सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
हस रे माझ्या मुला">>> वा क्या
हस रे माझ्या मुला">>> वा क्या बात है जिप्स, ......निज शैशवास जपणे अजुन काय असत ?
लहानपण देगा देवा !!
सगळयांना धन्यवाद ! ती आयरिसच
सगळयांना धन्यवाद ! ती आयरिसच आहे.
शशांक, तुझा झब्बू मस्तच ! ते पिलु घायाळ वैगरे झालं होतं का ? ते इतक्या जवळ येवू देत आहे आणि मध खात आहे म्हणून मला शंका आली.
दिनेशदा॑, गुलाब खुपच सुंदर !
श्रीकांत - अनुमोदन,
श्रीकांत - अनुमोदन, लोकमान्यांबाबतचा हा अनुभव "दुर्दम्य" या कादंबरीत आहे. तुकोबांबाबतही ही कथा (का दंतकथा) प्रचलित आहे.
जिप्सी - भटकंती, फोटोग्राफी, निसर्गप्रेम, स्मरणशक्ती, वक्तृत्व - अजून काय काय आहे ?
आपल्या येथील सर्व मंडळींचा एक मेळावा घ्यायला पाहिजे - म्हणजे त्यानिमित्ताने प्रत्येकातले असे विविध गुणदर्शन होईल - पुणे, मुंबई -असे कुठलेही ठिकाण चालेल. एकच अट - दिनेशदा, जागू किंवा इतरही पाककलानिपुण मंडळी आवर्जून पाहिजेत - शेवटी पोटोबा महत्वाचा.........
इन्डिगो - ते सनबर्डचे पिल्लू आईबाबांपासून दुरावले होते (कसे कोण जाणे), पण घायाळ नव्हते - दिवसभर आमच्याकडे होते - दुपारनंतर त्याच्या आईबाबांबरोबर उडून गेले - http://www.maayboli.com/node/24654 या लिंकवर सर्व हकिकत लिहिली आहे.
जिप्सी, मस्तच रे! तुझ्या
जिप्सी, मस्तच रे! तुझ्या पोतडीतपण खूप खूप काय काय आहे हं!.............. आणि इथे खूप गॅप नंतर दिसलास.
निज शैशवास जपणे अजुन काय असत ?
लहानपण देगा देवा !!>>>>>>>> १००० मोदक!!
आज इथल्या गप्पा थंडावल्या
आज इथल्या गप्पा थंडावल्या होत्या एकदम.. विकांताचा परिणाम.. मी देखील २ दिवस भटकून आलो. फुलांचे काही फोटो टिपलेत. १-२ दिवसात टाकतो..
मी ज्या ठिकाणी उमलणारे गुलाब
मी ज्या ठिकाणी उमलणारे गुलाब टीपत असतो, त्यापैकी या काही जागा.
भर रस्त्यावर, जिथे कुणी खतपाणी घालत नाही कि काटणी छाटणी करत
नाही, अशा जागी हे गुलाब मस्त फुलत असतात. आकर्षक रंग, सुंदर आकार
असे असले तरी सुंगध मात्र अजिबातच नसतो.
आणि अर्थातच तिथेच फुललेला हा निळसर गुलाब..
मी लहान होतो तेव्हा
मी लहान होतो तेव्हा आईवडिलांबरोबर काश्मीरला गेलो होतो त्या आठवणींपैकी एक म्हणजे तिथे घरांच्या कुंपणाला मेंदीची झाडं लावावी तशी गुलाबाची झाड लावली होती. मला त्याच मोठ नवल वाटल होत, सगळ्या घरांभोवती मग ते श्रीमंताच असो की गरीबाच, घराभोवती कुंपण गुलाबाच, तर्हेतर्हेचे गुलाब!! दुर्दैवाने तिथे आता फुले कमी अन काटे जास्त अशी परिस्थिती झाली आहे. देव करो अन पुन्हा फुले उमलोत.
निळा गुलाब भन्नाट!! दिनेशदा
निळा गुलाब भन्नाट!! दिनेशदा आणि श्रीकांत तुमचं वाचून ती म्हण किती सार्थ आहे हे कळतं....
'म्हणतात ना पिकतं तिथं विकत नाही!'
हुश्य... ८ दिवसांचा कोटा
हुश्य... ८ दिवसांचा कोटा नि.ग. वरचा वाचुन काढला. सगळ्यांनी कित्ती किती मस्त फोटो टाकले आहेत.
