निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, माझा एक्झोराचा अनुभव सांगितल्यावर एका अनुभवी बागप्रेमींनी मला वेगवेगळ्या रंगाचे एक्झोरा शक्यतो जवळ जवळ न ठेवण्याचा सल्ला दिला, आणि ही कमळांविषयीची माहिती सांगितली. मी हे कुठे वाचलेलं नाही / पडताळून पाहिलेलं नाही.

नमस्कार मित्रांनो जवळ जवळ १५ दिवसानंतर आलोय,
हा काळ माझ्यासाठी अतिशय वाईट आणि खड्तर होता.
नंतर सविस्तर लिहीनच.

दिनेशदा हेच ते ताडाचे झाड ज्याचा उल्लेख मागे मी केला होता.

ताडावर वड !!
पाम वर्गातली झाडे तोडली तर त्यांना फुटवा येणार नाही, पण मला वाटतं वरपर्यंत पाणी खेचले जात असावे. म्हणून हे झाड तग धरुन आहे.

बहुतेक झाड वेलींचा प्रयत्न सर्वात वरती पोहोचण्याकडे असतो, असा आयता घोडा मिळाला तर काय, मज्जाच की.
(नितीन, आता सगळे सुरळीत आहे ना ?)

अरे व्वा.. सगळ्यांची फुले एक से एक आहेत. एकदम प्रसन्न वाटले बघुन. Happy

दिनेशदा, धन्स निळ्या गुलाबाविषयी सांगितल्याबद्दल.

नितीन, आम्हाला काही करता येण्यासारखे असेल तर अवश्य सांग.
---------

हे आपल्या हयातीत होणार नाही कदाचित, पण वरच्या फोटोतले जे झाड आहे त्याची मूळे या खोडाभोवती लॅटिस विणत खालपर्यंत पोहोचतील. हळूहळू मधला बुंधा सुकून / कुजून जाईल. मग हे झाड असेच वर वाढत जाईल. मग मधून पोकळ असे जाळीदार खोड निर्माण होईल.
असे होण्यासाठी या खोडाची ऊंची बरीच जास्त आहे. कदाचित त्या आधीच वार्‍याने मधले खोड पडेल.

असे वाढलेले (म्हणजे पोकळ बुंध्याचे) कोल्हापूरला रंकाळ्याजवळ आणि गोव्याला पर्वरीला बघितले होते.

दिनेशदा नक्कीच Happy

खिडकितल्या झाडांना कबुतरांचा त्रास होत असेल तर - झाडाच्या बाजुला भिंगरी लावावी, हो तीच लहान मुलांची आवड्ती भिंगरी , पण हा उपाय हवा खेळती असेल तरच कारगर होउ शकतो, भिंगरीच्या फिरण्यामुळे कबुतर बिचकतात. Happy

नितीन, परमेश्वरकृपेने तुझा खडतर काळ लगेच संपो.
फोटो एकदम अनोखा आहे. दिनेशदा, तुम्ही जे वर्णन केलं ना ते डोळ्यांपुढे उभं राहिलं अगदी!

गौरी, अगं मी पण कमळांच्याबाबत असंच ऐकलं आहे. आणि माझ्या एका आत्तेबहिणीकडे ३/४ प्रकारची कमळं आहेत आणि ती वेगवेगळ्या बादल्यांमधे लावलेली आहेत. पण एक्झोराचं मात्र आत्ताच कळालं.

जिप्सी आणि आशुतोष फोटो सुंदर!

ताडाच्या झाडावर वादाचे झाड अप्रतिम. दिनेशदांचे बरोबर एकदम. असे होईल पण कदाचित आपण नसू...

ठाण्याहून ट्रेनने दादरकडे जाताना कांजुरमार्ग स्टेशनच्या जरा अलीकडे डाव्या बाजूला एक ताडाचे झाड आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात जसे ताडाचे झाड होते तशी ह्या झाडाला पण २ खोडे फुटली होती. ह्यापुढे अजून गंमत म्हणजे त्या २ खोडांना पुन्हा २-२ खोड फुटले होते. म्हणजे एकूण ४. ट्रेन प्रवास बंद झाल्याने गेल्या ३-४ वर्षात ते झाड पाहिले नाही. कधीतरी जमल्यास फोटो काढायला जावे लागेल.. Happy

सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन आणि निसर्ग तज्ञांना त्रिवार मुजरा !! Happy इथे ज्यांच्याकडे रहाते त्यांच्या घराला मस्त मोठ्ठं अंगण आहे. आणि काकूंनी छान झाडं लावली आहेत. थोडे फुलांचे फोटो टाकायचे होते पण काही केल्या फोटो इथे टाकता येत नाहीयेत. आत्ता upload च होत नाहीये फोटो. बघुया कधी जमेल तेव्हा टाकेन.

