सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जागू आणि जिप्सी दोघांचे
जागू आणि जिप्सी दोघांचे अभिनंदन.
२०१२ मधे असे अभिनंदनाचे योग सगळ्यांच्या आयुष्यात येऊ देत.
खूप दिवसांपूर्वी एकांनी या
खूप दिवसांपूर्वी एकांनी या ब्रोमिलियाचं रोप दिलं होतं. सध्या घरी थोडं बांधकाम चालू आहे म्हणून याला बागेतल्या एका कोपर्यात ठेवलं होतं. आज ऑफिसमधून लवकर आले आणि बागेला पाणी देताना लक्षात आले की याला छान फुलोरा आला आहे!
सरत्या वर्षाची नि ग वाल्यांना भेट.............
आज खूssssप दिवसांनी इथे आले.
आज खूssssप दिवसांनी इथे आले. जागूला लागल्याचं वाचलं आणि डायरेक्ट शेवटच्या पानावर आलेय. आता कशी आहेस जागू?
केश्व्विनी अग तिच्या नंतर
केश्व्विनी अग तिच्या नंतर अजुन बर्याच पडल्यात नी आता उठल्यात.
नविन वर्षात कोणी न पडो हिच प्रार्थना.
नविन वर्ष सर्वांना हिरवे हिरवे, सृष्टीने नटलेले जावो.
नविन वर्ष आपणां सर्वांना
नविन वर्ष आपणां सर्वांना प्रदुषण विरहित, आरोग्यवर्ढक,
सुख- समृद्धी आणि भरभराटीचे जावो !!
ब्रोमेलियाचा रंग मस्तच आहे,
ब्रोमेलियाचा रंग मस्तच आहे, शांकली.
नितीन, आता परत वेगवेगळी झाडे लावली जाताहेत हे छानच.
काहि वर्षांपुर्वी पीतमोहोर, त्यापुर्वी ऑस्ट्रेलियन बाभूळ, त्यापुर्वी गुलमोहोर आणि त्यापुर्वी पर्जन्यवृक्ष असे साथीचे रोग येऊन गेले मुंबईत (रोगांची लक्षणे अजून आहेत..)
काहि वर्षांपुर्वी पीतमोहोर,
काहि वर्षांपुर्वी पीतमोहोर, त्यापुर्वी ऑस्ट्रेलियन बाभूळ, त्यापुर्वी गुलमोहोर आणि त्यापुर्वी पर्जन्यवृक्ष असे साथीचे रोग येऊन गेले मुंबईत (रोगांची लक्षणे अजून आहेत..) >>>
दिनेशदा मला वाटत गुलमोहोर आणि पावडरपफ यांच रोपन रस्त्याच्या बाजुला सध्या कमी केल जातय
या झाडांमुळे सावली तर खुप मिळते पण यांचे पावसाळ्यात उन्मळुन पड्ण्याचे प्रमाण जास्त आहे.
शिवाय अश्या झाडांमुळे बॅनरबाजीत पण अडथळे येतात.
शांकली - ब्रोमेलियाचा जांभळा रंग मस्तच आठवा... हाच तो जेम्सच्या पाकिटात असलेल्या विविध रंगीत गोळ्यांपैकी काही गोळ्यांचा, माझे तर दोन्ही आवड्ते रंग पण गोळ्यापण.
गुलमोहोराने तर वेडच लावले
गुलमोहोराने तर वेडच लावले होते लोकांना, त्या काळात बांधलेल्या कितीतरी बंगल्यांची / सोसायटींची नावे गुलमोहोर होती. डेक्कन क्वीनने रोज करणार्या लोकांनी, खंडाळ्याच्या घाटात गुलमोहोराच्या बिया फेकल्या होत्या, त्याची झाडे वाढली होती... डेक्कन क्वीनला ५० का ६० वर्षे झाली, त्यावेळी ती झाडे मुद्दाम दाखवली होती, दूरदर्शनवर !
मी अनेकवेळा लिहित असतो, कि जीवसृस्टीतली विविधता हे आपले वैभव आहे. युरपमधे (ब्लॅक फॉरेस्ट वगैरे) जी जंगले आहेत ती एकाच प्रकारच्या झाडांची आहेत.
आपल्याकडच्या कुठल्याही नैसर्गिक जंगलात अशी एकाच प्रकारची झाडे नसतात.
ईन मीन तीन, मुचकुंद लावला आहे
ईन मीन तीन, मुचकुंद लावला आहे हे वाचून खूपच आनंद वाटला. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलच्या आवारातसुद्धा खूपच मोठे वाढलेले ३ वृक्ष आहेत.
नाहीतर दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे गुलमोहर,पेल्टोफोरम,रेन ट्री,काशीद/कसोड,स्पॅथोडिया असेच वृक्ष लावले जातात.
