सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
निकिता, गौरी हो नक्कीच टळेल.
निकिता, गौरी हो नक्कीच टळेल. सांगेन नंतर.
दिनेशदा त्या पानांना जाळी येण्यासाठी आम्ही पाने पाण्याच्या डबक्यात ठेवायचो. आपोआप ४-५ दिवसांनी जाळी यायची.
आम्ही बि साठी शिराळी लटकवून ठेवतो तेंव्हा अशीच जाळी येते.
शिराळ्याचा वेल होता आमच्याकडे
शिराळ्याचा वेल होता आमच्याकडे ... किती वाटून टाकली, खाल्ली, तरी संपता संपायची नाहीत. आम्ही पण त्यांची जाळी अंग घासायला वापरायचो.
आणि पिंपळाचं भलं मोठं झाड पण होतं मागच्या अंगणात ... त्याच्या पानांच्या जाळीवर चित्रकलेचे प्रयोग चालायचे
स_सा.. सिंधुदुर्गातले ते झाड
स_सा..
सिंधुदुर्गातले ते झाड नाही राहिले आता... ४ वर्षे झाली ते मारून. वीज पडली त्यावर...
दिनेशदा.. जागू... कधी करताय निसर्ग गटग... यंदा तुम्हा सर्वांना भेटायची इच्छा आहे..
दिनेशदा.. जागू... कधी करताय
दिनेशदा.. जागू... कधी करताय निसर्ग गटग... यंदा तुम्हा सर्वांना भेटायची इच्छा आहे.. >
हो हो या वेळी मला पण यायच आहे.
मग टिव्हीवरच्या मालिका आल्या
मग टिव्हीवरच्या मालिका आल्या !!>>> कित्ती दडले आहे या ४ शब्दात
जागू, बरे झाले संकट टळले.
जागू, बरे झाले संकट टळले. साधनाला अनुमोदन. ते कायमचे टळू दे.
साधना, किती दिवसांनी दिसलीस! बरं वाटलं तुला बघून.
अभिनंदन जागू जागू, आता संकट
अभिनंदन जागू
जागू, आता संकट कायमचे टळू दे म्हणजे झाले.>>> +++++१००००
कणबर्गी (बेळगाव) येथे दिसलेला
कणबर्गी (बेळगाव) येथे दिसलेला हा माड. यात एकाच नारळाला तीन कोंब आले होते असे इकडच्या चौकीदाराने सांगितले आणि आवर्जुन हे दाखवले आणि हे झाड ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहे असेही सांगितले.
मीही सध्या थोडा बीझी असल्याने
मीही सध्या थोडा बीझी असल्याने फार कमी वेळा मायबोलीवर येतोय.
वर्षाचा हा शेवटचा काळ खूप लोकांना वाईट गेला, पण मला मात्र वर्षाची हि अखेर खूप आनंद देऊन जात आहे.
येणारं वर्ष सगळ्यांनाच आनंदाचे जावो हिच सदिच्छा!!!!!!
(विषयांतराबद्दल क्षमस्व)
जिप्स्या तुझा आनंद द्विगुणित
जिप्स्या तुझा आनंद द्विगुणित पण होऊ देरे... तुझ्या आनंदात आम्हीही आनंदी आहोत. (पेढे मात्र खाल्लेले नाहीत अजुन ही गोष्ट वेगळी )
साधना द्विगुणीत करेल तो
साधना द्विगुणीत करेल तो कदाचीत पुढच्यावर्षी
साधना द्विगुणीत करेल तो
साधना द्विगुणीत करेल तो कदाचीत पुढच्यावर्षी >>> :), जिप्सी वाचतोयेस ना.
साधना, अगं धेडा तयार आहे
साधना, अगं धेडा तयार आहे आता... असं सांगायचय त्याला !
==
मिलिंद बोकीलांच्या समुद्रापारचे समाज या पुस्तकातला संदर्भ घेऊन -
मला लहानपणापासून असे वाटायचे कि फणस कापून त्यातले नेमके काय खायचे हे माणसाला कसे कळले असेल, किंवा नारळ फोडून आतले काय खायचे, हे कसे कळले असेल ?
