घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी

Submitted by निराली on 28 May, 2011 - 17:24

परदेशातल्या व देशातल्या घरांमधे एक मोठा फरक जाणवतो तो म्हणजे धुळीचा व स्वच्छतेचा.
परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते पण भारतात रोजचं डस्टिन्ग निदान दोनदा तरी करावं लागतं. पण दोन्ही ठिकाणी जर right tools and products माहीती असतील तर काम खुप सोप्पं होतं.

काही बाफं वर सिंक व बाथरूम किंवा भांडी कशी स्वच्छ ठेवावीत हे प्रश्नं पाहिले म्हणून हा घराच्या स्वच्छतेचा (सगळ्याच प्रकारच्या) धागा उघडलाय.

बरेच वेळा काही जणांना जे products किंवा पद्धती अगदी बेसिक वाटतील त्या बकिच्यान्ना माहिती पण नसतील त्यामुळे जे काय माहिती असेल, बेसिक किंव्हा रीसर्च केलेले ते सगळे लिहावे, ज्याने अनेकांना
मदत होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे कुटुम्ब आवाक्यात आलेली पाल फडक्याने हाताने पकडून सरळ बाहेर फेकून देते . मुलगी मात्र ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई करीत पळून जाते.

Reema , गोदरेज चे पेस्ट कंट्रोल चांगले आहे. मी ३ वर्षे झाली करुन घेते. नो प्रोब्लेम. वर्षभराचा कॉन्ट्रक्ट घेतात. वेळ झाली की तेच फोन करुन आठवण करुन देतात व येउन करतात. करुन पहा.

कुटुम्ब आवाक्यात आलेली पाल फडक्याने हाताने पकडून सरळ बाहेर फेकून देते .>>>> फेकता का? मारा ना तिला. म्हणजे मी तरि तसेच करते. (मेनका / मनेका गांधी येथे सदस्य नाही ना Happy )

फेकता का? मारा ना तिला. >>monalip, त्यासाठी पण किती धैर्य लागते. मी घरात पाल आली की माणसेच शोधते पालीला हाकलायला.
मनिमाऊ, तुम्ही कसा बंदोबस्त केला आहे पालींचा?

आमच्याकडची पाल दिसली नाही बर्‍याच दिवसांत. मुव्ह केलं बहुतेक.
बाकी आमच्याकडे मी पाल आली असं मी ओरडले की 'वा वा पाल आली का? छान' असं उत्तर मिळतं आणि ती पाल घरभत हुंदडत रहाते. Proud

आमच्या कुटुम्बाचा म्हणे कॉलेजात झूलॉजी विषय होता व तिथे डिसेक्शनला बेडकं, झुरळं, पायला, असले प्राणी कापून कापून त्यांची म्हणे भीड चेपलीय.(आणि त्यांचे ईईई ऊऊऊ हे कॉलेजातच झालय :फिदी:) आणि मुलीचा ए ग्रुप असल्याने तिने प्राण्यांची चित्रे पुस्तकातच पाह्यलीत. शिक्षणाचा जीवन घडवण्यात संबंध येतो तो असा ! Happy

बाजो मी पण पायला ची शेल्स गोळा करून त्यांची माळ बनविली होती. फर्स्ट यीअरला. वैनी बाय गरवारेला होती का?

बादवे आज बीन बॅग शिवली. घर पण नीट आवरले. हे उगीच बाफचा मान राखायला हो.

झूलॉजी विषय होता व तिथे डिसेक्शनला बेडकं, झुरळं, पायला, असले प्राणी कापून कापून त्यांची म्हणे भीड चेपलीय.(आणि त्यांचे ईईई ऊऊऊ हे कॉलेजातच झाल>>> हो हो अगदी. मी पण एस. वाय. पर्यंत ते करुन घेतले आहे. अर्थात त्या आधी पण मी सरळ पालीला मारुन मोकळी व्हायचे. आणि ते ईईईई ऊऊऊऊऊ भावासाठी राखुन ठेवले होते Happy

@ Reema, अग ते पिचकारी सदृश उपकरणातुन जेल ते थेंब सगळीकडे लावुन जातात. अगदी १ मि. पण वास नाही, आवरासावर नाही. फक्त पाणी असते तेथे स्प्रे करतात.