आपल्याकडच्या कुठल्याही नैसर्गिक जंगलात अशी एकाच प्रकारची झाडे नसतात.>>>>>>१०००० टक्के अनुमोदन!
जमल्यास हे वाचा
जमल्यास हे वाचा maayboli.com/node/31522
(No subject)
दिनेशदा, गुलाब अतिसुंदर! सर्व
दिनेशदा, गुलाब अतिसुंदर!
सर्व नि.ग. प्रेमींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
सर्व नि.ग. प्रेमींना नवीन
सर्व नि.ग. प्रेमींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
आजचा नवा सूर्य, माझ्या
आजचा नवा सूर्य, माझ्या घराच्या खिडकीवरचे प्रतिबिंब..
दिनेशदा, कधी येऊ
दिनेशदा, कधी येऊ तुमच्याकडे???
पक्षी टिपायला (कॅमेर्यातुन :फिदी:), फुले/निसर्ग पहायला आणि तुमच्या हातचे पदार्थ चाखायला.
कधीही_ये_रे.
कधीही_ये_रे.
सर्वांना नविन वर्षाच्या
सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला सर्वांनीच जाऊया...
चला सर्वांनीच जाऊया... निसर्ग गटग तिकडेच...
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
चला सर्वांनीच जाऊया... निसर्ग
चला सर्वांनीच जाऊया... निसर्ग गटग तिकडेच..>>>>जोरदार अनुमोदन
आमच्याकड्चा_रांगडा_निसर्ग!!!!
आमच्याकड्चा_रांगडा_निसर्ग!!!!
या_नक्की_!!!
नविन वर्षाच्या सर्वांना
नविन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा नविन वर्षात पृथ्वीतलावर निसर्गाची चांगली निगराणी केली जाउदे.
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
शांकली, जंगली बदामाची फळे यायचा हंगाम सध्या चालु आहे का?
आज एम आय टी शाळेच्या गेट्जवळ एक झाड पाहिले. त्याला मोठी लाल फळे होती. पाने साधारण सप्तपर्णीसारखी होती. पण बरीचशी पाने पिवळी झाली होती आणि काही गळाली होती.
ते जंगली बदाम सायनला साधना
ते जंगली बदाम सायनला साधना विद्यालयापाशी खूप आहेत. मी त्यांना पुर्वी सागरगोटे समजायचे.
सर्वांना नवीन वर्षाच्या
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिनेशदा, मस्त फोटो.
जिप्स्या, मला विसरू नको रे..........लाडू द्यायला.
ज्यानी वाचलं माही
ज्यानी वाचलं माही त्यांच्यासाठी हा निसर्ग.
http://www.maayboli.com/node/31336
पुणातल्या नि.ग.
पुणातल्या नि.ग. प्रेमींसाठी,
पुण्यात पुढच्या आठवडयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषद आहे. त्यात विविध प्रकारची चर्चासत्रे, झाडांचे औषधी उपयोग व माहिती देणार आहेत. तसेच औषधी वनस्पतींच्या रोपांची विक्री इ. आहे.
सर्व नि.ग.प्रेमींना नवीन
सर्व नि.ग.प्रेमींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेछा..
आस, ती परिषद कोठे आहे ? ठिकाण कळल्यास जाण्याचा प्रयत्न करीन.
दिनेशदा, प्रज्ञा, शोभा, सगळ्यांची फुले खुपच सुरेख आहेत.
सेनापतींना १००% अनुमोदन . पुढचे नि.ग.चे गटग दिनेशदां कडेच....
आस अजुन माहिती द्या ना
आस अजुन माहिती द्या ना कॉनफरन्स बद्दल.
दिनेशदांच्या गुलाबाला हा माझा
दिनेशदांच्या गुलाबाला हा माझा झब्बू. ( आमच्या ऑफिसमधील )
https://picasaweb.google.com/104889037919891930576/January22012?authuser...
आस, खरंतर जंगली बदामाचा हा
आस, खरंतर जंगली बदामाचा हा फळं येण्याचा काळ नाही. आत्ता पानगळ होते आणि साधारणत: फेब्रू-मार्चच्या सुमारास अगदी लहान झुपक्यांमधे फुलोरा येतो. ही सध्या दिसणारी फळं आहेत ती मागील हंगामात लागलेली आणि आता पिकलेली फळं आहेत. पानगळीमुळे इतके दिवस ती लपली होती.
ही फुलं, आणि फळांच्या आतल्या बिया खूप दुर्गंधी असतात.
या जंगली बदामाप्रमाणेच लाल सावर (काटेसावर), सोनसावर (गणेर) आणि पांढरी सावर यांची पण पानगळ होतीये. त्यांनाही फेब्रू-मार्चच्या सुमारास फुलं येतात.
Pages