निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी !

मी सुद्धा निसर्गातील सुंदर गोष्टी पाहून टुणटुण उड्या मारणार्‍यांपैकी आहे - तुमच्या छान गप्पा खूप दिवसांपासून वाचते - आता टायपायचा कंटाळा सोडून गप्पांमधे सामिल व्हावं म्हणते Happy

आम्ही सिअ‍ॅटल मधे रहातो - आणि pacific northwest चा निसर्ग नितांत सुंदर आहे - आमच्या प्रदेशातील निसर्गा ची नवलाई तुम्हा सगळ्यांना सांगीतली तर माझ्याबरोबर टुणटुण उड्या मारायला अनेक मंडळी इथे सापडतील अशी आशा - नव्हे - खात्री च आहे Happy

खालच्या दुव्यावर humming birds वर एक भन्नाट documentary आहे. तुम्हा सगळ्या निसर्ग प्रेमींना माझा हा सलामी चा रामराम Happy

http://video.kcts9.org/video/1380512531

हो शांकली, ती नाहीच आपली.. आणि निलगिरीला तर ते नाव, केवळ त्या पर्वतावर ब्रिटिशानी लागवड केली म्हणून पडलेय.

इन्डीगो, मला आवडेल उड्या मारायला. या हमिंग बर्डचे नवल वाटते, निव्वळ साखरपाणी एवढाच आहार आणि हे विविध रंग, उड्डाण क्षमता आणि कौशल्य.. लाजबाब.

आशुतोष, ऐकत नाय !!

नमस्कार इंडिगो - नि ग वर स्वागत, घरी बघेन ती हमिंग बर्डची डॉक्युमेंटरी. तुमच्या परिसरातील झाडे / प्राणी/ पक्षी यांबद्दल जाणून घ्यायला आवडेलच.
दिनेशदा - मला वाटतं, नुसत्या साखरपाण्यावर नाही रहात हा हमिंग बर्ड, तर काही किडेही खातो हा - जगण्याकरता त्याला "प्रथिने" तर मिळालीच पाहिजेत ना........
आशुतोष - हे फोटो छान आहेत, मागील फोटोमधे जरा गडबड झाली बहुतेक.

आशुतोष, जबरदस्त फुलं. मस्तच एक्दम
शांकली, ती शेन्ग काय cute दिसतेय. छान वाटतं इकडे येऊन.
जागू, तुझे सर्व तणाव लवकर संपोत.

जिप्सी, दिनेशदा, शांकली, आशुतोष फोटो मस्तच.
>> जागू, तुझे सर्व तणाव लवकर संपोत +१
शांकली, शेंगेची रंगसंगती फारच सुंदर आहे!
आमच्या ऑफिसच्या बाहेर तामणीची झाडं आहेत. बाकी सगळ्या लँडस्केपिंगमध्ये तेवढीच अस्सल देशी झाडं. फुलं + मागच्या वर्षीची बोंडं फार मस्त दिसतात.

दिनेशदा, गौरी धन्यवाद. कोरफड, ओवा(?) लावता येतात का? काही औषधी वनस्पती लावता येतील का?
गौरी , ऊन खुप नाही आहे. काही कुंड्यांना दुपारनंतर मिळते. बाकी कुंड्या लख्ख सुर्यप्रकाशात आहेत पण थेट ऊन काही महिनेच मिळते.

मानुषी,वैजयंती,गौरी धन्यवाद.
दिनेशदा, या ऑस्ट्रेलियन बाभळीची सुद्धा बेसुमार लागवड झालीये सगळीकडे. नीलगिरी सारखीच ही पण झाडं आता सगळीकडे दिसतात.
पण पुण्यात काही ठिकाणी मात्र आवर्जून आपली म्हणजे देशी झाडं लावली आणि वाढवली जाताहेत. त्यांपैकीच हा रोहीतक..
पुण्यात रस्त्याच्याकडेला अनेक ठिकाणी हा वृक्ष दिसतोय. याची पानं साधारणपणे सोनचाफ्याच्या पानांसारखी दिसतात. अगदी हिरवीगार आणि दाट पानं असल्याने हा वृक्ष खूप सुंदर दिसतो. नीलायम थिएटरच्या रांगेत पाथफाईंडरजवळ फूटपाथवर हा एक वृक्ष आहे. शिवाय जोगेश्वरीच्या बोळात (डॉ.सानेमॅडमच्या घराजवळ) पण एक जुना आणि खूप मोठा वृक्ष आहे. सध्या त्याला उंबरांसारखी फळं लागली आहेत. ही फळं पिकली की त्यातून अगदी लालबुंद रंगाच्या एका फळात ३/३ बिया बाहेर पडतात. या रक्तवर्णी बियांमुळेच याला रोहीतक असं नाव मिळालंय. याचं बोटॅनिकल नाव आहे - Amoora rohitaka.....

ही हिरवीगार पानं....

warli 024.jpg

आणि ही सुंदर फळं....

warli 008.jpg

फळं उकलून बिया बाहेर आल्या की त्यांचेही फोटो इथे देईन. फारच सुंदर दिसतात ह्या बिया पण.

इंडिगो, नि.ग. वर स्वागत. माझ्याकडे पण ती क्लीप दिसत नाही. Uhoh
जागू, आमची काही मदत होणार असेल तर सांग.

