये आणि वैतागून शेवटी आपण 'जो कोणी आला असेल तो येईल उद्या परत' असं म्हणावं तश्यातला काहीतरी भाग वाटायचा आणि बाकी गाण्याशी त्याचा काही अर्थ लागायचा नाही. काल कळलं की ह्याचा अर्थ 'काहीही झालं तरी उद्या उजाडणारच' असा आहे.
वाटेवर काटे वेचीत
वाटेवर काटे वेचीत चाललो.......
हे गाणे मला ' वाटेवर काटे फेकीत चाललो 'असे ऐकू येत असे'
मला ते रा-वन मधलं छम्मक छल्लो
मला ते रा-वन मधलं छम्मक छल्लो आहे ना ते काही नीट ऐकुच येत नाही.
त्यात करीनाच सारखं 'ऐसे कमाटीया' असं ऐकु येत.
एकू आलं तरी कळणार नाही कारण ते तामीळ मधे आहे
[Hamsika (Tamil):]
Unnai thottal En Ullathai
Norukka maattiyo
Ennai pola pennai parthu
Mayanga maattiyo
Kannil kannai pootti vittaal sirikka maattiyo
Ennai unnil sooti vittaal
Ottikka maattiyo
http://www.elyricsworld.com/chamak_challo_lyrics_akon.html
काल माझा ११ वर्षांचा लेक गात
काल माझा ११ वर्षांचा लेक गात होता......चाल ओळखीची वाटली म्हणून नीट ऐकलं गाणं.
कुठे ऐकलस विचारलं तर म्हणाला रिक्षात ऐकलं.
तर गाण.....
किर्तनाला रंगबाई होळीचा,होळीचा
काथला ग ठेचा माझ्या पोळीचा
मी जाम हसत सुटले. तो बिचारा फारच तल्लीनतेने गात होता चित्र काढताना.
काहि काहि धमाल..... तर इशान
काहि काहि धमाल.....
तर इशान (४ वर्ष वय) बॉडीगार्डमधल गाण अस म्हणतो,
तेरी मेरी मेरी तेरी गुळाची पापडी .....
आणि दुसरं कोणी म्हणत असेल तर मेरी तेरी नंतर ओरडुन गुळाची पापडी जोडतो.
त्या प्यार का मौसम
त्या प्यार का मौसम सिनेमातल्या शशी कपुरच्या 'नी सुल्ताना रेSSS .. " बद्दल झालय का आधी?
मी ते गाणं पुर्वी असं ऐकायचे
"ओ निकल पडा रे...प्यार का मौसम आया"
अगदी अलिकडे ते समजलं की नी सुल्ताना रे...असं आहे.
Pages