कडीपत्त्याचे झाड कसे लावतात ? काड्या लावयच्या का ? मी सध्या मेलबर्नला आहे, उन आहे भरपूर आणि बाग पण आहे घराबाहेर, कधी केलं नाहीये बागकाम, सहज मनात आलं की कढीपत्ता लावला तर... Happy

ज्यांच्याकडे कढीपत्त्याचे मोठे झाड असते त्या झाडाखाली आपोआप अनेक रोपे उगवलेली असतात, त्यापैकी एक अलगद उपटून आणायचे.
मोठ्या काड्या पण चांगल्या हवामानात तग धरतील. कढीपत्त्याला फळे येतात आणि त्यात बियाही धरतात. त्यापण रुजतील.
पण रोपांचा पर्याय जास्त चांगला.

कढीपत्याची काडी माझ्यामते नाही रुजत. कढीपत्याच्या झाडाभोवती भरपुर छोटी झाडे उगवतात तीच लावायची खणून. माझ्याकडेही भरपुर आली आहेत रोपे.

सेनापती ताडाच्या , म्हणजे ताडगोळ्याच्या झाडाला अश्या फांद्या मी ठाण्यामधे शिरगाव च्या किल्ल्याच्या भोवताली पाहिल्यात पण माडाच्या झाडाला जे सिंधुदुर्ग च्या किल्ल्यामधे होते ते मात्र दुर्मिळच

जागू, या तिघांपैकी कोण तग धरेल ते काळच ठरवेल. कदाचित तिघेही सुखात म्हणजे गुण्यागोविन्दाने वाढतील.
माझ्या आजोळी, वड पिंपळ एकत्र असले कि ते पवित्र मानतात, आणि त्याला पार बांधतात.

जागू, वड आणि पिंपळ दोन बांडगुळं त्याच्यावर आल्यावर ताडाचं झाड किती दिवस तग धरणर!

ओरिसामध्ये राऊरकेल्याला बघितलं - वड आणि पिंपळ मुद्दाम एकत्र लावतात. हे कॉंबिनेशन तिथे पवित्र समजलं जातं - त्याला ‘लक्ष्मीनारायण’ म्हणतात.

दिनेशदा, योगेश, सारीका, साधना, मामी आत्ताच मिस्टरांचा फोन आला आम्हा गावकर्‍यांवरचे संकट टळले आम्हाला स्टे मिळाला. Happy

हो साधना खरच परमेश्वरकृपेने तसेच घडो. आज इतक्या दिवसांनी खुप चांगले वाटत आहे. आता उद्यापासून माझा कॅमेराही चालू करेन. किती दिवस बिचारा तोही टेन्शनने बाहेर नव्हता आला Happy

गौरी,
हि दोन्ही झाडे एकत्र असली म्हणजे त्यावर अनेक पक्ष्याप्राण्यांच समेलनच भरते. घरट्यासाठी आधार असतोच शिवाय त्यांच्यासाठी खाऊची पण व्यवस्था होतेच.

दिनेशदा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा होत्याच पाठीशी.

आनंदी आनंद गडे सध्या आमच्या परीसरात झाला आहे.
mohor.JPG

मोने हो ग. तुला फोनायचच राहील. नंतर सवडीने करते.
आता थोड्याच दिवसात सुरंगीचे आगमन होईल.
surangi12_0.JPG

जागू, आता संकट कायमचे टळू दे म्हणजे झाले.>>> +१
दिनेशदा, खरंय. वडाचं किंवा पिंपळाचं झाड म्हणजे तिथे पक्ष्यांचे थवे असतातच.

पिंपळाच्या पानाची जाळी हि आमच्या लहानपणी मर्मबंधातली ठेव असायची. ते अखंड पान मिळावे म्हणून काय धडपड असायची. माझ्या मावशीने त्यावर शंकराचे पेंटींग केले होते. त्याला फ्रेम करुन ते आमच्याघरी पूजेत ठेवले होते.
फणसाच्या पानाला पण अशी जाळी पडते.
--------
आफ्रिकेत शिराळ्याचा (लूफा) चा उपयोग खास करुन अंग घासण्यासाठीच करतात. त्यालापण अशीच जाळी पडलेली असते. माझ्या लहानपणी त्याच्या पर्सेस करायच्या.
माझ्या आईचे आणि बहिणीचे असे बरेच उद्योग चालायचे. केवळ स्वतःच्या सुखासाठी
चालायचे ते.... वेळ मजेत जायचा, शिवाय कलाही अंगी बाणायची.....

मग टिव्हीवरच्या मालिका आल्या !!

Pages