सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जिप्सी, क्काय सह्ही फोटो आहेत
जिप्सी, क्काय सह्ही फोटो आहेत रे तामणीचे! म्हणजे आधीच ते फूल सुंदर आणि त्यात त्याचे फोटो तू काढलेस! म्हणजे सुवर्णाला सुगंध प्राप्त झाला की!
हे फोटो मी तुला न विचारता चोरणार आहे!
तू पुण्याला ये बरं इथल्या मित्रमंडळींचे फोटो काढायला........ तुझी नजरच पाहिजे.. आमाला काय जमत नाय अशे फुटू काडायला.
शोभा......
शोभा......
मानुषी, ते सूर्यपक्षी. मी पण
मानुषी, ते सूर्यपक्षी. मी पण त्यांना अगदी सकाळीच बघतो.
मला वाटतं एकदा साखरपाणी प्यायल्यावर, परत ते तयार व्हायला
वेळ लागत असावा. संध्याकाळी पण दिसतात ते.
चला, शुभ सोमवार...
धन्स दिनेशदा....फोटो पाहुन
धन्स दिनेशदा....फोटो पाहुन फ्रेश वाटलं.....
अरेच्या! तुमच्याकडे सोमवार
अरेच्या! तुमच्याकडे सोमवार सुरू पण झाला? इथे अजून रवीवारच आहे.
शुभ सोमवार तुम्हाला. धन्स दिनेशदा....फोटो पाहुन फ्रेश वाटलं.....>>>>> अगदी बरोबर! सुंदर गुलाब.
पानांचा आकार आवडला म्हणून हे
पानांचा आकार आवडला म्हणून हे रोप आणले होते. आता छान वाढीला लागलंय.
नाही, आमचा सोमवार तूमच्या
नाही, आमचा सोमवार तूमच्या नंतरच.
किती सुंदर आकार आहे पानांचा, पण प्रत्येक संयुक्त पानातल्या पानांची
संख्या वेगवेगळी आहे.
आपल्याकडे पुर्वी झिपरी नावाचे झाड असायचे, त्याची पाने वेणीत गुंफ़त
असत. तसेच एक वेडे झाड पण असायचे. त्याचे प्रत्येक पान वेगळ्या आकाराचे
असे. या दोन्ही झाडांना फुले येत नाहीत.
दिनेशदा त्या दोन्ही झिपर्या
दिनेशदा त्या दोन्ही झिपर्या माझ्याकडे आहेत. गडबड संपली की फोटो टाकेन.
सोमवार्ची छान सुरुवात. आता
सोमवार्ची छान सुरुवात. आता आठवडा मस्तच जाईल. धन्यवाद दिनेशदा आणि शांकली.
धन्यवाद हे फोटो मी तुला न
धन्यवाद
हे फोटो मी तुला न विचारता चोरणार आहे!>>>>शांकली, बिनधास्त मला संपर्कातुन तुमचा ईमेल पाठवा ओरीजनल (वॉमा) नसलेले फोटो धाडतो.
विसरलेच होते.. जिप्सी, सुंदर
विसरलेच होते.. जिप्सी, सुंदर फुलांनी रविवार छान गेला. फारच सुंदर फोटो.
जागू, गडबड लवकरच संपो, अशी
जागू, गडबड लवकरच संपो, अशी मनोमन प्रार्थना. आज इथे पोस्ट वाचून खुप बरे वाटले.
अरेच्या आज नि ग वर फारसं कुणी
अरेच्या आज नि ग वर फारसं कुणी आलं नाही? जरा चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय!!
दिनेशदा, वर जो फोटो दिलाय त्याला फुलं येतात का? ते रोप अजून लहान आहे त्यामुळे आत्तापर्यंत तरी त्याला फुलं आली नाहीयेत. अजून एक फुलं न येणारं आयव्ही (Ivy) चा छोटा वेल आहे. त्याच्या पण पानांचा आकार आणि रंगसंगती छान आहे. त्याचा फोटो...
जिप्सी, धन्यवाद. फार सुंदर
जिप्सी, धन्यवाद. फार सुंदर आलेत फोटो तामणीचे, खरंतर तू काय, दिनेशदा काय आणि जागू काय फार सुंदर फोटो काढता.... त्यामुळे हे सगळेच फोटो माझ्याकडे असावेत असं वाटत रहातं......