बोकिलांनी त्यांच्या पुस्तकात, एका नैसर्गिक शेती करणार्या तज्ञाचा हवाला देऊन असे लिहिलेय, कि नारळाच्या झाडावर चढून नारळ काढणे, अनैसर्गिक आहे. नारळाच्या झाडाला ते अजिबात आवडत नाही. नारळ तयार झाला कि झाड नारळ खाली टाकून देते, आणि तेच तूम्ही खावेत (शहाळी नव्हेत) अशी त्या झाडाची अपेक्षा असते.
म्हणूनच ते फळ एवढे मजबूत केलेय. झाडावर चढून नारळ काढले नाहीत, तर तेच झाड अनेक पटीने उत्पादन देते. आणि तसेही फार प्राण्यांना ते फळ फोडता येत नाही.
मी वाचल्याप्रमाणे एक खेकडाच तो पराक्रम करु शकतो. उंदीर, घुशी नुसते देठ कुरतडतात.
तसेच फणसाबाबत. फणस झाडावरुन उतरवावा लागतो (कारण आपल्याला कच्च्या फणसाची भाजी करायची असते) पूर्ण पिकलेला फणस झाडावरुन बद्कन खाली पडतो आणि आपोआप उकलतो. त्यातले गरे सहज काढता येतात. एक कांडेचोर (लांब नख्या असलेला, कोकणातील एक प्राणी) सोडला, तर फणस फोडणे कुठल्याच प्राण्याला शक्य नाही. माकडे प्रयत्न करुन बघतात, एवढेच.
तयार झालेले डाळींब पण असेच झाडावरच उकलते.
हे पुस्तक पण निसर्गप्रेमींना वाचण्यासारखे आहे. नैसर्गिक शेती, हे एक फॅड आहे का ? एका माणसाने दुसर्या माणसाला मदत का करायची ? थायलंड आणि फिलिपीन्स मधे लैंगिक बाजार का फोफावला, याचे छान विवेचन केलय.
जिप्या अभिनंदन रे
जिप्या अभिनंदन रे (आत्तापासुनच)
दिनेशदा छान आहे आशय. नारळ
दिनेशदा छान आहे आशय.
नारळ माकड फोडतात हे दृश्य मी डिस्कव्हरीला पाहीले आहे.
साधना, जागू, मोनाली, दिनेशदा,
साधना, जागू, मोनाली, दिनेशदा, सचिन >>>>>>>धन्यवाद
(पेढे मात्र खाल्लेले नाहीत अजुन ही गोष्ट वेगळी )>>>>पेढे काय पार्टीच देतोय बोला कधी भेटायचे???
दिनेशदा मस्त आशय
रच्याकने, ते वरील फोटोत एकाच नारळाला ३ धुमारे कसे? मी पहिल्यांदाच पाहिलंय हे?
जिप्स्या, कधी कधी नारळ जूळा
जिप्स्या, कधी कधी नारळ जूळा असतो, त्यातून असे धुमारे फुटतात.
नारळाचे डिझाईन फार खास असते. सहसा नारळ समुद्रकिनारीच वाढतात. तो पुर्ण वाढला कि आतले पाणी सुकून जाते व आत पोकळी तयार होते. त्याचा होडीसारखा आकार आणि आतली पोकळी यामूळे तो समुद्रात तरंगतो. लाटांबरोबर वहात जाऊन, दुसर्या किनार्याला पोहोचतो. तिथे रेतीत एका जागी स्थिर झाला कि तो रुजतो. मकरवृत्त आणि कर्कवृत्तामधल्या बहुतेक समुद्रकिनार्यावर त्याचा असाच प्रसार झाला असणार. मग किनार्यापासून दूर तो माणसाने नेला.
धन्स दिनेशदा
धन्स दिनेशदा
साधना, अगं धेडा तयार आहे
साधना, अगं धेडा तयार आहे आता... असं सांगायचय त्याला !
येस.. बरोबर
सावंतवाडीची माकडे झाडावरचे नारळ, नारळाचे तिन डोळे अस्तात त्यापैकी एक डोळा फोडुन् त्यातुन बोटे घालुन आतले खोबरे खायची आणि मग पाणीही प्यायची. असोल्या नारळाचे डोळे त्यांना कसे सापडायचे हे त्यांच्या जन्माला गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला
लाईफ या सिरिजमधे काही
लाईफ या सिरिजमधे काही माकडांचे कौशल्य दाखवलेय.