गुलाबांचे फोटो बघुन तर एक्दम प्रसन्न वाटले.
इंडिगो :- नि.ग. खुप खुप स्वागत. नाचणा पक्षी पण सुंदरच आहे.
जिप्सी ; तु खरचं औल -राऊंडरच दिसतोस. छान वाटतयं अशा मंड्ळींना बघुन
दिनेशदा, गुलाब पण खुपच सुरेख आहेत. तो निळा आहे कि लवेंडर कलर चा?
प्रिती, गुलाबामधे अगदी गडद
प्रिती,
गुलाबामधे अगदी गडद निळा रंग बरीच वर्षे मिळवता येत नव्हता. म्हणून याच
छटेला निळा गुलाब म्हणायची पद्धत पडली.
श्रीकांत,
मी स्विसमधे पण जागोजागी असे गुलाब बघितले, पण त्यांना नीट आकार नसे,
ते म्हणजे रानटी अल्पाईन गुलाब, त्यात मोजकेच रंग असतात, पुढे संकराने
वेगवेगळ्या छटा मिळवल्या गेल्या.
शांकली,
केनया हा गुलाबांचा मोठा निर्यातदार आहे. अगदी साच्यातून काढल्यासारखे
असतात ते गुलाब. पण त्यांची लागवड ग्लास हाऊसेस मधे करतात.
पण हि झाडे अशीच, कुणीतरी फांद्या खोचल्या असतील, तेवढेच.
निसर्गाची आणखी एक कलाकृती..
आज बर्याच दिवसांनी आले. कसे
आज बर्याच दिवसांनी आले. कसे आहात सगळे निसर्गप्रेमी ?
दिनेशदा छान फोटो. जागू कशी
दिनेशदा छान फोटो.
जागू कशी आहेस?
ओह, जागूतै - तू कशी आहेस ,
ओह, जागूतै - तू कशी आहेस , बर्याच दिवसांनी दर्शन???
आमच्या गप्पा चालूच आहेत -थोड्याफार- कधी थोड्या कधी फार-
दिनेशदांनी नैरोबीच्या नॅशनल पार्कातील प्राण्यांचे, पक्ष्यांचे व फुलांचे ही फोटो टाकलेत दोन भागात - किती पक्षी, किती प्राणी, किती फुले - आणि एव्हडीशीच माझी बुद्धी / स्मरणशक्ती ....... काय काय लक्षात ठेवावे (आणि कसे कसे) हेच कळत नाही...... (हतबल झालेला बाहुला....)
मोनाली सॉरी तुला फोन करायचा
मोनाली सॉरी तुला फोन करायचा राहून गेला. मामीलाही मी रिप्लाय नाही दिला.
अजुन तणाव कमी झालेला नाही.
जागूतै..........तणाव
जागूतै..........तणाव कसला?
गौरी मधुमालतीचं वाचून दिलासा मिळाला. लेट्स होप फॉर द बेस्ट!
जिप्सी, आत्ता कळलं, तुझ ते
जिप्सी, आत्ता कळलं, तुझ ते वेगवेगळ्या थिम्स वापरून फोटो टाकणे, कविता वगैरे हे सर्व लहानपणापासूनच किंवा म्हटलं तर उपजतच आहे.
जागू बरं झालं तू आलीस ते. ईथे कोणीही बरेच दिवस नि.ग. वर आले नाही की चुकल्यासारखे होते.
आता पायाचं दुखणं बरं आहे ना? काळजी घे.
धन्स लोक्स
धन्स लोक्स
अरे वा, जागू इज बॅक! कसले
अरे वा, जागू इज बॅक!
कसले सुंदर फोटो आहेत इथे! निळा गुलाब काय मस्त आहे!
माझ्याकडच्या बदामी एक्झोराच्या कळ्यांचा हा फोटो -
हा फोटो बघून मला ‘ज्वाला जश्या उसळती ...’ चीच आठवण येते
दिनेशदा, ती लाल फळं कसली
दिनेशदा, ती लाल फळं कसली आहेत? बेरीज आहेत का?
जागू, तुला बघून बरं वाटलं.
गौरी, एक्झोराच्या कळ्यांचा फोटो सुंदर! पूर्ण उमलल्या की त्या झुपक्याचा फोटो पण इथे दे.