शांकली, खरं आहे तुझं! सुंदर
शांकली, खरं आहे तुझं! सुंदर फोटो येण्यासाठी नुसता कॅमेरा चांगला असून भागत नाही. नजर तयारीची असावी लागते.
थोडं दिषयांतर......... काल मी संगीत मानापमान हे नाटक बघून आले. अतिशय सुंदर नाटक, नेपथ्य, गीते, गायक, एकूणच सर्वांगसूंदर असे हे नाटक आहे. ज्यांना नाटकांची (म्हणजे नाटके पाहाण्याची :)) त्यांनी जरूर हे नाटक पाहावे. काल शुभारंभाचा प्रयोग होता.
अरे हे काय? आजपण इथे कोणी
अरे हे काय? आजपण इथे कोणी दिसत नाही आहे. बरं मला नवीन घरात झाडे लावायची आहेत. बहुतेक तरी सगळी छोट्या कुंड्यातुन लावावी लागतील. कारण ग्रिलच्या बाहेरील बाजुने लावावी लागणार आहेत . कुंड्या अगदी छोट्या वापराव्या लागतील. तर तिथे कोणती झाडे लावता येतील ? मला शेवंती, तुळस, सदाफुली , पुदिना एवढेच सुचतेय. शिवाय मी बाल्कनीत अॅली बनवलीय तिथे २-३ वेल लावता येतील. तिथे काय लावु? जुन्या घरी बोगनवेल, प्राजक्त, चाफा, सोनचाफा होते. मधुमालती आणि कण्हेर फुलेच येत नसल्याने काढुन टाकावी लागली. कारण ती नुसतीच प्रचंड वाढायची त्याचा इतर झाडांना त्रास व्हायला लागला. साधारण बारमाही फुलणारा एखादा तरी वेल लावायचा आहे. स्वस्तिक इतक्या कमी जागेत नाही येणार ना?
तसेच थेट सुर्यप्रकाश नसला तरी चालेल अशी काही छोटी झाडे आहेत का?
आस, किचनच्या जवळ खिडक्या
आस, किचनच्या जवळ खिडक्या असतील (आणि पक्ष्यांचा त्रास नसेल तर ) कोथिंबीर, लसून, आले, अळीव, मिरच्या लावता येतील.
गाजर, बीट, मूळा यांच्या वरच्या चकत्या कापून खोचल्या तरी त्यांना छान धुमारे फुटतात. सुंदर दिसतात.
मूग, मटकी, वाटाणे यांचे वेलही छान दिसतात.
अननसातही आता काही शोभेचे प्रकार मिळतात.
पॅशनफ्रुटची तर मी नेहमीच शिफारस करतो (इथेच फोटो पण आहेत.) वेलही छान, फुलेही छान आणि फळांचे सरबतही छान.
शांकलीला अनुमोदन. खरचं सुंदर
शांकलीला अनुमोदन. खरचं सुंदर सुंदर पानफुलांचे, पक्ष्यांचे फोटो बघुन खुपच छान वाटते. दिवस अगदी
मस्त जातो. दिनेशदांचा गुलाब तर अप्रतिमच..
नि. ग. मुळे आमच्यासारख्यांच्या माहीतीत खुपच भर पडते आहे.
आपल्या जागूतै, जरा तणावाखाली
आपल्या जागूतै, जरा तणावाखाली आहेत. त्याना लवकरच दिलासा मिळो, अशी आशा करतो.
हि त्रिकोणी पानांची वेल मी जास्त करुन क्रुत्रिमच बघितली आहे.
आस, ऊन किती येतं त्या जागेत?
आस, ऊन किती येतं त्या जागेत? कबुतरांचा त्रास आहे का? रोज किती वेळ बागेकडे लक्ष देणं शक्य आहे?
फार लहान कुंड्या असतील तर दररोज / दिवसतून दोन वेळासुद्धा पाणी घालावं लागेल.
तुळस, शेवंती सदाफुली यांना थोडंतरी ऊन आवश्यक आहे. थेट सूर्यप्रकाश नसेल तर बाल्सम, फिलोडेड्रॉन, अन्य शोभेच्या पानांची झाडं लावता येतील.
