निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, एकदम काढून नको टाकू वेल. वर दिनेशदा आणि शशांक म्हणताहेत तसं फांद्या कापून पाणी घाल. थोडी वाट पहा अजून, तगेल नक्की. चिवट असते ती वेल.
माझ्याकडे होती पूर्वी. आम्ही अंबरनाथला रहात होतो तेव्हा... तिची फुलं, कळ्या सगळंच खूप गोड दिसतं.
शशांक, रोहितकाच्या माहितीबद्दल धन्यवाद. बहुदा आमच्या complex मध्ये असेल. बघते उद्या आणि सांगते.

जे गुलाबांचे फोटो टाकत असतो, ती झाडे जिथे ऊगवली आहेत / वाढत आहेत त्या जागांचे फोटो टाकले तर तूमच्या विश्वासही बसणार नाही. >> दिनेशदा लवकर टाका. मला नेहमीच कुतुहल असते...अश्या जागेचे.

(अशा जागेवरील मातीचे नमुने मी नेहमी सोबत घेतो)

हो चातका, या विकेंडला करतो ते काम !
दुबईबद्दल मला नीट नाही सांगता येणार पण मस्कतमधे कुठेही खजूराची, बोराची, विलायती चिंचेची झाडे उगवलेली दिसायची, तसे इथे फुलझाडांचे आहे.
नैरोबी समुद्रसपाटीपासून बरेच ऊंचावर आहे, हवा थंड, पाऊस भरपूर त्यामूळे इथे झाडे भराभर वाढतात. पण जसे आपण रिफ्ट व्हॅलीत उतरतो, त्याबरोबर जास्त करुन बाभळीची आणि निवडुंगाची झाडे दिसायला लागतात. नैरोबीहूनही ऊंचावर असलेल्या ठिकाणी (जसे माऊंट केनया ) आणखी वेगळी झाडे आहेत.

दिनेशदा, या रोहीतकाचा फुलोरा मात्र अगदी अनाकर्षक असतो. याला फुलं येऊन गेल्याचं फळं लगडल्यावरच कळतं. खूप बारीक फुलांच्या मंजिर्‍या असतात.

ज्ञानेश, नाचणाचा फोटो मस्त.

चातक वाळूवर उगवलेलं हे सोनं बघून त्या सोन्यालासुद्धा नक्की हेवा वाटेल या फुलांच्या भाग्याचा.

वैजयंती, अजिबात अडाणी प्रश्न नाही. ती फळं अंजीर किंवा उंबरासारखीच दिसतात.

म्हणजे शांकली,
साग, जंगली बदाम यासारखीच गत. इथे अवाकाडोचे पण असेच. फुले आलेली कळतही नाहीत, पण फळे मात्र नारळाएवढी मोठी.

हि झाडे लावायला पाहिजेत आपल्याकडे. गोव्याला चांगली वाढतात. वर्षभर हिरवी असतात, सावलीला चांगली. आणि इथेतरी भरपूर फळे लागतात.

अगदी अगदी, दिनेशदा.... मलातर नेहेमी असा प्रश्न पडतो की आपल्याकडे सुंदर पर्णसंभार, सुवासिक फुलं आणि रसदार-चवदार फळं असलेली अनेक देशी वृक्षसंपदा असताना आपल्याकडची 'कारभारी' लोकं परदेशी वृक्षांच्या मागे का लागतात?
हा रोहीतक सुंदर पाना-फळांचा, औषधी गुणधर्माचा इतका सुंदर वृक्ष आहे आणि तो आत्ता आत्ता लावला जायला लागलाय.

प्रज्ञा, त्या हमिंग बर्ड्स मधला एक माझ्या बागेत येतो Happy इतका गोड असतो आणि तितकाच चपळ - मला एकदाच त्याचे फोटो मिळाले - ह्याचं नाव Anna's Humming Bird

@ शांकली - >>देशी वृक्षसंपदा असताना आपल्याकडची 'कारभारी' लोकं परदेशी वृक्षांच्या मागे का लागतात?>>

मला वाटतं की इतकी वृक्षसंपदा आपल्याकडे आहे याचा कित्येक लोकांना पत्ताच नसतो - त्यांना जर ती माहिती देणारा आणि त्यांचे महत्व सांगणारा स्त्रोत मिळाला तर ते आपल्या संपदेकडे पुन्हा वळतील अशी मला आशा वाटते.