वॉव! दिनेशदांचे गुलाब आणि ती
वॉव! दिनेशदांचे गुलाब आणि ती लाल फळं मस्तच!आणि गौरीचा एक्झोरा! माझ्याकडे लाल आहे. बदामी प्रथमच पहातीय.
दिनेश मस्त आहेत फळे.
दिनेश मस्त आहेत फळे. खाण्यायोग्य असतात का ही फळॅ?
गौरी मस्त.
मलाही बर्याच दिवसांनी येऊन
मलाही बर्याच दिवसांनी येऊन चांगले वाटले.
गौरी सेम एक्सोरा माझ्या ऑफिसमध्ये आहे.
कुणी आमची आठवण
कुणी आमची आठवण काढली???????
मी मधुमालती
आणि आम्ही एक्झोरा
नमस्कार पुन्हा
नमस्कार
पुन्हा एकदा........फुलांचा राजा.
शांकली, मानुषी, माधव, आभार.
शांकली, मानुषी, माधव, आभार. फुललेल्या एक्झोराचाही फोटो टाकीन.
मानुषी, एक्झोरामध्ये हल्ली बरेच रंग येतात. मी एका ठिकाणी फिकट पिवळा बघितला. लालच्या कॉम्बिनेशनमध्ये तोही फार सुंदर दिसतो.
माझ्याकडे लाल आणि बदामी एक्झोरा आहेत. या दोन्ही कुंड्या परस्परांपासून ५ -६ फुटाच्या आत आहेत. एक्झोरा लावल्यापासून आजवर (दोन - तीन वर्षात) लाल आणि बदामी कधीच एका वेळी फुलले नाहीत!
मी असं ऐकलं, की कमळांबाबत हा प्रयोग सिद्ध झालाय - एका टाक्यात दोन रंगाची कमळं एकाच वेळी कधीच फुलत नाहीत! (परागकणांची सरमिसळ होऊ नये म्हणून?)
जिप्सी, आशुतोष, (नेहेमीप्रमाणेच) सुंदर फोटो!
मधुमालती - रंगून क्रीपर -
मधुमालती - रंगून क्रीपर - Quisqualis indica Combretaceae family
फुले सुंदरच असतात, सुवासिक असतात.... पण..........
- प्रचंड चिवट वेल असते ही - किती ही उपटून टाका, इकडे नाही तर तिकडे उगवतेच, उपटताना हात सोलवटतील पण मुळासकट काढताच येत नाही - मूळ पार कुदळीने खणून काढावे लागते. या भागातील वेल खणून काढली तर त्या कोपर्यात उगवेल - फरशी, काँक्रीट - कशालाही दाद देत नाही........ ज्यांना कोणाला ही वेल आवडत असेल त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे. मी हे एकदम असं काय विचित्र लिहितोय - असा कृपया गैरसमज नसावा - एक सावधगिरीचा इशारा देऊ इच्छितो.
हो शशांक अगदी माझ्या माहेरी
हो शशांक अगदी माझ्या माहेरी हा वेल कुठच्या कुठे पसरून जिथे तिथे त्याची रोपे उगवतात. अगदी दुसर्यांच्या जागेतही रोपे उगवतात.
सगळ्यांचीच फुले मस्त. ती लाल
सगळ्यांचीच फुले मस्त.
ती लाल फळे खाण्याजोगी असतात. आंबट आणि किंचीत गोड लागतात.
कमळाबाबत हे नवीन ऐकतोय. सारसबागेतल्या देवळाभोवती, अनेक रंगाची कमळे (खरे तर वॉटर लिली) एकाचवेळी फुललेली बघितली आहेत. पनवेलला पण बघितली आहेत.
परागकणांची सरमिसळ सहसा होत नाही.
मधुमालती वरुन आठवले, पुर्वी हि नावे जूळ्या बहिणभावांची असत. आमच्या नात्यात आहेत.
गणेशउत्सवाच्या काळात पनवेल,
गणेशउत्सवाच्या काळात पनवेल, पेण, वरून कमळ फुले बाजारात येतात
उरणमध्येही नवघर ह्या गावी लाल
उरणमध्येही नवघर ह्या गावी लाल कमळांचे तळे आहे. पुर्वी ह्या गावात खुप कमळांची तळी होती. आता एक-दोन बाकी आहेत.
Pages