दिनेशदा, शशांक, शांकली, प्रज्ञा स्वागतासाठी आणि प्रतिसादासाठी हार्दिक धन्यवाद !
आणि जागू लवकरच ताण संपवून परत यावी ही माझी सुद्धा शुभेछा !

अरेच्या, क्लिप कोणालाच दिसत नाहीये का पण ? मी youtube वर पाहिलं - तर ह्या फिल्म ची preview clip सापडली - ही नक्की दिसेल - संपूर्ण नाहीये पण एक झलक -

http://www.youtube.com/watch?v=Dr79FirG-7g

ह्या भयंकर चुळ्बुळ्या आणि चपळ पक्ष्याला फिल्म वर कस पकडलं यावर प्रोडुसर ची 'behind the scenes' clip - ही पण खूप सुंदर आहे -
http://www.youtube.com/watch?NR=1&feature=endscreen&v=hjnc1kHMDDo

शांकली, किती सुंदर गं रोहीतक ! बीयांच्या फोटो साठी धीर धरावा लागणार असं दिसतय पण Happy झाडाचाही टाक ना जमला तर फोटो - म्हणजे पुढच्या वेळी पुण्यात आल्यावर दिसला तर 'वळख पटेल' Happy

शांकली धन्यवाद
नेहमी दिसणार्‍या या झाडाबद्दल माहीती दिल्या बद्दल, अशी अनेक झाडे आपल्या परिसरात आहेत पण त्या बद्दल आपल्याला माहीती नसते किंवा आपण ती करून घेण्याचा प्रयत्न पण करत नाही.

दिनेशदा , मागे ज्या पक्ष्या च्या घरट्या बद्दल माहिती टाकली होती , त्या पक्ष्या बद्दल नेट वर सर्च केले तेव्हा त्याचे खालील फोटो मिळाले , त्याचे नाव आहे The White Throated Fantail Flycatcher:wtfantail1.jpgwtfantail.jpg

शांकली, मग याचा फुलोरा पण चांगलाच असणार.
ज्ञानेश, हा पक्षी धीट असतो नाही, अगदी खिडकीजवळ पण येतो. नाच बघण्यासारखा असतो त्याचा.

चातका,
परत, मस्कतची आठवण येतेय. पुढच्या महिन्यात चार वेळा दुबईमधे उतरेन, पण ट्रांझिट मधेच असेन.

आशु... केशरी गुलाब खुप सुंदर दिसतोय.

त्या 'छोटु'चा पिसारा काय मस्त दिसतोय. 'नाचण' नाव अगदी शोभतं हं त्याला. Happy

शांकली, या रोहितकाची फळे अंजीराच्या / उंबराच्या जातीची दिसतात का? अगदीच अडाणी प्रश्न आहे का?
ज्ञानेशचा पक्षी fan tailed flycatcher आहे ना? त्याचा एक लांबचा भाऊ असेल माझ्याकडे. मिळाला तर टाकते. हा नाचण फारच गोड दिसतोय.

वैजयन्ती - या रोहितकाची फळे अंजीराच्या / उंबराच्या जातीची दिसतात का? अगदीच अडाणी प्रश्न आहे का?>>>> अजिबात अडाणी प्रश्न नाहीए, मी कालच ही फळं बघून अंजूला (शांकलीला - माझी बायको) हाच प्रश्न विचारला. पण नंतर त्याबद्दल वाचताना कळले - दोन्ही वेगवेगळ्या कुळातले आहेत.
रोहितक - Meliaceae family
उंबर / अंजीर - Moraceae family
नाचण फारच छान नर्तक आहे, शीळही गोड असते याची, आमच्या घराच्या आसपास दिसतो अधूनमधून.

खूप वाईट वाटतंय लिहिताना............
पण मध्यंतरीच्या पायाच्या घोळात मधुमालतीकडे दुर्लक्ष झालं . बहुतेक मधुमालतीने मान टाकलीये.
काय काय करून तो वेल मी मोठा केला होता.
लोखंडी जिन्याखाली त्याची कुंडी होती. आणि जिन्याच्या लोखंडी पट्ट्यातून तो वेल मस्तपैकी वर चढत गेला होता. चांगलाच मोठा झाला होता. अजून फुलं आली नव्हती.

बहुतेक मधुमालतीने मान टाकलीये.>>>> अरेरे, पण भलती चिवट असते ही वेल - अजून तगेल असे वाटते, थोडे थोडे पाणी घालून वाट पहाणे.

शांकली, शशांक, हितकाची माहिती आणि फोटो सुंदरच!
चातक, ज्ञानेश मस्त फोटो ! नाचण नावच काय मस्त आहे नाचणार्‍या पक्ष्याचं!

ससा, मूळाखाली उंदरानी कुरतडलेलं वगैरे नाही ना ?
मी जे गुलाबांचे फोटो टाकत असतो, ती झाडे जिथे ऊगवली आहेत / वाढत आहेत त्या जागांचे फोटो टाकले तर तूमच्या विश्वासही बसणार नाही.
कुणीही कसलीही काळजी घेत नाही, तरी ते गुलाब मस्त फुलत असतात

Pages