मनिमाऊ, तुम्ही कसा बंदोबस्त केला आहे पालींचा? >>>> स्वाती, माझ्या घरात पालच नाही त्यामुळे घालवायचा प्रश्नच नाही. असती तर मी त्या घरात राहिलेच नसते. हा एकदा युसला असताना टेरेसमधे पाल दिसली बागेत. मी टेरेस लॉक केलं ते ३५ दिवसांनी उघडलं तो आल्यावर. Sad मी मरुन जाईन जर कधी माझ्या जवळपास पाल आली तर.

माझ्या घरात पालच नाही >> तेच ते. पाल येतच कशी नाही. काही उपाय आधीच करुन ठेवले आहेत का? हे विचारायचे होते. Happy

धन्स मधुरिमा आता हा उपाय करूनच बघते. मनिमाऊ मी सगळे उपाय करून थकले त्या विचित्र मुंग्यांसाठी ...बघू आता योडिचा उपाय करून बघते .

गोदरेज चे पेस्ट कंट्रोल चांगले आहे
अनुमोदन. माझ्याकडे उंदरांचा त्रास होता, पण या पेस्ट कंट्रोल नंतर एकदाही उंदिर, झुरळं वगैरे घरात दिसले नाहीत. एकदा तर पेस्ट कंट्रोल करुन गेल्यावर आठ दिवसांनी मुंग्यांची रांग दिसली , तक्रार केल्यावर माणूस परत येऊन औषध फवारुन गेला.

ह्म्म मोना. खरंच. तिथे ऊन नाही त्यामुळे कमी झाडं आहेत. करीपत्ता, कुंदा आणि ब्रम्हकमळ, पार वाट लागली. Sad कोरफड फक्त जगली.

पेस्ट कंट्रोलने मुंग्या, किडे, चिलटं, कोळी यातले काहिच होत नही घरात. फक्त ते रेग्युलर करत रहावे लागते.
घरात मांजर असेल तर पाल पण कधिच येत नाही Happy

.

अमा, शक्यतो काम झाल्या झाल्या कोमट पाणी आणि मायक्रोफायबर क्लॉथ वापरुन लगेच पुसून टाकायचा. आणि दुसर्‍या कोरड्या कॉथने कोरडा करायचा. गरज पडल्यास पाण्यात डीश धुवायचा सौम्य सोप घालून त्याने पुसायचे आणि नंतर कोमट पाण्याने पुसून कोरडा करायचा.

परदेशात खुप कमी श्रमात घर स्वच्छ ठेवता येते >> हे कसे काय कोणि सांगेल का? सगळी पाने वाचली पण याचे उत्तर नाहि मिळले.

मी रोज रोज माझे bathroom स्वछ करते .. पण तरिही बाथरूम मधुन लसना सारखा वास येतो .. कंटाळा आला .. फिनाइल वेग्वेगळे परयोग केले .. मला वाटते बाथरूम च्या पआइप मधुन वास येतो .. त्यात सुगंधी गोळ्या टाकल्या सर्व काहि केले .. काय सोलुश्न आहे..

इब्लिस | 16 January, 2013 - 21:32

>>
अतिशय घाणेरडी पोस्ट. जरा कंस्ट्रक्टिव्ह लिहा काहीतरी कधीतरी,....

मुंबईतल्या धुळीने मी वैतागलेय अगदी.

बाहेरुन घरात आलेली धूळ मी नियमीत साफ करते. आम्ही चपला दाराबाहेर काढतो, दारात मॅट आहे. दिवसभर घर बंद जरी असले तरी संध्याकाळी घरभर धुळ साचलेली असते. घरात येणारी धुळ कमी करण्याचे काही उपाय आहेत का?

हॉलला एक मोठ्ठी खिडकी आणि एक फ्रेंच विंडो आहे, बेडरुमला दोन मोठ्या खिडक्या आहेत, बाकी खोल्यांना एकेक खिडकी आहे. यामधुन येणा-या धुळीचा प्रतिबंध कसा करावा?

Pages