हा झब्बू हमिंग बर्डला........
काही वर्षांपूर्वी आमच्या बागेत आलेलं हे सन बर्डचं (फुलचुखी, शिंजीर) पिल्लू (मादी)

sunbird.jpg

दोन्ही पक्षी मस्त.

शशांक, मला नेहमीच वाटत आलेय कि पक्ष्यांना काही माणसांबद्दलच विश्वास वाटतो, आणि त्याच्या जवळ ते जातात.
माझा स्वतःचा अनुभव असा आहे कि, नैरोबी शहरातले पक्षी माझ्या जवळ अजिबात येत नाहीत, पण मी इथल्याच कुठल्याही बागेत गेलो, कि तेच पक्षी मुद्दाम माझ्या समोर येऊन नाचतात. अक्षरशः फोटो काढ म्हणून आग्रह केल्यासारखे करतात.

मला नेहमीच वाटत आलेय कि पक्ष्यांना काही माणसांबद्दलच विश्वास वाटतो, आणि त्याच्या जवळ ते जातात.
माझा स्वतःचा अनुभव असा आहे कि, नैरोबी शहरातले पक्षी माझ्या जवळ अजिबात येत नाहीत, पण मी इथल्याच कुठल्याही बागेत गेलो, कि तेच पक्षी मुद्दाम माझ्या समोर येऊन नाचतात. अक्षरशः फोटो काढ म्हणून आग्रह केल्यासारखे करतात.>>>>>.... फार म्हणजे फारच भाग्यवान आहात दिनेशदा तुम्ही, अगदी क्वचितच सापडतील अशा मंडळींपैकी...
सर्वांना मनापासून धन्यवाद.

शशांक काय धीट आणि गोड आहे पक्षी!
आणि हो मी ती मधुमालती आत्ता काढणार नाहीये. कारण ती कुठून कुठून चढलीये वर. काढणंही अवघ्ड आहे. आणि परत ती फुलायला हवीये मला!

मानुषी, मधुमालती अतिशय चिवट असते ... लहानपणी रेल्वे क्वार्टरमध्ये आमच्याकडे मधुमालती होती, तिची मुळं पार घराच्या खाली गेली होती. एका खोलीत शहाबादी फरशांमधल्या फटीतून तिचे धुमारे फुटायचे. किती काढलं, तरी आठवडाभरात खोलीत पुन्हा नवे कोंब आलेले असायचे! त्यामुळे मधुमालती येईल. इतकं सोपं नाही मधुमालतीचं झाड मारणं Happy

पक्ष्यांना काही माणसांबद्दलच विश्वास वाटतो,>>>> मंडाल्याच्या तुरुंगात लोकमान्य टिळक तुरुंगवासात होते तेव्हा काही चिमण्या त्यांचे हातातून तांदूळ टिपून खात अस वाचलय. ( लोकमान्य सामान्य कैदी नाहीत, मॅक्स म्यूलर सारख्या विद्वानाची यांना पत्रे येतात याची तुरुंगाधिकार्‍याला जाण होती आदर होता ).
तुकाराम महाराज ही चिमण्या आपल्याला घाबरतात म्हणून दु:खी झाले होते कारण सर्वाभूती असलेला परमेश्वर जर माझ्यात वास करतो व चिमण्यांमधे ही वास करतो तर चिमण्यांनी मला का घाबरावे ? असा विचार त्यांचे मनी आला होता व आपल्याला अधिक साधना करायला हवी असे त्यांना वाटले होते.

सहज वाचलेले आठवले म्हणून लिहिले.

सहज वाचलेले आठवले म्हणून लिहिले.>>>>मलाही एक आठवलं. शाळेत असताना सानेगुरुजींचा एक धडा होता. आणि मला उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धेत हा विषय आला होता त्यात मी हि ओळ वापरली होती आणि पहिल्या क्रमांकाचे बक्षिसही मिळवले होते. Happy

"चिमणी येऊन नाचून गाऊन
काय म्हणे मजला?
चिवचिव करीन चिंता हरेन
हस रे माझ्या मुला" Happy

(आजही सगळं पाठ आहे. वकृत्व स्पर्धेतले माझे पहिले बक्षिस होते.) Happy

या निमित्ताने पुन्हा आठवले Happy धन्स लोक्स Happy

Pages