नारळासारखाच पण एक छोटा नट ते अगदी निवडून तोडतात. मग त्याचे वरचे कठीण साल दाताने काढतात. मग तो सात दिवस उन्हात वाळवातात (हो सात दिवस) मग तयार केलेल्या एका खास कातळावर तो घेऊन जातात. त्या कातळावर खोलगट भाग त्यांनी तयार केले आहेत. त्यात तो नट ठेवून दुसर्या दगडाने तो फोडतात. आणि मग आतला गर खातात.
हे तंत्र त्यांचे त्यानीच शोधून काढलेले आहे. आणि पिल्ले पण बघत बघत ते शिकतात. पण ते शिकताना, अनेक घोळ घालून ठेवतात.
कुठला नट तोडायचा, तो कसा सोलायचा, मग कातळावर खोबणी का करायच्या (नाहीतर तो सटकतो) वर आपटायचा दगड कसा निवडायचा.. हे सर्व ती माकडे अनुभवातूनच शिकली आहेत.
कॅप्युचिनो माकडं ना ती
कॅप्युचिनो माकडं ना ती दिनेशदा?
जिप्सी, मग आम्हाला या नविन
जिप्सी, मग आम्हाला या नविन वर्षात लाडू बिडू मिळणार ना? आणि पार्टीच्यावेळी आम्हाला विसरू नकोस बरंका! (आणि आम्हाला इ-पार्टी, इ-पेढे नकोत!)...........
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/31551
दिनेशजी हे कोणते फळ आहे
जिप्सि, शांकलीला १००%
जिप्सि, शांकलीला १००% अनुमोदन. आंम्हाला ई पेढे वगैरे नकोतं हं..
दिनेशदा, माकडांचे नारळ खाण्याचे कौशल्य वाचुन खुपच आश्चय वाटले. आणि कौतुक ही.
जिप्सी, माडाचा ही फोटो मस्तच..
सगळ्या नि.ग. वरील मंडळींना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेछा.
माकडे झाडावर नारळ (शहाळे)
माकडे झाडावर नारळ (शहाळे) फोडून खातात हा कार्यक्रम आम्ही अगदि साग्रसंगित खूप वेळा पाहिलाय. त्यांच्या हातून सुटलेली नारळ आम्हाला मिळायचे.( किंवा एखादवेळेस ती माकडे मुद्दाम आमच्यासाठी हातातून सोडत असतील, आमची दया येवून :डोमा:)
जागू, ह्या तणावाखाली तू होतीस का, मला वाटले पायाचे दुखणे. असो., आता हे एकून बरे वाटले.
जिप्सी, अरे नक्की काय चाललंय, आम्हालाही कळूदे, लाडू, पेढे, पार्टि ?
दिनेशदांच्या वाटेकडे कितीजण डोळे लावून बसलेत.
लाईफ या सिरिजमधे काही
लाईफ या सिरिजमधे काही माकडांचे कौशल्य दाखवलेय >>>>>>> हे पाहिल्याचं आठवत आहे, पण कोणत्या चॅनलवर पाहिल ते आठवत नाही.
डिस्कव्हरी..
डिस्कव्हरी..
ते फळ जंगली बदामाचे. मी
ते फळ जंगली बदामाचे. मी लिहिलेय तिथे.
प्रज्ञा, तारीख ठरली कि सांगतोच इथे.
हा करांदा अजुन छोटा आहे याचा
हा करांदा अजुन छोटा आहे याचा आकार अजुन चारपट किंवा त्याहुन मोठा होऊ शकतो.
प्रत्येक पानामागे एक करांदा, खरतर हे त्या वेलीचे मुळ आहे, वेळ उपळुन काढलीतर असाच एक करांदा जमिनीखाली असतो पहा....
http://www.maayboli.com/node/17277 -रानकंद - करांदे जागुतै स्पेशल.
पश्चिम द्रुतगती मार्गावर
पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रा येथील टिचरर्स कॉलोनी बस स्टॉपच्या बाजुला मुचकुंदाची बरीचशी झाडे लावली गेली आहेत सद्ध्या त्यांची उंची १० ते १२ फुट आहे. काहींना फुलेही लगडली आहेत.
पहील्यांदाच हे झाड नावासकट ओळखले आणि मनातल्या मनात खुश झालो.
धन्स निसर्गाच्या गप्पा -
Pages