बापरे, कित्ती छापलेय इथे..
बापरे, कित्ती छापलेय इथे.. मी अधुन्मधुन्च वचलेय.. आता एकदा पुर्णवाचायला हवे.
दिनेश, तुम्ही लिहिलेय ते बांडगुळासारखे काहितरी माझ्या कॉलनीत आहे दोन झाडांवर. फोटो टाकेन इथे.
ओक्के..ते सूर्यपक्षी का? मला
ओक्के..ते सूर्यपक्षी का? मला वाटलं हेच फुलचुखे!
गेल्या मे जून मध्ये माझ्या
गेल्या मे जून मध्ये माझ्या घरा जवळ एका पक्ष्या ने हे घरटे बांधले होते. ह्या घरट्या चा आकार कोना सारखा असतो कोनाचा वरचा भाग छान विणलेला असतो पण खालचा भाग अर्धवट विणलेला, सोडलेला असतो , हे घरटे एका अनंताच्या झाडा वर जमिनी पासून ५ - ६ फुटा वर बांधले होते , हा पक्षी साधारणता डिसेंबर january च्या दरम्यान दिसू लागतो , ऑगस्ट पर्यंत असतो व नंतर दिसेनासा होतो , ह्या पक्ष्याचा आकार चिमणी एवढा आहे , तो छोट्या फांद्या वर सहसा नाचताना आढळतो, व नाचताना शेपटी फुलवून छान शिळ घालतो, गेल्या वर्षी घरटे बांधले तेव्हा मादी घरट्या बसली असायची आणि नर सारखा लक्ष्य ठेवून असायचा , कावळ्याला जवळच्या दुसर्या झाडा वर पण बसून द्यायचं नाही , सतत त्यांना हुसकावून लावायचा ; पण घरटे रहदारीच्या वाटेवर असल्या मुळे किंवा इतर कारण मुळे ह्या जोडीने लवकरच त्या घरट्याचा त्याग केला व लगेचच दुसऱ्या झाडा वर चांगलेच वरती दुसरे घरटे बांधले , फार वरती असल्या मुळे तसेच हे झाड चांगलेच हिरवे गार असल्या मुळे काहीच निरीक्षण करता आले नाही , खालील फोटो ( पहिल्या घरट्याचा ) mobile मधून घेतल्या मुळे क्लीअर नाही आहे , क्षमा असावी , फोटोत मादी ( नरही असू शकतो , काही जातीत नरही अंडी उबवतो ) घरट्यात बसलेली दिसत आहे , जाणकारांनी वारणा वरून पक्ष्याचे नाव सुचवावे
(No subject)
sorry दोनदा सेम फोटो उपलोड
sorry दोनदा सेम फोटो उपलोड झाला
नमस्कार
नमस्कार
आशुतोष गुलाब मस्तच! सध्या २/३
आशुतोष गुलाब मस्तच!
सध्या २/३ दिवस ऑफिसतर्फे मी ट्रेनिंगला कोरेगाव पार्क इथल्या ट्रेनिंग सेंटरला येतीये. लंच मधे आसपासच्या लेन्स मधून फिरताना काय मस्त वाटतं! दोन्ही बाजूंना दाट झाडी आणि स्वच्छ रस्ते.
आज दुपारी ही ऑस्ट्रेलियन बाभळीची उकललेली शेंग दिसली. तिचा अनोखा आकार आणि काळ्या मण्यांसारख्या बिया मला खूप आवडल्या. तिचा फोटो...
शांकली कसल्या फनी दिसतायत गं
शांकली कसल्या फनी दिसतायत गं त्या शेंगा?
जागू तणावाखाली म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का?
आशुतोष, गुलाब खूपच टवटवीत आहेत. एखादे तोडून घ्यावेसे वाटते.
शांकली, ती ऑस्ट्रेलियन बाभूळ
शांकली,
ती ऑस्ट्रेलियन बाभूळ जमिनीखालच्या केबल्स पण उध्वस्त करु शकते.
हो प्रज्ञा, तणावाखालीच आहे ती.
ज्ञानेश, फोटो आणखी नीट घेता
ज्ञानेश,
फोटो आणखी नीट घेता आला तर पहा ना.
आशुतोष, मस्त गुलाब.
Pages